शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

शिवजयंती त्यांची आणि समाजाची

By admin | Updated: May 31, 2014 16:38 IST

शिवजयंती भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करायची म्हणजे काय, तर भव्य मिरवणूक, लेझीम-दांडपट्टा कलावंतांचा ताफा, पोवाड्यांचे सादरीकरण, चौका-चौकांतून गल्लीबोळातील नेत्यांसह शिवछत्रपतींचे मोठे-मोठे चित्रफलक.. पण, छत्रपतींनी जपलेला माणुसकीचा धर्म आपण आचरणात कधी आणणार?

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

प्रत्येक महाविद्यालयात जशी पाच-दहा टारगट, दंगेखोर, पुढारीपण करणारी आणि अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टींत रस घेणारी मुले असतात, तशीच आमच्याही महाविद्यालयात काही मुले होती. हे विद्यार्थी साधारणपणे पाठीमागे वडिलांचा राजकीय वारसा असलेले; व्यापारी, जमीनदार, गैरमार्गाने भरपूर पैसा मिळविलेल्या आणि श्रीमंती ओसंडून वाहणार्‍या कुटुंबातून आलेले असतात. त्यांना केवळ टाइमपास करण्यासाठी, साम, दाम, दंड यांच्या मदतीने दहशत बसवण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी महाविद्यालयात यावेसे वाटते. ते सहसा वर्गात बसत नाहीत आणि जेव्हा ते बसतात, तेव्हा वर्गातील शिक्षकांना त्रास देण्यासाठी, वर्गात गोंधळ घालण्यासाठी येतात. मुलांवर भाव मारण्यासाठी येतात. फुकट खाण्याची सवय लागलेल्या आणि कणा नसलेल्या चार-सहा लाचारांची त्यांना साथ मिळते. ते त्यांचे हुजरे बनतात. पाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे न चावता, पण अंतर ठेऊन भुंकण्याचे काम ते करतात. कधी-कधी एखादा सार्वजनिक प्रसंग ते आपल्या हातात घेतात आणि त्याआधारे पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्राप्त करून घेतात.
याचा अनुभव आम्ही आणि आमच्या कॉलेजनेही तसा अकल्पित स्वरूपातच घेतला म्हणायचा. फेब्रुवारीला नुकताच प्रारंभ झालेला होता. परीक्षा जवळ आलेल्या. अभ्यासक्रम संपवण्यात प्राध्यापक गर्क. तयारी करण्यात विद्यार्थी मग्न, जादा तास आणि शासकीय प्रयोगानुभवात सारे कॉलेज गढलेले असताना एका हॉटेलमालकाला दमदाटी करून फुकटात चहा घेतल्यावर या स्वयंघोषित नेत्यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी गुटखा चघळत चघळत एक अस्मितानिदर्शक घोषणा केली. ती घोषणा होती, लवकरच येणारी शिवजयंती भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करण्याची. घोड्यांवर स्वार झालेल्या मावळ्यांची भव्य मिरवणूक, लेझीम-दांडपट्टा कलावंतांचा ताफा, पोवाड्यांचे सादरीकरण, चौका-चौकांतून या नेत्यांसह शिवछत्रपतींचे मोठे-मोठे चित्रफलक, शिवछत्रपतींच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक आणि नगरात असलेल्या महाराजांच्या पुतळ्यांचे पूजन नि सजावट, शेवटी उशिरा श्रमपरिहारार्थ सामीष भोजन, तेही ‘सह’सामीष भोजन.
दुसर्‍याच दिवशी या मावळ्यांनी कंबर कसली नि पैशांची तरतूद करण्यासाठी प्रेमळ दमदाटीसह देणगीचे नियोजन राबविण्याचे ठरविले. मावळ्यांनी हातात नागवी तलवार धरावी, तसे दोन-तीन हुर्ज‍यांच्या हातात दंडुके नि काठय़ा होत्या. कॉलेजच्या समोर असलेल्या तीन-चार दुकानदारांकडे यांची कृपादृष्टी वळली. नेता म्हणाला, ‘‘शिवजयंतीची देणगी घ्यायला आलोय, मागायला नव्हे. यंदा जयंती थाटामाटात करू. या थोर पुरुषाची जयंती म्हणजे आपल्या जगण्याचा आधार. बोला, किती देता देणगी?’’ दोघांनी या नेत्याने उच्चारलेला देणगीचा आकडा निमूटपणे हातावर ठेवला. वरती हात जोडून नमस्कार केला. एका दुकानदाराने थोडीशी हुज्जत घातली. कमी रक्कम देतो म्हणाला. त्यावर उपनेता दरडावून म्हणाला, ‘‘तुमच्या या दुकानातली काचेची कपाटे आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या तुम्हाला शाबूत बघायच्या आहेत, की फुटलेल्या? माकडा, महाराजांच्या जयंतीला हात आखडतोस? राम्या, दाखव रं तुझं कौशल्य? फुटलेल्या बाटल्यांच्या ढिगार्‍यांत याला वरती पाय करून उभा कर.’’ त्याबरोबर आज्ञाधारक राम्या दंडुका हातात घेऊन समोर आला. दुकानदाराने  आधी लोटांगण घातले व मग दान घातले. कागद, पेन, पेन्सिल विकणार्‍या एका गरीब दुकानदाराने नंतर देणगी देतो म्हणताच, त्या दुकानातला पसारा रस्त्यावर आला नि एकाने पुण्यकर्म म्हणून त्याला काडी लावली. दुकानदार दोन्ही हातांनी छाती बडवत होता. जमलेले शिवभक्त आनंदाने टाळ्या वाजवून हसत होते.
नंतर हे सारे शिवभक्त सरळ घुसले ते थेट प्राचार्यांच्या केबिनमध्येच. काही जण खुर्चीवर बसले. काही जण प्राचार्यांच्या समोर गुन्ह्याचा जाब विचारणार्‍या पोलिसाप्रमाणे उभे. ‘‘सर, आम्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांचे नेते आहोत. आपण सारे जण शिवजयंती साजरी करणार आहोत. त्यासाठी देणगी हवी.’’ प्राचार्यांनी वकिली थाटात नियमांचा आधार घेत अडचण सांगितली. त्यांची ही टाळाटाळ सहन न होऊन तीन नंबरचा नेता सरळ अंगावर धावला. दोन्ही हातात गळा पकडून गदगदा हलविले. प्राचार्य पुरते घाबरले. गारठले. घामाघूम झाले. ‘‘कॉलेजच्या वतीने व स्वत:ची देणगी म्हणून सांगाल ती देणगी देतो. माझा गळा तेवढा सोडा,’’ असे म्हणताच त्यांची मुक्तता केली. त्यानंतर एवढे बलदंड प्राचार्य सुमारे दोन तास थरथरत होते.
नंतर हे सगळे मावळे वर्गा-वर्गांत घुसले. जयंतीची माहिती देत देणगीचे आवाहन करीत होते. प्रेमळ दमदाटीही करीत होते. येणार्‍या-जाणार्‍या मुलांना व प्राध्यापकांना अडवून देणगी मागत होते. मी आणि आणखी दोन प्राध्यापक जरा उशिराच कॉलेजात आलो. आम्ही स्टाफरूमकडे वळतो न वळतो, तोच नंबर एकचा नेता एकदम समोर आला आणि शेजारच्या प्राध्यापकाला म्हणाला, ‘‘सर, तुमच्या वर्गात आम्ही गोंधळ करू नये म्हणून तुम्ही दरमहा चांगली रक्कम पॉकेटमनी म्हणून देता. पगार होताच न चुकता देता. तीच तीच बडबड करण्यासाठी तुम्ही एवढा मोठा सरकारचा पगार खाता. या जयंतीला एक महिन्याचा पगार आम्हाला हवा. देणार नसाल, तर उद्या-परवा काय घडेल, याचे फक्त चित्र डोळ्यांसमोर आणा.’’ या दोघांतील तहाची ही प्रेमळ बोलणी ऐकताच आम्ही दोघांनी भरघोस देणगीचे आश्‍वासन दिले व एका थोर महापुरुषाच्या कार्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले.
चार-सहा दिवसांनी त्यांच्याच काही शिष्यांनी आम्हाला माहिती दिली, की दहा-बारा फूट लांबी-रुंदीचे भव्य फलक उभारण्याचे ठरविले आहे. या सगळ्या नेत्यांच्या फोटोंमध्ये शिवछत्रपतींची फोटो-प्रतिमा मध्यभागी अंग चोरून उभी आहे. शिवछत्रपतींच्या सजीव देखाव्यात एका नेत्याला उभे करायचे आणि धनाजी, तानाजी, येसाजी, कान्होजी यांच्या वेशात त्यांच्या अनुयायांनी उभे राहावयाचे. कपडे, सजावट, फुलमाळा, प्रकाशझोत, राजस्त्रियांची उपस्थिती, अष्टप्रधान, त्यांचे कपडे, दागिने यांवरही खूप खर्च केला जाणार आहे. जयंतीपासून तीन दिवस इच्छाभोजन व ‘प्रियपान’ यांचीही चोख व्यवस्था केलेली आहे.
चार पैसे शिल्लक राहावेत म्हणून कॉलेजच्या प्रवेशद्वारावर देणगीसाठी ही टोळी उभी असतानाच एका कॉलेजकन्येला त्यांनी अडविले. देणगीसाठी दरडावले. थरथरत्या हाताने तिने आपल्या पर्समधून शंभराची नोट काढली व गहिवरलेल्या शब्दांत म्हणाली, ‘‘आईच्या औषधासाठी हे पैसे आणलेत. ती खूप आजारी असते; पण घ्या आता.’’ तेवढय़ात तीन नंबरचा नेता म्हणाला, ‘‘अरे, थांबा, थांबा. आपल्या पाठक सरांची ही मुलगी असावी. फार चांगले गुरुजी होते ते. मुलांना मदत करत. शिकवणीचा एक पैसा घेत नव्हते. वारले बिचारे ते.’’ हे ऐकताच सारे जण एकदम चकित झाले. गंभीर झाले. थोरला नेता म्हणाला, ‘‘राम्या, आपल्या देणगीतून पाचशे रुपये या मुलीच्या हातावर ठेव, तिच्या आईच्या औषधासाठी.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व 
निवृत्त प्राचार्य आहेत.)