शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्टुडण्ट व्हिसा

By admin | Updated: August 12, 2016 18:24 IST

स्टुडण्ट व्हिसासाठीची मुलाखत देताना अमेरिकन वकिलातीचे अधिकारी कशासंबंधी प्रश्न विचारतात?

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा!- याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!स्टुडंट व्हिसा मुलाखतीच्या दरम्यान वकिलातीतील अधिकारी तीन ‘पी’चा अंदाज घेत असतात. प्रिपरेशन (तयारी), प्लॅनिंग (नियोजन) आणि पर्पज (हेतू). त्या आधारे अर्ज केलेला उमेदवार स्टुडंट व्हिसासाठी पात्र आहे की नाही हे ठरवले जाते.प्रिपरेशन (तयारी) : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पार्श्वभूमी हे यातले महत्त्वाचे मुद्दे. त्या आधारे संबंधित विद्यार्थ्याची अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठीची तयारी आजमावली जाते. पदवीचं शिक्षण घ्यायला अमेरिकेत जायचं असेल तर भारतातली बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण असणं, रअळ, ॠटअळ किंवा ॠफए पूर्वपरीक्षांची तयारी पाहिली जाते. अमेरिकेत घ्यायच्या शिक्षणाशी उमेदवाराच्या भारतीय शिक्षणाचा, व्यावसायिक पार्श्वभूमीचा संबंध काय, हेही उमेदवाराला नेमकेपणाने सांगता यायला हवे.प्लॅनिंग (नियोजन) : अमेरिकेतल्या शिक्षणासाठीचा खर्च आणि इतर अनुषंगिक गोष्टींचे नियोजन नेमकेपणाने केले आहे का, याची खात्री वकिलातीतील अधिकारी करत असतात. कोणते कॉलेज, कोणते विद्यापीठ, त्यात नेमका कोणता कोर्स याची शोधाशोध करण्यात, त्यासाठीची साधने आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात उमेदवाराने कालापव्यय करू नये ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट! त्यामुळे उमेदवाराने त्याबाबतचे नियोजन किती नेमके केले आहे, याची कसून चाचपणी होते. म्हणूनच स्टुडंट व्हिसासाठी मुलाखतीला जाताना उमेदवाराकडे परदेशातल्या शिक्षणाच्या नियोजनाचा सविस्तर आराखडा तयार असायला हवा. यासोबतच अधिकाऱ्यांना उमेदवाराकडून परदेशातल्या शिक्षणासाठी केलेल्या आर्थिक नियोजनाचीही सविस्तर माहिती हवी असते. पर्पज (उद्देश) : अमेरिकेतल्या उच्च शिक्षणाचा उपयोग भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी कसा करणार, याबाबतही उमेदवाराकडे स्पष्टता असली पाहिजे. स्वत:च्या व्यावसायिक भविष्याचा आराखडा उमेदवाराकडे आहे का, याची चाचपणी केली जाते. या शिक्षणातून उमेदवार नेमकी कोणती व्यावसायिक, व्यक्तिगत कौशल्ये विकसित करू इच्छितो, हेही वकिलातीतील अधिकाऱ्यांना समजून घ्यायचं असतं. प्रिपरेशन, प्लॅनिंग आणि पर्पज या तिन्ही मुद्द्यांबाबतच्या प्रश्नांना नेमकी आणि प्रामाणिक उत्तरे देण्याची क्षमता हेच अमेरिकन स्टुडण्ट व्हिसा प्राप्त करण्याचं एकमेव गमक आहे. त्या आधारेच वकिलातीतील अधिकारी तुमची क्षमता जोखत असतात.अधिक माहितीसाठी वेबसाइट :

http://www.ustraveldocs.com/inव्हिसासंबंधी प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल :support-india@ustraveldocs.com