शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

इसिस राक्षसी मनसुब्यांची जागतिक दहशत

By admin | Updated: August 22, 2015 19:06 IST

अमेरिकेनं सुरू केलेल्या युध्दाला पुरून उरलेल्या ‘इसिस’च्या दहशतीची धार वाढतेच आहे. ही संघटना अधिकाधिक घातक होतेय. जग जिंकायची भाषा करतेय. या संघटनेचे ‘दलाल’ आता भारतीय तरुणांचं ब्रेनवॉशिंग करू लागले आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने एकत्र येऊन नुक्ताच दिलेला ‘इशारा’ ‘इसिस’ला जरब बसवू शकेल? - या दहशतवादी संघटनेला नेमकं हवंय तरी काय?

 
- पवन देशपांडे 
 
काळ्या कपडय़ातली एक व्यक्ती मोठय़ा आवेशात बोलत असते. सुडाची भावना त्यात ओतप्रोत भरलेली. बोलतानाच शेजारी उभ्या असलेल्या माणसाच्या मानेवर ठेवलेली धारदार सुरी.
तीन चार कॅमेरे हे दृश्य टिपत असतात. ज्याच्या मानेवर सुरी ठेवलेली आहे, त्याच्या तोंडून बळजबरी वदवून घेतलं जातं.. ‘‘मित्रंनो, माङया मृत्यूला कारणीभूत असणा:या अमेरिकन सरकारला सोडू नका, कदापि सोडू नका!’’  
वाक्य संपताच त्याचा गळा चिरला जातो.. कापलेलं शीर आडव्या धडावर ठेवलं जातं.. कॅमे:यात हे दृश्य टिपलं जातं. 
थरकाप उडवणारी अशी दृश्यं सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात व्हायरल केली जाताहेत. ही असते धमकी.. दहशतीची धमकी.. 
‘‘आमच्या नादाला लागाल तर अशी हालत होईल..’’ अशी धमकी. एका दहशतवादी संघटनेनं अमेरिकेला दिलेली धमकी.
अमेरिकेला ही धमकी देणारी दहशतवादी संघटना आहे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) म्हणजेच ‘इसिस’. जिनं सध्या स्वत:ला ‘इस्लामिक स्टेट’ असं संबोधणं सुरू केलंय. 
या इसिसनं गेल्या वर्षभरात कत्तल्लींची परिसीमा गाठली आहे. हजारो लोकांना ठार मारलंय आणि हजारो महिलांवर बलात्कार केलेत. 
सोळा वर्षापूवी या संघटनेची मुळं इराकमध्ये रुजली. ‘जमात अल-तावहीद वल-जिहाद’ नावानं एक छोटी संघटना सुरू झाली. जॉर्डनमधल्या अबु मुसाब अल झर्कवी या बंडखोरानं सुरू केलेल्या या संघटनेत काही तरुणांची माथी भडकवून त्यांना ‘जिहादी’ बनवण्यास सुरुवात झाली. 
या झर्कवीला राग होता तो जॉर्डनमधील राजवटीचा. त्याविरोधात लढा उभा करण्यासाठी त्यानं अल कायदाचीही मदत घेतली. पाकिस्तानात जाऊन ओसामा बीन लादेनकडून पैसा मिळवला आणि तरुणांना ट्रेनिंग देणं सुरू केलं. अल कायदाचं आर्थिक साहाय्य मिळाल्यानंतर ही संघटना फोफावली. या संघटनेला ‘अल कायदा इन इराक’ असं नाव मिळालं. त्यातून हजारो जिहादी तयार झाले. 2क्क्6 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात झर्कवी ठार झाला आणि त्यानंतरच्या काळात अनेक बदल होत गेले. 
अबु राशीद अल बगदादी आणि अबु अय्युब अल मिसरीच्या हाती या संघटनेची सूत्रं आली. त्यांनी इराकमधल्या अनेक बंडखोर संघटनांना एकत्र आणलं आणि इसिसची सुरुवात झाली. काही वर्षानी हे दोघंही ठार झाले. आता ही संघटना अबु बक्र अल बगदादीच्या हातात आहे. आतार्पयत या क्रूरसेनेनं गेल्या काही वर्षात मिळून दोन लाखांवर निष्पापांचे बळी घेतले आहेत. अर्धा इराक आणि अर्धा सीरिया उद्ध्वस्त करून तो भूभाग आपल्या ताब्यात घेतला आहे आणि आता लीबिया, लेबनॉन, नायजेरिया, येमेन, अफगाणिस्तान, पाकिस्तानात आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. तालिबांनी बंडखोरांवर हल्ले करून त्यांच्या ताब्यात असलेला भागही ही संघटना आपल्या ताब्यात घेऊ लागली आहे. बोको हराम नावाच्या संघटनेनंही या संघटनेला पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळं नायजेरियातही या संघटनेच्या कारवायांना वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही संघटना भारतात मूळ शोधू लागली आहे. काश्मीरमध्ये इसिसचे ङोंडे फडकावले जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्रातील काही तरुणांची माथी भडकावून त्यांना इसिसच्या मार्गावर घेऊन जाण्याचं कूकर्म सध्या केलं जात आहे. 
कल्याणचे चार तरुण इसिसमध्ये सामील झाल्याचे समोर आल्यापासून ही संघटना भारतासाठी घातक ठरू शकते हे लक्षात आले आहे. त्या चौघांपैकी भारतात परतलेल्या अरीब माजीद विरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेनंही भारतावर इसिसचा हल्ला होऊ शकतो, अशी भीती वर्तविली होती. भारत इसिसच्या टार्गेटवर असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी यूएसए टुडे या अमेरिकन वृत्तपत्रनं 32 पानी उर्दू भाषेतील दस्तऐवजांच्या हवाल्यानं दिलं होतं. त्यात स्पष्ट म्हटलं होतं की ही संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये एक संयुक्त दहशतवादी गट उभा करत आहे आणि त्या गटाच्या माध्यमातून भारतावर हल्ला केला जाऊ शकतो. काही आठवडय़ांपूर्वी इसिसनं एक नकाशा जारी केला होता. स्पेनपासून ते चीनर्पयतचा भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्लॅन त्यात स्पष्ट दिसतो. पाच वर्षात अख्खं जग ‘इस्लामिक स्टेट’ बनविण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्यांना भारतही आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. भारत हे या दहशतवादी संघटनेचं प्रमुख ‘लक्ष्य’ आहे. हा सारा भाग जिंकून ‘खलिफात’ बनवून त्यात शरीया कायदा लागू करायचा आणि आपल्या सोयीनुसार सा:या जगावर त्यांना राज्य करायचंय. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठीची डेडलाइन आहे 2क्2क्! 
या नकाशानुसार त्यांनी पुढील पाच वर्षात जिंकायच्या भागांना अरबी भाषेतली नावंही देऊ केली आहेत. स्पेन, पोतरुगाल आणि फ्रान्सच्या भूभागाला त्यांनी अंडलस असं नाव दिलंय. भारतीय उपखंडाला त्यांनी ‘खुरासन’ असं म्हटलंय. एकदा या सा:या भूभागावर राज्य केल्यानंतर संपूर्ण जग ताब्यात घेण्याचा त्यांचा मनसुबा आहे. 
मात्र, साठ देश सध्या इसिसच्या विरोधात उभे आहेत. इसिसविरोधातील लढा आता जागतिक झाला आह़े खुद्द अमेरिकेनं इसिसविरोधात लढाई सुरू केली आहे आणि इतर देशही त्यात खारीचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे अख्ख्या जगावर राज्य गाजवण्याचं इसिसचं स्वप्न पूर्ण होणं केवळ अशक्य, पण त्यापासून गाफील राहणंही घातक ठरू शकेल.
भारताच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलेली ही राक्षससेना केवळ अधूनमधून हल्ले करून शांतता भंग करण्याचं काम करू शकेल.
- तिला प्रवेशा आधीच रोखणं हे भारतापुढचं मोठं आव्हान आहे.
 
 इसिसचं बळ नेमकं कशात आहे?
1 तेलातून येणारा पाण्यासारखा पैसा
कोणतीही संघटना चालवायची म्हटलं की पैसा लागतो. दहशतवादी संघटना चालवण्यासाठीही इसिसला अमाप पैसा लागतो. हा पैसा कधी कोणाला लुटून, कधी तस्करी करून, तर कधी एखाद्याला वेठीस धरून उभा केला जातो. इसिस ही संघटना पैसा उभा करण्यात सध्या इतर दहशतवादी संघटनांच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे. इसिसची मालमत्ता तब्बल दोन अब्ज डॉलर म्हणजेच 130 अब्ज रुपये एवढी आहे. एखाद्या छोटय़ा देशाच्या अर्थव्यवस्थेएवढी मालमत्ता असलेली इसिस हा सारा पैसा तेल तस्करी, लूटमार आणि अपहरणांतून उभी करते. काही पैसा त्यांना देणग्यांच्या रूपातही मिळतो, तर काही देश छुप्या पद्धतीने या संघटनेला पैसा पुरवतात. 
तेल तस्करी हे इसिसचं पैसा जमवण्याचं मोठं साधन आहे. इराकमधील तेल विहिरींवर हल्ला करायचा, त्या आपल्या ताब्यात घ्यायच्या आणि तेलाची तस्करी करून पैसा उभा करायचा अशी त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. एखाद्या देशाचं सरकार जसं चालतं अगदी तसाच कारभार ही संघटना चालवते. प्रशासकीय सेवा देण्यासाठीही कारभार चालवला जातो. एवढंच नव्हे तर ही संघटना ज्यांच्या जोरावर उभी आहे त्या सगळ्या दहशतवाद्यांना, त्यांच्या घरच्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठीही यंत्रणा काम करते.   
 
2 लष्करी शिस्तीचे क्रूरकर्मा
इसिसचा आणखी एक स्ट्राँग पॉइंट म्हणजे त्यांच्यातील नेतृत्व पद्धती. एखाद्या लष्करी दलाप्रमाणं त्यांचा कारभार चालतो. 2क्1क् साली त्यांच्यातील 42 म्होरक्यांपैकी 32 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं, तर काहींना ठार मारण्यात आलं होतं. त्यानंतर ही संघटना संपेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. दहशतवाद्यांची दुसरी फळी कामाला लागली आणि त्यांनी आपले म्होरके जेरबंद असलेल्या तुरुंगांवर हल्ला करून त्यातील काहींना सोडवून आणलं. पुन्हा ही संघटना बांधली. आता ही संघटना जेवढी स्थानिक पातळीवर सक्षम आहे, तेवढीच वैश्विक पातळीवर. त्यामुळंच एखादा हल्ला चढवताना केवळ ‘ऑर्डर फॉलो’ करणं एवढंच त्यांच्या दहशतवाद्यांचं काम असतं. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातही असंच झालं होतं. म्होरक्यांनी सांगायचं अन् खालच्या दहशतवाद्यांनी पडत्या फळाची आज्ञा पाळायची. पण नेतृत्वावरच हल्ला चढवल्यास? आतार्पयत असं अनेकदा झालंय. अल कायदा इन इराक ही संघटना चालवणा:या झर्कवीला संपवल्यानंतर ही संघटना काहीशी शिथिल झाली होती. आता अबु बक्र अल बगदादी हा इसिसचा ‘राजा’ आहे. त्याच्या इशा:यावर सारी दहशतवादी सेना काम करते.  
 
3 सोशल मीडिया
सोशल मीडिया हा इसिसचा सर्वात मोठा स्ट्राँग पॉइंट. आजर्पयत जगभरात जी दहशत या संघटनेविषयी पसरली आहे, ती सारी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. शीर धडापासून वेगळे केल्याचे व्हिडीओ असो वा ओळीनं उभं करून अनेकांना गोळ्या घातल्या गेल्याचे छायाचित्र असो, सा:यांसाठी इसिसनं टि¦टर, फेसबुक आणि यूटय़ूबसारख्या सोशल मीडियाचा वापर केला. याशिवाय ही संघटना तरुणांची माथी भडकवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आली आहे. यासाठी टि¦टरचा सर्वाधिक वापर केला जातो. तब्बल 9क् हजारांहून अधिक टि¦टर अकाउंट इसिसच्या विचारसरणीचा प्रसार करणारे आहेत. या संघटनेबद्दल दररोज हजारो टि¦ट केले जातात. तरुणांना जिहादी बनण्यासाठी उद्युक्त केलं जातं. 
 
- इसिसच्या मुसक्या आवळणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) दौ:यात दहशतवादाविरोधात संयुक्तरीत्या लढण्यासाठी सौदीच्या राजपुत्रचे सहकार्य मिळवले. 
आपल्या देशांत दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना थारा दिला जाणार नाही आणि त्याविरोधात आपण एकत्रितपणो लढू, असं आश्वासन त्यांनी यावेळी मोदींना दिलं. एकीकडे पाकिस्तानसाठी हा इशारा समजला जात असला तरी, दुसरीकडे सर्वाधिक पैसा ज्या अरब राष्ट्रांतून मिळतो, तेथूनच आता विरोधाचा सूर आळवला गेल्यानं इसिसचे धाबे दणाणले असतील. भारतानं इसिसला रोखण्यासाठी उचललेलं हे पहिलं सावध पाऊल ठरेल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
 
- इसिसला संपवण्यासाठी झालेला खर्च
इसिसला नष्ट करण्यासाठी गेल्या वर्षीच्या 8 ऑगस्टपासून ते 31 जुलै 2क्15 र्पयत एकूण 3.5 अब्ज डॉलर एवढा खर्च झाला आहे. रुपयाच्या भाषेत बोलायचं तर तब्बल 227.5 अब्ज रुपये खर्च. म्हणजे रोजचा सरासरी खर्च झाला 63.7क् कोटी रुपये. सर्वाधिक खर्च अमेरिका करतेय. 
 
- इसिसवर सहा हजार हवाई हल्ले
वर्षभरापूर्वी अमेरिकेनं इसिसविरोधात हवाई हल्ल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून आतार्पयत अमेरिकन लष्करानं पाच हजार 945 वेळा हल्ले चढवले आहेत. म्हणजे जवळपास सहा हजार हल्ले. पण तरीही ही दहशतवादी संघटना तेवढय़ाच ताकदीनं उभी आहे, जेवढी ती वर्षभरापूर्वी होती. यात इसिसच्या एकूण तीन हजार 262 इमारतींना लक्ष्य करण्यात आलंय, 119 टँक उद्ध्वस्त करण्यात आले, एक हजार 202 वाहनं उडवण्यात आली आणि इसिसच्या दोन हजार 577 बंकरवर मारा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या या ऑपरेशन इनहेरेंट रिसॉल्व्हमुळे इसिसच्या मनसुब्यांवर तसूभरही परिणाम झालेला दिसत नाही. या दहशतवादी संघटनेला थोपवण्यासाठी, संपवण्यासाठी इराकी सैनिकांना मदत म्हणून जवळपास 18 ते 2क् देशांनी आपले सैनिकही पाठवले आहेत. तीन हजार 3क्क् अमेरिकन सैनिक इराकमधील लष्कराला ट्रेनिंग देत आहेत, तर इतर 17 देशांमधील एक हजार 2क्क् सैनिक तेथे जाऊन या लढय़ाला हातभार लावत आहेत. 
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)