शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

पण मानसिकतेचे काय?

By admin | Updated: November 29, 2014 14:20 IST

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पंखांवर आरूढ होत मानव प्रगतीची शिखरे पादाक्रांत करतो आहे; मात्र स्त्री-पुरुष भेदाची त्याची मानसिकता बदलायला तयार नाही. त्यामुळेच स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा करावा लागला. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सामाजिक परिस्थितीत थोडाफार बदल व्हायला सुरुवात झाली आहे तोच, आता या कायद्यात एक बदल होऊ घातला आहे. ‘पोरींना जन्मूच द्यायचे नाही’ या मानसिकतेला पूरक होईल, अशा या बदलाची वेधक मीमांसा.

 जोसेफ तुस्कानो

 
एके दिवशी एक बाई एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेली आणि भराभर म्हणाली, ‘‘डॉक्टर, मी खूप अडचणीत आहे. मला आपली मदत हवीय. मी गर्भवती आहे आणि कुणाला सांगू नका; पण एका सोनोग्राफी केंद्रात ओळखीच्या माणसाकडून गर्भ तपासून घेतला, तेव्हा तो मुलीचा असल्याचे कळले. मला अगोदर एक मुलगी आहे अन् कुठल्याही स्थितीत मला दुसरी मुलगी नको आहे..’’
‘‘मी काय करू म्हणता?’’ त्या डॉक्टरांनी विचारले.
‘‘माझा गर्भपात करण्यासाठी मदत करा,’’ ती बाई अजिजीने बोलली.
त्या अनुभवी व समजूतदार डॉक्टरांनी थोडा वेळ विचार केला नि म्हणाले, ‘‘माझ्याकडे एक उपाय आहे व तो तुमची समस्या सोडवू शकेल.’’ ‘‘मग सांगा ना.’’ ती बाई उत्सुकतेने म्हणाली. 
‘‘आपण असं करू या,’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्हाला दोन मुली नको आहेत ना, मग आपण तुमच्या पहिल्या मुलीला मारून टाकू या. मग पोटात असलेल्या मुलीला जन्म देणे त्रासदायक वाटणार नाही आणि तुमची या आपत्तीतून आपसूक सुटका होईल. एवीतेवी एकीला मारण्याचा निर्णय तर तुम्ही घेतलाच आहे.’’
‘‘असं कसं म्हणता डॉक्टर.कुणाची हत्या करणे हे पाप नाही का? अन् माझी छकुली तर माझी खूप लाडकी आहे. तिला कुठे ठेच लागली तर माझ्या डोळ्यांत पाणी येते.’’
तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘‘जिवंत मुलीला मारले काय किंवा पोटातल्या पोरीला ठार केले काय, दोन्ही पापच!’’
त्या बाईला भान आले व तिला अपराधी वाटले. आपल्या घरच्या लोकांची समजूत काढावी म्हणून तिने डॉक्टरांना विनंती केली.
हा किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब संवर्धन खात्याने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यात (एमपीटी १९७१) बदल करण्यासाठी २९ ऑक्टोबर २0१४ रोजी एक फतवा काढून, या क्षेत्रातील संबंधितांच्या सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार जर गरोदर बाईच्या मानसिक वा शारीरिक स्वास्थ्याला हानी पोचत असेल किंवा जन्मणार्‍या बाळात गंभीर शारीरिक आजार वा मानसिक कमतरता निर्माण होणार असतील, तर २४ आठवड्यांच्या गर्भाच्या गर्भपातास परवानगी दिली जाईल, असा तो बदल असेल. मानवतेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची भ्रूणहत्येची सरसकट परवानगी नीतिमत्तेला धरून नाही, हे कुणाही संवेदनशील नागरिकाला पटू शकेल.
स्त्रीच्या उदरात गर्भधारणा होते, तेव्हाच जीव जन्मतो आणि डॉक्टर मंडळी आपल्या पेशाचे रजिस्ट्रेशन करतात तेव्हा जाहीर करतात, की जिवाच्या प्रारंभापासून आम्ही मानवाप्रती आदर राखू. २४ आठवड्यांच्या अर्भकाचे हृदयाचे ठोके अल्ट्रा साउंड चाचणीत स्पष्ट जाणवतात व तो एका नव्या जिवाचा जणू हुंकार असतो. अर्भक आजारी असेल किंवा त्याच्यात एखादी त्रुटी असेल तर तो त्याचा गुन्हा थोडाच ठरतो, की त्याला थेट फाशीची शिक्षा द्यावी? वास्तविक समाजातील कमजोर घटकांचा बचाव करणे, ही प्रगतिशील समाजाची जबाबदारी ठरते. ती समाजाची खरी ताकद नि शान असते. इवल्या जिवांचे खच्चीकरण ही मानवतेप्रती क्रूरता होय. अशा प्रकारच्या गर्भपातास सरसकट संमती दिल्याने मातांचे आणि एकूण स्त्रियांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. अशा या बळजबरीच्या गर्भपाताने गर्भवती माता ‘व्हॅसोवेगाल अँटॅक’च्या बळी ठरतात. त्या हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावू शकतात. कारण खेडोपाडी अशा प्रकारच्या क्लिष्ट वैद्यकीय किंवा रक्तस्रावावर इलाज करणार्‍या सुविधा नसतात. अशा कायद्याने स्त्रियांचे आरोग्य अजून धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
गर्भवती मातांचे गुन्हेगारी प्रवृत्तीने होणार्‍या गर्भपातापासून रक्षण करण्यासाठी कायदा हवा. गर्भपाताचा गुन्हा कायदेशीर करून मातांचे मृत्यूचे प्रमाण कमी होणार नाही, हे शासनकर्त्यांनी समजून घ्यायला हवे. तसेच, हा नवा कायदा समाजात अजूनही मूळ धरून असलेल्या अनिष्ट रिवाजाला खतपाणी घालील व तो म्हणजे स्त्रीभ्रूणहत्येचा होय. ‘वंशाचा दिवा’ या वेड्या संकल्पनेपायी समाजात मुले आणि मुली यांच्या प्रमाणातला समतोल बिघडत चालला आहे. अजूनही स्त्रीभ्रूणहत्या ही सामाजिक समस्या असून, हा प्रकार १000 कोटी रुपयांच्या वरील व्यवसायाच्या रूपात छुपे रुस्तमपणे चालू आहे. 
समाजातील मुलींचे प्रमाण कमी होत गेले, की इथला लिंगसमतोल ढासळेल आणि पुरुषांतील समलिंगी संभोग, लिव्ह-इन-रिलेशनशिप, दोन पुरुषांचे परस्परांशी विवाह, त्याहीपुढे जाऊन बहुपतित्व पद्धती या बाबींचा सुळसुळाट होऊ शकेल.
दोन वर्षांपूर्वी ‘लॅन्सेट’ या इंग्लडमधील ख्यातकीर्त वैद्यकीय शोधनियतकालिकातील लेखानुसार, आपल्या देशात दर वर्षी ५ लाख स्त्रीभ्रूणहत्या होतात. काही भागांत तर वधूविक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. स्त्रीभ्रूणाला नष्ट करण्यास विरोध करणार्‍या मातांना त्यांच्या कुटुंबात वाईट, क्रूर वागणूक मिळाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे शासनदारी तक्रारी करणार्‍या बायांची मुस्कटदाबी होते. 
या पार्श्‍वभूमीवर बे बे शुआई या अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या चिनी महिलेच्या कृत्याची छाननी करू या. शांघायमधली ही बया सन २000 मध्ये आपल्या नवर्‍यासोबत इंडियाना प्रांतात आली होती. १0 वर्षांनी तिचं लग्न तुटलं व तिने दुसर्‍या पुरुषाशी घरोबा केला आणि त्याच्यापासून तिला दिवस गेले. जेव्हा तो गृहस्थ तिला दगा देऊन पळून गेला, तेव्हा तिने उंदराचे औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ती त्या आत्महत्येच्या कृतीतून वाचली; पण तिच्या पोटात असलेला अंजेल नावाचा स्त्रीभ्रूण आत्महत्येच्या दहाव्या दिवशी सिझरीन करून बाहेर काढण्यात आला. दुर्दैवाने अगदी दोन दिवसांनी अंजेल मरण पावली.  पोलिसांनी शुआईवर खुनाचा आरोप ठेवला. तिला ४३५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. आत्महत्येचा प्रयत्न आणि भ्रूणहत्या या दोन दृष्कृत्यांमुळे एका महिलेला झालेले हे शिक्षा प्रकरण दोन वर्षांपूर्वी खूप गाजले. इंडियानाच्या इतिहासातले ते पहिले प्रकरण ठरले.
‘प्रकाश बाबा आमटे - दी रीअल हीरो’ या चित्रपटातील तो हृदयद्रावक प्रसंग आठवा. 
एका अडलेल्या आदिवासी बाईला वाचवताना डॉ. प्रकाश जन्मू घातलेल्या बाळाचे तुकडे करतात व बाईचा जीव वाचवितात. दोघांनाही जगण्याचा हक्क असताना त्या बाईला वाचविण्यासाठी त्यांना जंगलातील सोयीअभावी बाळाला मारावे लागते, तेव्हा ते ढसाढसा रडतात.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पंखावर आरूढ होत आपण सतत भरारी घेत आलो आहोत. आपली खूप प्रगती होत आहे. आपली शानशौक नि आपल्या चंगळवादाला वेगवेगळी वळणे मिळत आहेत. त्याची परिमाणेदेखील झपाट्याने बदलत आहेत. पण आपल्या मानसिकतेचं काय? ती तर ढिम्म आहे तशीच आहे. पूर्वी गळा दाबून मुलीला मारले जाई. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात गर्भपाताची सोय झाली. आता तर संशोधक भ्रूणातल्या एक्स-एक्स क्रोमोझोमला छेद देऊन एक्स-वाय क्रोमोझोमचे संश्लेषण करणारी जीन-अभियांत्रिकी विकसित करण्यात गढले आहेत. आपल्या पद्धती बदलल्या; पण मानसिकता तीच आहे. पोरींना जन्मू द्यायचं नाही. शासनाने त्यास हातभार लावू नये, एवढेच.
(लेखक विज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत.)