शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरचे युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 06:05 IST

सैनिकी कारवाईच्या पारंपरिक इतिहासाला छेद देऊन हे युद्ध आत दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर पेटले आहे. पहिल्या फळीत आकाशातले-जमिनीवरचे सैन्य आणि बॉम्ब आहेत, दुसऱ्या फळीत फेसबुकवरचे स्वयंसैनिक आणि मोबाइल फोन्स आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरचा आणि आकाशमार्गे होणारा संघर्ष शस्रांचा वापर करून लढला जातो, तर फेसबुकवर शब्दांचा आणि चित्रांचा वापर करून युद्ध लढले जाते. पहिल्या फळीत लढण्यासाठी शारीरिक क्षमता, पात्रता आणि श्रम लागतात, तर दुसऱ्या फळीत कुणीही सहज सामील होऊ शकतो.

ठळक मुद्देफेसबुक असो, वा फेसबुकच्या सवतीचे दुसरे पोर व्हॉट्सअ‍ॅप, इथे पेटलेल्या युद्धातले स्वयंसैनिक आपले फोन वापरून शाब्दिक गोळीबाराला चटावले आहेत... त्यांचे आपण काय करणार?

- राहुल बनसोडे

भारतीय वायुसेनेच्या विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जाऊन तिथला अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्याच्या घटनेला आज सहा दिवस होत आहेत.२६ फेब्रुवारीला पहाटे केल्या गेलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांचे नेमके किती नुकसान झाले आणि त्यात कितीजण मारले गेले याचा आकडा हा लेख लिहिला जाईपर्यंत उपलब्ध झालेला नाही. पाकिस्तानने हा आकडा सांगणे म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अतिरेकी तळ उभारण्यास व चालविण्यास मदत करण्याची कबुली देणेच होय, त्यामुळे हल्ल्यात जीवितहानी झालीच नाही हा पाकिस्तानचा दावा त्यांच्या युद्धनीतीचा भाग आहे. ही कारवाई बिगरलष्करी प्रतिबंधात्मक स्वरूपाची होती असे स्पष्ट विधान भारताच्या परराष्ट्र सचिवांनी करणे हा भारतीय मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीचा भाग आहे.या कारवाईनंतर दोन्ही देशांची माध्यमे याविषयी उलटसुलट आणि अतिशयोक्तीपूर्ण बातम्या देणार ही बाब तशी गृहीत धरली जाऊ शकते, या बातम्यांना योग्य आकार देण्याचे कामही युद्धनीतीचा भाग असू शकते. त्यामुळे भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर अधिकृत माहितीतली त्रोटकता निदर्शनास आल्यानंतर जबाबदार आंतराष्ट्रीय माध्यमांनी या कारवाईचे सविस्तर वार्तांकन करणे टाळले. आपल्या चुकीच्या बातमीमुळे अनेक पातळ्यांवर अंदाधुंदी निर्माण होऊ शकते याची जाण या माध्यमांना नेहमी असते. विसंबून राहाता येईल, अशी नेमकी माहिती उपलब्ध न झाल्यास या कारवाईविषयी आंतराष्ट्रीय माध्यमांनी मौन राखले असले तरी भारतीय माध्यमांना असली जाणीव वा बंधने नसल्याने त्यांच्या बातम्यांचा वारू चौखुर उधळला असून, तो आजही थांबण्याचे नाव घेत नाही.दरम्यान, या प्रसंगाचे आपल्या प्रचारांच्या आराखड्यांवर काय परिणाम होतील याचा अंदाज लावण्यात राजकीय पक्ष व्यस्त होते. भारतातला सोशल मीडिया राजकीय मते, सामाजिक मते, साहित्यव्यवहार आणि निखळ मनोरंजन या मुख्य प्रवाहांमध्ये विभागलेला आहे. त्यात सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्यांचे प्रमाण तसे कमी आहे, साहित्यव्यवहारावर उलटसुलट बोलणारे लोक असले तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष काहीही परिचय नाही. लवकरच येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे सोशल मीडिया हा राजकारणाचा अड्डा बनला असून, भारतीय राजकारण्यांचा ओंगळ इतिहास आणि भयंकर वर्तमान इथे दुथडी भरून वाहात असते.जगभरात सोशल मीडियाच्या वापरातून गेल्या दशकात अनेक सत्तांतरे घडून आली. काही ठिकाणी फेसबुकमुळे आता जगात नवीन क्र ांतीच होते आहे, असा आभास लोकांना होऊ लागला, एखाद्या देशाची सरकारव्यवस्था मुक्त करायची असेल तर त्या देशातल्या लोकांना फेसबुक वापरायला द्या, असे मत तरुण विचारवंत मांडू लागले होते. - आज दशकभरानंतर मागे वळून पाहताना एखाद्या देशात एकाधिकारशाही प्रस्थापित करायची असेल आणि ती टिकवून ठेवायची असेल तर तिथल्या लोकांना फेसबुक द्या, असे मत समाजशास्रज्ञ मांडू लागले आहेत.अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्र्म्प यांची निवड झाल्यानंतर अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट केवळ सोशल मीडियाच्या प्रणालीत असलेल्या गडबड गोंधळामुळे घडून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर फेसबुकमुळे एखाद्या देशाची लोकशाही कशी धोक्यात येऊ शकते यासंदर्भात अनेक माध्यमतज्ज्ञ गंभीर विचार मांडू लागले. दोन हजार सोळा साली झालेल्या या निवडणुकीत रशियन हॅकर्सच्या मदतीने फेसबुकचा वापर करून अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यासंबंधी फेसबुकची अनेक पातळ्यांवर चौकशी चालू आहे.फेसबुकच्या सवतीचे दुसरे पोर व्हॉट्सअ‍ॅप या प्रणालीच्या माध्यमातून जगभर हिंसाचाराचे अनेक प्रसंग वरचेवर घडतच असतात, ज्यामुळे अनेक ठिकाणी नुसत्या संशयावरून लोकांना ठेचून मारण्याच्या घटना घडल्या आहेत. सुरुवातीला गंमतीची गोष्ट वाटणाºया फेसबुकने आता तक्षक नागाचे स्वरूप धारण केले असून, माणसामाणसांतील वितुष्ट वाढविण्यासाठी या माध्यमाचा वापर जास्त प्रभावीपणे करण्यात राजकीय विचारधारणा आणि जहालमतवादी यशस्वी ठरत आहेत.दोन राष्ट्रांदरम्यान उद्भवलेल्या राजकीय तणावाच्या परिस्थितीत या देशातले लोक फेसबुकचा वापर नेमका कसा करतात आणि त्यातून त्या देशांच्या संरक्षणनीतीवर कितीसा फरक पडतो या दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सध्या उद्भवलेल्या भारत - पाक संघर्षातून मिळत आहेत.२६ फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचे त्रोटक; पण अधिकृत वक्तव्य भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून साडेअकरा वाजता जारी करण्यात आले. तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने असा हल्ला झाला असल्याची कबुली सकाळी ट्विटरद्वारे दिली होती. या कारवाईत पाकिस्तानचे नेमके किती नुकसान झाले याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाकडून कुठलीही सविस्तर माहिती दिली गेली नाही; पण भारतातर्फे हल्ला झाला आहे इतकी माहिती भारतीय फेसबुकच्या वापरकर्त्यांना पुरेशी होती.या कारवाईमुळे भारताने पुलवामाचा बदला घेतला, पाकिस्तानला घरात घुसून मारले, पाकड्यांची जिरवली या आणि अशा असंख्य स्वरूपाच्या प्रतिक्रि या फेसबुकवर येऊ लागल्या. गेले काही वर्षे सोशल मीडियात आकडे लावण्याची एक गंभीर सवय लागली आहे. यात इतक्या इतक्या लोकांनी एकत्र येऊन असे असे केले तर कुठले सामाजिक बदल घडून येतील, अशा स्वरूपाच्या पोस्ट सदैव फिरत असतात. याशिवाय सरकारी प्रचारात अमुक लांबीचे रेल्वेमार्ग, तमुक लांबीचे रस्ते, इतक्या इतक्या कोटी घरांना इतका इतका लाभ अशी आकडेवारी सदैव लोकांच्या डोळ्याखालून फिरत असते. बालाकोटमधल्या वायुसेनेच्या कारवाईनंतर कुठलेही अधिकृत आकडे जाहीर केलेले नसल्याने माध्यमातल्या अनेकांची अडचण झाली. या अडचणींवर भारतीय टीव्ही माध्यमांनी लगेचच मात करून तिथे अंदाजे आकडे देण्यास सुरुवात केली ज्याचा अधिकृत स्रोत आजही जाहीर करण्यात आलेला नाही. या संभाव्य आकडेवारीतही मोठी तफावत होती. काही ठिकाणी या कारवाईत पाकिस्तानचे दीडशे अतिरेकी मारले गेल्याची माहिती होती तर काही ठिकाणी दोनशे, काहींनी हा आकडा तीनशेपेक्षाही जास्त असल्याचे सांगितले, काहींना हजारही कमी पडले.यापूर्वी भारताने २०१६मध्ये उरी येथे केलेल्या सर्र्जिकल स्ट्राइकलाही सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रसिद्धी देण्यात आली होती. सैनिकी कारवाईच्या पारंपरिक इतिहासाला छेद देऊन ही कारवाई दोन विभिन्न पातळ्यांवर केली जात आहे. त्यातल्या पहिल्या फळीत आकाशातले-जमिनीवरचे सैन्य आणि बॉम्ब आहेत, तर दुसºया फळीत फेसबुकवरचे कार्यकर्ते आणि मोबाइल फोन्स आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरचा आणि आकाशमार्गे होणारा संघर्ष शस्रांचा वापर करून लढला जातो तर फेसबुकवर शब्दांचा आणि चित्रांचा वापर करून युद्ध लढले जाते. पहिल्या फळीत लढण्यासाठी शारीरिक क्षमता, पात्रता आणि श्रम लागतात, तर दुसºया फळीत कुणीही सहज सामील होऊ शकतो. जमिनीवरच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग नसतांनाही स्रिया आणि मुलांचे सर्वात जास्त नुकसान होते, फेसबुकवरच्या युद्धात मात्र स्रिया आणि लहान मुलेही सहभागी होताना दिसतात. थोडक्यात, फेसबुकवरच्या युद्धात कुणीही स्वयंसैनिक बनू शकतो आणि आपल्या फोनचा वापर शाब्दिक गोळीबारासाठी करू शकतो.वीस वर्षांपूर्वी भारत - पाकिस्तानदरम्यान उद्भवलेल्या संघर्षात आणि आजच्या संघर्षात व्यापक अर्थाने मोठा फरक आहे. मे १९९९मध्ये घडून आलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीच्या वेळी भारतात इंटरनेटची व्याप्ती अतिशय कमी होती, न्यूज चॅनेल्सची संख्या कमी होती आणि त्यांना जबाबदारीची जाणीव होती. वृत्तसंस्था आणि न्यूज चॅनेल्सच्या एकाधिकारशाहीला फेसबुक एक पर्याय म्हणून पुढे आले आणि आज वृत्तसंस्थांची जागा व्यक्तींसमूहांनी घेतली आहे तर नॅरेटिव्हची जागा तथ्यांनी घेतली आहे. सार्वजनिक वस्तुनिष्ठ चर्चा मागे पडून त्याऐवजी भावनिक आव्हानातून प्रतिपक्षावर आगपाखड केली जाते आहे, आणि या सगळ्यांच्या मुळाशी फेसबुकचे अल्गोरीदमही आहे.एखाद्या घटनेवर वा मुद्द्यावर आपल्याला होणारा विरोध वाढतो आहे हे लक्षात आल्यास असा विरोध निष्प्रभ करण्यासाठी राजकीय पक्ष नवनवीन युक्त्या योजू शकतात आणि त्या युक्त्या बºयाच अंशी सफलही होऊ शकतात ज्याचा प्रत्यक्ष लाभ मतपेटीतून मिळू शकतो. दुर्दैवाने फेसबुकवर होणाºया विरोधाला उत्तर देण्यासाठी उपयोजित केलेल्या मुद्द्यांचा जमिनीवरच्या वास्तवाशी कित्येकदा काहीही संबंध नसतो. लोकशाहीच्या मुख्य पायापासून भरकटलेल्या या अवस्थेत एखाद्या घटनेमागचे वास्तव आणि तथ्ये मागे पडून सोशल मीडियातल्या लाखो लोकांनी त्या घटनेचे आपापल्या परीने केलेले विश्लेषण आणि दिलेल्या प्रतिक्रिया या केंद्रस्थानी येतात आणि त्याच्या भवताली शाब्दिक युद्धे खेळणाºयांची झुंबड उडते.भारत - पाकिस्तानच्या सध्या सुरू असलेल्या जमिनीवरचा संघर्ष आणि फेसबुकवरचा संघर्ष पहाता फेसबुकवरचा संघर्ष हा जमिनीवरच्या संघर्षापेक्षा खूप वेगळा असून. त्यात अतिशयोक्ती, शाब्दिक हिंसा आणि सत्यापासून घेतलेली फारकत स्पष्टपणे दिसून येते.सोशल मीडियातल्या युद्धखोरांना युद्धाचे दुष्परिणाम सांगण्यात काही लोक हिरिरीने पुढे आले असून, त्यांनी व्यक्त केलेल्या मतांनाही बरेच लोक सहमती दाखवत आहेत. मुळात जमिनी वास्तवाशी फारकत घेऊन अतिशयोक्तीने बरबटलेल्या युद्धखोर प्रतिक्रि यांवर केलेली शांततेची आव्हानेही तितकीच वास्तवापासून भरकटलेली आहे.जमिनीवरचे युद्ध आणि सोशल मीडियातले युद्ध हे दिवसेंदिवस परस्परपूरक होत चालले आहे, फेसबुकवरचे शाब्दिक युद्ध आता प्रत्यक्ष युद्धाला जन्म देऊ शकते तर प्रत्यक्ष जमिनीवर झालेल्या संघर्षाला हजारपट मोठे करून त्यातून फेसबुकवर शाब्दिक युद्ध खेळले जाऊ शकते.जमिनीवरचे युद्ध शांततामय मार्गांनी आणि प्रत्यक्ष चर्चेने आटोक्यात आणले जाऊ शकते, जी अर्थात गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. फेसबुकवरचे युद्ध आटोक्यात आणणे तसे सोपे आहे. आपल्या फोनवर असलेले पॉवर बटन दाबल्यास फेसबुक व फोन दोन्ही बंद होतात आणि सोशल मीडियातले युद्ध आपल्यापुरते ताबडतोब संपते.हाच नियम टीव्ही चॅनेल्सलाही तंतोतंत लागू पडतो.जमिनीवरच्या प्रत्यक्ष संघर्षाचे जे होईल ते होईल; पण आपल्या स्क्र ीनवरचे युद्ध थांबवण्यासाठी फक्त बटन दाबणे पुरेसे आहे.1. * प्रत्यक्ष संघर्षात सहभागी असलेल्या सैनिकांची संख्या ही अतिशय लहान आहे; पण फेसबुकवरच्या संघर्षात लाखो लोक सहभागी आहेत.2. * युुद्धजन्य परिस्थितीत नागरिकांच्या मनात तयार होणाऱ्या सुप्त भीतीचे प्रमाण हे वास्तवात कमी आहे; पण सतत फेसबुक वापरणाऱ्यांसाठी ही भीती कैक पटीने मोठी आहे !3. * एक फेसबुक वापरकर्त्या दुसºया फेसबुक वापरकर्त्यांशी संवाद साधताना हल्ली ‘आता मोठे युद्ध होणार का?’ असे विचारीत असतो.4.* युद्धज्वराने पेटलेल्या स्वयंसैनिकांना शांततेचे आव्हान करणारे फेसबुक शांततावादीही मोठ्या प्रमाणावर या माध्यमात व्यक्त होत आहेत.(लेखक मानववंशशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

rahulbaba@gmail.com