मोबाईल ऍपद्वारे प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ पहिला मराठी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 12:06 PM2018-04-04T12:06:05+5:302018-04-05T14:32:13+5:30

दादासाहेब फाळकेंनी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला . त्यांचा वारस सांगणारे मराठीतील कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत ...

The first Marathi movie, 'Love-Luffade', is aired by the mobile app | मोबाईल ऍपद्वारे प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ पहिला मराठी चित्रपट

मोबाईल ऍपद्वारे प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ पहिला मराठी चित्रपट

googlenewsNext
दासाहेब फाळकेंनी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला . त्यांचा वारस सांगणारे मराठीतील कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत आहे ही मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद बाब ठरावी. ही अभिमान वाटणारी कामगिरी घडवून आणणार आहे ‘लव्ह-लफडे’ नावाचा चित्रपट. मोबाईल ऍपद्वारे जगभर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट होय.

मराठी चित्रपटांचा दर्जा दिवसेदिवस अधिकच उंचावत जात आहे. नवीन येणाऱ्या आणि आलेल्या चित्रपटांचा आशय हा खूप चांगला असतो. विषय नाविन्यपूर्ण असतात पण हे विषय समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे वेळ आणि पैसा. तत्रंज्ञानाच्या युगात प्रत्येक जण हा आप-आपल्या कामात व्यस्त असतो अथवा मोबाईल मध्ये व्यस्त असतो. कुटुंबाकरिता मनोरंजनासाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईल ऍप द्वारेच प्रेषकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न मराठी चित्रपट क्षेत्रात पहिलांदा होत आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात एचसीसी नेटवर्क ऍपद्वारे चित्रपट प्रदर्शित करणारे हे पहिलेच ऍप ठरणार आहे. अशा प्रकारे लवकरच एचसीसी नेटवर्क ऍपद्वारे प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ‘लव्ह-लफडे’. 

प्रेम म्हटलं की प्रेमाच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी, गंमतीजमती घडतात त्याचं चित्रण म्हणजे ‘लव्ह-लफडे’. सचिन आंबात यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे नवीन चेहरे तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.

Web Title: The first Marathi movie, 'Love-Luffade', is aired by the mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.