शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर उपचार- सध्या वापरली जाणारी औषधं, प्लाझ्मा थेरपी आणि अन्य मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 06:05 IST

कोरोना हा ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. जगातील कुठल्याही ‘व्हायरल’ आजारावरचे  पहिले व सगळ्यांत मोठे औषध म्हणजे वेळ.  हा आपोआप बरा होणारा आजार असला, तरी  तो बरा होताना शरीरातील अवयवांना इजा होते. पण कोरोनामुळे नेमके काय नुकसान होते  यावर संशोधन व अभ्यास सुरू आहे.  पण मग सध्या कोरोनावर कोणते उपचार सुरू आहेत? कोणती औषधे त्यावर प्रभावी ठरताहेत? प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे कोणती? संशोधन सध्या कुठल्या पातळीवर आहे आणि  भारतातली आजची स्थिती काय?.

ठळक मुद्देमहत्वाचे : हा लेख कोरोनावरच्या उपचारांची दिशा आणि जगभरात चाललेल्या संशोधनाबाबत माहिती द्यावी, या हेतूने लिहिलेला आहे. कोणीही, कोणत्याही कारणाने ही औषधे स्वत: वापरून पाहण्याचा विचार/प्रयत्न करू नये

- डॉ. अमोल अन्नदाते

कोरोना हा एक असाध्य आजार आहे आणि यासाठी उपचारच नाहीत असा एक गैरसमज सगळीकडे पसरला आहे. उपचारांच्या संदर्भात एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, कोरोना हा सर्दी-खोकल्यासारखा व्हायरल म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. मात्न तो सर्दी-खोकल्यापेक्षा तीव्र आणि जास्त हानिकारक आहे. कोरोना व सर्दी-खोकलाच नव्हे तर जगातील इतर कुठला ही व्हायरल यावर पहिले व सगळ्यात मोठे औषध असते ते म्हणजे वेळ. अर्थात हा आपोआप बरा होणारा आजार आहे. पण तो बरा होत असताना त्यामुळे शरीरातील अवयवांना इजा होते व त्यातून शारीरिक, मानसिक पातळीवर या आजारामुळे हानी होते. कोरोनामुळे नेमके कुठल्या पातळीवर नुकसान होते यावर ही निरीक्षण व संशोधनातून अभ्यास सुरू आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू व शारीरिक हानीचे व्यवच्छेदक लक्षण आहे शरीरातील लाल पेशींची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करणे. म्हणून शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्त व रक्तवाहिन्यांना इजा होऊन फुफ्फुस्साच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहाचा वेग मंदावतो व रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कोरोनावर विविध पातळ्यांवर सध्या सुरू असलेले उपचारअ. व्हायरसची संख्या कमी करणारी औषधे ब. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपचार क. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणे ड. गुंतागुंत व शरीराला होणारी इजा टाळणे इ. लक्षणांवर उपचार 

अ. व्हायरसची संख्या कमी करणारी औषधे 1. रेमडेसिवीर -हे औषध कोरोना सोडून कशासाठी वापरले जात होते - इबोला संशोधन सध्या कुठल्या पातळीवर - नुकतेच अमेरिकेतील एका संशोधनात रेमडेसिवीर हे औषध दिलेले रुग्ण औषध न दिलेल्या इतर रुग्णांपेक्षा अधिक वेगाने बरे झाले. कॅनडामध्ये झालेल्या दुसर्‍या संशोधनात हे औषध शरीरात कोरोनाची वाढ होण्यापासून रोखत असल्याचे आढळून आले. शिकागो विद्यापीठात 125 कोरोना रु ग्णांना हे औषध देण्यात आले. त्यापैकी 123 रु ग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले. तरीही या औषधाबद्दल निश्चितपणे सांगण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.भारतातील स्थिती- भारताने फेब्रुवारी महिन्यात गिलियाड या कंपनीला पेटंटसाठी मंजुरी दिली आहे. पण हे औषध अजून भारतात उपलब्ध नाही.

2. लोपिनावीर / रेटीनोवीरकोरोना सोडून कशासाठी वापरले जात होते - एचआयव्ही संशोधन सध्या कुठल्या पातळीवर - ऑक्सफर्ड विद्यापीठात ट्रायल्स सुरू आहेत; पण अजून अंतिम निष्कर्ष हाती नाहीत. चीनमधील जीन यीन-टान रुग्णालयात 199 रुग्णांना हे औषध देण्यात आल्यावर लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली. मेड या र्जनलमधील संशोधनात मात्न या औषधांचा फारसा फायदा न झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.भारतातील स्थिती- औषध उपलब्ध आहे, देशात काही ठिकाणी वापरलेही जाते आहे. पण भारतात अजून पेटंटसाठी कोणालाही मंजुरी नाही. 

3. फावीपीरावीर -कशासाठी वापरले जाते - फ्लू - जास्त प्रमाणातील सर्दी, खोकला संशोधन सध्या कुठल्या पातळीवर - चीनमध्ये 340 रुग्णांवर झालेल्या अभ्यासात विषाणूचा शरीरात गुणाकार रोखण्यास व पसरण्याचे प्रमाण कमी करण्यास हे औषध प्रभावी ठरले.भारतात स्थिती - सध्या जपानमध्ये या औषधाची निर्मिती होते. भारतीय कंपन्या याच्या निर्मितीसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

4. वॅलप्रोइक अँसिड (सोडियम वॅलप्रोएट) -कशासाठी वापरले जाते? - झटके संशोधन - जनुकीय तंत्नज्ञान व जैव तंत्नज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राने एका पत्नाद्वारे या औषधाचे क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची मागणी करून हे औषध प्रभावी ठरू शकण्याची शक्यता वर्तवली आहे. पण अजून भारतात याचे कोरोनासाठी ट्रायल्स सुरू झालेले नाहीत.भारतात स्थिती - हे औषध भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व स्वस्तही आहे; पण अजून वापर किंवा संशोधन सुरू झालेले आही. 

5. हायड्रॉइक्सिक्लोरोक्वीन -कशासाठी वापरले जाते- मलेरिया, संधिवात संशोधन - ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात या औषधाचा मृत्यूच्या प्रमाणावर काहीही परिणाम झालेला नाही. काही अभ्यासात मात्न हे औषध दिल्याने 70 टक्के रुग्णांमध्ये विषाणू संख्या शरीरात बर्‍यापैकी कमी झाल्याचे दिसून आले. फ्रान्समधील 30 रुग्णांवर केलेल्या अभ्यासात या औषधाचा वापर फायदेशीर असल्याचे दिसून आले. पण 30 ही रुग्णसंख्या खूप कमी असल्याने हे औषध फायदेशीर ठरेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. हृदय अचानक बंद पडणे व हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे हे या औषधाचे दोन प्राणघातक दुष्परिणाम आहेत. पण 14 ते 60 या वयोगटात हृदयरोग नसल्यास हे औषध सुरक्षित आहे.भारतात स्थिती - आयसीएमआरने हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून आरोग्य क्षेत्नात काम करणारे व कोरोनाशी थेट संपर्क येणारे सर्व कर्मचारी यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील धारावी व इतर हॉटस्पॉट्समध्ये हे सर्व जनतेला प्रतिबंध म्हणून देण्यात आले आहे. पण अजून संशोधनात याची सर्व लोकसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी देण्याची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही. भारतात हे औषध मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहे. म्हणून या औषधावर संशोधन करण्याची आपल्याला चांगली संधी आहे. पण अजून अभ्यास सुरू झालेले नाहीत.

6. अँझिथ्रोमायसीन कशासाठी वापरले जाते- सर्दी, खोकला, न्युमोनिया, श्वसनाचा खालच्या व वरच्या बाजूचा जंतुसंसर्ग संशोधन - फ्रान्समधील एका अभ्यासात अँझिथ्रोमायसीन तसेच काही रु ग्णांमध्ये या सोबत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केल्यास उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पण संशोधनातील रुग्णसंख्या खूपच कमी असल्याने यावर अजून संशोधन आवश्यक आहे. भारतात स्थिती- हे औषध काही प्रमाणात वापरले जात असले तरी अजून संशोधन सुरू झालेले नाही. कॅनडामधून अँझिथ्रोमायसीन व हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन यांचा एकत्रित वापर करून जगभरातून रु ग्णालय एका मोठय़ा संशोधनात्मक अभ्यासात सहभागी होणार आहेत. पण भारतातून एकाही रुग्णालयाने यात अजून सहभाग नोंदवलेला नाही. आपल्या देशाने यात सहभागी व्हायला हवे कारण यामुळे निश्चित निष्कर्ष हाती येतील. 

7. आयवरमेकटीन -कशासाठी वापरले जाते- जंत, खरु ज संशोधन - या औषधावरचे सर्व संशोधन शरीराच्या बाहेर व शरीरातून पेशी बाहेर काढून झाले आहे. अशा संशोधनात 24 तासात विषाणू संख्या कमी व 48 तासात पूर्ण नाहीशी झाल्याचे दिसून आले आहे. जीवित व्यक्तीवर संशोधन अजून सुरू आहे व कुठलेही निष्कर्ष अजून हाती आलेले नाहीत. भारतात स्थिती- अजून या औषधाचा वापर व संशोधन सुरू झालेले नाही.

ब. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपचार 

1. इंटरफेरोन बिटा-कशात वापरले जाते - या आधी सार्स व कोरोनाच्या इतर जातकुळीतील विषाणूमुळे होणारा र्मस संशोधन- जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला उपचारामध्ये महत्त्वाचे स्थान दिले असून, लोपिनावीर, रेटीनोवीर व इंटरफेरोन बिटा अशा तिन्हींचा एकत्रित वापर करून काय परिणाम होतो यावर ट्रायल्स सुरू आहेत. आधी सार्सच्या अनुभवावरून हे औषध चांगले काम करू शकेल, असा अंदाज आहे. इंटरफेरोन बिटा शरीरात काय करते- इंटरफेरोन बिटा हे शरीरात विषाणू संसर्ग झाल्यावर नैसर्गिक प्रतिकारशक्तीची यंत्नणा कार्यरत करण्यासाठी व ती चालवण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे प्रोटीन आहे. एरवी इतर विषाणू संसर्गात हे नैसर्गिकरीत्या निर्माण होते. पण कोरोनामध्ये हे निर्माण होण्याचे प्रमाण कमी असल्याने फुफ्फुसांना इजा होते. भारतात स्थिती - भारतात हे औषध उपलब्ध असले तरी ते खूप महागडे आहे व जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. काही ठिकाणी वापरले जाते आहे. 

2. प्लाज्मा थेरपी -कोरोनाच्या बर्‍या झालेल्या रु ग्णांच्या शरीरात कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. ही अँण्टिबॉडीजच्या माध्यमातून प्लाज्मामध्ये असते. बर्‍या झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाज्मा वेगळा करता येतो. यासाठी थोड्या प्रमाणात रक्तदान करावे लागते. हा प्लाज्मा कोरोनाग्रस्त रुग्णाला दिल्यास त्याच्यात ही प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. चीन व अमेरिकेत यावर काही प्रमाणात प्रयोग झाला; पण अजून खूप कमी लोकांना हा दिला गेल्याने याची निश्चित उपयुक्तता सांगता येणे कठीण आहे. आयसीएमआरने या उपचाराला क्लिनिकल ट्रायल म्हणजे प्रयोगासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात प्लाज्मा थेरपी दिलेला पहिला रुग्ण अजूनही अत्यवस्थ आहे.

क.    शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणे 1. ओझोन थेरपी -लाल पेशींची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने ऑक्सिजन देऊनही उपयोग होत नसल्यास ओझोन द्यावे असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. यावर र्जमनीमध्ये काही प्रयोग सुरू आहेत व संशोधन केले जात आहे. भारतात अजून याचा वापर सुरू झालेला नाही. 

ड. गुंतागुंत व शरीराला होणारी इजा टाळणे -1. स्टीरॉइड - व्हेण्टिलेटरवर टाकण्याची वेळ आलेल्या रुग्णांना व फुफ्फुसांना इजा होत असलेल्या काही रु ग्णांना स्टीरॉइड्स देऊन उपचार केले जात आहेत. यावर संशोधन सुरू आहे व अंतिम निष्कर्ष आले नसले तरी परदेशातील डॉक्टरांना  याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हेण्टिलेटरवरील रु ग्ण वाचवण्यास यामुळे मदत होते आहे.2. टोकलीझूमॅब -कोरोनामध्ये सार्स ही जीवघेणी स्थिती निर्माण होते तेव्हा शरीरात सायटोकाइन या पेशींची वाढ होते. याला सायटोकाइनचे वादळ असे म्हटले जाते. त्यासाठी टोकलीझूमॅब हे औषध वापरले जाते. सध्या या औषधाचे परदेशात ट्रायल्स सुरू आहेत. भारतातही हे औषध वापरले जाते आहे.

इ. लक्षणांवर उपचार -यासाठी पॅरासिटॅमॉल व सर्दी-खोकल्याची इतर साधी औषधे वापरली जातात.

reachme@amolannadate.com(लेखक आरोग्य व सामाजिक प्रo्नांचे विेषक, लेखक, वक्ते आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या