शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमसाक्षरता म्हणजे नेमके काय?

By admin | Updated: April 18, 2015 16:23 IST

छापील मजकूर आणि टीव्हीवरचं दृश्य हेच अंतिम सत्य असा आपला भाबडा विश्वास. साधा कॉमनसेन्सही वापरला जात नाही. मुल्ला नसीरुद्दीनच्या गोष्टीतले प्रश्न विचारणोच जणू थांबून गेले आहे.

- वैशाली करमरकर
 
आजचा पेपर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग वाचायचे माध्यम भले वेगळे असेल. कोणी लॅपटॉपवर पेपर वाचणो पसंत करतो तर कोणी पारंपरिक स्वरूपातला कागदाच्या घडीचा पेपर. तसेच टेलिव्हिजन हादेखील आपल्या जीवनाचा भाग बनून गेला आहे. या दोन्ही माध्यमांमध्ये करमणूक आणि माहिती असते. या कुटुंबातले शेंडेफळ म्हणजे इंटरनेट. त्याची मुख्य कार्ये ही उपरोक्त दोन. शिवाय जनसंपर्काची निकड हे कार्य हे शेंडेफळ भारी उत्साहाने करते. 
 आपल्या सर्वावर अशा असंख्य बाजूंनी माहिती आणि करमणुकीचा धबधबा सतत कोसळत असतो. धबधब्यात चिंब होणो वेगळे आणि वाहून जाणो वेगळे किंवा त्याखाली गुदमरून जाणो वेगळे. या धबधब्यात तीनही मूळ प्रवाहांचे नियमन करणो ही गोष्ट कोणत्याही देशाच्या सरकारांच्या अखत्यारीतली राहिलेली नाही. कारण या माहितीचा वेग प्रचंड आहे. शिवाय जगभरात साधारणत: नव्वदीच्या दशकापासून खासगी मालकीची माध्यमे आणि सरकारी मालकीची माध्यमे असे दोन धबधबे तयार झाले आहेत. मग यावर उपाय काय? चिंब होणो आणि वाहवत जाणो यातला मध्य कोणता?
एखादे लहान मूल चाकू-कात्रीशी खेळू पहात आहे असे समजूया. जे पालक धसमुसळ्यासारखे ही चाकू-कात्री काढून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यात त्यांच्या बाळाला आणि त्यांना स्वत:ला इजा पोहोचण्याची शक्यता मोठी असते, कबूल! पण त्याऐवजी जर दुसरे रंगीबेरंगी खेळणो बाळापुढे धरले, तर बाळाच्या हातातून चाकू-कात्री आपसूक गळून पडते, ही गोष्ट सर्वज्ञात आहे. स्वत:च्या म्हणजे आपल्या सरकारच्या प्रसारमाध्यमांच्या सबलीकरणामागे बरोबर हेच मानसशास्त्र ‘जी-सेव्हन’ या प्रगत राष्ट्रांनी पहिल्यापासून वापरले. हे बाळ आपले आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे घातक-निराशावादी माहितीच्या चाकू-कात्र्या कायम भोवती असणार आहेत. त्यांच्या कह्यात बाळ जाऊ नये, आपल्या घराशी त्याच्या निष्ठा बांधल्या राहणो हे घराच्या मजबुतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, हे या राष्ट्रांनी ओळखले. त्यामुळे स्वत:च्या देशाची वृत्तपत्रे आणि प्रसारवाहिन्या कुठच्याही इतर भांडवली गुंतवणुकीच्या आशेने उपाशी राहतील अशी परिस्थितीच त्यांनी निर्माण होऊ दिली नाही. जसा देशाच्या राष्ट्रगीताचा अभिमान, ङोंडय़ाचा अभिमान तसा स्वत:च्या देशाच्या प्रसारवाहिन्यांचा अभिमान या संस्कारांची जोपासना तर केलीच, पण त्याचबरोबर ही माध्यमे काळाला धरून आणि नागरिकांची नस बरोबर ओळखून सतत बदलत राहतील याचीही काळजी घेतली. देशाचे नागरिक सकारात्मक मन:स्थितीत राहणो किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी नेमके ओळखले. 
आता या उलट आपल्याकडे काय घडले? ब्रिटिश आपल्यावर अजून राज्य करीत होते, त्यावेळी त्यांच्याच माजघरात आणि त्यांच्याच सुईणीच्या निगराणीत आपल्याकडील वृत्तपत्रंचा जन्म झाला. सत्ताधारी ब्रिटिशांची करडी चुकवून एकतर सरकारला झोडपणो किंवा भारतीय अडाणी प्रजेला सतत कानपिचक्या देणो, त्यांना जागे करणो, चार उपदेशाचे डोस पाजणो-हा वृत्तपत्रीय लिखाणाचा गाभा राहिला. ब्रिटिश गेले. त्यांच्याच माजघरात जन्मलेले हे बाळ तोच अजेंडा कसोशीने राबवत राहिले. रॉयटर, बेनेट कोलमन अशी नावे कायम राहिली. मग त्यात खासगी भांडवलदार उतरले, राजकीय पक्ष उतरले. याच सर्व गडद छाया उरावर घेऊन विविध टीव्ही चॅनेल्स उगवले. आपण आता गुलाम नाही, आपल्या देशाच्या नागरिकांची सकारात्मक मन:स्थिती जोपासणो महत्त्वाचे आहे, हे भानच उरले नाही.
तेवीस जिवंत भाषांमधून विचार करणारी भारत ही वैविध्यपूर्ण देवराई आहे, तिथे सैनिकांसारखे एकसुरी पाईनवृक्ष पाश्चात्य मॉडेलवर उभे करू पाहणो हे घातक असू शकते, हा विचारच जणू थांबला. गुलामीच्या हजारभर वर्षात तुर्की, मोगल आणि ब्रिटिश आक्रमणकत्र्यानी जी सर्रास लूट आरंभली होती तीच लूट स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यकर्ते करत राहिले. बदललेल्या भूमिका ना राज्यकत्र्यानी विचारात घेतल्या, ना भारतीय नागरिकांनी.
मुल्ला नसीरुद्दीनच्या गोष्टीतले प्रश्न विचारणोच जणू थांबून गेले. असे कोणते प्रश्न? त्याचे काही वानगी दाखले-
पहिली गोष्ट प्रत्येक छापील मजकूर हा ऑथेंटिक म्हणजे अस्सल असतो हा आपला गाढ विश्वास. त्याचबरोबर कॅमे:यात पकडलेले प्रत्येक दृश्य हेच एकमेव सत्य असते असाही भाबडा विश्वास. त्यामुळे होते काय, की पेपरात छापून आलेला मजकूर अथवा दूरचित्रवाणीवरील दृश्ये हेच अंतिम सत्य आहे असे सामान्य माणूस धरून चालतो. त्यावेळी काही कॉमनसेन्सच्या गोष्टी लक्षात येत नाहीत. मजकूर लिहिणारा शेवटी एक माणूस असतो. या माणसाचे  शिक्षण, ज्ञान, चिंतन, वाचन यावर मजकुराची प्रगल्भता अवलंबून असते. तीच गोष्ट खासगी टेलिव्हिजनची. कॅमेरा म्हणजे शेवटी दुस:या कोणाचा तरी डोळा असतो. तो डोळा जे आणि जेवढे दाखवेल तेच आणि तेवढेच आपण पाहतो.  खून-मारामा:या आणि रडणो-भेकणो याचा खप दुर्दैवाने आपल्या देशात सर्वात जास्त होतो. ‘भारत’ या वास्तवाला सतत लाथा-बुक्क्यांनी मारणो हा तर परदेशी मालकीच्या (पण मराठी बोलणा:या) माध्यमांचा मूळ अजेंडा. या चाकू-कात्रीत आपण सध्या सापडलो आहोत. 
लोकशाहीमध्ये विरोधी मते हवीतच. सत्ताधा:यांना आणि भांडवलशहांना छडीच्या सपका:याने जागे करत राहणो अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु त्यात तारतम्य हवे, सामूहिक परिणामांचा विचार हवा हा मुख्य मुद्दा आहे. 
माध्यमांमधून सॉफ्टपॉवरचा वापर करणो आणि एखाद्या देशात सतत विद्रोहाचे वातावरण खदखदत ठेवणो हे आजवरच्या वर्चस्ववादी (जी-सेव्हन) राष्ट्रांचा हातातला गेम आहे. त्यात त्यांचा हातखंडा आहे. विश्वास बसत नाही ना? मग ळँी ू’4341ं’ ू’ ि6ं1 : ळँी उकअ ंल्ल ि3ँी 61’ िा अ13 ंल्ल ि’ी33ी12 हे ऋ1ंल्लूी2 र3ल्ल1 रं4ल्लीि12  या विदुषीचे पुस्तक जरूर वाचा. फोर्ड फाउंडेशन आणि रॉकफेलर फाउंडेशनतर्फे परदेशी वार्ताहरांना, लेखकांना, शास्त्रज्ञांना दिल्या गेलेल्या शिष्यवृत्त्या आणि ‘सीआयए’चा परदेशातील विद्रोही गटांना खतपाणी घालत राहण्याचा अजेंडा यातील थेट संबंध फार विदारक पद्धतीने या बाईंनी दाखवून दिलेला आहे. 
यात आपण म्हणजे सामान्य भारतीयांनी सजग राहणो महत्त्वाचे आहे. आपण एक लक्षात घेतले पाहिजे - 199क् र्पयत ‘जी-सेव्हन’ राष्ट्रे जगातील उत्पन्नापैकी 5क्} उत्पादन करीत होती. तर नवोदित (ब्रिक्स) राष्ट्रे 36}. 2क्12 साली ब्रिक्सची टक्केवारी 52} झाली तर जी-सेव्हनची 36} वर घसरली. भारतातील नॉन कॉर्पोरेट सेक्टर 85} रोजगार निर्मिती करतो आणि 45 ते 5क्} जीडीपी - म्हणजे भारतातले एकत्रित उत्पादन करतो. हा नॉन कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वसामान्य करदाते. त्यांनी हे सर्व प्रश्न स्वत:ला विचारत राहणो महत्त्वाचे आहे. 
माध्यम साक्षरतेची पहिली सुरुवात मूलगामी स्वरूपाचे प्रश्न विचारण्यापासून होते. माध्यम साक्षरता म्हणजे अजूनही खूप काही आहे. ते आता पुढच्या रविवारी..
 
 
दागिन्यांना आमंत्रण!
 
जे वार्ताहर अॅँग्लोसॅक्सन किंवा इतर ‘जी सेव्हन’ समुदायांच्या तुलनेत भारत हा कसा मठ्ठ किंवा भिकारी असे एकांगी तुलनात्मक लिहीत असतात, बोलत असतात, त्यांच्याबद्दल आपण स्वत:ला काही प्रश्न विचारणो महत्त्वाचे आहे.
 हा इसम कोणाच्या खर्चाने परदेशात जाऊन आला?
 तिथे कुठे आणि किती काळ राहिला? तो खर्च कोणी केला?
 परदेशी राहून त्याला तेथे रोजीरोटी कमवावी लागली होती का? तिथल्या सामान्य करदात्याप्रमाणो तो राहिला होता का?
क्रमांक 3च्या प्रश्नाचे उत्तर होकारात्मक आले तर त्यांच्या मतांना वैचारिक खोली असण्याची जास्त संभावना आहे. पूर्वी कहाण्यांच्या पुस्तकात एक कहाणी होती. बहीण अचानक श्रीमंत झाली म्हणतांना भाऊ तिला जेवायला बोलावतो. ती जेवणाचे घास दागिन्यांवर ठेवते. स्वत: जेवत नाही. कारण हे आमंत्रण दागिन्यांना असते. तिला नाही. प्रश्न क्र. 1 आणि 2 हे या कहाणीतला मेसेज बरोबर चिमटीत पकडतात. पेपर वाचून झाल्यावर किंवा खासगी वाहिन्यांवरची नळावरची भांडणो सतत बघून एक अब्ज लोकसंख्या निराशावादाने झपाटली जाणार असेल तर हे भारतासाठी फार भयंकर आहे.
 
(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून, ग्योथे इन्स्टिटय़ूट मार्क्‍स म्यूलर भवन येथे विपणनप्रमुख (कॉर्पोरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत.)