शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शाम्पू आणि साबण

By admin | Updated: July 1, 2016 22:18 IST

‘एवढे मोठे अधिकारी, पण हॉटेलातला शाम्पू, साबण सोबत घेऊन जातात.’

- ज्ञानेश्वर मुळे
 
‘एवढे मोठे अधिकारी, 
पण हॉटेलातला शाम्पू, 
साबण सोबत घेऊन जातात.’
- अशी टीका माङयावर होते, 
पण मी त्याने बधत नाही. 
बदलत नाही. 
मी स्वत: अनेक गोष्टी 
पुरवून वापरतो.
बनियन फाटेर्पयत फेकत नाही, 
थेंबभर पाणीही वाया घालवत नाही,
झाडांना गळामिठी मारतो आणि 
समुद्रतळावर प्रवाळांचं रोपण करतो.
 
‘कशाला घेऊन येता या वस्तू? ते लोक काय म्हणत असतील? एवढे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि हॉटेलमधला शाम्पू, कंडिशनर आणि साबण घेऊन जातात?’
मी कामानिमित्त अनेक ठिकाणी जातो. तिथून परत आलो की ही वाक्ये ब:याचदा माङया कानावर पडतात. आता मला त्याची सवय झालीय. इतकी की मी त्याचे उत्तर द्यायचे टाळतो. सुरुवातीला काहीवेळा मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ‘हे बघा, ही काही चोरी नव्हे. राहण्याचे पैसे देतो तेव्हा शाम्पू, साबण वगैरेचेही पैसे देतो. हॉटेलवाल्यांनी ते दररोज बदलावे असा रिवाज आहे. शिवाय मी फक्त अर्धवट वापरलेल्या गोष्टी घेऊन येतो. कारण मी गेल्यानंतर त्या वस्तू हॉटेलवाले फेकून देण्याची शक्यता आहे. मला हा अनावश्यक अपव्यय व संपत्तीची हानी वाटते..’  हे समर्थन कुणाला पटत नाही. अशा किती गोष्टी दररोज मी करतो, त्यावर नाराजी व्यक्त होते. 
पण या सर्व गोष्टींचा माङया जीवनपद्धती विषयीच्या विचारांशी संबंध आहे.  गेल्या काही वर्षात माङो हे मत पक्के होत गेले आहे की, आपण विकासाच्या नावाखाली विनाशाच्या वाटेकडे जातो आहोत. त्यात साबण, शाम्पू यांच्या वापरापासून नदी, नाल्यांच्या निजर्लीकरणार्पयत आणि कपडे आणि वाहने यांच्या अवास्तव सोसापासून हवामान बदलार्पयत सर्वच गोष्टींचा समावेश आहे. आर्थिक उदारीकरणाबरोबरच भोगवादाचे उदारीकरणही कल्पनेपलीकडे फोफावते आहे. याचे प्रतिबिंब आता वैयक्तिक जीवनशैलीपासून राष्ट्रीय आशा-आकांक्षार्पयत सर्वत्र दिसते आहे. 
थोडे मागे जाऊ. म्हणजे माङया बालपणात. पन्नाशीवरच्या बहुतेक लोकांना यात स्वत:चे बालपण दिसेल. सकाळी उठल्यानंतर आम्ही अंघोळीसाठी नदी किंवा विहिरीवर जात असू. जाताना शेतावरती किंवा माळावर प्रातर्विधी. टूथपेस्ट नव्हती. वाटेत लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाचा शेंडा तोडून त्याने दात घासायचे. पाटातल्या पाण्यात तोंड धुवायचे. आवश्यक कपडे धुवायचे आणि मनसोक्त अंघोळ करून पोहून परत यायचे. घरात कपडे धुण्यासाठी मुख्यत: शिकेकाई. दंतमंजन म्हणून राख व जंतुनाशक म्हणूनही हात धुवायला राखच. इंधन म्हणून शेतातला पालापाचोळा, काटक्या व शेणकुटे. दररोज घालायचे कपडे मर्यादित. सणासुदीचे एक दोन कपडे पेटीत वेगळे ठेवलेले. गावात दोन तळी. एक पाण्यासाठी आणि एक जनावरांसाठी. उन्हाळ्याच्या सुटीत सगळी मुले मामाच्या गावी जायची. शेत, आंबे, माळ, मळणी, पेरणी, सुरपण, पोती, बैल, गाडी, विटीदांडू, शाळा, झाडे या शब्दांच्या पावसात आम्ही वाढलो. शेतात खतांचा वापर मर्यादित होता. उकिरडय़ात खत तयार व्हायचे. एसटीचे मर्यादित दर्शन व्हायचे. आजच्या भाषेत सांगू? आमचे जीवन ‘ऑरगॅनिक’ होते. आमचा आणि आमच्या परिसराचा पाऊस, नदीनाले, जमीन, वारा, आकाश सर्वाचा एकमेकांना सतत स्पर्श व्हायचा. पावसाची प्रतीक्षा म्हणजे चिखलात खेळायला मिळणार, नदीचा पूर पाहायला मिळणार, मनसोक्त भिजायला मिळणार. खेडय़ातले असे संपन्न आणि श्रीमंत जीवन जगत आम्ही वाढलो. 
या तुलनेने आजचे आपले जीवन फक्त उपकरणांनी, सुखसोयींनी नव्हे, तर रसायनांच्या अतिरेकी वापराने ओथंबलेले आहे.  आपण सगळे रासायनिक ओङयात दबले गेलो आहोत. याला इंग्रजीत ‘बॉडी बर्डन’ असा शब्दप्रयोग आहे. आपल्या अन्नातून, हवेतून, प्रसाधनातून, खेळण्यांपासून कपडय़ांर्पयतच्या दररोज संपर्क येणा:या वस्तूंमधून आपल्या शरीरात रासायनिक विषाचा राजरोस प्रवेश होत असतो. आपली सगळ्यांची शरीरे एका रासायनिक प्रयोगाचा भाग आहेत आणि पचनेंद्रिये या विषांचे महाद्वार म्हणून भूमिका पार पाडताहेत. सर्वाची शरीरे रासायनिक विषांची गुदामे झाली आहेत. दुर्दैवाने खेडय़ातले जीवन आणि शहरातले जीवन यांच्यातले अंतरही आता जवळपास संपत आले आहे. 
याचा अर्थ माङया बालपणातला गाव परिपूर्ण होता असे नव्हे. तिथे अज्ञान होते. गरिबी होती. विषमता होती. कष्ट होते. नळाचे पाणी नव्हते. आज शाळा, कॉलेजेस आहेत. टीव्ही, सेलफोन व संगणक घरोघरी आहेत. मुलांइतक्याच मुली शिकताहेत आणि गरिबी असली तरी तिची व्याख्या बदलली आहे. प्लॅस्टिकपासून शाम्पूर्पयतचे रासायनिक आक्रमण पर्यावरणावर आणि जनसामान्यांवर दशदिशांनी होत आहे. शेती, पाणी, नद्या, तलाव, ओढे, विहिरी, अन्नधान्य सगळे रसायनयुक्त आहे. यातून सुटका नाही. 
आधुनिक जीवनशैलीतील अधिक श्रीमंत, अधिक तरुण, अधिक सुंदर, अधिक यशस्वी होण्याच्या जीवनाच्या स्पर्धेत आपण दोन गोष्टींकडे पूर्णपणो दुर्लक्ष करत आहोत. पहिले, आपल्या सर्वाच्या या ‘अधिक’ भुका भागवण्यासाठी निसर्गावरती मनुष्यजातीने अनन्वित अत्याचार सुरूकेले आहेत. खनिजांचे अर्निबध उत्खनन व वापर, जंगलापासून जलसंसाधनार्पयत सगळ्यांचा अतिरेकी वापर, भूमीचेच नव्हे समुद्राचेही संतुलन बिघडवणारे वर्तन. यातून दीर्घ टप्प्यातील मानवी अस्तित्वच धोक्यात आले आहे. दुसरे, याच बेजबाबदार वागणुकीमुळे व्यक्तीचे जीवन सर्वागाने प्रदूषित होत आहे. 
जानेवारी 2क्15 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा प्रमुख पाहुणो म्हणून आले तेव्हा ब्लूमबर्गसारख्या प्रसिद्ध अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिल्लीतल्या प्रदुषित हवेत श्वास घेतल्याने ओबामांचे आयुष्य किती तासांनी घटले याचे हिशेब मांडले होते. ही पाहुण्यांची परिस्थिती, तर इथे आणि तिथेही राहातात, त्यांचे काय? चेह:यावरती ‘एअर फिल्टर मास्क’ घालणो किंवा जाऊ तिथे कुंडीतले झाड घेऊन जाणो हेच पर्याय आहेत पण ते प्रॅक्टिकल नाहीत. मग प्रॅक्टिकल काय आहे?.. 
निसर्गाला निसर्ग परत द्या. घरात, अंगणात, परसात, रस्त्यात निसर्गाला त्याची जागा देऊ या. दुसरे, साधेपणाकडे परत या. साधेपणा म्हणजे श्रीमंती. चिकूपणा नव्हे. आवश्यक तेवढय़ा गोष्टी तेवढय़ा प्रमाणात वापरणो म्हणजे साधेपणा.  पुनर्वापर करा. आमच्या घरात संयुक्त कुटुंबात मोठय़ाचा शर्ट छोटय़ाला, छोटय़ाचा त्याच्यापेक्षा छोटय़ाला किंवा वरच्या वर्गात असलेल्याची पुस्तकं वर्षानंतर दुस:या चिरंजीवांना, मग त्यापेक्षा छोटय़ा बहिणीला हा रिवाज सर्रास होता. मला अनेकदा पहिली आणि शेवटची पाने नसलेली पुस्तके मिळाली आहेत. 
‘नैसर्गिक ठेवा जपून वापरा, पाणी असो वा ऊर्जा, लाकूड असो वा तेल. थेंब थेंब, तुकडा तुकडा वाचवा. जे आपण निर्माण केले नाही ते नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही,’ असे रमेश मित्तल नावाच्या एका कारकुनाने मला सांगितले. तो वेळ मिळेल तेव्हा, वेळ मिळेल तिथे, भेटेल त्या व्यक्तीला पाण्याचा वापर एक पंचमांश कसा करता येईल हे पटवत असतो. 
आपण विकासदर वाढीच्या विचाराने झपाटलो आहोत. पण अमर्याद भांडवलशाही ही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही. भांडवलशाहीतील उद्योजकता हा गुण वाखाणण्यासारखा असला तरी तिच्या अनुषंगाने येणारे नैसर्गिक व मानवी शोषण मानवाच्याच नव्हे तर भूतलाच्या भविष्याच्या दृष्टीने विध्वंसक ठरते आहे. 
‘चला कल्पतरूंचे आरव, 
चेतना चिंतामणीचे गाव, 
बोलते जे अर्णव पीयूषाचे’ 
या ओवीत जीवन जगण्याचे रहस्य दिसते. कल्पतरूंची वनराई म्हणजे निसर्गाचे जीवनातील सदोदित स्थान, चिंतामणीचे गाव म्हणजे ‘अक्षय’ ऊर्जा असलेली गावे, शहरे आणि अमृताचे समुद्र (अर्णव) म्हणजे नदी, नाले, निसर्ग प्रपात व समुद्र सगळ्यांचे पावित्र्य. हे झाले, तरच ‘सर्व सुखी’ होतील याची शाश्वती आहे. तिथर्पयतच्या प्रवासातले आणि ‘ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ व ‘ह्यूमन हॅपीनेस इंडेक्स’ या दोन संकल्पनेतले अंतर समान आहे. हे मला थोडेफार उमजल्याने  मी शाम्पू, साबण पुरवून वापरतो, बनियन अगदी पार फाटेर्पयत फेकून देत नाही, थेंबभर पाणीही वाया घालवत नाही, झाडांच्या गळामिठी मारतो आणि समुद्रतळावर प्रवाळांचे रोपण करतो. 
लेखक भारतीय सेवेतील परराष्टीय अधिकारी आहेत