शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी का घडले

By admin | Updated: July 30, 2016 14:42 IST

जगण्यासाठी खेडी सुरक्षित असतात, हा भ्रमाचा भोपळा कोपर्डी येथील घटनेने (पुन्हा एकवार) फोडला. खेड्यांमध्येही आता किती दहशत आहे, माणसे बोलायला घाबरतात हे कोपर्डीत दिसले. इतर गावातले चित्रही वेगळे नाही. गावांचा सामाजिक दबाव व एकी संपली, आदराची स्थाने लुप्त झाली, चावडीचा दरारा गेला, दारूचा अड्डाच चावडीवर आला. मटक्याची टपरी, अवैध दारू, जुगाराचे अड्डे हे गावांचे नवे चित्र आहे. बेदरकार हिंसेची हिंमत येते आहे ती या बदलांमधूनच...

- सुधीर लंकेकोपर्डीत पीडित व आरोपी यांची जात शोधण्याचा प्रयत्न झाला. कोणाला कोपर्डीत येऊ द्यायचे व कोणाला रोखायचे, असा जातीचा हिशेबही जुळवला गेला. बलात्काराच्या घटनेनंतर कोपर्डीत दिसणारी गर्दी आता हळूहळू पांगायला लागली आहे. राजकारणही हळूहळू शमेल. माणसे आता विसराळू झाली आहेत. मेमरी कार्डांचा हा जमाना. त्यामुळे एखादी घटना मेंदूत साठवून ठेवण्याची गरज उरलेली नाही. हळूहळू ही घटनाही विस्मरणात जाईल. पण, एक प्रश्न कायम राहील, कोपर्डीत हे का घडले? कोपर्डीच नाही कुठल्याही खेड्यात अत्याचार व गुन्हेगार कोठून जन्मायला लागले? याची उत्तरे आता खेड्यांना, राज्यकर्त्यांना व संघटनांनाही शोधावी लागतील. अशा आरोपींना रोखण्यासाठी सरकार कितपत भूमिका बजावेल याबाबत साशंकता आहे. ‘मुलींना आम्ही कराटेचे प्रशिक्षण देऊ, कुटुंबाला शस्त्र परवाना देऊ’ असे मुख्यमंत्री म्हणाले.पण, त्यांच्यावर हल्लाच होणार नाही, अशी परिस्थिती आपण का तयार करू शकत नाही?