शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

डिझाइनची शाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:05 IST

औद्योगिकीकरणाच्या प्रकियेला सुरुवात झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलू लागल्या.  पारंपरिक हस्तकौशल्य वापरून वस्तू बनवण्याची पद्धत  आता इतिहासजमा होऊ पाहत होती आणि  त्याजागी यांत्रिक पद्धतीचा वापर करून  वस्तू विकण्याची शर्यत सुरू होणार होती. डिझाइन म्हणजे केवळ लांबून अनुभवण्याचे सौंदर्य नसून;  वस्तूची खरी ताकद आहे याची जाणीव याच काळात आधुनिक जगताला होऊ लागली.

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषिकेश खेडकर

डिझाइन आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग मानवी गरजा आणि त्यांची परिपूर्णता यांच्यापुढे जाऊन एखाद्या देशाच्या शक्तिप्रदर्शनासाठी करण्याची पहिलीच वेळ एकोणिसाव्या शतकात आली होती.औद्योगिकीकरणामुळे भारावलेल्या प्रगतीच्या वाटेवर धावताना अहंकार निर्माण झाला आणि याचा परिपाक म्हणजे अमेरिका आणि इंग्लंडमध्ये एक प्रकारची अहमहमिका रुजू लागली. अशातच 1851 साली इंग्लंडने आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेल्या भव्य-दिव्य प्रदर्शनाचे आयोजन केले. लौकिकास साजेसे असे हाइड पार्क, लंडन येथे भरवल्या गेलेल्या प्रदर्शनाचे नाव ‘द ग्रेट एक्झिबिशन’ (महान प्रदर्शनी) असे ठेवण्यात आले. जोसेफ पॅक्सटन नामक वास्तुरचनाकाराने स्टील आणि काच या दोन साहित्यांचा अफलातून मिलाफ साधून अत्यंत विलोभनीय वास्तूची रचना या प्रदर्शनासाठी केली. खुद्द राणी व्हिक्टोरिया मे 1851 मध्ये या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पोहोचली. जगभरातून आलेल्या देशांनी आपापल्या वस्तूंचे प्रदर्शन या क्रि स्टल पॅलेसमध्ये मांडले. सिंगरचे शिलाई यंत्र, मिल्टनची कपबशी, एल व्हिटनीची बंदूक इतकंच काय तर भारतात बनवला गेलेला हातमागावरचा कपडादेखील या प्रदर्शनात संपूर्ण जगासमोर मांडण्यात आला. वस्तू कोणतीही असो; पण एक गोष्ट ठळकरीत्या जाणवत होती ती म्हणजे बहुतांश गोष्टींच्या जडणघडणीत औद्योगिकीकरणाचा खूप मोठा वाटा होता. काळ आता सर्वार्थाने बदलू पाहत होता !पारंपरिक हस्तकौशल्य वापरून वस्तू बनवण्याची पद्धत आता इतिहासजमा होऊ पाहत होती आणि त्याजागी यांत्रिक पद्धतीचा वापर करून जागतिक बाजारपेठेत वस्तू विकण्याची शर्यत सुरू होणार होती. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लाकडाची खुर्ची.  1830 सालापासून लाकडातून खुर्ची बनवण्याच्या व्यवसायात असणार्‍या मायकल थॉनेट या र्जमन सुताराने आपल्या पाच मुलांसह 1849 साली एका नवीन कंपनीची स्थापना केली. वाफवलेल्या लाकडी दांड्या वेगवेगळ्या लांबीत कापून त्यांना विशिष्ट प्रकारची गोलाई देऊन आणि चिकटवून खुर्ची बनवण्याची पद्धत या कंपनीत पहिल्यांदा चालू झाली. वजनाला अत्यंत हलकी, टिकाऊ, मजबूत आणि आकर्षक खुर्ची बनवण्याचा मंत्र मायकल थॉनेटने संपूर्ण जगाला दिला. 1859 सालापर्यंत युरोपातील बहुतेक कॉफी शॉपमध्ये या खुच्र्या दिसू लागल्या आणि बघता बघता पुढच्या 80 वर्षात पन्नास दशलक्ष खुच्र्या या कंपनीने संपूर्ण जगभरात विकल्या. आजही थॉनेट चेअर नावाने प्रसिद्ध असलेली ही खुर्ची आपण वापरतो.उत्पादन प्रक्रि येपासून विभक्त होत जाणारी कला परत आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यात आले. कारखानदारांना कलाकाराच्या      कलेच्या व्यावसायिक मूल्याचे भयंकर आकर्षण वाटू लागले आणि एका वेगळ्याच कारखानदारी कलेचा (इंडस्ट्रियल आर्ट) जन्म झाला. घरातील पुरु ष व्यक्ती कारखान्यात कामावर असल्याने कुटुंबातील स्रियांना औद्योगिकीकरणाच्या प्रवाहात सामावून घेत या कारखानदारी कलेचे प्रशिक्षण देण्यात आले. 1848 साली अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे खास           महिलांसाठी या औद्योगिक कलेचे प्रशिक्षण देणारे कॉलेज उघडण्यात आले. डिझाइनच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हणता येईल असा कला आणि यांत्रिक    उत्पादन यांची एकत्रित जाण असणारा, इंडस्ट्रियल डिझाइनर म्हणून ओळखला जाणारा, ख्रिस्तोफर ड्रेसर  नावाचा स्कॉटिश व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आला. थेट उत्पादकाबरोबर काम करून उपयोगी आणि आकर्षक वस्तू बनवण्याची त्याची पद्धत खरोखर लौकिकास पात्र ठरते. 1879 साली धातूच्या पत्र्याला यांत्रिक पद्धतीने विशिष्ट भौमितिक आकार देऊन बनवलेला टी-पॉट आजही डिझाइनच्या इतिहासात मैलाचा दगड मानला जातो. कच्चा माल, यंत्राची क्षमता आणि सौंदर्यदृष्टी यांची एकत्रित जाण असणार्‍या ख्रिस्तोफरने डिझाइनच्या खेळाचे नियमच बदलून टाकले. आत्तापर्यंत वस्तूचे बाह्यरूप बदलण्यासाठी वापरले जाणारे हे डिझाइन आता वस्तूच्या निर्मितीप्रक्रियेत सामावले जाऊन मोठय़ा प्रमाणात उत्पादन केल्या जाणार्‍या प्रत्येक वस्तूचा एक अविभाज्य अंग बनले. डिझाइन म्हणजे केवळ लांबून अनुभवण्याचे सौंदर्य नसून; उत्तम डिझाइन हे परिणामी वस्तूची खरी ताकद आहे याची जाणीव आता आधुनिक जगताला होऊ लागली होती. डिझाइनची ही ताकद समजून घेऊन आधुनिक जगाच्या निर्मितीप्रक्रि येत ती परिणामकारकतेने वापरणारा डिझाइनर मात्र अजून जन्माला यायचा होता. या परिस्थितीत विसाव्या शतकातला सूर्य उगवला तो जागतिक महायुद्धाचे ढग घेऊन. 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले आणि पुढे चार वर्षात संपूर्ण जगाला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागले. या महायुद्धात र्जमनीच्या बाजूने लढलेल्या पीटर बेहरन्स नावाच्या र्जमन वास्तुरचनाकाराने युद्ध स्थिती स्वत: अनुभवली होती. युद्धोत्तर राष्ट्रनिर्माण प्रक्रि येत मोलाचा हातभार  लावण्याच्या उद्देशाने सन 1919 साली पीटर बेहरन्सने र्जमनीतील वैमार या शहरात जगातल्या पहिल्या डिझाइन कॉलेजची स्थापना केली. त्याला बौहोस (स्कूल ऑफ बिल्डिंग, म्हणजेच निर्माण प्रक्रियेतील शाळा) असे म्हणतात. जगातल्या पहिल्या डिझाइन कॉलेजमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा कला, ललित कला, सौंदर्यशास्र आणि उत्पादन प्रक्रि या यांची एकत्रित जाण असणारा डिझायनर म्हणून राष्ट्रनिर्माण प्रक्रि येत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पीटर बेहरन्सला होता. ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालत जगातल्या विविध महारथींनी एकत्र येऊन बनवलेला डिझाइनचा अभ्यासक्र म आजही शतकानंतर सयुक्तिक वाटतो. यात विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे बौहोसमधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गोष्टींचे पहिले विदेशी प्रदर्शन रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन येथे भरवले. काळाच्या पुढे विचार करणारी अशी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वं जगातल्या पहिल्या डिझाइन कॉलेजमुळे जोडली गेली. सन 1919 ते 1933 या पंधरा वर्षांच्या काळात प्रतिकूल राजकीय परिस्थितीत दोन वेळा बंद पडूनदेखील आधुनिक डिझाइनच्या जगतावर बौहोसचा ठसा अबाधित राहिला. इथे आपली डिझाइनची गोष्ट एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन थांबली आहे. यानंतरच्या काळात म्हणजे गेल्या शंभर वर्षांत डिझाइनच्या क्षेत्रात झालेली प्रगती अचाट आहे. औद्योगिकीकरण आणि बौहोस या दोन गोष्टींनी डिझाइनवर आधारित जीवनशैलीची मुहूर्तमेढ कशी रोवली ही गोष्ट नंतर बघूयात.

(क्र मश:)hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)