शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बोला, कसा घालवणार तुम्ही आजचा दिवस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 06:05 IST

अखंड घरातच राहायचे तर रोजच्या दिवसाला काहीतरी उद्दिष्ट हवे, नाहीतर दिवस नुसताच घरंगळत निघून जातो..!

ठळक मुद्देआयुष्यात ‘काही मिळवायचे’ म्हणजे काहीतरी उदात्त वगैरे हवे असे कोणी सांगितले? भोवताली वातावरण कमालीचे जड, खिन्न असताना मला आनंदी आणि निरोगी राहायचे हेसुद्धा ‘आयुष्यात काही मिळवायचे’ या सदरात येऊच शकते.

- वंदना अत्रे

वंदना, मी हल्ली रोज सकाळी तोंडावर दोन मास्क, हातात ग्लोव्हज घालते. बागेत उमलली असतील तेवढी मोगऱ्याची, चाफ्याची फुले छोट्या पिशवीत टाकते. छोटी सॅनिटायझरची आणि पाण्याची बाटली असतेच बरोबर. एकेक करीत आमच्या कॉलनीतील बिल्डिंगमध्ये प्रत्येक घरी जाते. आजोबा-आजींची कॉलनी आमची. दारातूनच आजोबा-आजींची चौकशी करते. त्यांना दोन फुले देते आणि थोड्या गप्पा मारून पुढे जाते. दोन तासात दहा-बारा घरातील आजी आजोबा नक्की भेटतात. ‘माझा दिवस नंतर खूप छान जातो...’- मेधाताई सांगत होती. मेधाताई ही आत्ता-आत्तापर्यंत नाशिकमधील एका कॅन्सरच्या रुग्णालयात पेशंटचे समुपदेशन करणारी माझी सत्तर-बहात्तर वयाची मैत्रीण. कोविड काळात जगतांना कोणते उदिष्ट डोळ्यापुढे ठेवून स्वतःला तंदुरुस्त ठेवते हे फोनवर सांगत होती...! पुन्हा-पुन्हा म्हणत होती, अखंड घरात राहायचे तर रोजच्या दिवसाला काहीतरी उद्दिष्ट पाहिजे बघ. नाहीतर दिवस नुसताच घरंगळत निघून जातो..! सत्तरीच्या वयात जगण्याच्या उद्दिष्टाबद्दल उत्साहाने बोलत असलेल्या या मैत्रिणीला कोणत्या हातांनी सलाम करावा हेच मला कळेना..! मनात आले, कधी विचार करतो बर आपण जगण्याचे उद्दिष्ट वगैरे गोष्टींचा? उठल्या-उठल्या रोज सकाळी स्वतःलाच प्रश्न विचारला, काय बरे असावे आजच्या दिवसाचे आपले उद्दिष्ट?रोज मिळणारे उत्तर वेगळे असते. कधी रेंगाळत, मजेत दिवस घालवण्याची इच्छा असते तर कधी खूप दिवस ठरवून ठेवलेले काम  करावेसे वाटते. पण असे आपल्या मनात आज काय आहे ते आपण कधी मनाला विचारतो का? जवळजवळ नाहीच! कोविडने आपली मानगूट पकडून आपल्याच घरात आपल्याला डांबून ठेवल्यावर दिवसाची सगळी चौकट खिळखिळी करून टाकली आणि समोर प्रश्न ठाकला.बोल कसा घालवशील आजचा दिवस? तेव्हा जाणवले, रोज समोर येणाऱ्या दिवसाला, सात दिवस असलेल्या आठवड्याला आणि महिन्याला काही निश्चित उद्दिष्ट असले पाहिजे. आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, गाठायचे आहे त्याचे छोटे-छोटे तुकडे करून हे तुकडे रोजच्या दिवसाशी जोडले पाहिजेत. आणि आयुष्यात ‘काही मिळवायचे’ म्हणजे काहीतरी उदात्त वगैरे हवे असे कोणी सांगितले? भोवताली वातावरण कमालीचे जड, खिन्न असताना मला आनंदी आणि निरोगी राहायचे हेसुद्धा ‘आयुष्यात काही मिळवायचे’ या सदरात येऊच शकते. गच्चीवर छोटीशी बाग करायची आहे, रोज पहाटेचा सूर्योदय बघायचा आहे, जुने फोटो नीट लावून ठेवायचे आहेत, उत्तम पोळ्या करायला शिकायच्या आहेत ह्यापैकी काहीही उद्दिष्ट असू शकते! हे उद्दिष्ट हवे, कारण ते आपल्याला दिवस सुरु करण्याची दिशा देते.दूरवर एखादे मुक्कामाचे ठिकाण दिसत असले की तिथपर्यंत जाण्याचा उत्साह आपल्याला येतो ना, तसेच काही घडते. आणि संध्याकाळी दिवस संपताना छान वाटत राहते. चार पावले पुढे गेल्यासारखे वाटत राहाते.

... उद्या सकाळी उठलात की

• अंथरुणातून बाहेर पडण्यापूर्वी डोळे मिटून बसा, स्वतःला विचारा, कसा घालवणार आहे मी आजचा माझा दिवस? काय आहे आजचा अजेंडा?•तुमचाच दिवस तुमच्यापुढे उलगडत जाईल.• नोकरी, उद्योग करीत नसाल तर एक ‘रिकामपणचा उद्योग’सुचवते :• रोज कोविड अशा नोंदी कराज्यामध्ये वास्तव परिस्थितीची नोंद असेल, पण त्या दिवशीची तुमच्या मनातील ठळक भावना कोणती ह्याची सुद्धा नोंद असेल. आणि त्या बरोबर त्या दिवशी घडलेली एखादी दिलासादायक घटनासुद्धा...!• या विषयाचा आणि काळाचा पुढे जेव्हा केव्हा समाजशास्त्रीय अभ्यास होईल तेव्हा तुम्ही-आम्ही लिहिलेल्या या नोंदी फार महत्त्वाच्या ठरतील...!

( ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)vratre@gmail.com