शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

व्हीआयपींच्या भेटी आणि वाघ

By admin | Updated: December 6, 2015 11:59 IST

व्याघ्र प्रकल्पाला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची भेट म्हणजे आमच्या काळजीचा विषय. कारण व्यक्ती जेवढी मोठी तेवढी तिची वाघ पाहण्याची इच्छा प्रखर. पण वाघही नेमके तेव्हाच गायब होणार!

प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
 
मेळघाटला येणारे पर्यटक वाघ बघायलाच येतात. जंगलातील नीरव शांतता, रानवट सौंदर्याची अनुभूती घ्यायला येणारे फार कमी! मात्र वाघ दिसलाच पाहिजे अशा अट्टहासाने येणा-यांना मेळघाटमध्ये ब-याचदा निराश व्हावं लागे. मोठे वन्यप्राणी पर्यटकांना बघायला मिळावे म्हणून आम्ही वेगळे पर्यटन क्षेत्र निश्चित केले होते, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. पर्यटकांचे गवा, सांबर अशा प्राण्यांच्या दर्शनाने फारसं काही समाधान होत नसे, वाघाची तहान काही मिटत नसे. त्यात प्रकल्पाला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची भेट असेल तर अशी परिस्थिती अधिकच तणावपूर्ण व्हायची. जेवढी व्यक्ती मोठी तेवढी तिची वाघ पाहण्याची इच्छा प्रखर. 
       एकदा आमचे सर्वात वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वनसंरक्षक माझ्या क्षेत्रत आले होते. दिवसभराच्या तपासणी कामानंतर रात्री त्यांनी वाघ बघायची इच्छा प्रकट केली. आमच्या उघडय़ा जीपवर दोन सर्चलाईट लावून आम्ही निघालो. आम्ही जवळपास अर्धा तास फिरलो पण काही दिसलं नाही. काही दिसत नसल्याने बॉस उतावीळ होऊ लागले होते आणि आम्ही लवकर काहीतरी दिसावं म्हणून देवाची प्रार्थना करू लागलो. डोळे फाडून फाडून काही दिसतंय का ते पाहत होतो. एवढय़ात रस्त्यावर लालबुंद चमकणारा डोळा दिसला. मला माहीत होतं की तो नाईटजार (चकवा) पक्षी आहे आणि मी तसं बॉसला सांगितलं. 
या पक्ष्याच्या बाबतीत एक समस्या अशी असते की, त्याला असं वाटत असतं की त्याला कोणी पाहिलेलं नाही. त्यामुळे आगंतुक अगदी जवळ येईपर्यंत हा उडत नाही. या प्रसंगात मी जीपचा वेग काही कमी केला नाही आणि आम्ही त्याच्या अगदी जवळ गेल्यावर त्याने हेलिकॉप्टरप्रमाणो सरळ उड्डाण केलं आणि आमच्या उघडय़ा जीपमधल्या बॉसच्या पुढय़ात जाऊन बसला. या अनपेक्षित पाहुण्याच्या भेटीने बॉस गांगरून गेले आणि जागच्याजागी उडाले. पुढे आणखी 3-4 चकवे आडवे आले. पण ते बिचारे शहाण्यासारखे आधीच उडाले. पण बॉसने पहिल्या चकव्याचा इतका धसका घेतला होता की हेही येऊन त्यांच्या पुढय़ात अवतरतील या भीतीने खबरदारी म्हणून खाली वाकायचे आणि सीटवरून उडी मारायचे. त्यांची ही अवस्था पाहून आजची फेरी इथेच थांबवावी असं मी त्यांना सुचवलं आणि वाघ किंवा इतर कोणताही प्राणी न पाहता आम्ही परत फिरलो. 
    एकदा सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण मेळघाटात आले होते. माझ्या  अधिका-यांनी त्यांना फिरवलं. त्यांना ब-यापैकी प्राणी दिसले. सरतेशेवटी त्यांना सेमाडोहला आमच्या निसर्ग निर्वचन केंद्रात आणलं गेलं. आमच्या शेरे पुस्तकात त्यांना शेरा लिहायला सांगितला. काही लिहिण्यापेक्षा त्यांनी एक व्यंगचित्र काढणं पसंत केलं. त्या चित्रत वाघ मागे लागल्याने जीव वाचवण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न करणा:या अधिका-याचे व्यंगचित्र रेखाटलं होतं. 
    एके दिवशी मला बिनतारी संदेश मिळाला की माननीय मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक मेळघाटला भेट देणार आहेत. ते त्यांच्या कुटुंबीयांसह खास मेळघाटात तीन दिवस घालवणार होते. ‘जेवढा मान्यवर मोठा तेवढा ताण जास्त’ हा अगदी प्रचलित अलिखित नियम होता. आमच्या दृष्टीने दोन नंबरचा नियम होता ‘जेवढा मान्यवर मोठा तेवढी प्राणी दिसण्याची शक्यता धूसर’. आमच्या सुदैवाने मुख्यमंत्री पूर्वी शिकार करत असल्याने त्यांना जंगलाची चांगलीच माहिती होती. त्यांना माहीत होतं की आज वन्यप्राणी दर्शनाचा दुष्काळ पडला तर उद्या बंपर पीक येऊ शकतं. पण दुर्दैवाने तीनही दिवस सलग दुष्काळी गेले. 
    शेवटच्या दिवशी मुख्यमंत्रीही उतावीळ झाले आणि सर्चलाईटच्या प्रकाशात प्राणी पाहायचं ठरलं. आम्ही कोलकाझ विश्रमगृहापाशी पोचता पोचता माझे सहकारी अजय पिलारीशेटना भेकर दिसलं आणि त्यांनी वाहन थांबवण्यासाठी जोरदार आवाज दिला. पण मुख्यमंत्र्यांच्या सर्चलाईटमधून ते भेकर काही दिसलंच नाही. तरीही मुख्यमंत्री आमच्या (वाघाच्या) खराब प्रदर्शनावर नाराज झाले नाहीत. त्यांनी त्यांचे काका व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं कोलकाझ येथे अनावरण केलं. मुख्यमंत्र्यांनी माझ्या कर्मचारीवर्गाला छानशी मेजवानी दिली. 
    आम्ही रात्रभर बसून सेमाडोहकरता जास्तीचा कर्मचारीवर्ग आणि कर्मचारीवर्गाला गस्तीकरिता सुविधा पुरविण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला. दुस:या दिवशी मी मुख्यमंत्री महोदयांना प्रस्ताव सादर केला आणि आठवडाभरात जास्तीचा कर्मचारीवर्ग मंजूर झाला. मुख्यमंत्री सहायता निधीमधून कर्मचारीवर्गासाठी साधनांसाठी भरघोस निधीही प्राप्त झाला. 
    मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही साधुकंडी गस्ती कुटीत चहापान ठेवले होते. त्यांना ते वातावरण, परिसर खूप आवडला. दुस:या दिवशी सकाळी मान्यवर हेलिकॉप्टरने चिखलद:याहून मुंबईला जाणार होते. त्यांच्या गाडय़ांचा ताफा हेलिपॅडकडे जात असताना त्यांनी अचानक कालच्या रात्रीच्या कुटीला त्यांचे मित्रद्वय अरुण साधू आणि जब्बार पटेल यांच्या समवेत भेट द्यायची इच्छा प्रकट केली. त्यावेळचे पोलीस उपमहानिरीक्षक संजीव दयाळ यांना मुख्यमंत्री प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रकडे वळले असल्याबद्दल काही कल्पना नव्हती. ते सरळ हेलिपॅडच्या दिशेने पुढे निघून गेले. त्यांना साधूची (अरुण) साधुकुंडीच्या पूर्वनियोजित नसलेल्या भेटीबद्दल कल्पना नव्हती. मान्यवरांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ते फारच अस्वस्थ झाले. 
    मुख्यमंत्र्यांना पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करण्यास मी प्रलोभित केलं असं वाटून ते माझ्यावर खूप नाराज झाले. ते मला म्हणाले की त्यांना पोलीस प्रशिक्षणात अशी शिकवण दिलेली असते की मान्यवरांच्या सुरक्षिततेच्या डय़ूटीवर असताना भरलेलं पिस्तूल जवळ ठेवावं, कारण जर का मान्यवरांना काही झालं तर त्या भरलेल्या पिस्तुलाने स्वत:ला संपवून टाकायचं (विभागीय चौकशीला सामोरं जाण्याऐवजी). मान्यवरांनी असा अचानक साधुकुंडीला घेऊन जाण्याचा प्रस्ताव मांडल्याने मीही चिंताक्रांत झालो होतो. त्यांची विनंती अमान्यही करता येण्याजोगी नव्हती आणि बदलाबाबत पोलिसांना कळवायला वॉकी-टॉकीही नव्हती. पण सुदैवाने सर्व काही ठीक झालं आणि काही समस्या उद्भवली नाही. 
    मुख्यमंत्र्यांच्या मेळघाट भेटीची मी तयारी करत होतो तेव्हा एका दु:खद घटनेचा उलगडा झाला. मला अशी बातमी मिळाली की वाघाने एका माणसाला मारलं आहे आणि काही अंशी खाल्लं आहे. हा प्रकार चिखलद:याजवळ घडला होता आणि मुख्यमंत्री दुस:या दिवशी तिथेच भेट देणार होते. माझ्या नोकरीच्या काळात आणि त्यापूर्वी लहानपणी पाहिल्यानुसार शाकाहारी प्राण्यांनी पिकांचे नुकसान करणो आणि मांसाहारी प्राण्यांनी जनावरे मारण्यापुरता मानव-प्राणी संघर्ष मर्यादित होता. मेळघाटात वाघाने माणूस मारल्याचं कधी ऐकलं नव्हतं, तेव्हा नरभक्षक वाघाची गोष्टच सोडा. त्यामुळे चिखलद:याजवळ वाघाने मारल्याचं कळल्यावर मला आश्चर्य वाटलं. 
    चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण वरचं पठार आणि खालचं पठार अशा दोन भागात विभागलं गेलं आहे. वरच्या पठाराच्या एका कडेला मरियमपूर नावाचं छोटंसं गाव वसलं आहे. मरियमपूरला नव्वदीच्या सुरुवातीस एक अतिशय कडक फादर (ख्रिश्चन धर्मगुरू) राहत होते. ते आदिवासींना दारू पिण्यापासून परावृत्त करत. फादरच्या प्रवचनाच्या प्रभावामुळे चांगला परिणाम होऊन गावात दारूबंदी कडकपणो पाळली जात होती. पण काही शौकीन त्यातून सुटका मिळण्यासाठी चिखलदरा-सेमाडोह रस्त्यावर 3-4 किमीवरच्या मेमणा नावाच्या छोटय़ाशा गावात जाऊन आपली तहान भागवून घेत. या भागात वन्यप्राणी भरपूर असल्याने मंडळी सूर्यास्तापूर्वी मरियमपूरला न चुकता परतत. 
    मेमणा गावची बरीचशी मंडळी ख्रिश्चन होती. गावात जाताना त्यांच्या दफनभूमीतून जावं लागे. ही दफनभूमी अजूही चिखलदरा-सेमाडोह रस्त्यावर आहे. तिथून उजव्या हाताला आतमध्ये मेमणा गाव आहे. त्या दिवसात मेमणामधल्या सर्वाना एक वाघीण तिच्या तीन बछडय़ांसह तिथे राहत असल्याचं माहीत होतं. ती मानवी अस्तित्व टाळायची आणि कोणी जवळपास आलाच तर गुरगुराट करायची.
    मला त्या माणसावरच्या हल्ल्याची बातमी कळली तो 1992 च्या एप्रिलचा शेवटचा दिवस होता. मी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्या माणसाचे प्रेत सापडलं. त्याच्यावरील खाणाखुणा पाहताच त्याला वाघाने मारल्याचं स्पष्ट होत होतं. वाघिणीने बहुतेक त्याला दफनभूमीत मारून ओढत नाल्यापाशी आणलं असावं आणि बछडय़ांनी त्याचे चावे घेतले असावेत. मी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटलो आणि त्यांचं सांत्वन केले. मी मेमणा येथील माङया कर्मचारीवर्ग आणि मरियमपूरच्या गावक:यांशी बोललो. जवळपासच्या जंगलात फिरलो. त्यावरून दिवसभरात कसा कसा घटनाक्रम झाला असेल याचा अंदाज बांधला. 
    संध्याकाळी तो बळी पडलेला माणूस त्याच्या काही मित्रंसोबत मरियमपूरहून मेमणा गावाला गेला होता. वाघिणीला टाळण्यासाठी दोन-चार पेग झाल्यावर त्याच्या मित्रंनी परतीच्या रस्त्याला लागण्याबाबत त्याला विनवलं. त्याने ते काही मानलं नाही. वाघिणीला मी दगडं मारून हाकलवून देईन असं सांगितलं. थोडय़ा वेळाने वाघीण तिच्या बछडय़ांसह तिथे आली असावी आणि तिला त्या माणसाचे खडे लागले असावेत. त्यामुळे तिने चिडून त्या माणसाला मारलं असावं 
आणि नाल्याशी ओढत नेलं असावं. 
कदाचित बछडय़ांनी उत्सुकतेपोटी त्याच्या मांडय़ांना चावे घेतले असावेत. 
    त्या घटनेनंतर मी त्या भागात जवळपास वर्षभर कडक निगराणी ठेवली होती. पण वाघिणीकडून असं कोणतंही ‘गैरकृत्य’ घडलं नाही. त्या बळीच्या अवाजवी धाडसाला माफ करण्यात आलं. त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वनविभागात नोकरीत सामावून घेतलं गेलं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाईचा चेक देण्यात आला.  
दोष कोणाचा होता हे कळलं असल्याने मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला काही प्रतिप्रश्न केले नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांसारखे बाकीचे मान्यवर समजूतदार असते तरी किती बरं झालं असतं, 
असं मला वाटत राहिलं.
 
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com