शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

‘तरुण’ हौस!

By admin | Updated: September 5, 2015 14:29 IST

इथे उत्साह म्हणजे उत्साह! इथे माणसाला मरण आहे, पण उत्साहाला नाही. जरा कुठे खुट्ट झालं की धावले सगळे. ‘गराज सेल आहे- धावा!’, ‘नवीन सिनेमा आलाय- धावा!’, ‘कपडय़ांचं नवीन दुकान निघालंय- धावा!’ यांना कुठली वेळ देण्यात अर्थच नाही. संध्याकाळी सात वाजता जमू म्हटलं तर हे साडेसहालाच हजर होणार. ठरलेल्या ठोक्याला हजर झालो तरी ‘उशीर का केला?’ म्हणून वैतागणार! आणि यांचं वय? - उणीपुरी 80 वर्षे!

- दिलीप वि. चित्रे
'टॅम्पा’ या फ्लोरिडा राज्यातील प्रमुख शहरांच्या 25 मैल दक्षिणोस असलेली ‘सन सिटी सेंटर’ ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी मुद्दाम तयार केलेली वसाहत; जिथे आम्ही गेली जवळ जवळ पाच वर्षे राहत आहोत. कुठलीही सरकारी यंत्रणा नसलेलं, केवळ ज्येष्ठांच्या स्वयंसेवी भावनेतून व कष्टांतून उभं राहिलेलं हे गाव; त्यांच्याच योगदानातून चालू राहिलेलं!
55+ वयोमर्यादा असलेल्यांसाठीच जरी ही वसाहत असली, तरी या गावाची सरासरी वयोमर्यादा आहे 77. हे एक स्वयंपूर्ण असलेलं दुमदार गाव. ग्रोसरी स्टोअर्स, हॉस्पिटल, डॉक्टर्स, रेस्टॉरंट्स इत्यादि सर्वच गरजेच्या गोष्टी हाकेच्या अंतरावर. गॉल्फ कॉर्टनं कुठेही जाता येईल अशी रस्त्यांची आखणी. शॉपिंग सेंटर, बँका, हॉटेल्स इत्यादि ठिकाणी जायचं असेल तर मोटारीविना गॉल्फ कॉर्टनंही जाऊ शकाल अशी सोय. ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक दुर्बलता आणि मानसिक अवस्था या गोष्टींचा प्रत्येक ठिकाणी पदोपदी विचार केलेला.
जवळ जवळ 200 पेक्षा अधिक क्लब्स स्वयंसेवकांनीच चालवलेले. पगारी नोकरवर्ग नाही. रहिवाशांच्या सभासदत्वाच्या वार्षिक उत्पन्नातून स्विमिंग पूल्स, लॅण्डस्कोपिंग, फेस्टिव्हल्स, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणारे फायरवर्क, करमणुकीचे कार्यक्रम इत्यादिंचा भागवला जाणारा प्रचंड खर्च आणि हा सगळा डोलारा सावरून धरणारे उत्साही ज्येष्ठ नागरिक. 
या गावाचं वैशिष्टय़ असं की इथे कोणीच जन्माला आलेलं नाही. आयुष्याच्या उत्तररंगाचा आस्वाद घेण्यासाठी सारे जमलेले; आणि आनंद द्यावा-घ्यावाचे गाणो गात गात दिंडी पुढे नेणारे.
परवडणा:या किमतीच्या घरांमधून राहणा:या जवळ जवळ 12 ते 15 हजार नागरिकांची वस्ती असलेलं हे गाव. इथल्याच नागरिकांनी, नागरिकांसाठी उभारलेलं, नागरिकांच्या आवडीनिवडी, गरजा पुरविण्यासाठी हौसेनं, आनंदानं चालवलेलं. त्यासाठी दरवर्षी सभासदांकडून संस्थेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांच्या निवडणुका होतात. वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यावर यथोचित प्रश्नोत्तरे होऊन चर्चा केली जाते. पण मुख्य म्हणजे सगळं अगदी खेळीमेळीनं. कुठेही आरडा-ओरडा नाही, वादावादी नाही, भांडणं नाहीत. माङया मराठी मनाला सुरुवातीला ते असह्यच व्हायचं, पण आता त्याचीच सवय झालीय.
इथल्या सगळ्या तरुण वृद्धांच्या (की वृद्ध तरुणांच्या) उत्साहानं मी अचंबित होतो. मग क्षणात वाटतं, की अरे, मीसुद्धा यांच्यातलाच एक आहे की! मग झटकन उठून कामाला लागतो. बागेची कामं करणं, झाडं लावणं, ती कापणं, त्यांना खतपाणी घालणं मला फार आवडतं. लिंबाचं झाड, पपईचं झाड फळांनी भरलेलं पाहिलं की मन मोहरतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुठूनतरी शेवग्याच्या झाडाचा एक नुसता पानं नसलेला दांडका मी आणला. बादलीत पाणी घेऊन तो भिजत घातला. आशेनं रोज त्याकडे दिवसातून दहा वेळा पाहायला लागलो; धीर सोडला नाही. आणि अचानक एकेदिवशी त्यावर अगदी बारीक बारीक लहान ठिपके दिसायला लागले. झटकन मी तो परसदारी जमीन खणून मातीत रोवला. तर काय, पाहता पाहता त्याला पानं फुटली, वाढायला लागला आणि आता वर्षभरात त्याचा मोठा वृक्ष झालाय. नको एवढय़ा शेंगा. खाणार तरी किती! शेजार-पाजारच्या अमेरिकन स्नेह्यांना त्या खायला शिकवायला हवं. दुसरं काय?
पण इथे उत्साह म्हणजे उत्साह! इथे माणसाला मरण आहे, पण उत्साहाला नाही. मी उत्साहानं म्हणालोसुद्धा, ‘‘की माणसं इथे उत्साहानं मरतातसुद्धा!’’ जरा कुठे खुट्ट झालं की धावले सगळे. ‘गराज सेल आहे- धावा!’, ‘नवीन सिनेमा आलाय- धावा!’, ‘कपडय़ांचं नवीन दुकान निघालंय- धावा!’ आता या वयात कसली नुसती धावाधाव! बरं, यांना कुठली वेळ देण्यात अर्थच नाही. अमुक ठिकाणी आपण सगळे संध्याकाळी सात वाजता जमू आणि मग तिथून पुढे सगळे बरोबरच जाऊ; की हे साडेसहालाच हजर. आणि मी जरी सात वाजता पोचलो तर मी उशीर केला म्हणून माङयावरच वैतागणार. आता इथे एक वाक्प्रचार रूढ झालाय. मला तो फार म्हणजे फारच आवडला. इथे सगळे अमेरिकन तरुण वृद्ध वेळेवर कधीच जात नाहीत. ते म्हणतात, कऋ डव अफए डठ ळकटए, डव अफए छअळए!   
आमच्या ‘सन सिटी सेंटर’च्या वसाहतीत ‘आर्ट अॅण्ड क्रॉफ्ट’चे जसे अनेक क्लब्स आहेत तसे ‘रायटिंग’, थिएटर्स, नाटक दिग्दर्शन, डान्स, म्युङिाक इत्यादि गोष्टींचेसुद्धा. तुमच्या आवडीचं काही तरी असणारच, तेच तुम्ही करा. कंटाळा येणो शक्यच नाही. आलाच, तर तो तुमचाच दोष!
जवळजवळ 225 खुच्र्या असलेलं ‘रोलिंग्ज थिएटर’ नावाचं एक थिएटर आहे. इथल्याच लोकांनी लिहिलेली, दिग्दर्शित केलेली, त्यात कामं केलेली नाटकं, म्युङिाकल्स तिथे अधूनमधून सादर केली जातात. महिन्यातून दोनदा, सोमवारी तिथे उत्तम दर्जाचे, ऑस्कर पारितोषिक मिळालेले, अथवा ऑस्करसाठी नामांकन झालेले चित्रपट माणशी फक्त दोन डॉलर्स या दरात दाखवले जातात. एकदा तर तिथे ओम पुरी आणि शबाना आझमी यांचा सब-टायटल्स असलेला चित्रपटसुद्धा दाखवण्यात आला होता.
‘बेसबॉल’ हा अमेरिकेचा सर्वात लोकप्रिय आणि ‘राष्ट्रीय’ खेळ. इसवी सन 18क्क् मध्ये या खेळाची सुरुवात झाली. 194क्-1945 च्या सुमारास ‘ज्ॉकी रॉबिन्सन’ नावाचा एक उत्तम कृष्णवर्णीय खेळाडू होता. त्यानं अक्षरश: इतिहास घडवला. तो काळ म्हणजे गो:या-काळ्यांच्या वर्णद्वेषाचा काळ. गोरे लोक असलेल्या बसमध्ये काळ्यांना मज्जाव. होटेल्स, रेस्टरूम्स इत्यादि ठिकाणी काळ्यांचा शिरकाव नाही. फक्त गो:यांची मक्तेदारी. अशा काळात जॅकीनं आपल्या बेसबॉल खेळातील कौशल्यामुळे सगळ्यांनाच चकित केलं. गो:या खेळाडूंचा त्यानं धुव्वा उडवला. सगळ्या राज्यांतून व शहरांतून असलेल्या वेगवेगळ्या बेसबॉल टीम्सकडून त्याला मागण्या येऊ लागल्या.
तो ज्या टीममधून खेळत असे त्या टीमचा युनिफॉर्म असलेल्या ज्ॉकीच्या टी शर्टवर त्याचा नंबर होता 42.
इफकअठ एछ¬एछअठऊ लिखित आणि दिग्दर्शित, ज्ॉकीच्या जीवनावर आधारित ‘42’ नावाचा चित्रपट अमेरिकेत जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा थिएटरातून प्रचंड गर्दी उसळली. सुदैवानं आम्हाला तो आमच्या ‘रोलिंग्ज थिएटर’मध्येच पाहायला मिळाला.
तो कधी दाखवला जाणार याची जाहिरात झाली, ती तारीख आम्ही कॅलेंडरवर लिहून ठेवली आणि त्या दिवसाची वाट पाहत बसलो. पण काय, त्या दिवशी सकाळपासूनच पावसाची सुरुवात. चित्रपटाच्या वेळेर्पयत पावसाने भरपूर जोर धरला. त्यामुळे मी खुशीत! शोभाला म्हणालो, हे छानच झालं. आता आज गर्दी नसणार. तिकिटं नक्की मिळतील.
पण कसचं काय! आम्ही पोचलो. घरून जरी आधीच निघालो होतो तरी थिएटरबाहेर पावसातही गर्दी. नशीब म्हणून तिकिटं मिळाली. मी शोभाला म्हणालो, ‘बघ आहे की नाही! इथे म्हणजे कऋ डव अफए डठ ळकटए, डव अफए छअळए !!
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक.)
dilip_chitre@hotmail.com