शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
3
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
4
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
5
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
6
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
7
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
8
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
9
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
10
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
11
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
12
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
13
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
14
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
15
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
16
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
17
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
18
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
19
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
20
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

साडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 06:05 IST

काहीच दिवसांचं अंतर. साडी देणारी गेली,  साडी घेणारी गेली, साडी मात्र आहे.

ठळक मुद्देमनाला चटका लावणारा एक अनुभव..

- विनायक पाटील

डॉ. मीना, डॉ. मनोहर आणि डॉ. मनीष ही बापये मंडळी माझे मित्र. त्यांची नाशिकजवळ अंजनेरी डोंगराच्या पायथ्याशी दोन एकर जमीन.जमीन उजाड ठेवण्याऐवजी शेती करावी असे त्यांच्या मनात आले. सगळे भेटायला आले आणि काय शेती करावी, असा सल्ला विचारती झाली. मी म्हणालो, ‘‘शेती आमदनी म्हणून करणार आहात की छंद म्हणून’’ ते उत्तरले, ‘‘झाडेझुडपे असावीत एवढेच! फायद्याची अपेक्षा नाही. शिवाय पाणी भरपूर आहे. शेताला संरक्षक कुंपण आहे. पीक सुचवा.’’ मी विचारले, ‘‘माझ्या मनातील या परिस्थितीत येणारे, उत्पन्न देणारे पीक सांगू की, आपल्याशी चर्चा करून पीक ठरवू?’’ ते म्हणाले, तुम्हीच ठरवा. मी उत्तरलो, दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली करवंदाची एक प्रजाती आहे. तिचे नाव ‘कोकण बोल्ड’. टप्पोरी मधुर करवंदे. उत्पन्नही बरे आहे. दर्जेदार करवंदे दुर्मीळ आहेत. डोंगरी शेतीत एक चांगला पर्याय आहे. करवंदाची शेती करायचे ठरले. कृषी विद्यापीठाकडे रोपांची मागणी केली. रोपे मिळाली. लागवड करण्यापूर्वी शेतावर कायमस्वरूपी काम करणारा जाणकार मजूर मिळविला. त्याचे नाव विजय शिगाडे. जातीने महादेव कोळी. बायकोचे नाव यमुना. सहा अपत्ये. चार मुली, दोन मुलगे. त्यांचा पगार बापये करतात. पगारपत्रकावर मी सही केल्यानंतर पगार मिळतो. दर महिन्याचा हा क्रम. पगार मासिक. एकदा पगारपत्रकासोबत मी केलेल्या खर्चाचेही बिल डॉ. बापयेंकडे पाठविले. रुपये सात हजार दोनशे. त्याला सांगितले तुझा पगार तुला ठेव, माझे पैसे सवडीने पुढील महिन्याच्या पगारपत्रकावर सही घेण्यासाठी येशील तेव्हा दे. सोबत त्याची बायको यमुनाही आली होती. नेहमी एकटाच येत असे, आज जोडीने आला होता. त्याला जोडीने पाहिल्यावर माझी बायको सरोज हिने तिला देण्यासाठी कपाटातून एक कोरी साडी काढली आणि कॅरीबॅगमध्ये घालून बाजूला ठेवली. जाताना तिला द्यावी म्हणून. आणि सरोज घरकामात गुंतली. मोटारसायकल सुरू होण्याचा आवाज आल्यावर तिने बाहेर डोकावून पाहिले तर विजय आणि यमुना निघाले होते. ती धावत साडी घेऊन आली आणि मला म्हणाली, ‘अहो त्यांना मोबाइल करून थांबवा, साडी द्यायची राहिली.’ मी फोन केला. त्याने गाडी चालवत असल्याने उचलला नाही. सरोज खट्ट झाली. मी म्हणालो, ‘अगं पुढच्या पगाराला येईल तेव्हा साडी विजयजवळ दे.’ दरम्यान सरोजला हृदयविकाराने ग्रासले. उपचारासाठी पुण्याला न्यावे लागले. एक महिना पुण्याला होती. मीही तिच्यासोबत. विजय शिगाडेचा फोन आला. ‘दादा तुमच्या सहीशिवाय पगार मिळत नाही आणि तुम्ही नाशिकमध्ये नाही.’ मी उत्तरलो, ‘अरे माझे सात हजार दोनशे रुपये तुझ्याजवळ आहेत ते सध्या खर्च कर. मी आल्यावर पगार होईल.’ ‘दादा ते पैसे माझ्याकडून खर्च झाले आहेत,’ विजय उत्तरला. मी म्हणालो, ‘‘अरे गाढवा माझे पैसे तू परस्पर खर्च केले आणि वर पगार मागतोस? काही अक्कल? ठीक आहे. मी नाशिकला आल्यावर बघू.’’ दरम्यान सरोजचे आजारात 13 मे 2019 रोजी निधन झाले. काही दिवसांनी विजयचा फोन आला. पगारपत्रकावर सही घेण्यासाठी येऊ काय?. मी त्याच्या बायकोला देण्यासाठी सरोजने काढून ठेवलेली साडी आठवणीने जवळ ठेवली, विजयला देण्यासाठी. विजय आला. मी त्याला म्हणालो, मी पगारपत्रकावर सही करतो; पण माझे पैसे का आणि कशासाठी खर्च केलेस ते सांग. तो म्हणाला, यमुना आजारी पडली होती. तिच्या औषधासाठी केले खर्च. मी परत करीन. ठीक आहे, पुन्हा असे करू नकोस. मी पत्रकावर सही केली आणि म्हणालो, अरे ही साडी घेऊन जा. सरोजने यमुनासाठी ठेवली आहे. देणारी गेली; पण साडी बाजूला काढून ठेवली आहे. विजय थोडा थांबला आणि म्हणाला, दादा घेणारीही गेली आहे. त्याच आजारात ती गेली.साडी देणारी गेली, साडी घेणारी गेली. साडी आहे.vinayakpatilnsk@gmail.com(साहित्य, कला आणि शेतीसह अनेक विषयांमध्ये सखोल जाण असलेले लेखक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.)