शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विद्वत्तेचा मानदंड

By admin | Updated: September 6, 2014 15:16 IST

प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ज्ञानसंपन्नतेची खरी ओळख म्हणजे नालंदा आणि तक्षशीला ही विद्यापीठे! नालंदा विद्यापीठ तेराव्या शतकाच्या प्रारंभी विनाश पावले. उरले ते फक्त भग्नावशेष! पण, इतिहासाने पुन्हा एकदा कूस बदलली. जुन्या अवशेषांच्या साक्षीने ८00 वर्षांनंतर नव्या रूपात नालंदा विद्यापीठ सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पूर्वीचे नालंदा विद्यापीठ होते तरी कसे? त्या सुवर्णक्षणांना दिलेला हा उजाळा.

 डॉ. वसंत शिंदे , श्रीकांत गणवीर

 
प्राचीन भारताच्या इतिहासात नालंदा विद्यापीठाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्यापीठ म्हणून नावाजलेले ‘नालंदा विद्यापीठ’ वैश्‍विक इतिहासातील अद्वितीय असा सांस्कृतिक वारसा आहे. प्राचीन भारतीय इतिहासाकडे  दृष्टिक्षेप टाकल्यावर कला-साहित्य-संस्कृती-शिक्षण-विज्ञान या क्षेत्रांतील भारताच्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेतल्याशिवाय जागतिक इतिहासाचा अध्याय पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षण-संशोधन क्षेत्रात तक्षशीला, नालंदा, वलभी, विक्रमशीला, ओदंतपुरी अशा अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक  केंद्रांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. ‘नालंदा महाविहार’ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राचीन विद्यापीठ होते तरी कसे? 
इ.स. पाचवे शतक ते इ. स. तेराव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत सुमारे ८00 वर्षे अव्याहतपणे ज्ञानदान करणार्‍या या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे अवशेष कालौघात भूमीच्या उदरात गडप झाले. एकोणविसाव्या शतकाच्या प्रारंभिक वर्षांत ब्रिटिश अभ्यासक बुचनन यांनी बिहार राज्यातील राजगृहाच्या उत्तरेस सुमारे ११ कि.मी. अंतरावरील बरगाव (वडगाव) या खेड्याजवळील प्राचीन भग्नावशेषांची सर्वप्रथम नोंद केली. त्यानंतर ख्यातनाम पुरातत्त्वज्ञ जनरल अलेक्झाँडर कनिंघम यांनी चिनी यात्रेकरूंच्या प्रवासवर्णनांच्या आधारे बरगाव येथील भग्न पुरावशेषांचे नाते प्राचीन नालंदा विद्यापीठासोबत असल्याचे सांगितले. त्यापुढील महत्त्वाचा टप्पा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारे 
 
इ. स.१९१५-१६ ते 
इ. स.१९३५-३६ अशी तब्बल २0 वर्षे बरगावच्या पुरावशेषांचे विस्तृत प्रमाणावरील उत्खनन होय. या ऐतिहासिक उत्खननात भव्य अशा स्तूप व महाविहार यांच्या अवशेषांसोबत लहान विहार, व्रतानुष्ठिक स्तूप, ताम्रपट, बुद्ध-बोधिसत्त्व यांची पाषाण व धातू शिल्पसंपदा असा अमोल ठेवा प्राप्त झाला. बरगावचे प्राचीन पुरावशेष हे प्राचीन नालंदा विद्यापीठाचेच अवशेष असल्याचा सर्वांत महत्त्वाचा पुरावा, नालंदा विद्यापीठाची कार्यालयीन मुद्रा, ज्यावर ‘श्री नालंदा-महा-विहारीयार्य-भिक्षू-संघस्य’ असा लघुलेख लिहिलेला आहे, प्राप्त झाला. प्राचीन स्थळाची ओळख सिद्ध होण्यासाठी वाड्मयीन पुराव्यासोबत पुरातत्त्वीय पुरावा-अभिलेखीय पुरावा प्राप्त होणे महत्त्वाचे असते. 
इ. स. पाचव्या शतकाच्या सुमारास नालंदा येथे विहाराची स्थापना तत्कालीन गुप्तवंशीय राजा कुमारगुप्त प्रथम याच्या काळात झाली, असा इतिहासकारांचा कयास आहे. चिनी यात्रेकरू ह्युएन त्संग याने, श्री शक्रादित्य राजाने नालंदा येथे विहाराची सर्वप्रथम स्थापना केल्याचा उल्लेख केला आहे. अन्य चिनी यात्रेकरू इत्सिंगच्या प्रवासवर्णनातून याला दुजोरा प्राप्त होतो. शक्रादित्य राजाची ओळख कुमारगुप्त प्रथमसोबत केली गेली आहे. त्यानंतर बुधगुप्त, तथागत गुप्त, बालादित्य अशा अनेक गुप्त राजांनी नालंदाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले दिसून येते. नालंदा विद्यापीठाचा खर्‍या अर्थाने उत्कर्ष इ. स. सातव्या शतकादरम्यान हर्षवर्धन राजाच्या कालखंडात झालेला दिसून येतो, तर परमोत्कर्ष पाल राजवंशाच्या धर्मपाल-देवपाल या राजांच्या कालखंडात! 
इ. स. सातव्या शतकात नालंदा विद्यापीठात ज्ञानार्जन केलेले चिनी यात्रेकरू ह्युएन त्संग आणि इत्सिंग यांच्या प्रवासवर्णनातून नालंदा विद्यापीठाच्या इतिहासावर महत्त्वपूर्ण प्रकाश पडतो. महायान बौद्ध संप्रदायाच्या अध्ययनाचे प्रमुख केंद्र असलेल्या नालंदा विद्यापीठात अनेक विषयांचे, धर्मपरंपरेचे आणि तत्त्वज्ञानाचे अध्ययनसुद्धा केले जात असे. नालंदा विद्यापीठाच्या गुणवत्तेची आणि शिक्षणप्रणालीची कीर्ती केवळ भारतात नव्हे, तर आशिया खंडात सर्वदूर पसरल्यामुळे देश-विदेशातून या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा असायची. नालंदा विद्यापीठात प्रवेश मात्र गुणवत्तेच्या व ज्ञानाच्या आधारावरच होत असे. श्रीलंका, चीन, जपान, तिबेट, कोरिया अशा अनेक राष्ट्रांतून नालंदा विद्यापीठात विद्यार्थी उच्च ज्ञान संपादन करण्यासाठी येत असत. नालंदा विद्यापीठात प्रवेश प्राप्त होणे अवघड होते. इच्छुक विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊनच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. प्रवेश परीक्षा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारांवर विद्वान आचार्यांकडून घेतली जात असे. या प्रवेश परीक्षेत मग विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कसोटी कशी लागणार नाही! प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांमागे दोन-तीन विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणे शक्य होत असे. चिनी प्रवासी ह्युएन त्संगच्या मते, प्रवेशप्राप्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांंना हीनयान-महायान बौद्ध धर्मग्रंथांसोबत वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान आदींत प्रावीण्य प्राप्त असणे आवश्यक होते. नालंदा हे प्रामुख्याने महायान बौद्ध संप्रदायाचे अध्ययन केंद्र असले, तरी या विद्यापीठात महायान बौद्ध संप्रदायासमवेत अन्य विविध विषयांचे अध्ययन केले जात होते. या विषयात धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, कला यांच्याशी निगडित विषयांचा समावेश होता. ‘ली’ या चिनी अभ्यासकाने वेद, हेतुविद्या (प्रमाणशास्त्र), शब्दविद्या (व्याकरण व तत्त्वज्ञान), चिकित्साविद्या (आयुर्वेद), शिल्पस्थान विद्या (कला) या विषयांच्या अध्ययनाचा विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे.  ह्युएन त्संग याने एकूण १0 हजार शिक्षक व विद्यार्थी यांचा उल्लेख केला, ज्यांत १,५६0 शिक्षकांचा समावेश आहे. सुमारे ८,५00 विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सुमारे १,५00 अध्यापक नालंदा विद्यापीठात कार्यरत होते. याचा अर्थ, सरासरी ६ विद्यार्थ्यांंमागे एक शिक्षक, असा होतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्या संख्याप्रमाणावरून नालंदा येथील शिक्षणप्रणालीची महत्ता समजू शकते. व्याख्यान पद्धतीप्रमाणे शिक्षणाचे नियोजन असले, तरी व्याख्यानादरम्यान आचार्य-विद्यार्थी यांच्यात अनेक प्रश्नांवर गहन चर्चा होत असे. विद्यार्थ्यांंचे शंकानिरसन केले जाणे नालंदा विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. शिक्षण-संशोधनाची गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी कडक शिस्तीचे पालन अत्यावश्यक होते. शिक्षण-अध्ययनप्रक्रियेत नियमांचे उल्लंघन वा नियमांची हेळसांड मान्य केली जात नव्हती. विद्वान शिक्षक आणि ज्ञानार्जनासाठी सर्मपित विद्यार्थी यांचे उत्कृष्ट उदाहरण नालंदा विद्यापीठाने जगापुढे ठेवले होते. ह्युएन त्संगने यथार्थपणे नालंदा विद्यापीठातून ज्ञानसंपादन केलेल्या विद्यार्थ्यांंबाबत म्हटले आहे, की नालंदा विद्यापीठातील विद्यार्थ्याला त्याच्या ज्ञानासाठी सर्वत्र मानसन्मान प्राप्त होत होता. 
ग्रंथालय हे विद्यापीठाचे भूषण असते. नालंदा विद्यापीठातील ग्रंथालये ही तत्कालीन भारतात आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त होती. ‘धर्मगंज’ क्षेत्रात तीन इमारतींत अथांग ग्रंथसंग्रह संरक्षित केला गेला होता. यांपैकी एक इमारत नऊ मजली व अन्य दोन सहा मजली होत्या. या भव्य इमारतींवरूनच नालंदाच्या ग्रंथसंग्रहाची कल्पना केली जाऊ शकते. रत्नसागर, रत्नोदधी व रत्नरंजक ही या तीन ग्रंथालयांची नावे! भारताच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यति’ अशी ही भव्य ग्रंथालये! 
नालंदा विद्यापीठ हे निवासी शैक्षणिक केंद्र होते, ज्यात विद्यार्थ्यांंना गुणवत्तेच्या आधारावरच मोफत शिक्षण दिले जात असे. या विद्यापीठाच्या दैनंदिन खर्चासाठी २00 गावांचे महसूल उत्पन्न राजांनी विद्यापीठाला दिले असल्याचा महत्त्वपूर्ण उल्लेख चिनी प्रवासी इत्सिंग याने केला आहे. राजाश्रयाशिवाय एवढय़ा भव्य प्रमाणात विद्यापीठाचा खर्च कसा चालणार? प्रत्येक विद्यार्थ्याला राहण्यासाठी व्यक्तिगत अशी निवासव्यवस्था केलेली होती. नालंदा विद्यापीठाच्या महाविहारांचे भग्नावशेष पाहिल्यावर तत्कालीन नालंदाची उत्तुंगता ज्ञात झाल्याशिवाय राहत नाही. महाविहारांच्या पुरावशेषांवरून तत्कालीन विद्यापीठाची स्थापत्य रचना, पर्यावरणाशी समतोल राखत केलेली आखणी, अध्ययन-संशोधनासाठी पूरक अशी वातावरणनिर्मिती यांची कल्पना येते. विविध संप्रदाय-मतांच्या विद्यार्थ्यांंमध्ये स्थापित केलेला सलोखा, हे नालंदा विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक होय. 
ज्ञानाच्या क्षेत्रात नालंदा विद्यापीठाने जागतिक इतिहासात प्राप्त केलेले सर्वोच्च स्थान हा भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण होय. शेकडो वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानकेंद्र म्हणून सर्वोच्च स्थान टिकवून ठेवलेले नालंदा विद्यापीठ इ.स. तेराव्या शतकाच्या प्रारंभी विनाश पावले आणि भारतीय इतिहासातील एक देदीप्यमान तारा निखळून पडला! 
(लेखक डेक्कन कॉलेज, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक आहेत)