शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सारे प्रवासी ‘साथी’चे!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 06:05 IST

कोरोनाचा उगम, संसर्ग, प्रसार, त्यावरील लस-औषध निर्मितीतली आव्हानं, कोरोनानंतर बदलू शकणारी भूराजकीय समीकरणं अशा सर्व अंगांनी एका गंभीर विषयाचा सुगम भाषेत आढावा घेणारं ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. त्या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संक्षेप!

ठळक मुद्देडायमंड प्रिन्सेस या आलिशान क्रूझवर घडलेल्या (आणि फसलेल्या) क्वारण्टाइनची कहाणी

- डॉ. मृदुला बेळेडायमंड प्रिन्सेसची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली, तसा आरनॉल्ड हॉपलॅण्ड आणि त्याची बायको जेनी या अमेरिकन जोडप्याचा धीर सुटू लागला होता. पैसे वाचवण्यासाठी आरनॉल्डनं तळघरातली छोटी खोली निवडली होती. त्यामुळे दिवसभर बाहेरचं काहीही दिसत नसे. दिवसातून दोन वेळेला ‘शुद्ध हवा खाण्याची सुट्टी’ मिळाली, की ते वर डेकवर येत, तेव्हा वरच्या आलिशान स्वीटमधले प्रवासी आपापल्या बाल्कन्यांमधून गप्पा मारताना दिसत. त्यांचं आयुष्य त्यातलं त्यात बरं चाललं होतं. आरनॉल्ड आणि जेनी बाहेर हवा खायला डेकवर येऊन उभे राहिले, की त्यांना रोज क्रूझच्या दारात उभी असलेली रुग्णवाहिकांची रांग दिसे. कॅप्टन अर्माच्या गंभीर आवाजात घोषणा, सूचना, संसर्गाबाबत रोजच्या खबरी मिळत. दुसर्‍या दिवशी आणखी दहा रुग्ण सापडले, तिसर्‍या  दिवशी एक्केचाळीस, आणखी काही दिवसांनी सहासष्ट. रोज ही संख्या वाढत चालली होती. या रुग्णांना रुग्णवाहिका रोज टोक्योमधल्या रुग्णालयांमध्ये विलगीकरणासाठी हलवत होत्या. 

अडीच आठवडे उलटले, तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून क्रूझवरचा कोविड संसर्गाचा उद्रेक कसा हाताळायचा याबद्दल काहीही सूचना आली नाही. नंतर ती आली, तेव्हा आजारी माणसांचं ताबडतोब शहरातल्या रुग्णालयात विलगीकरण करावं आणि संशयितांच्या चाचण्या कराव्या, असं सांगितलं गेलं. पण एव्हाना जपान सरकारने टोक्यो शहरात चीनमधल्या वुहानसारखीच टाळेबंदी जाहीर केलेली होती.इकडे क्रूझवरचे कर्मचारी अजूनही आपापल्या केबिन्समध्ये सहकार्‍यांबरोबर दाटीवाटीने राहत होते. त्यांच्यातल्या कितीतरी जणांचं लागण झाली म्हणून विलगीकरण करण्यात आलेलं होतं. त्यामुळे उरलेल्या कर्मचार्‍यांना लागण झालेली असण्याची आणि तरीही त्यांच्यात लक्षणं दिसत नसल्याची दाट शक्यता होती. पण तरीही हे कर्मचारी काहीही तक्रार न करता चाचण्या झालेल्या नसतानाही काम करत होते. प्रवाशांना अन्न पुरवत होते, अंथरूणं पांघरूणं पुरवत होते. दारात ठेवलेली खरकटी भांडी उचलत होते. कारण हे  केलं नाही तर त्यांची नोकरी जाणार, हे त्यांना नक्की माहीत होतं. खलाशी वर्गातले बरेच अधिकारी पश्चिमेकडच्या युरोप आणि अमेरिकेसारख्या देशातले होते. यांची राहायची व्यवस्था वरच्या मजल्यांवरच्या स्वतंत्र हवेशीर खोल्यात होती, तर स्वयंपाक, रूमसर्व्हिस, सुरक्षा, हाउसकिपिंग सांभाळणारे कर्मचारी भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्ससारख्या देशातले होते. हे सगळे तळघरातल्या अंधार्‍या कोंदट खोल्यात दाटीवाटीने राहात. सगळ्या जगात असलेली गरीब-र्शीमंत, पश्चिमेकडचे आणि पूर्वीकडचे, गोरे आणि काळे हे सगळे भेदाभेद इथेही कसोशीने पाळले जात होते. प्रवाशांमध्ये जपान्यांच्या खालोखाल मोठय़ा संख्येने अमेरिकन प्रवासी होते. डायमंड प्रिन्सेसची मालक असलेली कार्निव्हल कॉर्पोरेशन ही कंपनी अमेरिकेने आपल्या नागरिकांना विशेष विमानानं अमेरिकेत घेऊन जावं अशी विनंती करत होती. पण अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने - सीडीसीने या प्रवाशानी क्रूझवरच थांबावं अशी सूचना दिली, आणि इकडे आर्नोल्ड हॉपलॅण्ड कमालीचा वैतागला. हॉपलॅण्ड हा एक डॉक्टर. साथरोगांचं नियंत्रण आणि तयारी हा त्याच्या अभ्यासाचा विषय होता. टेनेसीमध्ये तो काम करत असलेल्या रुग्णालयात त्याने या विषयात चिकार काम केलेलं होतं. क्रूझवरची परिस्थिती दिवसेंदिवस किती धोकादायक होऊ लागली आहे, याची त्याला पूर्णकल्पना होती. चाचण्या न करता साडेतीन हजार लोकांनी डोक्यावर रोगाची टांगती तलवार घेऊन दिवस कंठणं अतिशय कठीण होतं. अनेक खटपटी करून त्याने अमेरिकेतल्या आपल्या एका डॉक्टर मित्राशी संपर्क  साधला. हा मित्र कॉँग्रेस सदस्य होता. या मित्राने सीडीसी मधले आपले लागेबांधे वापरून काही चक्रं फिरवली, आणि सगळ्या अमेरिकन प्रवाशांच्या मेलबॉक्समध्ये एक दिवस अमेरिकन दूतावासाकडून ई-मेल येऊन पडला : ‘ज्यांची परत यायची इच्छा असेल, त्यांना अमेरिकन सरकार विशेष विमानाने जपानहून अमेरिकेत नेण्याची व्यवस्था करेल. अर्थात अशा लोकांची आधी चाचणी केली जाईल. आणि निरोगी नागरिकांनाच परत नेले जाईल. अमेरिकेत पोहोचल्यावर या सगळ्यांना परत चौदा दिवस विलगीकरण कक्षात रहावं लागेल. यासाठी ज्यांची तयारी असेल, त्यानी ती उलट ई-मेल करून कळवावे’ -  अशी ही ई-मेल होती. हॉपलॅण्डसकट इतर अनेक अमेरिकनांना घरी जायचं होतं. अमेरिकेत पोहोचल्यावर विलगीकरण करून घ्यायला त्यांची काहीही हरकत नव्हती. त्यांनी आपला होकार कळवला. काही अमेरिकन नागरिकांनी मात्र क्रूझवरच राहायचं ठरवलं. कारण विमानात अनेक प्रवाशांच्या शेजारी बसून जाणं त्यांना धोक्याचं वाटत होतं. 13 फेब्रुवारीला डायमंड प्रिन्सेसवरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 218वर जाऊन पोहोचली होती. वुहानशिवाय जगात इतर कुठल्याही ठिकाणी रुग्णांचा इतका मोठा समूह सापडलेला नव्हता. कर्मचार्‍यांचा धीरही आता खचत चालला होता. हा तणाव सहन न होऊन दुसर्‍याच दिवशी सोनाली ठक्कर या भारतीय मुलीने स्वत:चा एक व्हिडिओ करून आपल्या सोशल मीडिया अकाउण्टवर टाकला. मुंबईची राहाणारी सोनाली ही डायमंड प्रिन्सेसवरची एक सुरक्षा कर्मचारी होती. काही दिवसांपूर्वी तिला ताप आल्यानं क्रूझवरच क्वॉरण्टाइन करून ठेवण्यात आलेलं होतं. आदल्या दिवशी तिची कोरोना टेस्ट केलेली होती, आणि ती निगेटिव्ह आलेली होती. तिच्याशिवाय अजून तेरा भारतीय कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झालेली होती. भारत सरकारने ताबडतोब आपल्याला इथून सोडवावं किंवा निदान काही भारतीय डॉक्टरांना इथं पाठवून आपल्याला मदत करावी, अशी कळकळीची विनंती तिनं केली. इथं आपण अजिबात सुरक्षित नाही, असंही ती म्हणाली. हा व्हिडिओ भारतात सोशल मीडिया आणि टीव्हीवर भरपूर प्रसिद्ध झाला, आणि चक्रं हालू लागली. आरनॉल्ड हॉपलॅण्ड आणि त्याची बायको जेनी, दोघांनी परत जायचं ठरवलं, आणि आपलं सामान आवरायला घेतलं. चारच दिवसांनी खास विमानाने ते दोघं इतर अमेरिकन प्रवाशांबरोबर घरी परत जाणार होते. परत जाण्याचा दिवस आला. आरनॉल्ड आणि जेनी बॅगा भरून, तयार होऊन आपल्या खोलीत बसले होते. थोड्याच वेळात त्याना बस घ्यायला येणार होती आणि विमानतळावर पोहोचवणार होती. दारावर  कुणीतरी टकटक केली म्हणून ते जायच्या तयारीने उठले. पण दारात एक आरोग्य कर्मचारी त्यांच्यासाठी एक निरोप घेऊन उभी होती. जेनीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याने आता त्यांच्या सगळ्याच बेतावर पाणी फिरलं होतं. आता त्यांना अमेरिकेत जाता येणार नव्हतं. जेनीला काहीही त्रास होत नव्हता. पण तिची रवानगी टोक्योच्या एका विलगीकरण रुग्णालयात करण्यात आली. आर्नोल्ड हॉपलॅण्डची टेस्ट निगेटिव्ह होती. पण जेनीच्या संपर्कात आल्याने त्याला टोक्योमधल्या एका हॉटेलमध्ये क्वॉरण्टाइन करून ठेवण्यात आलं, उरलेले तीनशे अमेरिकन बसेसमधून विमानतळावर जायला निघाले. आणखी काही दिवसानी, 27 फेब्रुवारीला सोनाली ठक्करसह एकूण 138 कर्मचारी आणि प्रवाशांना एअर इंडियाच्या खास विमानाने भारतात आणलं गेलं. यात पाच परदेशी प्रवासीही होते, दोन र्शीलंकन, एक नेपाळी आणि एक पेरूचा. त्यानंतर जेनी हॉपलॅण्डची कोरोना टेस्ट दोन वेळेला निगेटिव्ह आल्यानं तिला रुग्णालयातून सोडण्यात आलं, आणि 1 मार्चला ती टोक्योहून अमेरिकेतल्या आपल्या घरी येऊन पोहोचली. त्यानंतर आठवड्याभरानं क्वॉरण्टाइन संपवून आरनॉल्ड हॉपलॅण्डही आपल्या घरी परत आले.  ही सगळी मंडळी आपापल्या देशात पोहोचली तोवर बहुतेक सर्व देशात   ‘टाळेबंदी’ सुरू झालेली होती. कोरोना व्हायरसनं सगळं जग पादाक्रांत करायला सुरुवात झाली होती, आणि त्यामुळे जगाचं लक्ष डायमंड प्रिन्सेसच्या कहाणीवरून काहीस उडालं होतं. सुरुवातीला दहा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असलेलं, आणि संपलं तेव्हा सातशे माणसांना संसर्ग घडवून आणि सात रुग्णांचा बळी घेऊन संपलेलं डायमंड प्रिन्सेस क्रूझवरचं क्वॉरण्टाइन, हा फसलेल्या क्वॉरण्टाइनचा एक उत्तम नमुना होता. mrudulabele@gmail.com (लेखिका औषध-निर्माणशास्त्र आणि बौद्धिक संपदा हक्क कायद्याच्या तज्ज्ञ अभ्यासक आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या