शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उद्या नाही, ‘आज’च..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 06:05 IST

बेरोजगारी हे आपल्या देशापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. आजच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळपास संपुष्टात आणली आहे; पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे. उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. डिजिटल क्र ांतीचे हे बदलते स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देजेव्हा संगणकीय यंत्र व माणूस बरोबरीने कामे करतील तेव्हा ऐन वेळी निर्णय कोण घेईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

- डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटीलगेल्या काही महिन्यांत झालेल्या मोर्चांमध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवांचा मोठा सहभाग होता. कायम नोकरी मिळावी म्हणून रेल्वे प्रशिक्षणार्थींनी केलेली रेल्वे रोको कृती असो, एमपीएससी परीक्षा गेली दोन वर्षे न घेतल्याबद्दल आणि रिक्त पदे न भरल्याबद्दल सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली नाराजी असो, किंवा संपूर्ण राज्यभरात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून हजारो युवकांनी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न असो, या साऱ्या आंदोलनातील प्रश्नांचा सामायिक धागा म्हणजे वाढती बेरोजगारी आहे.‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालानुसार देशामध्ये सुमारे ३.१ कोटी बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या दरात सतत वाढ होत आहे. देशाच्या ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर वाढला आहे. शेतीविषयक समस्या, कर्जबाजारीपणा, शेतीवगळता पर्यायी रोजगाराचा अभाव यांमुळे ग्रामीण स्तरावरील युवकांची स्थिती बिकट बनली आहे. शेती करून हातात काही येत नाही आणि शेती करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, अशी त्यांची संभ्रमावस्था झाली आहे.बेरोजगारीसारखा अत्यंत ज्वलंत प्रश्न आपल्या देशापुढील सर्वात मोठे आव्हान असून, या प्रश्नाची सोडवणूक एकटे कोणतेही सरकार करू शकत नाही, तर समाजातील सर्व घटक जे रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतात अशांनी मिळून यावर उपाय शोधणे आणि कृती करणे आवश्यक आहे. अपेक्षित रोजगारांची संख्या आणि बेरोजगारीचा दर यांच्यामधील दरी रुंदावत चालली आहे. निश्चलनीकरणामुळे मध्यम आणि लघु उद्योग धुळीला मिळाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, ग्रामीण भागांतील लघुउद्योगांची तर कंबर तुटली हे सर्वज्ञात आहेच.आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाºया रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे. औद्योगिक क्र ांतीने जगाच्या अर्थकारणाचे चित्र संपूर्णपणे बदलून टाकले. वाफेच्या इंजिनापासून सुरू झालेल्या या तंत्रज्ञानाने उत्पादन क्षेत्रापासून शेती व्यवसायापर्यंत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल आणले. कापड उद्योग, लोहमार्ग वाहतूक, पोलाद उत्पादन येथपासून घडत गेलेले बदल खाणउद्योग, ऊर्जा उद्योग या सर्वच क्षेत्रांत पसरत गेले. मोठमोठे कारखाने उभे राहिले. लोकांना रोजगार मिळाले, शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग येत गेला आणि या सर्वाचाच देशाच्या अर्थकारण व समाजकारण यांवर सखोल परिणाम झाला.या औद्योगिक क्र ांतीने जशी सुबत्ता आणली तसेच त्याचे वाईट परिणामही आले. शहरीकरण झाले; पण शहरांचे बकालीकरणही झाले. ऊर्जेच्या भरमसाट व अयोग्य वापराने पर्यावरणावर अतिशय घातक परिणाम होऊन खेड्यापाड्यांतून शहरात काम व पैशाच्या आशेने आलेल्या माणसांचे हाल झाले. खेडी ओस पडत चालली व शहरातील वाढत्या गर्दीने आयुष्य बरबाद झाले; पण एक मात्र खरे की तंत्रज्ञानाने आणलेल्या या औद्योगिक क्र ांतीने तेव्हा उत्पादकता भरपूर प्रमाणात वाढवली. रोजगार वाढवले, मालाची मागणी वाढवली, सेवांची गुणवत्ता वाढवली. आपण गेल्या ५० वर्षांत भारतात झालेल्या पोलाद, मोटार उद्योग, वाहतूक सेवा इत्यादींतील बदल बघितले तर शंभर वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशात झालेल्या बदलांचे चित्र डोळ्यांसमोर आणता येते.तेव्हाच्या तंत्रज्ञान क्र ांतीमुळे ज्या यंत्रांची निर्मिती झाली त्या बहुतेक सर्व यंत्रांनी माणसाच्या शारीरिक कष्टांची जागा घेतली. उदाहरणार्थ वजन उचलण्याच्या यारीने शंभर माणसांची संपूर्ण दिवसाची मेहनत एका तासात उरकण्याची किमया केली. माल उत्पादन, खाण उद्योग, वाहतूक या सर्वच क्षेत्रांत माणसाच्या मेहनतीची जागा लहान-मोठ्या यंत्रांनी घेतली. साध्या जमिनीत खड्डा करायला किंवा विहीर खणायला जेवढी माणसे किंवा दिवस लागायचे, यंत्रांनी तेच काम काही तासांत उरकून उत्पादकता कमालीने वाढवली. यामुळे बिनचूक मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्यास व त्याचा परिणाम उत्पादनाच्या खर्चावर होऊन त्या त्या मालाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणे शक्य होऊ लागले. पण या प्रत्येक यंत्राबरोबर ते चालवणारा माणूस तेथे असणे जरुरीचे होते.आजची जी तंत्रज्ञान क्र ांती होते आहे, त्यात माणसाच्या मेहनतीची जागा यंत्रे घेत असतानाच बुद्धीचीही जागा घेत आहेत. संगणक जेव्हा ८०/९०च्या दशकात घराघरात पोहोचले, त्यावेळी संगणक कितीही वेगवान असला तरी त्याला स्वत:ची बुद्धी नाही व आपण जे सांगू, जी आज्ञावली पुरवू त्यानुसार काम करणारा तो माणसाचा गुलाम आहे, अशी हेटाळणीरूप भाषा सर्वच जण वापरताना दिसत होते. पण या डिजिटल क्र ांतीच्या ओघात आता येणारी यंत्रे, यंत्रमानव हे माणसांचीच जागा घेत आहेत. या क्र ांतीचा पहिला परिणाम जो तुम्हा-आम्हा सर्वांनाच दिसेल तो म्हणजे चालकाशिवाय चालणारी गाडी आता केवळ कल्पनेतच नाही तर प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना दिसणार आहे. आज जेव्हा संगणकीय यंत्र व माणूस बरोबरीने कामे करतील तेव्हा ऐन वेळी निर्णय कोण घेईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे.अगदी वैद्यकशास्रातील एखाद्या गुंतागुंतीच्या शस्रक्रियेपासून, विमान, गाडी चालकापर्यंत ही नवीन यंत्रे माणसाची मेहनतच नाही तर बौद्धिक क्षमतेची जागा उत्तम तºहेने घेऊ लागणार आहे. उत्पादन उद्योग, सेवा उद्योग यांच्यावर या नवीन क्र ांतीमुळे होणारा हा परिणाम सर्व अर्थव्यवस्थेवर व समाजव्यवस्थेवर खोलवर परिणाम करणारा ठरणार आहे. आजच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळजवळ संपुष्टात आणली आहे. पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे ! उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. डिजिटल क्र ांतीचे हे बदलते स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे.औद्योगिक उत्पादकता वाढते आहे; पण लोकांची घरटी आमदनी मात्र कमी होत आहे. अर्थव्यवस्था वाढते आहे; पण रोजगाराचे प्रमाण मात्र वाढताना दिसत नाही. गरीब-श्रीमंतीतील दरी आणखीनच वाढताना दिसत आहे. तुम्ही केवळ कुशल कामगार आहात म्हणून तुम्हाला रोजगार मिळणार नाही तर आता तुम्हाला ‘अतिकुशल’ कामगार म्हणून शिक्षण घेणे जरुरी आहे. जगातील सर्वच प्रगत देशांत या उद्याच्या तंत्रज्ञान क्र ांतीमुळे हे बदल घडणार आहेत. त्या बदलांची व त्यांच्या परिणामांची तीव्रता ही त्या त्या देशातील सामाजिक परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असेल. पण सर्वच देशांतील मध्यमवर्गीय समाजावर या बदलांचे जास्तीत जास्त परिणाम झालेले असतील. आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाºया रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारत आज त्या नवीन क्र ांतीला सज्ज व्हायला पाहिजे. कारण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे उभे राहणारे कारखाने वेगळ्या कौशल्याला रोजगार देणार आहेत. तंत्रज्ञानाचा एक नवीन वर्ग तयार करणार आहेत. आपण सर्वांनीच याची दखल घेऊन त्या दृष्टीने तयारी करणे जरु री आहे.उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेकारी निर्माण होते त्या बेकारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्पादनखर्च कमी होतो आणि नफा वाढतो. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते.काही ठिकाणी यांत्रिकीकरणामुळे हजारो लोकांचा रोजगार आणि नोकºया बुडाल्या असून, या लोकांच्या उपजीविकेसाठी सरकार आणि त्यांच्या नोकरीच्या ठिकाणच्या व्यवस्थापनाने आपल्या कामगारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यामध्ये सरकारने यंत्रकर वसूल करून त्यामधील ठरावीक हिस्सा अशा बेरोजगार झालेल्या कामगारांना दिला तर ते उदरनिर्वाहाचा दुसरा काहीतरी विकल्प शोधतील आणि त्यांना एक आधार मिळेल. असं जर नाही झालं तर बेरोजगारीमुळे हिंसाचार, गुन्हेगारी आणि समाजाला अहितकारी असणाºया गोष्टींमध्ये हे लोक सामील होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.पण सध्या आपला सर्वसाधारण समाज नको असलेल्या गोष्टींमध्ये म्हणजे धर्म, जाती-पाती, राजकारण, मांसाहार, भाषण-लेखन स्वातंत्र्य यामध्ये गुरफटून आपला वेळ फुकट घालवतो आहे. ज्यामुळे रोजगाराच्या किंवा अर्थार्जनाच्या काहीच संधी प्राप्त होणार नाहीत. अशा परिस्थितीत जर या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी याला संवैधानिक स्वरूप देता आलं तर देशात सगळीकडे याचा उपयोग करून बेरोजगारी आणि पर्यायाने उदरनिर्वाह आणि गुन्हेगारी यावर बºयापैकी नियंत्रण मिळवता येईल. या सगळ्या गोंधळात तंत्रज्ञान क्र ांतीच्या बदलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे काळाची गरजच आहे..(लेखक लोहगाव येथील अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत.)