शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पुस्तकांशी रोमान्स

By admin | Updated: July 22, 2016 17:53 IST

हवी तेव्हा आणि हवी तेवढी पुस्तके विकत आणायला घरच्यांची ना नसायची. पण काय आणायचे आणि काय वाचायचे हा निर्णय आम्हालाच घ्यावा लागायचा.

 - सचिन कुंडलकर

हवी तेव्हा आणि हवी तेवढी पुस्तके विकत आणायला घरच्यांची ना नसायची. पण काय आणायचे आणि काय वाचायचे हा निर्णय आम्हालाच घ्यावा लागायचा.वाचनाची आवड-निवड काळ-वयाप्रमाणे वेगात बदलली. मी तर बरीच वर्षे चांदोबा, चंपकशिवाय काही वाचतच नव्हतो. साहित्यातील मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींची ओळख होण्याआधी आयुष्य असेच चालले होते. छचोर आणि सुंदर..आपल्या आईवडिलांना असलेले अनेक भयगंड, त्यांच्या लहानपणीच्या अनेक न्यूनतेच्या भावना आणि त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आपण खूप लहानपणीपासूनच पूर्ण करत असतो. आपण आपल्या आईवडिलांची एका प्रकारे वेबसाइट असतो. जगाला दाखवून देण्यासाठी त्यांना जे जे करायचे असते ते सगळे करण्यासाठी ते आपल्याला घडवत असतात. आपल्या आईवडिलांनी विशिष्ट निर्णय घेऊन आपल्याला त्याप्रमाणे मोठे केलेले असते. आपल्याला हे करता आले नाही किंवा आपल्याला हे मिळाले नाही ते माझा मुलगा किंवा मुलगी करेल. त्यामुळे लहानपणी आपण काय करणार असतो यामध्ये फारसे सरप्राइज उरलेले नसते. आपल्या आईवडिलांनी त्यांच्या समजुतीनुसार आपल्या जगण्याचा मार्ग आणि आपल्या आवडीनिवडी फार लहानपणी घडवायला घेतलेल्या असतात. कुटुंबामध्ये प्रत्येक लहान मूल हे आधीच्या पिढीने सोसलेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी तयार केलं जात असतं. अगदी पांढरपेशा शहरी सुशिक्षित घरातही हे नेहमी घडते, टाळता येत नाही. ज्या अन्यायाचा बदला घ्यायचा ते अन्याय बदलतात. पण हे चक्र न थांबता चालूच असते. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला लहानपणी नीट इंग्रजी बोलता येत नसेल, त्याची लाज वाटत असेल तर तो हमखास हा न्यूनगंड भरून काढण्यासाठी आपल्या मुलांना ती जन्मण्याआधीच कॉन्व्हेंटमध्ये घालतो तसे आहे हे.माझ्या आजोबांनी माझ्या आईने लिहिलेले लिखाणाचे कागद विहिरीत फाडून फेकून दिले, पुन्हा लिहिलेस तर याद राख असे तिला बजावले आणि असले काही करून वेळ वाया घालवण्यापेक्षा पोटापाण्याची नोकरी करायला फार लहान वयात घराबाहेर ढकलले म्हणून मी आज लिहितो. माझ्या वडिलांना संगीताची अतिशय आवड असूनही गरीब परिस्थितीमुळे आणि घरी झालेल्या दुर्लक्षामुळे स्वत:चे शिक्षण, आवडी- निवडी मनासारख्या जोपासता आल्या नाहीत म्हणून माझा भाऊ आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात इतकी मोठी कामगिरी करतो आहे. उत्तम नाव कमावतो आहे. हे सगळे आमच्या आई- वडिलांच्या जगाविरु द्ध तयार झालेल्या त्वेषामुळे घडले. त्या त्वेषाला त्यांनी चांगले स्वरूप दिले. एक प्रकारे अनुरागच्या वासेपूर चित्रपटात घेतला जातो तसा मुलांच्याकरवी घेतलेला जगाचा बदलाच आहे हा. पण त्याचे स्वरूप उपयुक्त आणि आनंदी ठरले. मी भरपूर लिहावाचायला लागलो ते घरातील वातावरणामुळे नाही. आमच्या घरात व. पु. काळे आणि पु. ल. देशपांडे सोडून काहीही वाचले जात नसे. पुलं आमच्या घरी आले असते तर रागावून गेले असते. फक्त माझी पुस्तके काय वाचता रे ठोम्ब्यांनो? जरा इतर काही वाचन करा, असे म्हणाले असते. तसे ते सतत आमच्या घरात असल्यासारखेच होते, कारण लहानपणी त्यांच्या कथाकथनाच्या कॅसेट घरात सतत लागलेल्या असत. त्यांचा आवाज घरात येतच राहायचा. घरात पुस्तकसंग्रह मर्यादित असला, तरी हवी ती पुस्तके हवी तेव्हा आणि हवी तेवढी विकत आणायला आईवडिलांची ना नसायची. पुस्तके आणायची आहेत हे म्हटल्यावर ते महिनाअखेर असला तरी पैसे कसेबसे जमवून द्यायचे. पण काय आणायचे आणि काय वाचायचे याचे निर्णय आम्हाला करायला लागत. त्यामुळे बरेवाईट पुष्कळच वाचून वाचनाची स्वत:ची निवड करता आली आणि ती काळ आणि वयाप्रमाणे फार वेगाने बदलत गेली. मी मोठा होताना काळ माझ्यापेक्षा वेगाने बदलत होता. ही ऐंशी आणि नव्वदच्या दशकाची कहाणी आहे. पुण्यात तेव्हा नुसते ‘असून’ पुरायचे नाही. दाखवायला लागायचे. अनिल अवचट हे प्रसिद्ध लेखक ही आमची नव्याने आयुष्याकडे बघायची खिडकी होती. कारण ते सतत सर्व कार्यक्र मांना दिसत. चांगले आणि सोप्या भाषेत थेट लिहित. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाशी गप्पापण मारत. तेव्हा ते लाकूड कोरण्याचा छंद जोपासत होते. ते जिथे तिथे हातात एक छोटे लाकूड घेऊन कोरत उभे असलेले दिसायचे. नाटकाला आले तरी पहिल्या रांगेत बसून लाकूड कोरत बसायचे. पुण्यात सगळे दाखवावे लागे. आपण जी पुस्तके वाचतो आहोत ती नावे दिसतील अशी हातात घेऊन फिरायची फार आवड पुणेकरांना होती. कुठेही जाताना हातात अशी दोन पुस्तके बाळगली की मग काय विचारायचं नाही. अशा गावात राहून वाचायची आवड कुणाला नाही लागणार? गौरी देशपांडे किंवा तत्सम परपुरु षी धाडशी पुस्तके हातात घेऊन फिरले की लोक आपल्याला गांभीर्याने घेत. मी ब्रिटिश लायब्ररीची मेंबरशिप घेतली तेव्हा मी लायब्ररीतून डेक्कनवरून चार-पाच महत्त्वाची पुस्तके अशी दाखवत चालत चालत फर्ग्युसन रस्त्यावरून घरी येत असे. आणि वाचत त्यातले एखादेच असे. आमच्या गावात अनेक महिलांना गौरी देशपांडे व्हायचे होते आणि ज्यांची वये वाढूनही लग्न झाली नसत त्यांना पु. शी. रेग्यांची सावित्री व्हायचे असे. मोर मिळाला नाही तर आपणच मोर व्हायचे. असे कसे होणार? एक मोर मिळाला नाही तर दुसरा मोर शोधायला नको का? सगळं आपणच कसे होणार? पण स्त्रीवादाची लाट शहरात वेगात पसरत असल्याने असले भयंकर प्रश्न विचारून बायकांचा रोष ओढवून घायची टाप पुण्यात कुणाच्यातही नव्हती. ‘बॉयकटाचे कट’ अशी एखादी मजेशीर कादंबरी माझे लाडके भा. रा. भागवत लिहितील अशी मला अपेक्षा होती. पण त्यांनी ती लिहिली नाही. मलाच ती कधीतरी पुढे लिहावी लागणार हे मला लहानपणीच लक्षात आले. मी तर बरीच वर्षे चांदोबा, चंपक, फास्टर फेणे आणि इंद्रजाल कॉमिक्स सोडून काही वाचतच नव्हतो. फास्टर फेणे तर मला अचानक लकडी पुलावर भेटेल की काय असे वाटायचे इतका मी त्याच्या जगात गुंगून जायचो. पाचवी सहावीत गेल्यापासून मला गौतम राजाध्यक्ष यांनी संपादित केलेले ‘चंदेरी’ हे सिनेमाचे मासिक वाचायची सवय लागली. माझ्या बहिणींमुळे मला लागलेले हे व्यसन फार काळ टिकले. मला ते मासिक सोडून दुसरे काही वाचायलाच नको असे. मी आणि माझ्या बहिणी त्यातले मोठे मोठे नटांचे फोटो कापून भिंती भरून चिकटवत असू. डिम्पल कपाडिया तेव्हा कपडे कसे घालावेत? परफ्यूम कसे वापरावेत ? या विषयावर एक सदर लिहित असे. ते सगळे मी नीट वहीत नोंदवून ठेवत असे. मला मुंजीत ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले होते. त्यातली लोचट आई मलाच काय पण माझ्या आईलासुद्धा आवडली नाही. सनी देओलचा ‘बेताब’ आला तेव्हा माझी एक बहीण ताबडतोब त्याच्या प्रेमात पडली आणि तिने सनीला पत्र लिहिले. सनीने तिला थँक यू असे उत्तर पाठवले. त्याचे फोटो उशाखाली घेऊन ती झोपायची. हा माझ्या आयुष्यात घडलेला पहिला ताकदवान पत्रव्यवहार. मराठी साहित्यातील मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींची ओळख होण्याआधी माझे आयुष्य असे चालले होते. छचोर आणि सुंदर. शाळेत मराठीच्या तासाला एकदा आमच्या श्रीवा कुलकर्णी सरांनी सुनीता देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रव्यवहाराचा उल्लेख केला आणि जी. ए. कुलकर्णी यांचे काही लिखाण वाचून दाखवले. त्या दिवशी कोणत्यातरी अनामिक आकर्षणाने मी शाळेच्या ग्रंथालयातून जीएंची दोन पुस्तके घेऊन गेलो. माझे वाचन आणि पुस्तक या गोष्टीशी असणारा माझा रोमान्स त्या दिवशी सुरू झाला असे मी समजतो. कारण मी घरी येऊन टीव्ही न पाहता गुपचूप ‘कैरी’ ही कथा वाचली आणि खूप अस्वस्थ होऊन रडलो. मला आईवडील आहेत आणि मी अनाथ नाही याचे मला त्या दिवशी खूप बरे वाटले. मी ते पुस्तक परत करायला गेलो आणि शाळेत ग्रंथपालांना विचारले आपल्याकडे अजून कोणती चांगली मराठी पुस्तके आहेत? ते मोकळं हसले आणि म्हणाले, हे सगळं तुमच्यासाठीच उभं केलं आहे बाळांनो. आत जा आणि हवी ती दोन पुस्तके निवडून आण. वि. दा. सावकर, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, आचार्य अत्रे, बालकवी, भा. रा. तांबे, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत, इंदिरा संत. काळाचा उभा आडवा सुरेख पसारा होता तिथे. माझी वाट पाहत होता. माझ्या बैठ्या आयुष्याची निवांत लोळत सुटी घालवण्याची आखणी करत होता. मी काय निवडू आणि कसे निवडू हेच मला कळेना. खूप जास्त आणि कळले नाही तरी वाचायची सवय मला शाळेमुळे आणि शाळेतल्या शिक्षकांमुळे लागली. आणि सुनीता देशपांडे यांच्या लिखाणामुळे माझ्या वाचनाला आणि लिखाणाला दिशा मिळाली. त्यामुळे इतर कुणाहीपेक्षा सुनीता देशपांडे यांचे माझ्यावर खूप जास्त अप्रत्यक्ष संस्कार आहेत. (ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)