शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

किनारे किनारे..

By admin | Updated: June 17, 2016 17:54 IST

परदेशात कुठे सहल ठरवली की त्यात क्रूझचा समावेश असतोच असतो. भारतातली सहल ठरवताना मात्र असा विचार क्वचितच होतो. खरं तर भारतीय जलसफरीही आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या आणि अनुभवांना एक नवं कोंदण देणाऱ्या आहेत..

मकरंद जोशीजेव्हा जेव्हा सुटीचा, सहलीचा कार्यक्रम ठरवला जातो तेव्हा तेव्हा सर्वसाधारणपणे परदेशातला बेत असेल तर त्यात अनेकदा क्रूझचा समावेश केला जातो. सिंगापूरची दोन दिवसांची ‘स्टार क्रूझ’ किंवा युरोपमधली ग्रीसची ‘आयलंड क्रूझ’ अनेकांना मोहवते. काहीच नाही तर निदान अ‍ॅमस्टरडॅम ‘कॅनल क्रूझ’ किंवा पॅरिसच्या ‘सीन क्रूझ’चा समावेश तरी सहलीमध्ये करण्याचा प्रयत्न नक्की केला जातो..भारतातील सहल ठरवताना मात्र असा विचार क्वचितच केला जातो. म्हणजे भारतातील पर्यटनाच्या बाबतीत जणू हवाई मार्ग, रेल्वे प्रवास किंवा रस्त्यावरील प्रवास इतकेच पर्याय उपलब्ध आहेत अशीच (गैर)समजूत रूढ आहे. आता ज्या भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या शेकडो नद्या आहेत, हिमालयाच्या कुशीत उगम पावून बंगालच्या सागराला मिळणारी गंगा आहे, तिबेटमध्ये उगम पावून भारतात येणारी ब्रह्मपुत्रा आहे, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला येऊन पश्चिम भारतातून पूर्व भारतात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणारी कृष्णा आहे त्या भारतात पर्यटनासाठी मात्र जलमार्ग नाहीत असं कसं होईल? पण अनेकदा आपल्याच घरातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात तसं भारतातल्या जलवाहतुकीचं आहे. चला, भारताचं दर्शन किनारे किनारे कसं करता येईल याचा एक आढावा घेऊया..भारताच्या पूर्वांचलातील एक मुख्य राज्य म्हणजे आसाम. या राज्याची जीवनरेखा आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा आपल्या अपरंपार जलसंभाराने आसामची भूमी सुपीक आणि सुफलाम करत आली आहे. आसाम म्हटल्यावर चहाचे मळे, एकशिंगी गेंडा आणि पारंपरिक कलाकारांनी विणलेली रेशमाची वस्त्रेही आठवतात. या सगळ्या गोष्टींचे दर्शन तुम्ही ब्रह्मपुत्रेची जलसफर करत घेऊ शकता. आसामची राजधानी असलेल्या गौहत्तीमधून निघणाऱ्या ब्रह्मपुत्रा क्रूझेस या चार दिवसांपासून ते आठ दिवसांपर्यंतच्या असतात. त्यातील काही क्रूझेसचा कार्यक्र म आसामची संस्कृती आणि वन्यजीवन या दोन्हींचे दर्शन घडवणारा असतो, तर काहींमध्ये फक्त सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा समावेश असतो. तुम्ही जर चार दिवसांची गौहत्तीहून निघून गौहत्तीला परत येणारी क्रूझ निवडलीत तर या जलसफरीत विजयनगर, सौलकुची, पोबितोरा अभयारण्य आणि गौहत्ती शहरामधील प्राचीन कामाख्या मंदिर यांचा समावेश असतो. गौहत्तीहून निघून जोरहाटला संपणारी क्रूझ म्हणजे आसामच्या चहाच्या मळ्यांपासून ते काझरिंगा नॅशनल पार्कपर्यंत व्हाया आसामी लोकजीवन आणि लोककला असे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारी जलयात्रा असते. या सफरीत ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहातील सर्वात मोठ्या बेटाचा माजुलीचा समावेश आवर्जून केलेला असतो. ब्रह्मपुत्रेचा प्रवाह दुभंगल्याने या बेटाची निर्मिती झालेली आहे. त्यावरूनच दोन प्रवाहांच्या मधली भूमी म्हणून माजुली हे नाव मिळालं आहे. या बेटावर छोटी छोटी १४४ गावं आहेत. प्रामुख्याने शेतकरी असलेले इथले लोक भाताचे जवळ जवळ शंभर प्रकार पिकवतात आणि तेही कोणत्याही रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर न करता.१५ व्या शतकात संत श्रीमंत शंकरदेव आणि त्यांचे शिष्य माधवदेव यांच्या प्रभावामुळे माजुलीवर वैष्णवांचे अनेक सत्रा (मठ) निर्माण झाले. या सत्रांच्या आधाराने फुललेली नृत्यकला, संगीत, गाणी हे सगळं आज आसामला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचं आकर्षण ठरलं आहे. या जलसफरीमध्ये सौलकुची गावात रेशमाच्या कोशांमधून रेशीम कसं काढतात आणि हातमागावर त्यापासून तलम कापड कसं विणतात हे पाहायला मिळतं. तसेच अहोम राजवटीत १७ व्या शतकात बांधलेलं शिबसागर गावातील शिवमंदिर जे भारतातील सर्वात उंच शिवमंदिर मानलं जातं ते पाहायला मिळतं. आसाममधल्या या जलसफरी जरा महाग नक्की आहेत, पण नेहमी नेहमी परदेशातल्या सहलींवरच का पैसे खर्च करायचे? कधी तरी आपल्याच देशात करूया की ! भारताच्या पूर्व किनाऱ्यावर अनुभवावीच अशी आणखी एक जलसफर म्हणजे पश्चिम बंगालमधील सुंदरबनची जलसफर. युनेस्कोच्या विश्ववारसा यादीत समाविष्ट झालेलं सुंदरबन म्हणजे गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशातील जंगल. या मॅँग्रूव्ह फॉरेस्टमध्ये फिरण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नौकाविहार. तुम्ही छानपैकी तीन-चार दिवसांचे क्रूझचे पॅकेज निवडून या अनोख्या भागाला भेट देऊ शकता किंवा इथल्या बेटावरच्या एखाद्या हॉटेलमध्ये राहून मोटर लॉन्चने सुंदरबनचे वन्यवैभव पाहू शकता. फिशिंग कॅटपासून ते ठिपकेवाल्या हरणांपर्यंत अनेक प्रकारचे प्राणी इथे आहेत. जरी इथे दोनशेपेक्षा जास्त वाघ असल्याचा दावा केला जात असला, तरी व्याघ्रदर्शन तसे दुर्मीळच असते. पण किंगफिशर म्हणजे खंड्याच्या अनेक जातींसह पाणपक्ष्यांचे विविध प्रकार तुमचं लक्ष वेधून घेतात.भारतामधल्या जलसफरींमधील केरळ बॅकवॉटर जगद्विख्यात आहे. एकमेकांना जोडलेल्या पाच तलावांमधून निर्माण झालेल्या या अथांग जलाशयात पारंपरिक पद्धतीच्या ‘केट्टुवल्लम’मधून सफर करण्याचा आनंद जगभरातले पर्यटक घेतात. अशा प्रकारच्या जलसफरी मध्य प्रदेश (भेडाघाट) पासून ते आपल्या महाराष्ट्रापर्यंत (कोयना, तापोळा, कोकण) उपलब्ध आहेत. नेहमी फक्त रस्त्याने प्रवास करण्यापेक्षा काही वेळा नदी, सरोवरातील जलसफरीचा आनंद अवश्य घ्या, तुमच्या पर्यटनाला एक वेगळी रंगत नक्की येईल. पाण्यावर तरंगत्या होडीमधून पक्षिदर्शनाची हौस पूर्ण करायची असेल तर ओरिसातल्या चिल्का सरोवराला भेट द्यायलाच हवी. दया नदीच्या मुखावर हे सरोवर तयार झालेलं आहे. या सरोवराने ११०० चौ.कि.मी.चा परिसर व्यापलेला आहे. चिल्का लेकमधील जलसफरीचा आनंद तुम्ही सातपाडा येथून किंवा बाराकूल येथून घेऊ शकता. सातपाडा भुवनेश्वरपासून १०० कि.मी.वर, तर पुरीपासून ४८ कि.मी.वर आहे. सातपाडाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉल्फिन वॉच. त्याचप्रमाणे चार किंवा सात तासांची बोट राइड घेऊन तुम्ही नलबन पक्षी अभयारण्याला भेट देऊ शकता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात जर ओरिसाला भेट दिलीत तर चिल्का सरोवरातील जलसफरीचा अनुभव आपला आनंद नक्कीच द्विगुणित करील.