- स्टीफन हॉकिंग्ज
आपण राहतो त्या विश्वाला समजून घ्यायचे, तर अणूची माहिती हवी.
त्या अणूंना एका साखळीत बांधून ठेवणा:या
शक्तींची रचना माहिती असायला हवी.
अवकाश आणि काळाचे रुप आणि रेषा,
चमकत्या ता:यांचे जन्म आणि मृत्यू,
झगमगत्या आकाशगंगांचे नृत्य आणि
कृष्णविवरांचे रहस्य हे सारे माहिती असायला हवे.
पण ते पुरेसे नाही.
ही माहिती म्हणजे संपूर्ण ज्ञान नव्हे.
या गोष्टी विश्वाच्या सा:याच रहस्यांच्या खिडक्या
उघडत नाहीत, सारेच सांगत नाहीत.
चमकत्या ता:यांच्या प्रकाशाची रहस्ये असतील त्यात दडलेली,
पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून निघणारी शलाका
दिसत नाही या खिडकीतून!
या प्रकाशाचा उद्गम समजून घ्यायचा,
तर जीवनाविषयीची जिज्ञासा हवी
आणि मनाची कवाडे उघडण्याची तयारी!
पृथ्वीवर जीवसृष्टी उत्स्फुर्तपणो जन्माला आली
हे मानत असू आपण, तर मग हेही खरे,
की या अथांग विश्वात आणखी कुठेतरी
फुटलेला असू शकेल जीवनाचा अंकूर!
विश्वाच्या या अफाट पसा:यात कोण जाणो कोण्या दिशेला
असेल कदाचित कुणीतरी..
बुद्धिमान जीवांची ती वसाहत पाहत असेल
माणसांकडे कुतुहलाने!!
‘त्यांना’ माहिती असेल का ‘आपल्या’विषयी?
की पृथ्वीवरून निघणा:या शलाका नुसत्याच
भटकत असतील नि:ष्प्राण विश्वाच्या अचेतन पोकळीत?
या इथे, पृथ्वी नावाच्या ग्रहावर एक अख्खे आयुष्य नांदते आहे,
हे कळले असेल का ‘आणखी’ कुणाला?
असे काही, असो अगर नसो,
पृथ्वीच्या कक्षेपलीकडे ‘कुणी’ आहे का?
- या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे.
We are life
We are intelligent
We Must Know
(पृथ्वीपल्याड, अन्य कुठल्या ग्रहांवर माणसाचे कुणी ‘भावंड’ आहे का? - हे शोधण्याच्या उद्देशाने ख्यातनाम शास्त्रज्ञ
स्टीफन हॉकिंग्ज यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच ब्रेक थ्रू नावाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेच्या उद्घाटनप्रसंगी हॉकिंग्ज यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा स्वैर अनुवाद)