- नितीन कुलकर्णी
आपण एक तरुण वा मध्यमवयीन गृहस्थ आहात व आपले आईवडील वयस्कर आहेत आणि त्यांच्याबरोबर शहरात पायी चालण्याचा अनुभव आठवून आपल्या अंगावर काटा आला नाही तर यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्याला एंडलेस रनर या प्रकारच्या मोबाइलच्या गेमप्रमाणो येणारे अडथळे पार करत छोटय़ा रस्त्यांवरून चालताना बाइक, वाहनांपासून जिवाचा बचाव करणं, पावसाळा असल्यास रस्त्यावरील खड्डे, दगडं यांच्या ठेचकाळण्यापासून सांभाळत चालणं, नंतर मुख्य रस्त्यावर गाडय़ांच्या वेगातून उद्भवणारा धोका टाळण्यासाठी पदपथावर जावं म्हटलं तर दोन पाय:यांएवढा उंचीचा हा चौथरा चढावा लागतो. वडीलधा:यांना गुडघ्यांचा त्रस असेल तर आपल्या आधाराखेरीज चढणं धोक्याचं ठरू शकतं. बरं, पदपथावर चढलं तर लक्षात येतं की इथले पेव्हर ब्लॉक्स सलग नाहीत. तिथे झालेल्या एखाद्या कामानंतर ते वरखाली झालेले आहेत, त्यामुळे ठेचकाळण्याचा धोका कायम!
नुसत्या सीमेंटचा पदपथ असेल तर तोही एकसारखा नाही. वरखाली किंवा खडबडीत! काही पदपथांखाली गटारी असतात व त्यांची झाकणो वरखाली असतात. त्यावर पावलं टाकताना पोटात गोळा येतो आणि उघडी गटारं टाळण्यासाठी डोळ्यात तेल घालून बघावं लागतं. आपण जेव्हा वडीलधा:यांना न घेता आलो तेव्हा या सगळ्या अडचणी शिताफीनं कशा टाळल्या याचा अचंबा वाटतो आणि वडीलधा:यांच्या अडचणी दृगोच्चर होतात.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अडचणींमधे कमालीचं नावीन्य असतं, अडचणींचं स्टॅँडर्डायङोशन नाही. एकाच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असते. या परिस्थितीवर रोज मात करणारे एकतर नियमित खेळत असलेले एंडलेस रनर्स किंवा आपल्या वयावर मात केलेले सीनियर चॅम्पियन्स! गमतीचा भाग सोडला तर आपल्या नगररचनेच्या मानकांचा उडालेला बोजवारा बघणो हा एक गंभीर विषय ठरेल.
माणसाच्या जगण्यातल्या सुखसुविधांचे व्यक्तिपरत्वे अनेक अर्थ वा अपेक्षा असू शकतात; परंतु नित्याचे व्यवहार करत असताना मूलभूत सुविधा मिळण्याची अपेक्षा याबाबतीत कुणाचे दुमत असणार नाही. परंतु परिस्थिती काही औरच दिसते. काही शहरांमधे पादचा:यांना सुरक्षितपणो पायी फिरता येणंदेखील दुरापास्त झालंय. याचा सरळ अर्थ असा की, ‘युनिव्हर्सल डिझाइन’ या प्रणालीचा अंतर्भाव आपल्या नगररचनाकारांनी अभावानेच केलेला दिसतो. या प्रणालीप्रमाणो डिझाइनची संकल्पना करताना डोळ्यासमोर वय अथवा शरीराची विशिष्ट परिस्थिती ठेवावी, जेणोकरून तयार झालेल्या वस्तू, परिसर अथवा सुविधांचा वापर त्यांनाही सुकर व्हावा.
या वापरकत्र्यामधे मुलं व त्यांना कडेवर घेऊन जाणारे पालक, वृद्ध व गरोदर स्त्रिया येतात. आणि ‘बॅरिअर फ्री’ डिझाइनच्या प्रणालीत विविध कारणांमुळे अपंगत्व आलेल्या व्यक्तींचा उपयोगकर्ता म्हणून विचार करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ स्वच्छतागृहात वेगळी व्यवस्था असणं, इमारतींमधे व्हीलचेअर ने-आण करण्याची उतरंड असणं. असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीमधे अधू झालेल्या अवयवासाठी वस्तुनिर्मिती करण्यात येते. डोळ्यांना कमी दिसतं म्हणून आपण वापरत असलेला चष्मा, आधाराची काठी, व्हीलचेअर इत्यादि असंख्य वस्तू या प्रकारात येतात.
एका मास्टर ऑफ डिझाइनच्या विद्यार्थिनीच्या (तेजसी शिवदे, एन. आय. एफ. टी.) प्रबंधाची प्रस्तावना पुढील वाक्यांनी सुरू होते. ‘जीवन केवळ सुस्थितीत असलेल्या लोकांबरोबर राहण्याने समृद्ध होत नसते, तर जे आणि जसे लोक आपल्या जवळ असतील त्यांच्या बरोबरच्या आपल्या अनुभवांना समृद्ध करत जाणो म्हणजे जीवन होय.’
या वाक्यात ‘डिझाइन फॉर स्पेशल नीड्स’ या शाखेची पाळंमुळं दडलेली आहेत. डिझाइनच्या या शाखेत काम करताना लोकांसाठी काही परोपकारी काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. यातूनच सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या असलेल्या या वर्गाच्या गरजा समजून घेणो शक्य होते. या वर्गात शारीरिक व मानसिकरीत्या अक्षम (फिजिकली चॅलेंज्ड) असलेले लोक येतात, तसेच विशेष गरजा (स्पेशल नीड्स) असलेल्या लोकांचा विचारही यात केला जातो. जसं की वृद्ध, गरोदर स्त्रिया, मुलं इत्यादि. हा विषय एन.आय.एफ.टी.सारख्या संस्थांमधे एक ऐच्छिक विषय म्हणून शिकवला जातो. त्यामुळे साहजिकच यात काम करण्याची प्रबळ इच्छा असणारे विद्यार्थीच असतात. त्यामुळे या क्षेत्रतील नवप्रवर्तनाला (इनोव्हेशन) वाव मिळतो. तेजसीने स्नायुचैतन्यातील कमतरता (हायपोटोनिया) असलेल्या मुलांच्या अक्षमतेवर काम केलं आहे.
या मुलांना साध्या साध्या दैनंदिन क्रिया करणंही कठीण असतं, त्याबरोबरच त्यांना पालक-शिक्षकांच्या समोर या क्रिया करायला शिकवणं व सराव करून घेणं हे फार कठीण आव्हान असतं. या सरावात स्नायूंचा व्यायाम हा एक महत्त्वाचा भाग येतो. हा व्यायाम करताना कंटाळा येऊ नये म्हणून काही खेळ उपलब्ध आहेत, परंतु ते मुलांना कंटाळवाणो वाटू शकतात.
या प्रोजेक्टच्या संशोधनातून असं लक्षात आलं की काही क्रि या करायला शिकवण्यासाठी खेळ नाहीत, जसं की कपडे घालणं व काढणं. यासाठी ‘ग्रॉस मोटर स्किल्स’ म्हणजे शर्ट किंवा पॅँट हातात पकडणो, बाहीमधे हात व पॅँटच्या पायात पाऊल सरकवणो या उपक्रिया येतात. व ‘फाईन मोटर स्किल्स’मधे कॉलर दुमडणो, बटणो अथवा हुक्स, ङिापर काढणो वा घालणो, बुटाची लेस बांधणो व सोडणो इत्यादि क्रिया येतात. या सर्व क्रियांचा सराव हवाहवासा वाटावा हा या प्रकल्पाचा उद्देश.
यासाठी एक खेळ डिझाइन केला गेला. भीमाचे कार्टूनमधले पात्र यासाठी निवडले व कापडाचा वापर करून या खेळाचा प्रोटोटाइप बनवून टेस्ट केला.
‘छोटा भीम, मला घरी पोहोचवा’ या खेळात छोटय़ा भीमला अडथळ्यांमधून घरी पोहोचवायचे आहे आणि अडथळे म्हणजे लेस बांधणो, सोडणो, बटणो काढणो, घालणो इत्यादि क्रिया होत.
अशा प्रकारचा प्रकल्प इंटरडिसिप्लिनरी डिझाइनमधे मोडतो, जेथे अनेक शाखांच्या मेळातून योजना केली जाते.
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत.)
nitindrak@gmail.com