शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

इथे संतांचिेये भूमि

By admin | Updated: November 29, 2014 14:10 IST

केरळातील फा. कुरियोकोस ऊर्फ चाव्हारा आणि सिस्टर युफ्रासिया एलुवेंथिंकल यांना पोप फ्रान्सिस यांनी संतपद बहाल केले. त्यानिमित्ताने या सार्‍या प्रवासाच्या इतिहासाला दिलेला उजाळा..

 डॉ. सुशीला मेंडीस

 
पोप फ्रान्सिस यांनी २३ नोव्हेंबर २0१४ रोजी केरळमधील फा. कुरियोकोस ऊर्फ चाव्हारा आणि सिस्टर युफ्रासिया एलुवेंथिंकल यांना संतपद बहाल केले. शतकानुशतकांचा इतिहास असलेल्या सायरो-मलबार कॅथलिक चर्चने आतापर्यंत जगाला तीन संत दिले आहेत. सिस्टर आल्फोन्सो ही त्या चर्चशी निष्ठा असलेली पहिली संत. पोप फ्रान्सिस यांनी त्याचबरोबर इटलीच्या चार जणांना संतपद दिले. रोमन कॅथलिक चर्चसाठी इटली देश अनन्यसाधारण महत्त्व राखून असल्यामुळे त्या देशातील चौघांना तो मान मिळणे समजण्यासारखे आहे. मात्र, केरळला हा बहुमान का मिळावा? सायरो-मलबार चर्चची पाळेमुळे पहिल्या शतकातील संत थॉमसच्या केरळ भेटीपर्यंत पोहोचतात. रोमशी संपूर्णत: समरस झालेली ही चर्च. ख्रिस्ती धर्माचा विशेष प्रसार झालेल्या गोव्यात आजमितीस एकही संत नाही. संत फ्रान्सिस झेवियर हा स्पॅनिश मिशनरी होती, तर फा. जुजे व्हाज यांना १४ जानेवारी २0१५ रोजी पोपकडून श्रीलंकेतल्या कोलंबोत संतपद दिले जाणार आहे. अर्थात, त्यांनी श्रीलंकेत कार्य केले असले, तरी गोवा आणि दमणच्या आर्कडायोसीसने त्यांच्या संतपदासाठी प्रयत्न केले होते, हे निर्विवाद.
केवळ गोवाच नव्हे, तर उर्वरित भारतातूनही कुणालाच संतपदाचा बहुमान मिळालेला नाही. यातून केरळची पुरोगामी विचारसरणी दृग्गोचर होते का? की आज ते राज्य देशातले सर्वांत सुशिक्षित राज्य आहे, ही बाब अधोरेखित होते? आपल्या गोव्याच्या, वेर्णे येथील फा. आल्वारिस यांना गोव्यातील चर्च ओळखू शकली नाही. त्यांची महत्ता जाणली ती केरळने. तिथल्या ऑर्थोडॉक्स सायरियन चर्चचे प्रमुख असलेल्या फा. आल्वारीसना आज जगभरातली जनता संताचाच मान देते. तत्कालीन वसाहतवादी राजसत्तेला स्थानिकांतून संत निपजणे कदाचित मान्य नसावे. तर, मग आणखी एक गोमंतकीय, फा. आग्नेल यांचे काय?
संतपद बहाल करण्याच्या प्रक्रियेत चमत्कारांची निश्‍चिती ही महत्त्वाची असते. हे चमत्कार अधोरेखित करताना व्हेटिकनच्या ५00हून अधिक वैद्यकीय सल्लागारांनी सदरहू चमत्कार वैद्यकशास्त्राद्वारे शक्य नसल्याचा निर्वाळा द्यावा लागतो. त्यानंतर धर्मशास्त्राचे अभ्यासक संबंधित चमत्कारातले दैवी संदर्भ तपासतात. त्याला खास नियुक्त केलेल्या कार्डिनल्सच्या समूहाने मान्यता द्यायची असते. ही प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पोप आपली मान्यता देतात. ज्या दोन केरळींना अशी मान्यता मिळाली, त्यांच्या भक्तांनी आणि पाठीराख्यांनी आपल्या प्रतिपादनाच्या आग्रहाचा संयतपणे आणि सातत्याने पाठपुरावा केला, हे स्पष्ट आहे.
केरळच्या दोन कार्डिनलांच्या नेतृत्वाखाली बिशप, पाद्री यांच्यासह तबब्ल ५,000 नागरिकांनी संतपद बहाल करण्याचा तो अनुपम सोहळा पाहण्यासाठी व्हेटिकन गाठले, ही बाबही त्या राज्यातील जनतेच्या उत्साहाचे आणि चिकाटीचे निदर्शक आहे. हा सोहळा केरळमधील चर्चमधूनही थेट प्रक्षेपित केला गेला. चाव्हारा आणि युफ्रासिया यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कोट्टायममधील मन्नन, एर्नाकुलममधील कुनम्मावू आणि थिसूरमधील ओल्लूर भागातील जनता तर आताही आनंदोत्सव साजरा करते आहे.
चाव्हारा अचानंद या नावाने विख्यात असलेले फा. चाव्हारा आणि एव्हुप्रासियम्मा या नावाने सर्वप्रिय असलेल्या सिस्टर युफ्रासिया यांचा जन्म १९व्या शतकातला. चाव्हारा १८0५मध्ये जन्मले आणि १८७१मध्ये त्यांना देवाज्ञा झाली, तर १८७७मध्ये जन्मलेल्या सिस्टर १९५२मध्ये ख्रिस्तवासी झाल्या. १९८६मध्ये भारतभेटीवर आलेले पोप जॉन पॉल यानी चाव्हारा यांना ‘शाश्‍वत सुखाचे अधिकारी’ घोषित केले. (या प्रक्रियेला बिटिफिकेशन म्हणतात. ती संतपद बहाल करण्याआधीची पहिली पायरी.) एव्हुप्रासियम्मांना तो मान २0 वर्षांनंतर लाभला. २0व्या शतकातल्या सिस्टर आल्फोन्सो यांना तुलनेने लवकर संतपद दिले गेले. फा. चाव्हारा यांनी कार्मेलाइट्स ऑफ मेरी इमेक्युलेट या संप्रदायाचा पाया घातला. सश्रद्धांसाठी रिट्रिट प्रवचनांची सुरुवातही त्यांनीच केली. ते केवळ सायरो-मलबार ख्रिस्ती धर्मीयांचे धार्मिक नेते नव्हते. केवळ ख्रिस्ती धर्मातीलच नव्हे, तर समाजातील सर्व धर्मांच्या मुलांसाठी- विशेषत: दुर्बल घटकांसाठी धर्मनिरपेक्ष शिक्षण दिले जावे, अशा मताचा प्रसार करणारे समाजसुधारक म्हणून त्यांना केरळ ओळखते. त्यांनी प्रारंभीच्या काळात सुरू केलेल्या शिक्षणसंस्थांत एका संस्कृत विद्यालयाचाही समावेश होता. परदेशी मदतीशिवाय देशातला पहिला छापखाना सुरू करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. याच छापखान्यातून पहिले मल्याळी दैनिक- नसरानी दीपिका- छापले गेले. विद्यालयातून दुपारचे जेवण देण्याचा प्रघातही याच पुण्यात्म्याने पाडला. आज आपल्या देशातील प्रत्येक राज्यात अशा प्रकारचे जेवण दिले जात आहे. सायरियन कॅथलिकांचे व्हिकार जनरल म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक चर्चने एक तरी विद्यालय सुरू करावे, असा आदेशच काढला. यामुळेच शिक्षण सार्वत्रिक बनण्यास मदत झाली. देशातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य म्हणून केरळला जो मान दिला जातो, त्याचे काही अंशी श्रेय फा. चाव्हारा यांनाही द्यावे लागेल. समाजाच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य महिला शिक्षणाशिवाय शक्य नाही, या धारणेने ते सतत वावरले. त्याच धारणेने त्यांनी १८६६मध्ये मदर ऑफ कार्मेल या केवळ महिलांसाठीच्या संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. सिस्टर युफ्रासिया याच संप्रदायाच्या सदस्य होत्या; मात्र त्यांचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. थिसूर येथील कॉन्व्हेंटच्या चार भिंतींच्या आतच राहून आपल्याकडे साह्यासाठी आलेल्यांची मदत करणे हेच त्यानी जीवनकार्य मानले. सतत प्रार्थना आणि ध्यानधारणेत मग्न असलेल्या या सिस्टरला लोक प्रेमाने ‘प्रार्थनामग्न माता’ असे संबोधत. मृत्यूनंतर   ३५ वर्षांनी तिला १९८७मध्ये ‘देवाची सेवक’ घोषित करण्यात आले. २00२मध्ये तिला ‘पूजनीय’ ठरविले गेले. ३ डिसेंबर २00६ रोजी त्यांना सायरो-मलबार चर्चच्या आर्च बिशपनी ‘पवित्र’ घोषित केले. तात्पर्य, केरळच्या तिच्या लोकांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांती संतपदापर्यंतची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल, याची खबरदारी घेतली. 
(लेखिका गोवा येथील महाविद्यालयात 
इतिहास विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापक आहेत.)