सोशल मीडियावर सैराट मधल्या 'सुमन अक्का'च्या स्टायलिश लूकला मिळते अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 09:00 AM2021-12-24T09:00:00+5:302021-12-24T09:00:00+5:30

'सैराट' ( Sairat Movie) सिनेमाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही मिळवून दिलं. रसिकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिलं.

Sairat Fame Suman Akka Aka Chhaya Kadam is been liked very much by fans over social media, check her gorgeous look here | सोशल मीडियावर सैराट मधल्या 'सुमन अक्का'च्या स्टायलिश लूकला मिळते अधिक पसंती

सोशल मीडियावर सैराट मधल्या 'सुमन अक्का'च्या स्टायलिश लूकला मिळते अधिक पसंती

googlenewsNext

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा 'सैराट'. ''झिंग झिंग झिंगाट''च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. रसिकांप्रमाणेच सैराटची भुरळ बॉलीवुडलाही पडली. त्यामुळे बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा रिमेक बनवला.

'सैराट' सिनेमाने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं. महाराष्ट्राच काय सगळीकडेच सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. 'सैराट' सिनेमाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही मिळवून दिलं. रसिकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिलं. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच सिनेमातून त्यांच्यातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. हा सिनेमा मराठी सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.'सैराट' सिनेमाच्या कथेसह सिनेमातलं संगीतही रसिकांना भावलं. सैराट सिनेमाने ख-या अर्थाने मराठी सिनेमांची ताकद आणि उंची वाढवली.

'सैराट'मुळे अभिनेत्री छाया कदमचीही प्रचंड चर्चा झाली. 'सैराट' सिनेमात लहान पण दमदार भूमिकेत झळकलेल्या सुमनअक्का अर्थात छाया कदम यांना सुद्धा या सिनेमामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली.आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची मनं जिंकली.'सैराट'च नाहीतर 'फँड्री' आणि 'रेडू' सिनेमातल्याही भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली होती.

छाया कदम यांनी 'न्यूड' या सिनेमांत न्यूड मॉडेल्सची भूमिका साकारली होती.भूमिका परफेक्ट व्हावी यासाठी त्या प्रचंड मेहनत घेतात.छाया कदम सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहेत.सोशल मीडियावर त्यांचे विविध अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात. त्यांचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. एक से बढकर एक फोटो चाहत्यांच्या नजरा वेधून घेत असतात.

 छाया कदम या मराठी चित्रपटसृष्टीतील आज रसिकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे.ऑनस्क्रीन साध्या सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या छाया कदम खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहेत.सोशल मीडियावर त्यांचे विविध अंदाजातील फोटो पाहून चाहतेही त्यांचे कौतुक करत असतात. छाया कदम जितक्या सोज्वळ तितक्याच त्या ग्लॅमरस असल्याचे त्यांचे फोटो पाहिल्यांनर कळते.

Web Title: Sairat Fame Suman Akka Aka Chhaya Kadam is been liked very much by fans over social media, check her gorgeous look here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.