शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

उमेदीची १०२ वर्षे

By admin | Updated: July 19, 2014 19:12 IST

एखाद्याच्या आयुष्यात उमेदीची वर्षे असतात तरी किती? फार तर आठ, दहा! म्हणूनच वयाची तब्बल १0२ वर्षे नित्यनूतन विचार करत त्याप्रमाणेच आयुष्य जगणार्‍या जोहरा सहगल या वेगळ्या ठरतात. शंभर वर्षे झालेल्या चित्रपटसृष्टीच्याही आधी १ वर्ष जन्म झालेल्या या ज्येष्ठ अभिनेत्रीचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा..

- रेखा देशपांडे

तू चिरप्राचीन, तू चिरनूतन.. - रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या एका कवितेत नवजात अर्भकाचं असं वर्णन केलं आहे. बाळाचा, सजीवाचा जन्म ही घटना सृष्टीच्या इतिहासातली किती प्राचीन घटना, त्याच वेळी त्या नवजात सजीवाइतकं नूतन दुसरं काय असू शकणार? जोहरा सहगल यांचा फोटो पाहताना, त्यांना फिल्म किंवा टीव्हीच्या पडद्यावर पाहताना कवितेतले हेच शब्द मनात उमटतात. आजच्या तरुण आणि प्रौढ पिढीनंही त्यांना पाहिलंय ते त्यांनी ऐंशी-नव्वद आणि शंभर वषर्ं पार केलेलं; पण त्यांच्या चिरमिस्किल मुद्रेवरचं हसू आणि डोळ्यांतलं अपार कुतूहल कधी वृद्ध झालेलं दिसलंच नाही. 
भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला त्याच्या बरोबर एक वर्ष आधी जोहरा सहगल या देशाच्या भूमीवर अवतरल्या होत्या. नुसत्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या शंभर वर्षांच्या घटना, स्थित्यंतरांचा विचार केला, तरी जोहरा सहगल यांनी केवढा मोठा काळ अनुभवला, अक्षरश: सर्वांगांनी अनुभवला, त्याची थोडीशी कल्पना येईल. थोडीशीच. कारण या शंभर, नव्हे १0२ वर्षांच्या प्रदीर्घ अवधीतल्या अवघ्या सांस्कृतिक इतिहासालाच या व्यक्तिमत्त्वानं टिपकागदाप्रमाणे टिपून, शोषून घेतलेलं दिसतं आणि तेही चिरनूतन जिंदादिलीनं!  
आजच्या वेगाच्या युगातल्या ‘सेलेब्रिटीजना, सिनेमा, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, स्टेज शोज इतकेच नव्हे तर आपलं सामाजिक भान जगापुढे मांडण्यासाठी करण्याचे उपक्रम, अशा दाही दिशांनी आपापल्या प्रतिभा परजताना आपण पाहतो आहोत. भोवळ आणणारा असा हा वेग आहे हे सगळेच कबूल करतात - तरीही त्यातून सुटका नाही, याचीही जाणीव त्यांच्याकडे असते. कारण आज दम खायलाही जो थांबला तो संपला, अशी अवस्था आहे. अशा या पिढीनं जोहरा सहगल यांचा दिग्विजय पाहायला हवा! 
जन्म पारंपरिक पण पुरोगामी विचार अवलंबिलेल्या खानदानी मुस्लिम कुटुंबातला. इतिहासात रोहिला पठाणांचा उल्लेख वाचलेला काही जणांना आठवत असेल. अशा रोहिला पठाण खानदानात साहिबज़ादी ज़ोहराबेगम मुमताज़ुल्लाहचा जन्म सहारनपूर इथे झाला. 
जोहराचं व्यक्तिमत्त्व लहानपणापासून टॉमबॉयचंच. आपण आपलं करिअर करायचं, आपलं स्वत्व घडवायचं हेच ध्येय ठरवलं. नृत्य, अभिनयाकडे ओढा लहानपणापासूनच होता. सुदैवानं त्याला इंग्लंडमध्ये एडिम्बरा इथे राहणारे मामा साहबजादा सइदुज्झफर खान यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांच्याबरोबर जोहरा चक्क कारनं हिंदुस्तानातून निघाली. इराण, पॅलेस्टाइन, सीरिया मग तिथून इजिप्त असा प्रवास करत बोटीनं युरोपमध्ये पोहोचली.
 तिची युरोपियन मामी तिला र्जमनीतल्या ड्रिस्डेन इथे मेरी विगमनच्या बॅले स्कूलमध्ये घेऊन गेली. युरोपमध्ये जाऊन बॅले शिकणारी जोहरा पहिली भारतीय मुलगी. र्जमनीत बॅले शिकत असताना या साहबजादी साहिबा तिथल्या काऊंटेस लिबेस्टीनच्या घरी राहत होत्या. याच दरम्यान उदयशंकर आपला बॅलेचा ट्रुप घेऊन युरोपमध्ये कार्यक्रमांचे दौरे करत होते. जोहरानं अर्थातच त्यांचा ‘शिवपार्वती हा बॅले बघितला आणि मग ती त्यांना भेटली. सन १९३५मध्ये जोहरा त्यांच्या जपान दौर्‍यात सामील झाली आणि त्यांच्या बॅलेची नायिका बनली. जपान, अमेरिका, इजिप्त असा दौरा करत-करत १९४0मध्ये जोहरानं उदयशंकर यांच्या अलमोडा इथल्या संस्थेत नृत्य शिकवायला सुरुवात केली.
याच काळात तिथे नृत्य शिकणार्‍या कामेश्‍वर सहगल या तरुणाशी सूर जुळले. दोघं प्रेमात पडले. प्रेमात पडलो म्हणजे लग्नबंधनातच राहायला हवं, असं काही जोहरांना वाटत नव्हतं. (हे चाळीसच्या दशकात घडत होतं, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ ही संकल्पना तेव्हा चर्चेला आलेली नव्हती.) एकूणच आसमंतात मजेत भिरभिरताना चुकून पृथ्वीतलावर आलेलं हे पाखरू असावं! कामेश्‍वर यांच्या  आग्रहाखातर जोहरांनी लग्न केलं. विवाह आंतरधर्मीय, नवरा मुलगा नवर्‍या मुलीपेक्षा वयानं चार-सहा वर्षांनी लहान. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांनी विरोध वगैरे करून पाहिला; पण संसार सुरू झाला. 
उदयशंकर अकादमी बंद पडल्यावर दोघांनी लाहोरमध्ये स्वत:ची जोहरेश डान्स इन्स्टिट्यूट सुरू केली; पण लवकरच फाळणीची चाहूल लागली. सांप्रदायिक असंतोषानं लाहोर धुमसू लागलं, तसं १९४५ मध्येच सहगल दांपत्य आपल्या एक वर्षाच्या मुलीला घेऊन मुंबईला आलं. परंपरेचं पाणी किती खोलवर मुरतं याचा विलक्षण प्रत्ययच जोहरा यांनी आपल्या नवजात मुलीविषयीच्या पहिल्यावहिल्या भावनांचं प्रामाणिक वर्णन करताना दिलंय. आपल्याला मुलगी झाली, हे आपल्याला त्या क्षणी आवडलं नव्हतं, आपल्याला तिच्याविषयी ममत्व वाटलंच नाही, असं त्यांनी लिहून ठेवलंय. अर्थात, पुढे ती धारणाच किती चुकीची होती, हे त्यांना जाणवलं. आई-मुलीचं गोड नातं निर्माण झालं आणि आईच्या शंभराव्या वर्षी मुलगी किरण हिनं आईचं चरित्र लिहून प्रसिद्ध केलं - ‘जोहरा सहगल - फॅटी! पण त्या आधी - 
चाळीसच्या दशकाच्या मध्यावर लाहोर आणि एकूणच उत्तरेतल्या सांस्कृतिक-वैचारिक चळवळीचे वारे मुंबईत येऊन पोहोचत होते. एकीकडे पृथ्वीराज कपूर आपल्या पृथ्वी थिएटर्समधून सामाजिक भान जागवणारी नाटकं करत फिरत होते, तर दुसरीकडे डाव्या विचारसरणीच्या मुशीत पोसलेल्या मंडळींनी इंडियन नॅशनल थिएटर असोसिएशन - ‘इप्टा’ची चळवळ सुरू केली होती. जोहरादेखील पृथ्वी थिएटर्समध्ये सामील झाल्या आणि तिथे चौदा वषर्ं अभिनय-नृत्यात रमल्या. त्याचबरोबर ख्वाजा अहमद अब्बास, चेतन आनंद, बलराज साहनी वगैरे मंडळींबरोबर ‘इप्टा’च्या नाट्यचळवळीतही त्या सामील झाल्या. याच मंडळींनी याच विचारांनी प्रेरित होऊन चित्रपटनिर्मिती सुरू केली, तेव्हा अब्बास यांच्या ‘धरती के लाल आणि चेतन आनंद यांच्या ‘नीचानगरमध्ये जोहरा यांनी कामंही केली. पन्नासच्या दशकात त्यांनी गुरुदत्तच्या ‘बाज या चित्रपटाचं नृत्य-दिग्दर्शन केलं. गुरुदत्त हेही उदयशंकर यांचे शिष्य आणि चित्रपटसृष्टीतली त्यांची कारकीर्द सुरू झाली होती ती नृत्य-दिग्दर्शनाने, हे लक्षात घेतलं की, या घटनेचं आणखी एक लोभस परिमाण लक्षात येतं. तसंच अब्बास यांनी राज कपूरसाठी ‘आवाराची पटकथा लिहिली, तेव्हा त्यातल्या ‘घर आया मेरा परदेसी या संपूर्ण स्वप्न-दृश्याचं नृत्य-दिग्दर्शन जोहरा यांनी केलं, हीही अर्थपूर्ण घटना. वाममार्गाला लागून नरकाच्या आगीत तडफडणार्‍या नायकाला नायिका बाहेर आणते आणि एका सुंदर, नितळ जगात घेऊन येते, असं ते प्रतीकात्मक स्वप्न-दृश्य होतं. त्या काळातल्या नैतिक-सामाजिक मूल्यांचं ते प्रतिबिंब होतं. जोहरा अशा काळातली शिल्पं कोरणार्‍या शिल्पकारांमध्ये होत्या.
१९५९ मध्ये कामेश्‍वर सहगल यांचं अकाली निधन झालं, तेव्हा जोहराही हादरल्या; पण लवकरच जगण्यानं नवी दिशा दाखविली आणि जोहरांचं नवं आयुष्य जणू सुरू झालं, नव्या कर्तृत्वाचं दार उघडलं. जोहरा यांनी दिल्लीत नाट्य अकादमीची धुरा सांभाळली. काळाचा पोत बदलत होता, तसाच जोहरा यांच्या जगण्याचाही पोत बदलत जणू दरवेळी नवं स्वप्न साकारत होता. मग त्या इंग्लंडमध्ये भरतनाट्यम् शिकविणारी संस्था चालविणार्‍या रामगोपाल यांच्याबरोबर त्यांच्या संस्थेत उदयशंकर शैली शिकवायला लंडनला गेल्या आणि त्यांच्या कारकिर्दीत बीबीसीचा झळाळता अध्याय सुरू झाला. बीबीसीच्या टीव्ही कार्यक्रमांत, मालिकांत त्यांनी भूमिका करायला सुरुवात केली. आयव्हरी मचर्ंटच्या चित्रपटांतून कामं केली. 
वयाच्या ७८ व्या वर्षी म्हणजे १९९0 मध्ये त्या भारतात परतल्या, तेव्हा त्यांचे काव्य-पाठाचे अनेक कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरले. हफीज जालंधरींची नज्म त्या सादर करत - ‘अभी तो मैं जवान हूँ. ही नज्म सादर करायला जोहरा सहगल इतकी दुसरी कोण व्यक्ती लायक असणार? फाळणीनंतर लाहोरमध्ये स्थायिक झालेल्या आपल्या उझरा बट्ट या बहिणीबरोबर त्यांनी १९९३ मध्ये ‘एक थी नानी हे नाटक केलं, तेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांत त्या बातमीचंच किती अप्रूप निर्माण झालं होतं. ऐंशीचं वय पार करून या दोघी बहिणी जणू या दोन देशांतल्या पुरातन मानवी संबंधांचं प्रतिनिधित्व करत होत्या.
याच सुमारास जोहरा सहगलना पुन्हा एकदा सिनेमासृष्टीनं पाचारण केलं. भारतात तसंच परदेशांतही. गुरविंदर चड्ढाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवणारा ‘भाजी ऑन द बीच, ‘बेंड इट लाइक बेकमन, ‘हम दिल दे चुके सनम, ‘दिल से, ‘चीनी कम, ‘साँवरिया.. वयाच्या नव्वदाव्या वर्षी या तरुण अभिनेत्रीनं ‘चलो इश्क लड.ाएँमध्ये प्रमुख भूमिका- गोविंदाच्या आजीची - ही केली आणि खलनायकाबरोबर फायटिंगही केली. २00६मध्ये पृथ्वी थिएटर्सनं पृथ्वीराज कपूर यांची जन्मशताब्दी साजरी केली ती त्यांच्या नाटकांतले काही अंश सादर करून. तेव्हा जोहरा या ते अंश सादर करणार्‍या सर्वांत ज्येष्ठ आणि मूळ नाट्यप्रयोगांतल्याच कलावंत होत्या. त्या आल्या तेव्हा त्यांनी, ‘आपल्याला दिग्दर्शक हवा अशी मागणी पृथ्वीराज कपूर यांच्या नातीकडे केली आणि आपल्या नातवाच्या वयाच्या मकरंद देशपांडेच्या दिग्दर्शनानुसार रीतसर नाटकात काम केलं! रोखरीच, जोहरा सहगल यांच्या आयुष्याची सगळीच वषर्ं ही उमेदीची वषर्ं होती!
(लेखिका राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या अभ्यासक आहेत.)