शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

जगज्जेता

By admin | Updated: July 19, 2014 18:17 IST

जगातील सर्वाधिक देश ज्यात सहभागी होतात, ती स्पर्धा म्हणजे फुटबॉल विश्‍वचषक. त्यावर सोनेरी मोहोर उमटवली र्जमनीने. खरं तर जग जिंकल्यासारखाच हा आनंद; पण तरीही कुठेही उन्माद नाही.. मस्ती नाही. काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी हा परफेक्शनचा र्जमन मंत्र खेळातूनही जगाला त्यांनी दिला आणि जगज्जेता कसा असतो, हेही दाखवून दिले..

 आनंद खरे

गेला महिनाभर क्रीडाविश्‍वावर केवळ फिफा विश्‍वचषकाचेच गारुड होते. संपूर्ण जगभरात केवळ फुटबॉलचीच भाषा बोलली जात होती. या २0व्या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत नेहमीच आपली हुकुमत गाजवणारे युरोपचे संघ बाजी मारतात की लॅटिन अमेरिकन संघ आपल्या खंडातच म्हणजे ब्राझीलमध्ये आयोजित होणार्‍या फुटबॉलच्या महाकुंभामध्ये आपली प्रतिष्ठा कायम राखतात केवळ याचीच चर्चा सुरू होती. र्जमनीने (युनायटेड र्जमनी) या विश्‍वचषकामध्ये बाजी मारत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा विचार केल्यास ऑलिम्पिकनंतरची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आहे. फुटबॉलच्या विश्‍वचषकाला ८४ वर्षांची परंपरा आहे आणि दर चार वर्षांनी आयोजित होणार्‍या या स्पर्धेचे विजेतेपद म्हणजे खर्‍या अर्थाने विश्‍वविजेतेपद आहे. कारण या फुटबॉल विश्‍वचषकाची व्याप्ती बघितल्यास जगभरातील पाच खंडांचे २0९ देश या फिफाशी जोडलेले आहेत आणि या २0९ देशांमध्ये आपापल्या खंडांमधील देशांच्या संघांमध्ये दोन ते तीन वर्षे या विश्‍वचषकासाठी पात्रता फेरीचे सामने सुरू असतात आणि या २0९ देशांतून केवळ ३२ संघांना या विश्‍वचषकाच्या अंतिम चरणामध्ये प्रवेश मिळतो. या तुलनेत आपले क्रिकेटचे विश्‍व यापुढे किती खुजे आहे हे कळते. त्यामुळेच अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत विश्‍वविजेतेपद मिळविणे म्हणजे खर्‍या अर्थाने जगात अव्वल ठरणे असते. आणि ही महान कामगिरी या वेळी युनायटेड र्जमनीने केलेली आहे. 
विश्‍वचषकाचा इतिहास बघितल्यास या संघाने खूप काही मिळविले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र हे सर्व आपल्या पदरात टाकत असताना त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांची दूरदृष्टी या सर्वांचाच हा परिपाक आहे, असेच म्हणावे लागेल.
र्जमनीचा इतिहास : र्जमनीचा फुटबॉलचा इतिहास बघितल्यास १९00च्या काळामध्येच र्जमनीमध्ये फुटबॉल खेळाला सुरुवात झालेली आढळते. १९0८ ला र्जमनीचा स्वित्झर्लंडबरोबर पहिला अधिकृत सामना झाला. त्यामध्ये र्जमनीला ५-३ असा पराभव पत्करावा लागला होता. फिफाच्या पहिल्या १९३0 च्या स्पर्धेत र्जमनीला काही कारणांमुळे सहभाग घेता आला नाही तर त्यानंतर १९३४च्या दुसर्‍या विश्‍वचषकामध्ये र्जमनीने प्रथमच सहभागी होत तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. मात्र १९३८च्या तिसर्‍या विश्‍वचषकामध्ये र्जमनीला पहिल्याच सामन्यामध्ये स्वित्झर्लंडकडूनच ४-१ पराभव पत्करावा लागला आणि थेट स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्यानंतर मात्र दुसर्‍या महायुद्धामुळे र्जमनीत सर्वच खेळांच्या संघांवर बंदी होती. महायुद्धानंतर र्जमनीचे तीन भाग झाले आणि पश्‍चिम र्जमनी, पूर्व र्जमनी आणि सरलँड अशा तीन संघांनी १९५0च्या विश्‍वचषकासाठीच्या पात्रता फेरीमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यावेळी त्यांना पात्र होता आले नाही. त्यानंतर पश्‍चिम र्जमनी म्हणून र्जमन संघाने १९५४ मध्ये सहभाग मिळवला आणि अंतिम सामन्यामध्ये हंगेरीला ३-२ असे पराभूत करून चक्क विजेतेपदही पटकावले आणि त्यानंतर र्जमनीने मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक विश्‍वचषकामध्ये र्जमनीचा सहभागच नव्हे तर चांगले प्रदर्शनही राहिलेले नाही. र्जमनीने त्यानंतर १९७४ व १९९0 ला विजेतेपद पटकावले तर र्जमनी चार वेळा उपविजेताही ठरलेला आहे. इतर संघांचा विचार करता ब्राझीलच्या यशामध्ये पेले, झिको, सॉक्रेटिस, रोमारिओ, रोनाल्ड आणि आता नेअमार तर अज्रेंटिनाकडून डिएगो मॅराडोना आणि लिओनेल मेस्सी, फ्रान्सकडून झिनेदीन झिदान, इंग्लंडकडून डेव्हिड बॅकहॅम, वेन रुनी, नेदरलँडकडेही रूड गुलीट व्हन पर्सी, रॉबेन अशा एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे या संघांनी विश्‍वचषकामध्ये आणि इतर स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. र्जमनीकडेही फॅन्झ बॅकेनबोर, लोथर मथायस, जुर्गन क्लिन्समन, ऑलिव्हर कान, मायकेल बलाक अशा दज्रेदार खेळाडूंनी र्जमनीच्या संघातील विजयामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे, मात्र तरीही र्जमनीने कधीही एक-दोन खेळाडूंवर आपली मदार ठेवलेली नाही.
विश्‍वचषकातील विजयी कामगिरी : या विश्‍वचषकावर चौथ्यांदा आपली मोहोर उमटवत र्जमनीने अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत. हा विजय त्यांच्या वर्ष सहा महिन्यांच्या मेहनतीचा नसून त्याला गेल्या १0 वर्षांचे अथक परिश्रम आणि प्रयत्न कारणीभूत आहेत. फुटबॉल विश्‍वचषकानंतरची सर्वात मोठय़ा युरो चषकाच्या २000च्या स्पर्धेत र्जमनीला गटवार साखळीतच पराभूत व्हावे लागले. त्यानंतर मात्र र्जमनीने कोरिया-जपान येथे आयोजित केलेल्या १७व्या विश्‍वचषकामध्ये अंतिम फेरी गाठून आपल्या संघाला स्थिरस्थावर केले. मात्र या अंतिम लढतीमध्ये ब्राझीलकडून २-0 असा पराभव पत्करावा लागला होता. अर्थात ब्राझील फुटबॉलची महाशक्ती असल्यामुळे र्जमनीचा हा पराभव काही जिव्हारी वगैरे लागण्यासारखा नव्हता. मात्र त्यानंतर पुन्हा २00४ च्या युरो चषक स्पर्धेत र्जमनीला झेक रिपब्लिक संघ, नेदरलँडवर तर नाहीच नाही परंतु फुटबॉलमध्ये फारसे परिचित नसलेल्या लॅरेव्हिया या संघावरही विजय मिळविता आला नाही आणि पुन्हा गटवार साखळीतच पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र र्जमनीची थिंक टँक जागी झाली. फुटबॉलमध्ये सातत्य राखायचे असल्यास वेगळा विचार करणे आवश्यक आहे हा विचार करून १९९0च्या विश्‍वचषकाच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या जुर्गन क्लिन्समन यांनी योजना तयार करून ‘कॅच देम यंग’ या स्किमखाली लहान वयाच्या खेळाडूंची निवड केली. या निवडलेल्या खेळाडूंकडून भविष्यामध्ये अपेक्षित रिझल्ट मिळण्याच्या उद्देशाने त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या खेळाडूंना र्जमनीमधील नावाजलेल्या बुंडेस लिगा या फुटबॉल लिग स्पर्धेत वेगवेगळ्या संघांकडून समाविष्ट करून घेतलं. जेणेकरून त्यांना चांगला आणि नियमित सराव मिळेल. त्यानंतर र्जमनीमध्येच आयोजित २00६च्या १८व्या विश्‍वचषकामध्ये र्जमनीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मात्र इटलीकडून त्यांना २-0 असा पराभव पत्करावा लागला. 
विश्‍वचषकातील कामगिरी : या वेळची २0वी विश्‍वचषक स्पर्धा ही ब्राझीलमध्ये आयोजित केली गेली असल्यामुळे या विश्‍वचषकावर ब्राझील आणि अज्रेंंटिना या लॅटिन अमेरिकन संघांचेच वर्चस्व राहील अशीच चर्चा सुरुवातीला केली जात होती. र्जमनीने गटवार साखळीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोतरुगालला ४-0 असे पराभूत करून आपली झलक दिली. त्यामध्येच त्यांचे सांघिक प्रयत्न दिसले आणि हा संघ कसा परिपूर्ण आहे याचा प्रत्यय आला. त्यानंतर अमेरिकेलाही २-0 पराभूत केले तर घाणाने मात्र र्जमनीला बरोबरीत रोखले. याचा विचार करत र्जमनीने बाद फेरीत आक्रमणाबरोबर आपला बचावही भक्कम केला आणि अतिरिक्त वेळेत चिवट अल्जेरियावर मात केली. तर उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सला सहज पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत र्जमनीने कमालच केली. यजमान ब्राझीलवर चक्क ७ गोल झळकावले. अंतिम फेरीत अज्रेंटिनाच्या संपूर्ण संघाचा बारकाईने अभ्यास करून अंतिम सामन्यामध्ये खेळ केला. अज्रेंंटिना संघ बर्‍याच प्रमाणात मेस्सीवरच अवलंबून आहे हे लक्षात घेऊन मेस्सी कशा प्रकारे गोलकडे चाल करतो, उजव्या किंवा डाव्या बाजूने चाल करत चेंडू मध्य भागात आणतो आणि त्यानंतर जागा बनवून गोलमध्ये किक मारून गोल करण्याचा प्रयत्न करतो. या सर्वांंचा अगदी सखोल अभ्यास केला आणि त्याला अटकाव करण्यासाठी बास्टीन स्वानस्टायगर आणि हॉवर्ड यांच्यावर ती कामगिरी सोपवली. या दोघांनीही मेस्सीला शेवटचा शॉट घेण्याची एकही संधी दिली नाही. र्जमनीचे प्लॅनिंग कसे व्यवस्थित होते याची प्रचीती येते. र्जमनीच्या संघाचा विचार केल्यास त्यांनी केलेल्या १८ गोलचा विचार करता एकाही गोलमध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ दिसला नाही. समोर गोलपोस्ट दिसत असूनही थेट गोलमध्ये चेंडू न मारता त्यांच्या खेळाडूंनी इतर सहकार्‍यांकडे पास करून गोल केले हेही त्यांच्या विजयाचे गमक आहे. तसेच र्जमनीच्या २३ खेळाडूंचा विचार करता सर्वच खेळाडू हे सारख्याच ताकदीचे होते. त्यामुळे मिलोस्लाव क्लोस हा गोल करण्याच्या रेकॉर्डच्या उंबरठय़ावर असूनही त्याला सतत खेळविण्याचा अट्टहास केला नाही. र्जमनीच्या विजयामध्ये आणि संघ बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या प्रशिक्षक जोकीम लुई यांनी कोणताही दबाव न बाळगता संघाच्या हिताचाच विचार करून संघामध्ये बदल केले. घानाविरुद्ध आपला संघ अडचणीत सापडला आहे अशा वेळी त्यांनी आपल्या संघातील बुजूर्ग खेळाडू मिलोस्लाव क्लोस याला मैदानात उतरवले. त्याच्याकरवी गोल करवून ही लढत बरोबरीत सोडवली. एवढेच नाही तर बदली खेळाडू थॉमस शूलरने गोल करूनही त्याला पुढील सामन्यामध्ये लगेचच पहिल्या ११ मध्ये न खेळवता मध्यंतरानंतरच त्याला पसंती दिली आणि त्याच्या करवीही गोल केला. तेच सूत्र त्यांनी मारिओ गोएत्झेच्या बाबतीत वापरले. त्याने घानाविरुद्ध गोल केल्यानंतरही बदली खेळाडू म्हणूनच त्याचा योग्य वापर केला आणि अंतिम सामन्यातही त्याचाच गोल निर्णायक ठरला. र्जमनीचा कर्णधार फिलिप लम यांचेही कौतुक करावे तितके थोडे आहे. बचाव, मध्यपंक्ती आणि आघाडी या तीनही क्षेत्रांत त्यांचा सहजसुंदर वावर होता. त्याने बचावात आपल्या सहकार्‍यांना योग्य साथ दिलीच परंतु मध्यपंक्तीमध्ये जात त्याने आपल्या आघाडीवीरांना योग्य पासेसचे खाद्य कायम पुरवले. मध्यपंक्तीतील स्वानस्टायकरचेही कौतुक करण्याइतकी महत्त्वाची भूमिका त्याने पार पाडली. अंतिम सरावादरम्यान डोळ्याच्या खाली जखम होऊन रक्ताची धार लागली असतानाही त्याने संघहिताचा विचार करून तात्पुरता इलाज करून घेतला, परंतु मैदान सोडले नाही आणि मेस्सीला रोखण्याचे मिशन पूर्णपणे यशस्वी केले. थॉमस मुल्लरनेही तोच बाणा अवलंबला. त्याला गोल्डन बुटाची ट्रॉफी खुणावत असतानाही आणि त्याला त्यासाठी अनेक वेळा गोलसमोर थेट गोलमध्ये चेंडू मारण्याच्या अनेक संधी आलेल्या असूनसुद्धा त्याने आपल्या सहकार्‍यांकडे चेंडू पास करून हमखास गोल करण्यावर भर दिला. 
व्यक्तिगत हितापेक्षा संघाचे हित आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याचा प्रत्यय दिला. ब्राझीलकडे नेमार आहे, पोतरुगालकडे रोनाल्डो आहे, अज्रेंंटिनाकडे मेस्सी आहे, नेदरलॅन्डकडे व्हॉन पर्सी व रॉबेन आहे तर आमच्याकडे संपूर्ण संघच आहे याची प्रचीती र्जमनीने दिली.
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत.)