शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

४२ खून करणाऱ्या माथेफिरूच्या अटकेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 06:05 IST

१९६०च्या दशकात रामन राघव या पिसाट खुन्याने मुंबईत एकामागोमाग ४२ खून पाडले.  संध्याकाळ झाली की मुंबईचे रस्ते सामसूम व्हायचे, या पिसाट खुन्याला चतुराईनं पकडलं ते अ‍ॅलेक्स फियालो या पोलीस अधिकाऱ्यानं. नुकतंच या अधिकाऱ्याचं निधन झालं. त्यानिमित्त त्या भयनाट्याचं स्मरण..

ठळक मुद्देमहानगरी मुंबईच्या गर्दीतून रामन राघवला हुडकून काढत त्याच्या हत्यासत्राला पूर्णविराम देणारे पोलीस अधिकारी ॲलेक्स फियालो मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहतील.

 - रवींद्र राऊळ

मुंबई शहरात दहशत पसरवणाºयांमध्ये रामन राघवचं नाव कायम स्मरणात राहील. रामन राघवचं नाव आलं की लगेच दुसरं नाव समोर येतं ते त्याला पकडणारे पोलीस अधिकारी ॲलेक्स फियालो यांचं. गेल्या आठवड्यात वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आणि या निमित्ताने पुन्हा चर्चा झाली ती रामन राघवच्या अटकनाट्याची. मुरब्बी आणि कसलेले पोलीस अधिकारी ॲलेक्स फियालो यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास केला. पण त्यांनी कायमची ओळख राहिली ती रामन राघवला अटक करणारा अधिकारी म्हणूनच. त्याला कारणही तसंच होतं.

   १९६0 च्या दशकात एका पिसाट खून्याने शहरात थैमान घातलं होतं. एकामागोमाग एक खून पडत होते. कोणत्याही दोन खूनांमध्ये कसलंही कनेक्शन नाही. खूनामागे कसलाही हेतू नसायचा. सगळे बळीत गरीब आणि अधिकतर फुटपाथवर झोपणारे. बरेचशे त्यांच्या झोपड्यांमध्ये मृतावस्थेत सापडले. मृतांमध्ये पुरूष, महिला आणि मुलांचाही समावेश. बहुतेक खून हे मुंबईच्या उपनगरात रात्रीच्या वेळी होत होते. सगळ््यांच्या डोक्यावर अणकुचीदार शस्त्राने प्रहार केलेले असायचे.

   १९६२ ते १९६८ या सहा वर्षांच्या कालावधीत खून्याने असे तब्बल ४२ खून पाडले होते. पोलीस हैराण झाले होते. तत्कालीन मृदभाषी पोलीस आयुक्त इम्यॅन्युअल मोडक दररोज सकाळी येऊन कार्यालयातील त्यांच्या खूर्चीत स्थानापन्न झाले की त्यांचा फोन घणघणत असे. तो उचलला की कुठल्यातरी पोलीस ठाण्यातून अधिकारी बोले,‘‘सर, मर्डर.’’ मोडक यांनी पोलीसांना कामाला लावलं. दोन हजारहून अधिक पोलीस रात्रीची गस्त घालत. नागरिकही त्यात उतरत आणि कुठल्यातरी भलत्याच संशयिताला चोप देत. तोवर बातमी येई, नुकताच आणखी एक खून झाला. मारेकरी दाढी वाढवलेला असल्याची वार्ता पसरल्याने साधूमंडळींचीही पळापळ सुरू झाली. शहरात लागोपाठ खून होत होते, तरीही मारेकरी सापडत नव्हता. जणूकाही लंडनमधील कुख्यात सिरियल किलर जॅक  रिपर याचा दुसरा अवतारच.  

   या हत्यासत्राने नागरिक भयकंपित झाले होते. सायंकाळ झाली की मुंबईतले सारे रस्ते संचारबंदीसारखे सामसूम होत. प्रेक्षकांअभावी सायंकाळनंतरचे सिनमो शोही बंद पडले होते. शहरात अफवांचं पिक आलं होतं, हा कुणी मारेकरी म्हणजे सुपरपॉवर आहे. तो मांजर, पोपटाचं रूप घेऊन घरात शिरतो आणि हत्या करतो. या दरम्यान सिरियल किलर रामन राघवला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. पण पुरेसा पुरावा नसल्याने त्याला सोडून देण्यात आलं. पोलिसांनी आपल्या रेकॉर्डमधल्या संशयितांची छाननी केली, त्यांची धरपकड सुरू केली. खबºयांना पैसे देऊन देऊन अधिकारी थकले. पण खूनांची मालिका सुरूच होती.

   मारेकऱ्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आतुर झाला होता. डोंगरी पोलीस ठाण्यातील फौजदार ॲलेक्स फियालो त्यातलेच एक. स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या तोडीच्या मुंबई क्राईम ब्रॅन्चमध्ये त्यांनी सात वर्षे काम केलं होतं. डोंगरी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतरही त्यांची तपासाची सवय कायम होती. तीन - चार वर्षे थैमान घालणारा हत्यारा सापडायचा होता. आॅगस्ट १९६८ मध्ये मालाडमध्ये राहाणारी एक महिला मारेकऱ्याच्या हल्ल्यातून वाचली होती. तिने हल्लेखोराचं वर्णन पोलिसांकडे केलं होतं. पोलिसांकडे मारेकऱ्याचं रेखाचित्र तयार होतंच. पोलिसांचा संशय रामन राघववरही होता. बहिणीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या रामन राघवने पाच वर्षे तुरूंगात काढल्याने पोलिसांकडे त्याचं रेकॉर्ड तयार होतं.

  सप्टेंबर १९६८ मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास फियालो डोंगरी पोलीस ठाण्यात पायी चालत जात होते. इतक्यात समोरून एक दाढीधारी डुलत डुलत येताना दिसला.  दहा दिवसांपूर्वी मालाडमधील महिलेने केलेल्या वर्णनात तो फिट्ट बसत होता. निळी  शर्ट, खाकी पॅन्ट आणि ब्राऊन कॅनव्हासचे बूट...

  फियालो सांगत, ‘‘मी त्याला आधी हटकायचं टाळलं. माझ्या खाकी वर्दीकडे पाहून त्याची काय प्रतिक्रिया असेल, याचा अंदाज मला घ्यायचा होता. तो जवळ आला तशी आमची नजरानजर झाली. त्याने तुच्छतेने माझ्याकडे पाहिलं आणि तो पुढे निघाला. मी माझ्या खिशातला त्याचा फोटो काढून पाहिला. डोळे सारखेच होते. मी पाठी वळलो आणि त्याचा पाठलाग सुरू केला. तो आपल्याच धुंदीत चालत होता. भेंडी बाजार नाका येताच मी त्याला पाठीवर थोपटून अडवलं आणि म्हणालो, ‘मेरे साथ  जाव. थोडा काम है.’ चौकशीसाठी त्याला पोलीस क्वार्टर्समध्ये नेलं. त्याच्या हातात ओली झालेली छत्री होती. डोंगरी परिसरात तर तेव्हा ऊन पडलं होतं. मी त्याला नाव आणि काम काय करतोस विचारलं. त्याने उत्तर दिलं, नाव सिंधी दलवाई. मालाडला राहतो. भीक मागतो. मालाड म्हटल्याने आणखी एक धागा जुळला होता. मी त्याला एक सणसणीत थप्पड दिली आणि म्हणालो, हम तेरेको रामन राघव के नाम से जानता है. तो निर्विकारच राहिला.’’

  नंतर फियालो यांनी त्याला त्याचा फोटो दाखवला आणि विचारलं, याला ओळखतोस? तो म्हणाला, ’साब मेरे जैसाही दिखता है. मगर वो मै नही. कोई और होगा.’

फियालो यांनी मग मोडस आॅपरेंडी ब्युरोला पाचारण केलं. पोलीस रेकॉर्डमधील रामन राघवचे ठसे त्याच्याशी जुळत असल्याचा निर्वाळा ठसेतज्ज्ञांनी दिला. फियालो यांनी हाच तो सिरियल किलर असल्याचं कुणालाही सांगितलं नाही. आपली जीप मागवली आणि त्याला डोंगरी पोलीस ठाण्यात नेलं. जीपच्या ड्रायव्हरलाही मारेकरी पकडला गेल्याची कल्पना दिली नाही. अन्यथा संतप्त जमावाने त्याला ठारच मारलं असतं. त्याला लॉकअपमध्ये टाकल्यानंतर फियालो यांनी पोलीस आयुक्त मोडक यांना रिपोर्ट केला. रामन राघव पकडला गेल्याचं समजताच खुद्द आयुक्त मोडक डोंगरी पोलीस ठाण्यात पोहचले. त्याला पुढील तपासासाठी क्राईम ब्रॅन्चच्या ताब्यात देण्यात आलं.

  पुढच्या तपासात बरेच आढेवेढे घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कलाने घ्यायचं ठरवलं. त्याने केलेल्या मागणीप्रमाणे त्याला भरपेट चिकन खायला दिलं. केसांना चोपडायला तेल आणि कंगवा दिला. त्यानंतर कुठे त्याने साºया हत्यांची कबुली दिली.

     एक भाऊ आणि चार बहिणी असलेला रामन राघव १९५0 साली अवघ्या विशीत असताना मुंबईत आला होता. त्याला कन्नड आणि हिंदी भाषा येत होत्या. सिंधी दलवाईप्रमाणेच तलवाई, थम्बी, अन्ना, वेलुस्वामी अशी अनेक नावं त्याने धारण केली होती.

  पुढे खटल्यात बचाव पक्षाने तो मनोरूग्ण असल्याचा बचाव केला. खून करताना तो काय करतो ते त्याला माहित असायचं. पण त्याचा परिणाम काय होणार आणि त्याचं कृत्य कायद्याच्या विरोधात असायचं हे त्याला ठाऊक नसायचं. तो स्क्रिझोफ्रेनिक होता.

    न्यायालयाच्या आदेशावरून त्याला एक महिना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर तो मनोरूग्ण नसल्याचं स्पष्ट झालं. त्याला फाशीची शिक्षा झाली तेव्हा त्याने अपिल करायला नकार दिला. शिक्षा निश्चित करण्यापूर्वी हायकोर्टाने मुंबईच्या जनरल सर्जनना निर्देश दिले की, तीन मनोवैज्ञानिकांचं पथक स्थापन करून तो मनोरूग्ण आहे की नाही, तो स्वत:चा बचाव करू शकतो की नाही ते ठरवा. त्या पथकाने रामन राघवच्या दोन दोन - दोन तासांच्या पाच मुलाखती घेतल्या. त्यावेळचं त्याचं वागणं विक्षिप्त होतं.

   आपण करतो ते करण्यासाठी सरकार आपल्याला आदेश देतं, असा त्याचा ठाम समज होता. त्यावरून फाशीची शिक्षा रद्द करून त्याला आजीवन कारावासाची सजा सुनावण्यात आली. मनोरूग्ण जाहीर करून त्याला येरवडा तुरूंगात सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ मेंटल हेल्थ ॅन्ड रिसर्चमध्ये उपचार सुरू करण्यात आले. १९९५ साली ससून रूग्णालयात किडनीच्या विकाराने त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडील हत्या करण्यासाठी वापरलेली विशिष्ट पद्धतीने वाकवलेली पहार मुंबई पोलिसांकडे आजही आहे. रामन राघवला पकडल्याबद्दल फियालो यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं. इतरही अनेक रिवॉर्ड त्यांना मिळाले.

   देशभरात आजवर वेगवेगळ्या सोळा सिरियल किलरनी केलेली भीषण हत्याकांडं खळबळजनक ठरली, पण रामन राघवने घातलेलं दहशतीचं थैमान त्यात सर्वाधिक होतं. महानगरी मुंबईच्या गर्दीतून रामन राघवला हुडकून काढत त्याच्या हत्यासत्राला पूर्णविराम देणारे पोलीस अधिकारी ॲलेक्स फियालो मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहतील.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)

Rawindra.rawool@lokmat.com

ग्राफिक्स- प्रकाश सपकाळे