शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- सांगत आहेत केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:25 IST

देशाच्या कानाकोप-यात गुणवत्ता आहे. ही गुणवत्ता हुडकून काढली जाईल. आता प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल, स्वत:ला सिद्ध करता येईल. पैशाअभावी संधी मिळाली नाही, असं आता होणार नाही.

ठळक मुद्देखेलो इंडिया- भारताचं क्रीडा धोरण बदलताना दिसतंय, नेमकं काय होतंय मैदानात? भारताची पदकांची भूक त्यानं वाढेल?. प्रत्यक्ष मैदानावरचा हा लेखाजोखा.

-राज्यवर्धन राठोड(केंद्रीय युवा व क्रीडामंत्री)

एशियन गेम्समध्ये भारताने केलेली कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. अर्थात त्यात सर्व खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापकांचे भरीव योगदान आहे. आता केवळ याच यशावर समाधान न मानता 2020 साली टोकियोत                होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करायला हवी. एशियन गेम्समध्ये भारताने यशाचे नवे मापदंड प्रस्थापित केले.  युवा अँथलॅटिक्सनी तर बहुमोल योगदान दिले. एका अर्थाने भारताची ही कामगिरी पारंपरिक यशापेक्षा भिन्न आहे. त्याचे मूल्यमापन लगेचच करता येणार नाही. त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. आतापर्यंत केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा असली की देशात खेळांची चर्चा होत असे. विद्यमान केंद्र सरकारने पहिल्यांदा हा ट्रेण्ड बदलला. 

खेलो इंडिया योजना केंद्र सरकारने सुरू केली. त्यात नवनव्या खेळाडूंचा शोध सुरू असतो. पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम प्रशिक्षण खेळाडूंना दिले जाते. उत्तम खेळाडूंच्या सर्वंकष विकासासाठी आम्ही एक केंद्रीयकरण असलेली व्यवस्था उभारली. जेथे नोकरशहांचा संबंध कमी येईल. खेळाडूंच्या माध्यमातूनच खेळाडूंचा शोध - ही ती व्यवस्था. याची सुरुवात आम्ही 2014 पासून केली. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकतील, अशा खेळाडूंना प्रशिक्षणासाठी विनाअडथळा निधी मिळण्याची सोय झाली. खेळाडूंची निवड समिती करते. क्र ीडा प्राधिकरणांतर्गत येणारा मिशन ऑलिम्पिक सेल खेळाडूंना निधी देतो. निधी देताना याआधीचे सरकार विचार करीत असे. आम्ही निधी दिला. निधी वाढवला. सर्वसमावेशक निधी उभारला. कार्पोरेट घराणी पुढे आली. त्यांनी निधी दिला. क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी आता अशी मदत मिळू लागली आहे.

एशियन गेम्समध्ये भारताने 69 पदकं मिळवली. या खेळात आतापर्यंत भारताचे हे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. पण तेवढय़ावर थांबता येणार नाही. 2020 साली होणारे ऑलिम्पिक समोरच आहेत. तेथे मोठे आव्हान असते. अर्थात खेळाडू हा वर्षानुवर्षाच्या नियमित सरावानंतर तयार होतो. आपल्या खेळाडूसमोर ऑलिम्पिकचेच आव्हान आहे. त्यात 2014 व 2018 साली खर्‍या अर्थाने भारताचा दबदबा निर्माण होईल. त्यासाठी आम्ही आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. क्रीडा विज्ञान महत्त्वाचे ठरते. त्यात केवळ डावपेच नसतात. शास्त्रोक्त अभ्यास असतो. म्हणजे केवळ भारतीय खेळाडू नव्हे तर त्यांच्या जगभरातल्या स्पर्धकांवरही नजर ठेवली जाते. त्यासाठी ‘टॉप्स’ समिती आहे. दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या सारख्यांवर ही जबाबदारी असते. त्यातून खेळाडूंना सर्वोत्तम रणनीती आखता येते.

आपल्याकडे खेळ राज्यांशी संबंधित विषय आहे. पण प्रश्न नेहमी मला, केंद्र सरकारलाच विचारले जातात. तरीही पंतप्रधान अशा प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतात. त्याची दखल घेतात. परंतु राज्यांनीदेखील जबाबदारी पाळावी. कोणत्या राज्याने खेळाडूंना प्रोत्साहन दिले, निधी दिला- यावर सकारात्मक चर्चा व्हायला हवी. 

मणिपूरमध्ये राष्ट्रीय खेलकूद विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशान त्यासंबंधीच्या विधेयकास संसदेने मंजुरी दिली. 524 कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी येणार आहे. केवळ पदवी, पदव्युत्तर नव्हे खेळांमध्ये संशोधनाचीही विद्यापीठात सोय असेल. विद्यापीठाचे विस्तारित केंद्र विविध राज्यांमध्ये उभारले जातील. खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक, संशोधक, पंचांना त्यात प्रशिक्षण देण्यात येईल. ही योजना क्रातिकारी आहे.‘खेलो इंडिया’ ही एक सुरुवात आहे. 

क्रीडाक्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्याची क्षमता या योजनेत आहे. देशाच्या कानाकोप-यात गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत. पण त्यांना आर्थिक मदत मिळत नाही. आता कोणत्याही प्रतिभावान खेळाडूला पैशांअभावी संधी नाकारली जाणार नाही. खेलो इंडिया योजना त्यासाठीच आहे. प्रत्येक खेळाडूला स्वत:ला सिद्ध करण्याची रास्त संधी देण्यात येईल. भारताची आंतरराष्ट्रीय कामगिरी त्यानेच सुधारेल.

शब्दांकन : टेकचंद सोनवणे