शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
5
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
6
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
7
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
8
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
9
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
10
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
11
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
12
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
13
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
14
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
15
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
16
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
17
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
18
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
19
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
20
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

एकात तीन!

By admin | Updated: August 1, 2015 15:58 IST

साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी मुंबईच्या फुटपाथवर, लोकलच्या फिरत्या विक्रेत्यांकडे एक गंमतवस्तू आली होती. कधी नुसती तर कधी किचेनच्या रूपात. ही होती एक लाकडी डबी. सर्व बाजूने गोलसर बनवलेली व हातात धरल्यावर खडबडीत पोतामुळे उत्सुकता चाळवणारी

नितीन अरुण कुलकर्णी

 
साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी मुंबईच्या फुटपाथवर, लोकलच्या फिरत्या विक्रेत्यांकडे एक गंमतवस्तू आली होती. कधी नुसती तर कधी किचेनच्या रूपात. ही होती एक लाकडी डबी. सर्व बाजूने गोलसर बनवलेली व हातात धरल्यावर खडबडीत पोतामुळे उत्सुकता चाळवणारी. या डबीचे डबीपण ओळखल्यावर आपण डबी उघडतो आणि आपली सगळी धिटाई पणाला लागते, कारण आत एक वळवळणारा काळा किडा आहे. याचे सहा पाय आपल्या हाताच्या हालचालीबरोबर थरथरतात. नंतर आपण ही डबी परत परत उघडण्याचा चाळा करू लागलो की आधी वाटलेल्या भीतीचे रूपांतर गंमतचाळ्यात होते. 
 सुरुवातीला उपलब्ध झालेल्या या लाकडी  गंमतडब्या अगदी हाताने बनवल्याप्रमाणो दिसायच्या.  काही भाग जरी मशीनने बनवलेला असला, तरी त्याचा दर्शनी फिल मात्र हस्तकलेच्या वस्तूसारखा होता. नंतर प्लॅस्टिकच्या प्रतिकृतीसुद्धा उपलब्ध झाल्या होत्या, परंतु त्याला मास-मॅन्युफॅक्चरिंगचा वास होता. ही चायनाप्रणीत वस्तू बघितल्यानंतर असा प्रश्न पडतो की याला हस्तकलेचा नमुना मानायचा की डिझाइनचा? पण अनुभवाचा भाग बघितला की कलाकृती म्हणायचादेखील मोह होतो. त्यातल्या त्यात ‘चलशिल्प’ (‘्रल्ली3्रू 2ू4’स्र341ी) या आधुनिक कलावादांपैकी एका प्रकारातल्या कृतीप्रमाणो वाटतो. अशा शिल्पाचा काही भाग हलताडुलता राहतो आणि जिवंतपणाचा अनुभव देतो.
 कला (आर्ट), हस्तकला (क्राफ्ट) आणि सुयोजन  (डिझाईन) या वस्तूनिर्मितीच्या तिन्ही क्षेत्रंमधे एक अतूट नातं आहे. हे तिन्ही कार्यकलाप अनेक नवीन अनुभवजन्य व उपयोगी वस्तूंची समाजात भर घालत असतात. या तिन्ही प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोगांना वेसण घालत असतात, पण त्यांच्या मूळ प्रयोजनाचं आच्छादन उपप्रयोजनांवर होत असतं. 
कलेचं मूळ प्रयोजन सौंदर्यवस्तूंच्या निर्मितीद्वारे सौंदर्याचा अनुभव देणो. 
हस्तकौशल्याचे मूळ प्रयोजन, नित्योपयोगी व सुशोभिकरणाच्या वस्तूनिर्मितीची परंपरा प्रवाहित ठेवणो. 
सुयोजनाचे मूळ प्रयोजन, यंत्रयुगात वस्तूनिर्मितीचं तंत्र व विक्रीव्यवस्था सुगम करणं, कारण सूचकता उत्पादकतेसाठी महत्त्वाची असते. बनणा:या वस्तूचे रूप कसे असणार आहे हे आधीच जाणले व पारखले नाही तर पुढे जाऊन उत्पादनकत्र्याला बरेच नुकसान होऊ शकते.
समजा एक चित्र आहे आणि या चित्रचा आशय, त्यातले भाव वगैरे या चित्रचं कलामूल्य आहे. या चित्रकडे पाहून आपल्या मनात उदात्त भाव निर्माण होतात, हा झाला त्याचा मानसिक पातळीवरचा उपयोग. व्यावहारिक पातळीवर या चित्रने आपले लिव्हिंगरूम सजते व कलाकार प्रसिद्ध असेल तर आर्ट इन्व्हेस्टमेंटदेखील होते. अर्थात हे झाले त्याचे उपप्रयोजन. याप्रमाणोच सुयोजनाचे (डिझाईन) उदाहरण घेऊ. 
आपल्या लिव्हिंग रूममधला सोफा. त्याचा मूळ उद्देश घरातलं बसणं सुखकारक करणं हा होय. परंतु उपप्रयोजन म्हणजे लिव्हिंग रूमची शोभा वाढवणो व त्याद्वारे आपल्या स्टेटसचे प्रदर्शन करणो आणि कल्पनेबरहुकूम लाकूड अथवा कपडा तसेच फोमच्या कामाद्वारे इच्छित परिणाम साधणो. यात आला हस्तकौशल्याचा भाग. 
जेथे हस्तकौशल्याला प्राथमिक प्रयोजन दिले गेले अशा वस्तूनिर्मितीचा विचार आजच्या परिस्थितीत करताना सुयोजन विसरून चालणार नाही. पारंपरिक हस्तकला वस्तूंचा उपयोग आणि सौंदर्य पूर्वी होते तसे राहून चालणार नाही, कारण आपल्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. बहुसंख्य वस्तू औद्योगिक निर्मितीद्वारे उपलब्ध होतात त्यामुळे साहजिकच हस्तकौशल्याचा वापर करून बनवलेल्या वस्तू उपयोगापेक्षा सुशोभिकरणासाठी वापरल्या जातात. अशा वस्तू सामान्यांच्या खिशाला परवडणा:या नसतात. म्हणजे अशी परिस्थिती साहजिकपणो निर्माण झाली आहे. प्राचिन काळात हस्तकला हेच एक प्रमुख वस्तूनिर्मितीचे साधन होते, ते कलेचाच विस्तार होते. कलेत हस्तकलेचे तंत्र व हस्तकलेत कलेचा आत्मा अंगभूत होता. आज सगळीकडेच सुयोजन पसरलेले दिसते. आज आपण जीवनदेखील लाइफस्टाइलच्या अभिव्यक्तीसाठी जगू इच्छितो. ‘व्हॉट इज इन?’ हा प्रश्न काहीही नवीन विकत घेताना आपल्या मनात असतो आणि यामुळेच आपल्या जीवनशैलीचं संक्रमण होत असतं. 
भारतात वेगवेगळ्या प्रांतांमधे हस्तकलेची परंपरा दिसून येते. आधुनिक जीवनसरणीमधे या पारंपरिक बाजच्या वस्तू संयुक्तिक ठरत नाहीत. यांचा आकार, पोत, रंग इत्यादि नवीन ट्रेंडप्रमाणो नसले की आपल्याला आवडत नाहीत. त्यामुळे अनेक पारंपरिक हस्तकलेचे प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा उद्योगांना चालना देण्याचं काम काही सरकारी योजना करतात, डेव्हलपमेंट कमिशनर हॅण्डीक्राफ्ट्स यांचे कार्यालय देशव्यापी फंडिंग देतात. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अर्थात एनआयडीसारख्या शैक्षणिक संस्था डिझाइनच्या अभ्यासक्र मात हस्तकलांचा अंतर्भाव करून हे कार्य करीत आहेत. त्यामुळे अनेक तरुण डिझाइनर्स क्र ाफ्ट डिझाइनकडे वळत आहेत. अशांपैकीच एक नाव संदीप संगारू. 
एनआयडीमधे शिकवत असलेला हा डिझाइनर त्रिपुराच्या कटालमरा या गावातल्या बांबू व केनच्या कारागिरांकडून बांबूकाम प्रथम शिकला. शैक्षणिक प्रकल्पांसाठी त्याला दुर्गम गावात जावं लागे. बांबू हे असं माध्यम आहे की ज्यापासून बरंच काही बनवता येतं. चटया, टोपल्यांपासून फर्निचर व घरदेखील. जेव्हा त्याने आधुनिक डिझाइनची तोंडओळख या कारागिरांना करून दिली तेव्हा त्यांनी संदीपसाठी जणू एका खजिन्याचे द्वार खुले केले. याआधी संदीपने लोखंड व लाकडामध्ये सिनेमांच्या सेटसाठी काम केले होते. यानंतर संदीपने ‘ट्रस मी’ (ट्रस म्हणजे आधाराचा सांगाडा) या फर्निचरच्या कलेक्शनचे काम चालू केले जे 2क्1क् मधे सादर केले. पुढे त्याला त्याच्या डिझाइनसाठी, म्हणजे फक्त फर्निचरला नव्हे तर समाजाबरोबर राहून समाजाला वर आणण्याच्या योगदानासाठी ब्रिटिश काउन्सिलचे पारितोषिक दिले गेले.
 
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत.) 
nitindrak@live.com