एका तरुणाचा प्रेमविवाह झाला.. प्रेयसीची बायको झाली आणि संसार सुरू झाला...
लग्नाआधीचे गुलाबी दिवस संपले अन् तारेवरची कसरत सुरू झाली..
लग्नाआधी तो बायकोसाठी कविता करायचा.. मात्र आता कवितादेखील सुचेना... त्यावरून त्याचा एका मित्रासोबत संवाद सुरू होता...
मित्र- काय रे भावा...? आज काल कविता लिहीत नाहीस.. आधी तर सुंदर सुंदर कविता करायचास..
विवाहित मित्र- तुला हवा असेल तर निबंध लिहून देतो...
मित्र- कविता आणि निबंधात काय फरक..?
विवाहित मित्र- प्रेयसीच्या तोंडातून निघालेला एक शब्ददेखील कविता असतो.. आणि पत्नीच्या तोंडातून निघालेला तोच एक शब्द निबंधासारखा असतो...
मित्राचे डोळे पाणावले...