शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

बस यही एक पल है.

By admin | Updated: November 8, 2015 18:04 IST

पुनर्जन्म ही संकल्पना हिंदी चित्रपटांना आवडणारी. यावर आधारित कितीतरी चित्रपट येऊन गेले. त्यातील बरेच गाजलेही.

 -विश्रम ढोले

पुनर्जन्म ही संकल्पना 
हिंदी चित्रपटांना आवडणारी.
यावर आधारित कितीतरी 
चित्रपट येऊन गेले. 
त्यातील बरेच गाजलेही. 
आपले प्रेम जन्मजन्मांतरीचे असावे 
अशी सा:यांचीच अपेक्षा असते. 
त्यामुळे हिंदी चित्रपटांतील गाणीही मग
जन्मांच्याच चौकटीत बोलतात.
पुन्हा एकदा जन्मा यावे, 
पुन्हा एकदा मरूनी जावे
मातेउदरी गर्भरूपातून. 
पुन्हा एकदा दु:ख साहवे
- शंकराचार्यांच्या ‘पुनरपि जननम पुनरपि मरणम’ या चर्पटपंजरीमध्ये भारतीय मानसिकतेतील दोन खूप खोलवरच्या श्रद्धा दडलेल्या आहेत. एक- अर्थातच जन्म-मृत्यूच्या चक्रावरची किंवा जन्म-पुनर्जन्मावरची श्रद्धा. जगणं आजच्याने संपत नाही, ते कालही होतं आणि उद्याही असणार आहे ही कालचक्रावरील श्रद्धा. त्याला जोडूनच दुसरी श्रद्धा येते ती म्हणजे- या चक्र ात अडकणो म्हणजे मायेत अडकणो. दु:खात अडकणो. आपल्या कर्मामुळेच आपण त्यात अडकतो पण त्यातून सुटकाही कर्मातूनच होते. वर्तमानातील कर्म फक्त वर्तमानातच संपते असे नाही. त्याचे परिणाम याच नव्हे तर अगदी पुढच्या जन्मातल्या भविष्यावरही होतात असा दोन्हींचा एकत्रित अर्थ. 
धार्मिक कर्मकांड, सामाजिक-सांस्कृतिक चालीरिती आणि संस्कारातून तर या सा:या धारणांची अभिव्यक्ती होत असतेच; पण कलात्मक आविष्कारांमधूनही त्या खूपदा दिसतात. अगदी चित्रपटांचे उदाहरण घेतले तरी सहज लक्षात येते की, एकटय़ा पुनर्जन्माच्याच संकल्पनेवर आधारित कितीतरी चित्रपट येऊन गेले. त्यातील बरेच गाजलेही. आपल्या चित्रपटांमधील प्रेमही जन्मजन्मांतरीचे असावे अशी अपेक्षा असते. गाणीदेखील ‘सौ बार जनम लेंगे हम सौ बार फना होंगे’, ‘जनम जनम का साथ हमारा’, ‘जनम जनम के फेरे’, ‘हर जनम हमारा मीलन’ अशा जन्मांच्याच चौकटीत बोलतात. किंवा निदान ‘सौ साल पहले मुङो तुमसे प्यार था आज भी है और कल भी रहेगा’ अशा वर्षांच्या भाषेत तरी. थोडक्यात काय तर भूतकाळाचे अनुभव व भविष्यकाळावरचा विश्वास यांच्या आधारे वर्तमानातल्या कृती करायच्या, निर्णय घ्यायचे, समर्थन करायचे आणि अगदी जन्मजन्मांतरापर्यंत त्यांच्या परिणामांची अपेक्षा करायची. काळ आणि कृती यासंबंधी आपली मानसिकता मुख्यत्वे अशीच राहिली आहे. जगण्यामध्ये आणि चित्रपटांमध्येही.
अशावेळी ‘आगे भी जाने ना तू, पिछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है’ असे ठाम सुरात सांगत एखादे गाणो येते तेव्हा ते खूप लक्षणीय ठरते. कारण हे गाणो भूतकाळाला निर्थक आणि भविष्याला अ™ोय ठरवित फक्त वर्तमानातच जगा असा उच्चरवाने संदेश देते. हे वर्तमानही अगदी क्षणांच्याच मापाने तोला असेही सांगते. भूत आणि भविष्यापासून पार तोडून, कालचक्र  नाकारून फक्त वर्तमानावरच विश्वास ठेवणारे आणि वर्तमानाला फक्त क्षणापुरते मर्यादित करणारे हे गाणो आपल्याकडच्या प्रस्थापित धारणांच्या पाश्र्वभूमीवर म्हणूनच विलक्षण ठरते. हे गाणो बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’मधले. साठीच्या दशकात आलेला वक्त (1965) एक महत्त्वपूर्ण चित्रपट होता. व्यवसायाच्या दृष्टीने तर तो खूप यशस्वी ठरलाच; पण सुनील दत्त, शशी कपूर, राजकुमार, बलराज सहानी, साधना, शर्मिला टागोर, अचला सचदेव अशी मोठी नावे असलेल्या वक्तने मल्टीस्टार चित्रपटांचा ट्रेंडही स्थिर केला. शिवाय काळाच्या तडाख्याने कुटुंबाची ताटातूट होणो आणि त्याच काळाच्या कृपेने कुटुंब पुन्हा एकत्र येणो या जुन्याच फॉर्मुल्याचेही पुनरुज्जीवन केले. पुढे अनेक वर्षे त्यावर अनेक बरेवाईट चित्रपट येत गेले. पण वक्तचे वेगळेपण तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही. नेहरूप्रणीत आधुनिक, समाजवादी आणि उपभोगविरोधी विचारांच्या पाश्र्वभूमीवर वक्तने नशिबाला मुख्य भूमिका देणारे आणि भोगविलासाला अपराधगंड न बाळगता स्वीकारणारे श्रीमंती नाटय़ मांडले. असे चित्रपट यापूर्वी येतच नव्हते असे नाही. पण वक्तने त्याला मल्टीस्टार प्रतिष्ठा दिली. यश दिले. ‘आगे भी जाने न तू’ सारख्या गाण्यातून या सा:या नाटय़ाकडे बघण्याचा, त्याचे समर्थन करण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. 
रवि यांनी संगीत दिलेल्या वक्तमधील इतरही गाणी गाजली. वयाच्या बंधनातून मोकळे करत सरत्या वयातही रोमॅण्टिक प्रेमाला स्थान देणारे ‘ए मेरी जोहरा जबी’ गाणो तर आजही तितकेच लोकप्रिय आहे. पण या सा:यांवर मात करीत लक्षात राहते ते ‘आगे भी जाने ना तू’. एकतर हे गाणो आशाने विलक्षण तन्मयतेने गायले आहे. खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही पट्टय़ांमध्ये लिलया फिरणा:या सुरांतून आशाने या गाण्यातले क्षणभंगुरतेचे आणि उपभोगाचे प्रभावीपण पोहचविले आहे. श्रीमंती पार्टीचा माहोल, उच्चभ्रूंचा वावर, मदन, मदिरा आणि मदिराक्षींचा संगम, वातावरणातील उत्कटता वाढविणारे पाश्चात्त्य पार्टीसंगीत अशा सा:या पाश्र्वभूमीवर हे गाणो येते. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले मीना (साधना) आणि रवि (सुनील दत्त) ही उत्कटता अनुभवत असतानाच त्यांच्या प्रेमाच्या भविष्याबद्दल चिंतित होतात. तेव्हा रवि म्हणतो, तुझं माङयावर प्रेम आहे, माङो तुङयावर. बस, मग बाकी सारे नशिबावर सोड. हा नशिबाचा धागा उचलतच आशाच्या उंच चढत जाणा:या  सुरांमध्ये गाणो सुरू होते- आगे भी जाने ना तू. ‘‘क्षणभंगूर जगण्यामध्ये फक्त त्या क्षणाला महत्त्व दे. तो आकंठ उपभोग. कारण आधी काय झाले ते आता गैरलागू आहे आणि  नंतर काय होईल हे अ™ोय आहे. तेव्हा जो क्षण तुङया हातात आहे तोच खरा. तोच पूर्णांशाने जग’’ असा संदेश देणारी अतिशय सुंदर शब्दकळा साहिर लुधियानवीने या गाण्यातून उभी केली आहे. ‘ये पल गवाना ना ये पल ही तेरा है’ ‘ये पल के होने से दुनिया हमारी है’ ‘ये पल जो देखो तो सदियों पे भारी है’ ‘ये पल से पाएगा जो तुझ को पाना है’ अशा जणू उपदेशवजा, सुभाषितवजा ओळी पेरत हे गाणो ‘यही वक्त है कर ले पुरी आरजू’ हाच संदेश वारंवार देत राहते. काय गंमत आहे बघा, वक्तच्या सहाच वर्षे आधी आलेल्या ‘कागज के फूल’मध्ये साहिरनेच ‘वक्त है मेहरबाँ, आरजू है जवाँ, फिक्र  कल की करे इतनी फुर्सत कहाँ’ अशा शब्दांत क्षणभंगुर उपभोगामध्ये रमणा:या, भविष्याविषयी बेफिकीर असणा:या मानसिकतेवरही टीका केली होती.   
जन्माच्या फे:याबद्दल, भविष्याबद्दल अविश्वास व्यक्त करत वर्तमानातील आनंद व उपभोगाला भविष्याच्या दावणीला बांधायला नकार देणारे हे ‘आगे भी’ चे आवाहन चित्रपटगीतांच्या संदर्भात विलक्षण असले, तरी ते भारतीय मानसिकतेला पूर्णपणो अपरिचित आहे असे नाही. फक्त लौकिक जगालाच मानणारी, त्यातील आनंद आणि उपभोगाला अपराधगंड न बाळगता स्वीकारणारी चार्वाकपंथीयांची विचारधाराही आपल्याच भूमीतील. 
जोवरी जगावे मस्त जगावे, ऋण काढुनि तुपही प्यावे
देहाची होता राख एकदा, नवजन्माचे कोणा ठांवे?
अशा शब्दांत चार्वाकपंथीय जन्म-पुनर्जन्म, ब्रrा-माया, कर्म-मोक्ष वगैरे संकल्पनासमूहातून व्यक्त होणा:या विरक्तीप्रधान, उपभोगविन्मुख, भविष्यकेंद्री आणि कालचक्रप्रणीत प्रस्थापित विचारांची थट्टा करतात. भविष्य निश्चित करू शकण्याच्या मानवी क्षमतांवर खोल अविश्वास व्यक्त करत वर्तमान पूर्णांशाने उपभोगण्याचा संदेश देतात. ‘आगे भी जाने ना तू’ ही त्याचीच लोकप्रिय फिल्मी अभिव्यक्ती. 
ती अर्थात एकमेव नाही. आनेवाला पल जानेवाला है (गोलमाल- 1979), पल दो पल का साथ हमारा (दी बर्निंग ट्रेन- 1980), ना कल का पता न पल का पता (मुकद्दर का फैसला- 1987), कल किसने देखा कल आए या ना आए (देशवासी- 1991), ये पल की है तू जिंदगी (कलयुग- 2005), जो चला गया पल वो आएगा नही कल (श्ॉडो- 2009) अशीही अनेक गाणी सांगता येतील. ‘हर पल यहाँ जी भर जियो, जो है समाँ कल हो न हो’ (कल हो न हो- 2003) हे या प्रकाराचे अलीकडचे एक अतिशय लोकप्रिय गाणो. ‘वो कौन थी’ मधील (1964) लताचे ‘लग जा गले’ हे नितांतसुंदर गाणोही याच कोटीतले. ‘नशिबाने मिळालेला एकांत पुन्हा वाटय़ाला येईल याची शाश्वती नाही. तेव्हा अपराधभावना न ठेवता हा निसटता एकांत माङयासोबत उपभोग’ असे स्त्रीसुरात येणारे धीट आवाहन या गाण्यात आहे. एका अर्थाने परंपरा ज्याबद्दल अपराधगंड निर्माण करू शकते अशा सा:या  उपभोगाला नशिबाच्या कोंदणात बसवून, भूत आणि भविष्यापासून त्याची नाळ तोडून ही गाणी आनंद व उपभोगाला स्वायत्त समर्थन पुरवू पाहतात. परंपरा आणि आधुनिकतेच्या पलीकडे जाणारे हे उत्तर आधुनिक पद्धतीचे समर्थन आहे. प्रेमासारख्या भावनेला जन्मजन्मांतरीचे पारंपरिक कोंदण द्यायचे आणि उपभोगाला भविष्यनिरपेक्ष क्षणभंगुरतेचे नवे समर्थन पुरवायचे अशी ही भारतीय मानसिकतेची कसरत आहे. चित्रपटगीतांमधूनही त्याचे प्रत्यंतर येते. ‘आत्ता आणि इथे’ मध्येच रमू पाहणारी आणि आनंद-उत्तेजना-उपभोगाला प्राधान्य देणारी उत्तराधुनिक मानसिकता आज जेव्हा प्रकर्षाने जाणवू लागली आहे तेव्हा पन्नास वर्षांपूर्वीच तिचे समर्थन पुरवू पाहणा:या ‘आगे भी जाने न तू..’ चे वेगळेपण लक्षात येते. ‘कल किस ने देखा है, कल किस ने जाना है’ म्हणणा:या या गाण्याने पन्नास वर्षानंतरच्या भविष्याचा इतका योग्य वेधही घ्यावा यातील विसंगतीचे आश्चर्यही वाटू लागते.