शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पहा वाचा ऐका

By admin | Updated: January 17, 2015 16:58 IST

एरवी कधी पाहायला न मिळणारी एखादी सुंदर फिल्म, बाजारात कुठेही विकत न मिळणारं जगाच्या काना-कोपर्‍यातलं संगीत, क

एरवी कधी पाहायला न मिळणारी एखादी सुंदर फिल्म, बाजारात कुठेही विकत न मिळणारं जगाच्या 
काना-कोपर्‍यातलं संगीत, कसलाही गाजावाजा न करता सातत्याने उत्तम लिहिणारा कुणी अनाम ब्लॉगलेखक यांच्या भेटीगाठींसाठी 
हा एक खास कोपरा
 
‘लिटल टेररिस्ट’
‘शार्ली हेब्दो’ प्रकरणाची दहशत जाणवतेय अजून, आणि आठवतातच पेपरात पाहिलेले हसरे चेहरे, पेशावरची शाळा नव्यानं सुरू झाली म्हणून पुन्हा दप्तरं पाठीला टांगून जाणारे.
कितीही नाकारला तरी ‘दहशतवाद’ होतोच असा आपल्या जगण्याचा भाग.
त्या संशयाची, दहशतीची आणि जमिनीवर रेषा मारुन तयार झालेल्या देशांची एक गोष्ट आणि या गोष्टीतली सिधीसाधी हाडामासाची माणसं. ती पहायची असतील तर ‘लिटल टेररिस्ट’ हा लघुपट जरूर पहा. फक्त १५ मिनिटांचा. भारत-पाक बॉर्डरवरचं राजस्थानातलं एक इटुकलं गाव. फौजांनी वेढलेलं. क्रिकेट खेळता खेळता चेंडू भारतीय हद्दीत पडला म्हणून ‘तिकडचा’ जमील ‘इकडे’ येतो कुंपणाची तार वर करुन. फौजी शोधतात त्याला आणि त्याचा जीव वाचावा म्हणून ‘इकडचे’ बापलेक त्याला पुन्हा घरी पाठवण्याचा प्रयत्न करतात, इतकी ही छोटी गोष्ट.अश्‍विन कुमार लिखित दिग्दर्शित हा लघुपट
http://www.filmsshort.com/
या वेबसाईटवर जाऊन शॉर्टफिल्म विभागात गेलं तर पाहता येईल.                                       - मृण्मयी सावंत
 
कलाक्षेत्रातले अस्सल ‘चिन्ह’!
इंद्रधनुष्याचे रंग, चांदणभरली रात्न, मधुबालाच्या कृष्णधवल प्रतिमा, गुरु दत्तचे सिनेमे, पिकासोच्या गेर्निकेचं कारुण्य, व्हिन्सीच्या मोनालिसाचं हास्य, अरुण कोलटकरांच्या जेजुरीतली इमेजरी, गायतोंडेंची चित्रं यापैकी कशातही रस असणारांसाठी, दृश्यकलेला वाहिलेला एक ब्लॉग- ‘चिन्ह’- 
http://chinhatheartblog.blogspot.in/
चित्न वाचायला अलगद शकवणारा. चित्नकलेविषयी चर्चा घडवणारा. असे ब्लॉग हे मायमराठीचे भाग्य. ‘चिन्ह’ हे चित्नकलेला वाहिलेले नियतकालिक. त्याच्या अंकांविषयी येथे रसरशीत नोंदी होतात. ‘नग्नता, चित्नातली आणि मनातली’ या विशेषांकावर आलेला प्रतिसाद मुळातून वाचवा असा. ‘मुक्त शब्द’च्या दिवाळी अंकाने आरांचे न्यूड मुखपृष्ठावर छापून नंतर झाकले. या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रि या एखादा विषय किती आशयघनतेने हाताळता येतो हे दाखवतात. चित्नकलेवर कुठे काही लिहिले, बोलले गेले की त्याची सजग नोंद येथे होते. मांडणी कलापूर्ण आणि भाषा नेमकी. कोणत्याही कलाक्षेत्नात अस्सल काही केले तर दाद मिळते, अशी आश्‍वासकता पेरणारे हे लेखन नव्या पिढीला मागच्यांशी जोडून उमेद देणारे आहे.                        
- प्रा. अनंत येवलेकर
 
वाद्यांशिवाय ऑर्केस्ट्रा
स्टॅनफोर्ड विद्यापीठातले प्राध्यापक गे वँग आणि त्यांचा ‘कॉम्प्युटर म्युझीक ऑर्केस्ट्रा’! प्रिय मित्र ‘गूगल’वर या महाशयांच्या नावाने (Ge Wang) शोधाशोध केली तर पहिल्याच ३-४ लिंक्स्मध्ये त्यांच्या या ऑर्केस्ट्राची लिंक दिसते. वाचकांच्या सोयीसाठी ही लिंक सोपी करूनही देत आहे (http://tinyurl.com/lbrwj2m). या वँग महाशयांनी सादर केलेल्या ‘चक’ सॉफ्टवेअरचा वापर करून कुठल्याही कॉम्प्युटरवर अनेक वाद्यांचा अंतर्भाव असलेला वाद्यवृंद निर्माण करता येतो. 
याशिवाय आवश्यकता भासेल ती ध्वनिवर्धनासाठी फक्त एका साऊंड मिक्सरची! सोबतीला काही स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेली उपकरणं वापरली तर मग काही विचारायला नको - विविध प्रकारचे साऊंड इफेक्टस् आणि सध्याच्या सांगीतिक वाद्यांवर अशक्य असलेले असंख्य नाददेखील सहज शक्य  होतात. वर दिलेल्या लिंकमध्ये या सगळ्या प्रकारांचं प्राध्यापक महोदयांनी केलेलं एक उत्तम सादरीकरण बघायला मिळतं - अवश्य बघा, कदाचित तुम्हालाही यातून काही नवीन घडवण्याची प्रेरणा मिळेल!
- राजा पुंडलिक