शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासाचा त्रिफळा

By admin | Updated: July 18, 2015 13:18 IST

आयपीएल म्हणजे काय, तर एक मार्केटिंग कॅप्सूल! याबाबत कोणी फारशी नाकं मुरडली नाहीत, कारण ज्यांनी नाकं मुरडायची तेच त्याचे लाभार्थी होते! विश्वासालाच मोठ्ठा तडा गेला आहे. त्याची किंमत चुकवावीच लागणार. ग्रीस सारखंच आयपीएललाही एक ‘बेलाउट पॅकेज’ हवं आहे, पैशाचं नव्हे, तर पुन्हा विश्वास मिळवण्याचं.

चंद्रशेखर कुलकर्णी
 
 आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि बेटिंगच्या प्रकरणात झालेल्या चौकशीच्या निष्कर्षाचा खरा अर्थ वेगळा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीनं जाहीर केलेला अहवाल दुपेडी आहे. त्याचा पहिला पदर असा की, बेटिंग आणि फिक्सिंग या काही केवळ कल्पना नव्हेत. कारण करणारे सुखेनैव हे सारे करत राहिले आणि करत होते हे निर्विवाद सिद्ध झालं. 
दुसरा पदर असा की या गोष्टींना थारा नाही. क्रिकेटवर स्वत:च्या जातधर्मापेक्षाही विलक्षण प्रेम करणा:या चाहत्यांना हे प्रकार मानवत नाहीत, हेही अधोरेखित झालं. या संपूर्ण प्रकरणाच्या तपशिलापेक्षाही शीलाचा भाग महत्त्वाचा आहे. कारण क्रिकेट हा कोणोएकेकाळी पांढरेशुभ्र कपडे घातलेल्या सभ्य गृहस्थांचा परिटघडीचा खेळ होता. त्यातल्या सभ्यतेवर, त्यातल्या सूचितेवर सामान्यातल्या सामान्य क्रिकेटप्रेमींचा विश्वास होता. हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, याच्यावरची त्याची श्रद्धा अढळ होती. बघता-बघता काळाच्या ओघात केवळ कपडय़ांचेच नव्हे तर खेळाचेही रंग बदलले. वन-डे क्रिकेट, त्यापाठोपाठ आलेला टी-ट¦ेन्टी आणि कानामागून येऊन तिखट झालेले आयपीएल या सगळ्यांनी क्रिकेटला मनोरंजनाचा बाज दिला. खरं तर रंजनाचं एक सप्तरंगी इंद्रधनुष्य साकारलं़ पण हे इंद्रधनुष्य मृगजळाइतकंच आभासी वाटण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. क्रिकेटच्या ब:यापैकी दीर्घ इतिहासानं तयार केलेल्या विश्वासाची राखरांगोळी या प्रकरणानं केली. 
हे सगळं महाभारताची आठवण करून देणारं आहे. अनीतीनं चाललेल्या गोष्टींकडे धृतराष्ट्राप्रमाणो जी डोळेझाक केली गेली त्याचा हा परिपाक आहे. बीसीसीआय असेल किंवा आयपीएलचं गव्हर्निग कौन्सिल असेल, त्यांनी आयपीएलच्या महाभारतातल्या दु:शासनांकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं आणि त्यातूनच हे सगळं प्रकरण हाताबाहेर गेलं. सुदैव इतकंच की न्यायसंस्था, माध्यमं याबाबतीत आपली भूमिका चोख बजावत राहिले. त्यामुळेच निदान या तर्कसंगत निष्कर्षार्पयत वाटचाल झाली. मुदलात, हे सारं का झालं त्याचं गणित जितकं किचकट आणि तितकंच सरळ, साधं सोपंही आहे. 
क्रिकेटला मिळालेला लोकाश्रय, भारतासारख्या देशामध्ये धर्मापेक्षाही माणसाच्या हृदयात त्याला मिळालेलं स्थान. या सगळ्यांतून क्रिकेटची आर्थिक गणितं बदलत गेली. 197क् च्या दशकात केरी पॅकरच्या सर्कशीनं जी नांदी केली त्याचा एक भव्य प्रयोग काळाच्या उदरात दडलेला होता, त्याचा आविष्कार आयपीएलच्या निमित्तानं पाहायला मिळाला़ 
आयपीएलच्या नावावर अनेकांचं चांगभलं झालं. अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर मुंबईचा श्रेयस अय्यर केवळ एक मोसम रणजी सामने खेळला होता. त्याची आयपीएलमधील व्हॅल्यू साठ लाखांची होती. वर्षभरात तीच व्हॅल्यू अडीच कोटींची झाली. हे एका छोटय़ा खेळाडूच्या बाबतीत घडलं. बडय़ांची बोली आणि त्यांचं अर्थकारण हे तर फार वेगानं बदललं. आयपीएलच्या या जत्रेत स्टेडियमच्या नूतनीकरणापासून मैदानाची माती, इतर छोटी-मोठी कंत्रटं, जेवणाचं कंत्रट. अशा एक ना अनेक बाबीत अनेकांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. 
लाभार्थी असलेल्या अनेकांनी तर तिकिटांच्या काळ्याबाजारालाही हात घातला. हे सगळं बाजाराच्या नियमानुसार चालू होतं. जो सिनेमा हाऊसफूल होतो, त्याचीच तिकिटं ब्लॅक होतात. तुरळक प्रेक्षक आलेल्या सिनेमाची तिकिटं कोणी ब्लॅकमध्ये विकत नाहीत आणि ती कोणी घ्यायलाही येत नाहीत. बदललेल्या अर्थकारणाने आयपीएल ही प्रत्येकासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी झाली. हाव इतकी वाढली की ही कोंबडी प्रत्येक जण कापायला निघाला. आणि यातले जे मोठे कसाई होते त्यांच्यात बीसीसीआयचे थेट हितसंबंध गुंतले असल्यानं त्यांच्या कृत्यांकडे डोळेझाक केली गेली. 
अशा परिस्थितीत गुरुनाथ मय्यपन, राज कुंद्रा आणि बरेच जण सहीसलामत सुटलेही असते, पण इतर अनेक क्षेत्रंसारखी पोलिसांमधली श्रेयाची स्पर्धा क्रिकेटसाठी वरदान ठरली. दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या जीवघेण्या स्पर्धेतून अहमहमिका निर्माण झाली. त्यातून विंदू दारासिंह आणि गुरुनाथ मय्यपन यांच्या अटकांचं सत्र झालं. अन्यथा काहीच झालं नसतं. 
आयपीएलचा हा बॅ्रण्ड मातीमोल व्हायला नको असेल तर दोन उपाय आहेत. पहिला असां की गमावलेला विश्वास परत  मिळवण्यासाठी जे काही करणं शक्य आहे, ते बीसीसीआयनं केलं पाहिजे. त्यासाठी नातीगोती बाजूला ठेवून फौजदारी खटले मार्गी लावले पाहिजेत. आणि दुसरा असा की तमाशाला जाताना ‘देवाचिये द्वारी’ चालल्याचा भाव प्रेक्षकांनीही मनात ठेवू नये. डेलीसोप म्हणून गाजलेल्या छोटय़ा पडद्यावरील मालिका लोक आवजरून बघतात. त्यात काय होणार, कसं घडणार हे आधी ठरलेलं असतं. त्याचं दिग्दर्शन, नेपथ्य हे सगळं ‘सेट’ असतं. आणि हे सगळं माहीत असूनही लोक ते बघतात. आयपीएल हीदेखील मनोरंजानाची अशीच एक कॅप्सूल आहे, हे जर चाहत्यांनी पक्कं डोक्यात ठेवलं आणि डब्ल्यूडब्ल्यूएफच्या कुस्तीसारखा आयपीएलचा सामना पाहिला तर अपेक्षाभंगाचं दु:ख वाटय़ाला येण्याचं कारण नाही. हा झाला प्रेक्षकांपुरता विचार. क्रिकेटचा व्यापक अंगानं विचार केला तर वाट बिकट असली तरी यातल्या पहिल्या मार्गाची वहिवाट चोखळणं विश्वास परत मिळवण्याच्या दृष्टीनं हिताचं ठरेल. कोण जाणो आयपीएलला पुन्हा सोनेरी दिवस येतीलही. आज आर्थिक संकटात असलेल्या ग्रीसचं शतकानुशतके जुनं तत्त्वज्ञान उभ्या जगानं स्वीकारलेलं आहे. ग्रीस सारखंच आयपीएललाही एक ‘बेलाउट पॅकेज’ हवं आहे, ते पैशाचं नव्हे तर पुन्हा विश्वास मिळवण्याचं!.
कोणताही मोठा उपक्रम आयोजन अगर संस्था यांना कपाळमोक्षापासून वाचवू शकतील असे दोन निकष व्यवस्थापनशास्त्रत सांगितले जातात.
1)Too big to fail
2) Too good to fail
 
सतत घोंघावणा:या वादळामधून आयपीएलचे तारू धकून गेले तर ते याच दोन निकषांवर!
 
मार्केटिंग कॅप्सूल!
 
आयपीएल म्हणजे नेमके काय, तर मार्केटिंगच्या अंगानं खेळाची तयार केलेली ही एक कॅप्सूल आहे. खेळाचा हा फॉरमॅटचं मुळी टेलिव्हिजनच्या सॉफ्टवेअरच्या रूपात पाहिला गेला. तसं पाहिलं तर हे बावन्नकशी सॉफ्टवेअरच. शिवाय त्याला जत्रेचाच फ्लेवर मिळाला. याबाबत कोणी फारशी नाकं मुरडली नाही. याचं कारण ज्यांनी नाकं मुरडायची तेच याचे लाभार्थी झाले. अनेक माजी खेळाडू, माजी पंच ह्यांना सुगीचे दिवस आल़े क्रिकेट संघटनांचं आणि खेळाडूंचंही अर्थकारण बदललं. 
 
पहिला अध्याय पूर्ण!
 
विश्वासाला तडा गेल्याची किंमत बीसीसीआयला चुकती करावी लागणार आहे. त्याचा पहिला अध्याय एव्हाना लिहून झाला आहे. चॅम्पियन्स लीग बंद करण्याची वेळ येणं हाच तो पहिला अध्याय. सर्वसामान्य खेळाडूंपासून क्रिकेटच्या संघटकांर्पयत अनेकांना सुगीचे दिवस दाखवणा:या या आयपीएलवर कायमचा पडता पडेल, अशा भाबडय़ा समजुतीत कोणी राहण्याचं कारण नाही. मनोरंजनाला मरण नाही. तरीही जे भाबडे चाहते क्रिकेटच्या खेळाकडे खूप गंभीरपणो पाहात होते त्यांच्या श्रद्धेला नख लागले आहे. 
 
ब्रॅण्ड व्हॅल्यू 4 अब्ज डॉलर!
 
आयपीएल किंवा खरं तर टी-ट्वेंटीच्या फॉरमॅटमुळे प्रेक्षक पुन्हा मैदानाकडे वळले. आजमितीस स्टेडियममधल्या प्रेक्षकांच्या बाबतीत वन-डेची वाटचालही कसोटीच्या दिशेने सुरू आहे. अशा परिस्थितीत लोकांनी टी-ट्वेंटीकडेही पाठ फिरवणं परवडणारं नाही. आयपीएलचा ब्रँड एव्हाना ब्रम्हांडाएवढा झाला आहे. या ब्रँडची आजची व्हॅल्यू 4 अब्ज डॉलर आहे. इतक्या मोठय़ा महानाटय़ावर कायमचा पडदा टाकणो परवडणारे आहे का? याचा विचार बीसीसीआयला करावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं दार किलकिलं झालेलं नसतानाही खेळाडूंना वैभव दाखवणा:या या खेळाचा अंत व्हावा असं नवोदित खेळाडूंना तर मुळीच वाटणार नाही.
 
(लेखक ‘लोकमत’मध्ये वरिष्ठ सहायक संपादक आहेत)