शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

यवतमाळच्या कारागृहातील महिलांचे नवे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 07:05 IST

कारागृहात बंदी असलेल्या महिलांच्या आयुष्यालाही नवी दिशा मिळू शकते. त्याकरिता अस्तित्व फाउंडेशनच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत.

रुपेश उत्तरवारकारागृहात बंदी असलेल्या महिलांच्या आयुष्यालाही नवी दिशा मिळू शकते. त्याकरिता अस्तित्व फाउंडेशनच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत. ही चळवळ कारागृहातील बंदी महिलांचे भविष्य बदलून टाकणारी आहे. कारागृहातून सुटका होताच त्यांना आत्मनिर्भर होता यावे म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे. ड्रेस डिझायनिंग, ब्यूटीपार्लर असे कोर्स कारागृहातील महिलांना शिकविले जात आहे. यासोबतच त्यांची विचारसरणीही सकारात्मक व्हावी म्हणून योगाचे प्रशिक्षण आणि ध्यानही शिकविले जात आहे. त्यातून या महिलांमध्ये वैचारिक परिवर्तनाला सुरूवात झाली आहे.कळत नकळत घडलेल्या गुन्ह्यात, खोट्या आरोपात गोवलेल्या महिला कारागृहात बंदी आहेत. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्यांना कारागृहातच राहावे लागणार आहे. अशावेळी त्यांचे वैचारिक संतुलन ढासळू शकते. या महिला न्यायालयातून निर्दोष ठरून कारागृहाबाहेर पडल्या तरी अनेकदा त्यांना घरात घेतले जात नाही. कुठले कामही मिळत नाही. अशा महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. असा प्रकार घडू नये म्हणून अस्तित्व फाउंडेशनच्या नेतृत्वात महिलांनी एक व्यापक चळवळ उभारली आहे. या चळवळीतील प्रत्येक महिला संघर्षातून उभी झाली आहे. त्यांनी स्वत:च्या कुटुंबाला सावरले आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, कारागृहातील बंदी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अस्तित्व फाउंडेशनच्या महिला झटत आहेत.यवतमाळ कारागृहात १२ महिला बंदिवासात आहेत. यापूर्वी त्यांनी १५ महिलांना प्रशिक्षण दिले. आता कारागृहात असलेल्या कच्च्या कैदी महिलांना ड्रेस डिझायनिंग आणि ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये ड्रेस, ब्लाऊज, पेटीकोट, फ्रॉकचे शिवणकाम शिकविण्यात आले. ब्यूटीपार्लरच्या माध्यमातूनही महिला आर्थिक सक्षम होऊ शकतात. ब्लिचिंग, फेशियल, मेकअप, हेअरस्टाईल, साडी नेसण्याचे प्रकार, लग्नातील मेकअप, मेहंदी आणि इतरही प्रकार बंदी महिलांना शिकविण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातच नव्हेतर शहरात जाऊनही त्या चांगला रोजगार मिळवू शकतात. या प्रशिक्षणाला कारागृहातील महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून कारागृहातच त्यांना भविष्याची नवी दिशा मिळाली आहे.मानसिक संतुलनासाठी योगाकारागृहातील बंदी महिलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहत नाही. त्यामुळे त्या नकारात्मक विचाराने क्रोधीत असतात. यामुळे त्यांच्या करिअरचे मोठे नुकसान होत. बंदी महिलांच्या डोक्यात उत्तम विचारांना स्थान मिळावे, मनावर संतुलन मिळावे म्हणून त्यांना योगाचे धडे दिले जात आहे. यामुळे पोट, वात विकार, गुडघ्यांचे आजार पाठीचे आजार दूर होण्यास मदत झाली आहे. कारागृहात सुधारगृहाचे चित्र निर्माण होण्यास मदत होत आहे.सामान्य महिलांची उत्तम कामगिरीया मोहिमेचे नेतृत्व अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा अलका विनोद कोथळे करीत आहेत. त्या सेंट ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षिका आहेत. यासोबतच त्या जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव आणि वीज ग्राहक संघटनेच्या सहसचिव आहेत. त्यांनी कारागृहात पार्लरचे प्रशिक्षण दिले. माणिक अविनाश पांडे यांनी हेअरस्टाईलचे प्रशिक्षण दिले. करुणा धनेवार घरी कपडे शिवण्याचे काम करतात. त्यांनी ड्रेस डिझायनिंगचे प्रशिक्षण बंदी महिलांना दिले आहे. डॉ. कविता बोरकर आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यांनी कारागृहातील महिलांना योगाचे प्रशिक्षण दिले.कारागृहातील महिला कच्च्या कैदी आहेत. त्यांची कधीही सुटका होऊ शकते. कारागृहातून बाहेर पडताच त्यांना रोजगाराचे साधन हवे असते. त्याकरिता ड्रेस डिझायनिंग आणि ब्यूटीपार्लर हे शॉर्ट कोर्स आहेत. या माध्यमातून कच्या कैदी महिलांना त्यांच्या भविष्याची दिशा मिळाली आहे. त्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आले आहेत. आत्मविश्वासही वाढला आहे.- कीर्ती चिंतामणी, कारागृह अधीक्षक, यवतमाळपैशापेक्षा माणूसकी महत्त्वाची आहे. कारागृहातील महिलांनाही सन्मान मिळावा म्हणून फाउंडेशनने काम हाती घेतले आहे. भविष्यात हे काम आणखी पुढे नेले जाणार आहे. या कामात कारागृह अधीक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा राहिला आहे. यामुळे एका चांगल्या विचाराला पुढे नेता आले.- अलका कोथळे, अध्यक्ष, अस्तित्व फाउंडेशन, यवतमाळ

टॅग्स :jailतुरुंग