शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

‘आफ्ताब-ए-सितार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:05 IST

मुंबईत एक कार्यक्रम होणार होता.  मीही गेलो होतो. ग्रीनरूममध्ये उस्ताद विलायत खाँसाहेब बसलेले होते. फोटो काढण्यासाठी  मी पुण्याहून आलो असल्याचे त्यांना सांगितले.  ‘तो फिर ले लो.’, असं हसत म्हणून  समोर ठेवलेली सतार त्यांनी उचलली. छेडायला सुरु वात केली. मी कार्यक्र मात त्यांचे फोटो घेणार होतो; पण इथं तर साक्षात ‘गाणारी सतार’ समोर! ते स्वरानंदात विहार करीत होते. तो क्षण माझ्या कॅमेर्‍यानं तत्काळ बंदिस्त केला.

ठळक मुद्देउस्ताद विलायत खाँ यांचा दि. 28 ऑगस्ट रोजी जन्मदिवस. त्यानिमित्त..

- सतीश पाकणीकर 

मुंबईच्या फोर्ट भागातील रंगभवन या सभागृहात मुंगीलाही शिरता येणार नाही इतकी गर्दी झाली होती. पडदा वर जायला अजून पंधरा-वीस मिनिटे बाकी होती. रसिक आपापल्या जागेवर शांत बसून होते. तिकीटविक्र ीची खिडकी केव्हाच बंद करण्यात आली होती. असा कोणता कार्यक्र म होता की एव्हढी गर्दी व्हावी? कारणही तसंच होतं - सुरेल स्वरांइतकंच, जीवनकलेसही मानणार्‍या माई म्हणजेच र्शीमती मोगूबाई कुर्डीकर या गानतपस्विनीच्या जीवनावर लिहिलेल्या चरित्नाचं प्रकाशन. हे प्रकाशन होणार होतं ‘आफ्ताब-ए-सितार’ उस्ताद विलायत खाँ यांच्या हस्ते. दुधात साखर म्हणजे प्रकाशनानंतर खाँसाहेबांचं सतारवादन होणार होतं. तो दिवस होता 29 मार्च 1986. मी, भाऊ हेमंत व मित्न संदीप होले तिघेही वेळेच्या आधी पोहोचलो होतो. त्याआधी मी 1983च्या सवाई  गंधर्वमहोत्सवात खाँसाहेबांची प्रकाशचित्ने टिपली होती. त्यावेळी आम्ही त्यांना पूना क्लबवर जाऊन भेटलोही होतो. पण आजचा कार्यक्र म खास असा होता.कॅमेरा गळ्यात असल्याने आम्हाला कलावंतांच्या ग्रीनरूममध्ये सहजच प्रवेश मिळाला. समोरच खाँसाहेब व त्यांचे साथीदार बसले होते. मउसुत, कमी आवाजात व आदब राखत बोलणार्‍या खाँसाहेबांचं बोलणं ऐकणं हीपण एक पर्वणी होती. मी त्यांना नमस्कार केला व पुण्याहून फोटो काढण्यासाठी आलोय हे सांगितले. ‘तो फिर ले लो फोटो’, असं हसत म्हणून त्यांनी समोर ठेवलेली सतार उचलून ती छेडायला सुरु वात केली. मी कार्यक्र मात फोटो घेणार होतो. पण इथं तर साक्षात ‘गाणारी सतार’ समोर होती. मी पटकन कॅमेरा सरसावला. उपलब्ध प्रकाशाचा अंदाज घेत मी कॅमेरा सेटिंग्ज ठरवली. सतारीचे ट्युनिंग करतानाची एक मस्त भावमुद्रा कॅमेराबद्ध झाली. पुढच्याच मिनिटाला खाँसाहेबांच्या त्या गाणार्‍या सतारीतून अलगदपणे स्वरांच्या लडी त्या खोलीभर पसरल्या. कुठे घाई नाही की कोणता आवेश नाही. ते स्वरांचा आनंद स्वत: घेत होते आणि इतरांना देतही होते. माझ्या कॅमेर्‍याला किती क्लिक करू असे झाले होते. त्यांचा त्या स्वरानंदात विहार सुरू असताना त्याचं प्रतिबिंब त्यांच्या चेहर्‍यावर एका प्रसन्न हास्याद्वारे उमटलं .. तो निर्णायक क्षण माझ्या कॅमेर्‍यानं तत्काळ बंदिस्त केला. मायक्र ोफोनचा अडथळा फोटोसाठीही नव्हता अन् ऐकण्यामध्येही नव्हता. होते ते निखळ स्वर अन् त्यात बुडून गेलेले खाँसाहेब.थोड्याच वेळात शुभ्र सुती नऊवारी साडी नेसलेल्या प्रसन्न चेहर्‍याच्या मोगूबाई, त्यांच्या सोबतच किशोरीताई, उस्ताद विलायत खाँ व लेखिका कल्याणी इनामदार हे सर्व स्वरमंचावर आले. प्रकाशनाचा कार्यक्र म आटोपशीरपणे पार पडला. आणि काही मिनिटातच खाँसाहेबांच्या वादनाला सुरुवात झाली. आता सतारीच्या त्या स्वरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. दर्दी रसिकांची वाहवा त्या स्वरांच्या पाठोपाठ वातावरण अजूनच सुरेल करीत होती. खाँसाहेबांच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते. मध्येच अचानक सतारवादन थांबवत समोर र्शोत्यांत बसलेल्या मोगूबाईंकडे निर्देश करत ते म्हणाले, ‘‘ये तो मोगूबाई माँ का हुक्म था इसलिये बजा रहा हुँ, वरना ऐसी फजूल बातोमें नहीं आता मैं. रियाज करता हुँ तो आनंद करता हुँ.’’ त्यांच्या या बोलण्यावर प्रेक्षक चकित. पण त्यांचं ते आनंद घेणं ग्रीनरूममध्ये आम्ही नुकतंच अनुभवलं होतं. स्वनिर्मित असा ‘सांज सरावली’ हा राग त्यांनी निवडला होता. मग परत सतारवादन सुरू करत त्यांनी त्यातीलच एक गत वाजवायला सुरुवात केली. काही काळ वाजवल्यावर त्याबरोबरीने चीज गायला सुरुवात केली. ‘‘झान्जरवा..’’ परत थांबले व अत्यंत नाट्यपूर्ण रितीने  म्हणाले, ‘‘चीज से गत कैसे होती है यह मैं गाकर सुनाता हुँ. कुछ लोग ऐसे है, जो एतिराज करते है. क्यूँ के उनको गाना नहीं आता. हाँ, गवय्ये एतिराज नहीं करते. मैं गाता हुँ, तो गवय्ये एतिराज नहीं करते.’’ त्यांच्या या वाक्यावर र्शोत्यांमध्ये एक हास्याची लकेर उमटून गेली. आधीच्याच तन्मयतेनं खाँसाहेबांचं वादन परत सुरू. या वादनात डाव्या हाताच्या करंगळीने तरफेच्या तारांवर नाजूक आघात तर उजव्या हातातील नखीने चिकारीच्या तारांवर लयकारीचे अद्भुत असे काम ते लीलया करत होते. पुढे दीड तास र्शोत्यांना पर्वणीच होती. मला त्या कार्यक्र मात त्यांच्या अनेक भावमुद्रा टिपता आल्या ही माझी दुहेरी पर्वणी. खरं तर खाँसाहेबांना त्यांनी रचलेल्या बंदिशी व चीजा या गायकांनी शिकून घ्याव्यात असे फार वाटे. नंतर काही वर्षांनी आजचे आघाडीचे व प्रतिभावंत गायक पं. उल्हासजी कशाळकर यांनी एका मुलाखतीत खाँसाहेबांकडून हा राग शिकल्याचे व नंतर तो त्यांच्या उपस्थितीत सादर केल्याची आठवण सांगितली आहे. त्यांना खाँसाहेबांकडून भरघोस दादही मिळाली होती.पुढे बर्‍याच वर्षांनी म्हणजे ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाच्या 50व्या वर्षी, डिसेंबर 2002 मध्ये मी 2003 सालासाठी एक कॅलेंडर प्रसिद्ध करण्याचे ठरवले. माझ्या थीम कॅलेंडर्सची ती सुरुवात. कॅलेंडरमधील सर्व कलाकारांना त्यांचे मी वापरणार असलेले फोटो व त्यासाठी परवानगी देण्याचे पत्न पाठवून दिले. माझ्या अपेक्षेपेक्षा वेगाने सर्वांच्या परवानगीची पत्नेही आली आणि शुभेच्छा व आशीर्वादही. त्यातच शुभेच्छा होत्या उस्ताद विलायत खाँसाहेबांच्या. रंगभवनच्या ग्रीनरूममधील त्यांची ती सतारवादनाचा आनंद घेतानाची भावमुद्रा त्यांना फारच आवडली होती.26 डिसेंबर 2002. पन्नासाव्या सवाई गंधर्व महोत्सवाचा पहिलाच दिवस. पं. भीमसेन जोशी व डॉ. एस. व्ही. गोखले यांच्या हस्ते आठ ते दहा हजार रसिकांपुढे सवाई स्वरमंचावरून ‘म्युझिकॅलेंडर 2003’चे थाटात प्रकाशन झाले. त्यावर रसिकांच्या मान्यतेची मोहोर उठली. कॅलेंडरमध्ये समाविष्ट असलेले बरेच कलाकार त्यावर्षी आपली कला त्या मंचावरून सादर करणार होते. अर्थात त्यात उस्ताद विलायत खाँसाहेबही होते.खाँसाहेब हॉटेल ब्लू डायमंड येथे मुक्कामाला होते. 27 डिसेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास मी त्यांच्यासाठी कॅलेंडरच्या काही कॉपीज घेऊन तेथे पोहोचलो. त्यांना भेटायला व त्यांची मुलाखत घ्यायला काही पत्नकारही आले होते. खाँसाहेब लाउंजमधल्या सोफ्यावर अत्यंत आरामात बसून प्रसन्नपणे प्रश्नांची उत्तरे देत होते. आमचा एक मित्न आणि खाँसाहेबांचा शिष्य संदीप आपटे त्यांना हवं - नको बघत होता. गर्दी जरा कमी झाल्यावर मी पुढे झालो. गिफ्टपॅक केलेली ती कॅलेंडर्स त्यांच्यापुढे धरली. त्यांनी विचारले, ‘‘क्या लाये हो इसमें?’’ मी त्यांना कॅलेंडर्स आहेत आणि कालच त्याचं प्रकाशन झाल्याचं सांगितलं. त्यांना मी पाठवलेल्या फोटोची व पत्नाची आठवण झाली. त्यांनी परत एकदा त्यांच्या त्या फोटोची प्रशंसा केली. त्यांचा मूड छान होता. मला माझ्या कॉपीवर त्यांची स्वाक्षरी हवी आहे अशी विनंती मी केली. कॅलेंडरचे एक एक पान उलगडत ते समोर येणार्‍या प्रत्येक प्रकाशचित्नास मनमोकळी दाद देत होते. सर्व बघून झाल्यावर मी मार्कर पेन त्यांच्या पुढय़ात धरले. एकदम त्यांच्या मनात काय विचार आले न कळे पण ते म्हणाले, ‘‘ऐसा करते हैं. कल सुबह हम भीमसेन भाई के घर आनेवाले है. आप वहाँ आ जाईये. उनको भी दिखायेंगे.’’ मला याचा काहीच बोध होईना. पण माझा इलाजही नव्हता. मी ‘‘ठीक है.’’ एव्हढेच म्हणू शकलो. मग मी संदीपकडे त्यांच्या कार्यक्र माची विचारणा केली. ते दुसर्‍या दिवशी सकाळी 11 वाजता ‘कलार्शी’ या भीमसेनजींच्या घरी येणार होते. मग तेथे भेटण्याचे ठरले.दुसर्‍या दिवशी सकाळी पावणेअकरा वाजताच मी ‘कलार्शी’च्या बाहेर जाऊन थांबलो. अपेक्षेप्रमाणे 11 च्या सुमारास खाँसाहेब व त्यांच्याबरोबर इतरही काही पाहुणे गाडीतून उतरले. त्यांच्या पाठोपाठ मी व माझा सहायक जितेंद्र आत गेलो. दिवाणखान्यात समोरच नेहमीच्या खुर्चीवर भीमसेनजी बसले होते. त्यांच्या खास आवाजात त्यांनी खाँसाहेबांचे व सर्वांचे स्वागत केले. दोघांची गळाभेट झाली. दोघांनाही एकमेकांबद्दल किती आदर वाटतो हे त्यांच्या वागण्यावरून लक्षात येत होते. मग घरच्या सगळ्यांची चौकशी झाली. बाकीचे आम्ही सगळे कार्पेटवर बसलो होतो. मग मिठाईचे तबक फिरले, चहापान झाले. खूपच दिवसांनी असे निवांत भेटल्याने त्या दोन दिग्गजांच्या गप्पा रंगल्या होत्या. काही वेळ गेला. मी आणलेले कॅलेंडरचे पाकीट समोर घेतले. खाँसाहेबांनी माझ्याकडे पाहिले व नंतर भीमसेनजींना म्हणाले, ‘‘इन्होने एक बढिया कॅलेंडर बनाया है. कल आए थे मेरा ऑटोग्राफ लेने. मैंने इनको कहा आपके घर आने के लिये.’’ त्यांच्या या वाक्यावर भीमसेनजी म्हणाले, ‘‘अरे, ये तो हमारे घरके ही है.’’ अण्णांच्या या वाक्याने मला काय वाटले असेल हे वर्णनातीत आहे. खाँसाहेबांच्या नजरेतही कौतुकाचे भाव दाटले. मग त्या कॅलेंडरवर प्रथम भीमसेनजींनी सही केली. त्यानंतर खाँसाहेबांनी त्यांची सही केली. त्यांच्या दोघांच्या त्या सह्यांमुळे माझ्या त्या कॉपीची किंमत अनमोल झाली.त्या दिवशी रात्नी खाँसाहेबांचे सवाई गंधर्वमहोत्सवात बहारदार वादन झाले. परत एकदा माझ्या संग्रहात त्यांच्या तल्लीन भावमुद्रा जमा झाल्या. त्यांच्या प्रत्येक मैफलीत हा अनुभव येतच गेला. त्या काळात त्यांची प्रत्येक रेकॉर्ड अनेकवेळा ऐकली. त्यातील माझी सर्वात आवडती रेकॉर्ड म्हणजे सतार-सुरबहार वादनाची (विलायत खाँसाहेब व इमरत खाँसाहेब) ‘चांदनी केदार’ या रागाची ‘अ नाइट अँट ताज’ या शीर्षकाची एक रेकॉर्ड. दोन आत्मे एकमेकांशी संवाद साधत आहेत या ‘थीम’वर केलेले ते अप्रतिम वादन. स्रीच्या आवाजासाठी सतारीची योजना तर पुरुषाच्या आवाजासाठी सुरबहार. केवळ अवर्णनीय !रेकॉर्डचा, नंतर कॅसेट्सचा, नंतर सीडी व डीव्हीडीजचा व पेन ड्राइव्हचा जमाना मागे पडून आज संगीत ऑनलाइन ऐकण्याचा जमाना आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेले ‘इकोडॉट’ सारखे उत्पादन वापरून ‘‘अँलेक्सा, राग चांदनी केदार बाय विलायत खाँ’’ असे म्हटले की, पुढच्या क्षणी आपल्याला ते अद्वितीय संगीत ऐकू येण्यास सुरु वात होते. तंत्नज्ञानातला हा फरक जरी प्रचंड असला तरी माझ्या आस्वादनात मात्न तसूभरही उणेपणा आलेला नाही. मी डोळे मिटून घेतो. मग मी अलगद टिपूर चांदण्यात न्हालेल्या ‘ताजमहाला’च्या एका चौथर्‍यावर बसलेला असतो. मिटलेल्या माझ्या डोळ्यांसमोर त्या चांदण्या रात्नीही ‘आफ्ताब-ए-सितार’ म्हणजेच सतारीच्या सूर्याची- विलायत खाँसाहेबांची ती तल्लीन मुद्रा अवतरते. सुरबहार-सतारचे स्वर ऐकू येऊ लागतात. जणू त्या चौथर्‍यावर बसून ‘शहाजहान-मुमताज’ यांच्यातील प्रेमालापाचा आविष्कार ऐकणारा मी एक मूक साक्षीच !(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)sapaknikar@gmail.com