शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भीती आहे, बंदी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:05 IST

जपानमध्ये घबराट जरूर आहे;  पण त्याचा धसका कोणी घेतलेला नाही.  लोकांच्या स्वातंत्र्यावरही बंदी आलेली नाही. याचं कारण जपान मुळातच शिस्तशीर आहे. 

ठळक मुद्देआक्रस्ताळेपणा करणं हा मुळातच जपान्यांचा स्वभाव नाही. कायद्याचंही काटेकोर पालन. त्यामुळे निदान आतापर्यंत तरी सरकारनंही लोकांवर फारसे निर्बंध घातलेले नाहीत. 

- रोहित हळबे

जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसनं आता जपानमध्येही शिरकाव केला आहे. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. लोकांच्या मनात घबराट जरूर आहे; पण प्रत्यक्षात त्याचा फार धसका कोणी घेतल्याचं चित्र मात्र दिसत नाही. सरकारनंही स्वत:हून लोकांवर फारसे निर्बंध लादलेले नाहीत. कोणालाही घरात डांबून ठेवलेलं नाही. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंदी आलेली नाही. लोकांना वाटेल त्यावेळी ते बाहेर पडू शकतात, कामावर जाऊ शकतात. याचा अर्थ संकट दाराशी घोंघावत असतानाही जपानी सरकार किंवा जपानचे लोक अजून जागे झालेले नाहीत, असं म्हणायचं का?तसं कधीच म्हणता येणार नाही, कारण अर्थातच त्यामागे काही कारणं आहेत. ती आपल्याला समजून घ्यावी लागतील.मुळात जपान हा अतिशय शिस्तशीर देश आहे. आपलं कर्तव्य, आपल्या जबाबदार्‍या आणि आपली कामं यांना जपानी लोक सर्वाधिक महत्त्व देतात. त्यामुळे सरकारनं काही निर्बंध लागू करण्याच्या आधी लोकांनी स्वत:हूनच आपल्यावर अनेक निर्बंध लादून घेतले आहेत.दुसरी गोष्ट, जपानची लोकसंख्या अतिशय कमी आहे. वृद्धांची संख्या जास्त आहे. त्यामुळे असंही जपानध्ये रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फार लोकं एकावेळी कधीच दिसत नाहीत. अर्थात टोकिओसारखं राजधानीचं शहर, काही टुरिस्ट स्पॉट्स, रेल्वे स्टेशन. यांसारख्या काही ठिकाणी लोकांची थोडीफार गर्दी असते, दिसते; पण तीही आता कमी झाली आहे.आक्रस्ताळेपणा करणं हा मुळातच जपान्यांचा स्वभाव नाही. कायद्याचंही काटेकोर पालन. त्यामुळे निदान आतापर्यंत तरी सरकारनंही लोकांवर फारसे निर्बंध घातलेले नाहीत. विविध माध्यमांतून आवाहन, विनंती मात्र ते करीत आहेत. जपानमधील लोकांना तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे समूहाच्या भीतीचं वातावरण इथे दिसत नाही. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं आहे. आठवडाभर काम केल्यानंतर इथले लोक वीकेण्डला जातात. वीकेण्डसाठी बाहेर पडणं त्यांनी थांबवलं आहे. मोठमोठे इव्हेण्ट्स आधीच कॅन्सल झाले आहेत. बाहेर पडताना मास्कचा वापर केला जात आहे. त्यामुळे मास्क, टिश्यू पेपरचं शॉर्टेज इथे आहे. डिस्नेलॅँडला लोकांची गर्दी असते; पण 29 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळात ते आधीच बंद ठेवण्यात आले आहेत. कदाचित ही मुदत आणखी वाढवण्यात येईल. स्पोर्ट्स सेंटर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरून काम करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपन्यांतली गर्दी कमी झाली आहे. महत्त्वाच्या मीटिंग्जही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाचवेळी सगळ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कामाच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. समजा एखाद्या कंपनीतील कर्मचार्‍यांची वेळ सकाळी सातची असेल, तर काही जण सातला, काही जण आठला, काही जण नऊला. अशी बदलण्यात आली आहे. जेणेकरून कुठेही गर्दी होणार नाही.आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, जपानमध्ये कोरोनामुळे दुर्दैवानं काही जणांचा मृत्यू झाला; पण ते वृद्ध होते. या वृद्धांचीही काळजी घेतली जात आहे. सरकार, कंपन्या आपापल्या पातळीवर लोकांची तपासणी करताहेत. सगळं काही शिस्तशीर सुरू आहे. रस्ते ओस पडलेत, गर्दी कमी झालीय, लोकांनी आधीच किराणा आणि इतर सामान घरात भरून ठेवलंय. भीती आहेच; पण त्यापेक्षाही काळजी अधिक दिसतेय. दुकानं पूर्णत: बंद झालीत, काहीच मिळत नाहीये. अशी स्थिती सध्या तरी नाहीए.(लेखक जपानच्या टोकिओतील रहिवासी आहेत.)

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे)