शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

झिंगझिंग लापालापा

By admin | Updated: January 9, 2016 15:02 IST

साहित्याच्या प्रांतात आपल्या पाऊलखुणा उमटवणा:या तीन बिनीच्या तरुण साहित्यिकांना चार प्रश्न; त्यांच्या काळाने त्यांच्यापुढे वाढून ठेवलेल्या संधी आणि संकटांबद्दल या अंकात..

- मुलाखती आणि शब्दांकन :सोनाली नवांगुळ
 
आमची पिढी इतकी एक्सपोज्ड आहे सगळ्याच गोष्टींना की स्वत:ची भाषा सापडत नाहीये आम्हाला. जे सगळं पाहतो, वाचतो त्यातून वाटतं की आपल्याला जे वाटतंय ते सगळं होऊन गेलंय, कुणीतरी आधीच करून ठेवलंय, मग आपण नवं काय लिहिणार आहोत? आजची संवेदना मांडण्यासाठी शब्द कुठले हे कळत नाही. मी जी भाषा वाचते, मला आवडते, ती जुनी आहे, मग आमचं आजचं एक्सप्रेशन काय हे कळत नाही. सापडेपर्यंत थांबावं लागतं. कदाचित हा संघर्ष प्रत्येक काळात होत असेल. 
 मोठय़ा मोठय़ा घटना सतत मनावर आदळत राहतात. त्यांचं प्रमाण आणि वेग इतका आहे की प्रत्येक मोठी गोष्ट सतत ऐकून- पाहून ढोबळ होत जाते. त्यावर लिहायला गेलं तर तेही या ढोबळपणामुळं गवसत नाही.
- मनस्विनी लता रवींद्र नाटककार, पटकथा-संवादलेखक
 
कला, साहित्य, भाषा, तत्त्वज्ञान याकडे ज्या समाजाचं लक्ष असतं आणि ते विकसित करावं असं ज्याला वाटतं तो आदर्श समाज. आपल्या शिक्षणव्यवस्थेत कला व भाषेचे शिक्षक सरप्लस होतात. जेमतेम लायकी नसणारेही व्यवस्थेत शिकवण्याच्या, सांगण्याच्या जागेवर येऊन बसलेत आणि जे गांभीर्यानं या गोंधळाबद्दल सांगू, बोलू पाहतात त्यांना व्यवस्था बाजूला नेऊन बसवते. शिक्षणातून कुशल कामगार व आदर्श नागरिक घडावा हा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. तो चांगला माणूसही व्हावा असा विचार झाला तर नवीन ऊर्जेला संधी आहे. लेखक घडवण्याची गोष्ट फार दूर, आपण अजून चांगला वाचक होऊ किंवा घडवू शकत नाही आहोत. पाश्चात्त्य जगात लेखनव्यवसायावर करोडपती होणारे लोक स्वप्नवतच वाटतात इथे. एखाद्या सजर्काला विद्यापीठ घडवू शकत नाही, फारतर आकार देऊ शकतं.  वाचणारे घडतील तर बदलाला बरीच जागा आहे.
- गणेश विसपुते लेखक, कवी आणि अनुवादक
 
मोजक्याच लाडक्यांना पुढे आणणारी साहित्यपरंपरा केवळ जुनी आहे, म्हणून ती श्रेष्ठ होती असं नव्हे. या परंपरेचं मी कौतुक नाही करू शकत. साहित्यवृद्धीसाठी उपकारक नसणारी ही चाकोरी नव्या समाजमाध्यमांनी मोडली ते बरंच झालं. ठराविकांची पाठराखण, हांजीहांजी, वा्मयीन नियतकालिकात वर्णी, शिफारस यातून काही चांगलं घडलंही असेल; पण ती पोषक संस्कृती नव्हती. आज एक पुस्तकही न येता आपण लिहिलेली कविता फेसबुकच्या वॉलवर पोस्ट केली की तिच्यावर वाचणारे बोलतात, काही सुचवतात, शेअर करतात आणि आवडत राहिलं तर आपण नवं काय करतो याची वाट पाहतात. 
तुम्ही वाईट, बिनबुडाचं लिहिलं की इथे तुम्हाला झोडपूनही काढतात. त्याअर्थी हा आरसाही आहे.
हे मला आवडतं. महत्त्वाचं वाटतं.
 
- वीरा राठोड युवा-साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी