- प्रकाश ठोसरे
मी चिखलद:याच्या ‘ब्रेसाईड’मधे काही महिनेच राहिलो. त्यानंतर माझी तारुबंद्याला बदली झाली. चिखलद:याच्या माङया वास्तव्यात निवांत संध्याकाळ अनुभवण्यासाठी मी ब:याचदा वैराटला जात असे. वैराट हे गवळ्यांचे गाव मेळघाटचं सर्वात उंचावरचं ठिकाण (समुद्रसपाटीपासून 4क्क्क् फूट) आहे. तिथला सूर्यास्त हे पर्यटकांच्या दृष्टीने खास आकर्षण आहे. मी वैराटहून मेळघाटच्या घनदाट जंगलाचं विहंगम दृश्य पाहत असे. या घनदाट जंगलाच्या दृश्यात अधूनमधून छोटे छोटे पाडय़ांचे ठिपके डोकावतात. हे पाडे मूलत: ब्रिटिशांनी जंगल खात्याची कामे करण्यासाठी आणलेल्या मजुरांचे कॅम्प आहेत. त्यातलाच एक ठिपका म्हणजे तारुबंदा, जिथे मला क्षेत्रीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी पुढील सात महिने राहायचे होते.
चिखलद:याच्या वास्तव्याकडे मागे वळून पाहिलं तर असं जाणवतं की तिथलं काम खूपच हलकं होतं. थंड हवेच्या ठिकाणी सरकारी खर्चाने वनविश्रमगृहात घालवलेली सुट्टीची जागा म्हणा ना. तिथं सुरुवातीच्या काही त्रसदायक गोष्टी होत्या जशा की माङयावर आणि माङया गोष्टींवर तुटून पडणारे जंगली उंदीर, छपरावर खुडबूड करणा:या उदमांजरी, भूतबंगल्यातल्या करकरणा:या खिडक्या, वा:याच्या शिळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉफीच्या मळ्यात धुक्यात वावरणारी अस्वलं! पण हळूहळू हे सर्व माङया अंगवळणी पडलं आणि मी स्थिरस्थावर झालो होतो. मी रात्री उशिरार्पयत वन्यप्राण्यांविषयी पुस्तकं वाचत असे. जिम कॉर्बेट आणि केनेथ अॅण्डरसनच्या सगळ्या पुस्तकांचा मी फडशा पाडला होता. माङया खोलीत बसून केलेलं हे वाचन खूपच आनंददायक होतं. कारण खिडकीतून बाहेर डोकावून मी कितीतरी ससे, उदमांजरी, रानडुकरं, सायाळी आणि हो, बिबटय़ापण पाहिला होता. जुन्या वनविश्रमगृहात बसून एकीकडे वन्यप्राणी पाहत पाहत त्यांच्याच गोष्टी वाचणं म्हणजे फारच उत्तेजक होतं.
तारुबंदा म्हणजे स्थानिक बोलीभाषेत झाडावर वाढणारी परोपजीवी वनस्पती, बांडगुळासारखी. तारुबंदा जेमतेम 5क्-6क् उंब:यांचा पाडा होता. इथलं नजरेत भरणारं घर सोमजी पटेल नावाच्या झोकात राहणा:या आदिवासी माणसाचं. त्याचं पटेल हे आडनाव गावप्रमुखाचं द्योतक आहे. तो काळासावळा होता आणि त्याचे मोठाले दात ओठांच्या बाहेर डोकावत असत. त्याच्या विशिष्ट हास्यामुळे त्याच्या चेह:यावरचं सुरकुत्यांचं जाळं आणखीनच दाट व्हायचं. मी 198क् मध्ये सोमजीला शेवटचा भेटलो आहे, पण त्याचा चेहरा माङया आठवणीत कायमचा कोरला गेला आहे. सोमजीला आदिवासी घाबरून असत, कारण तो त्यांचा ‘भुमका’ (आदिवासी डॉक्टर) होता आणि तो ‘करणी’ करतो असा त्यांचा समज होता. तो आदिवासी मजुरांना वनखात्याच्या कामावर लावत असे, त्यांच्या वतीने मजुरी घेत असे आणि त्यातून स्वत:चं मोठं कमिशन कापून घेत असे. मी त्याच्या कंत्रटी पद्धतीतून काही मजुरांना बाहेर काढू शकलो होतो. त्यांना पूर्ण मजुरी मिळू लागल्याने ते माङयावर खूश असत. काही लोकांनी मी सोमजीच्या जादूटोण्याचा आदर करावा, त्याच्यापासून सावध राहावं, त्याचा रोष पत्करू नये असाही सल्ला दिला होता. पण प्रत्यक्षात सोमजीच माङया बाबतीत जास्त सावध असायचा. मी त्याचं बिंग फोडू नये ह्यासाठी तो माझी मर्जी संपादन करू पाहत असे. गावात जेव्हा एखादी साथ यायची तेव्हा सर्व गाव दैवी उपाययोजनेसाठी सोमजीकडे धाव घेत असे.
एकंदरीत सोमजी हे एक खास प्रस्थ होतं. तो मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रत रात्रीच्या मिट्ट काळोखात अनवाणी एकटा फिरू शकत असे. तो राजकारणातही सक्रिय होता. तारुबंद्याहून रात्री निघून तो पहाटे पहाटे चिखलद:याला पोचत असे आणि चिखलद:याचं काम आटोपून तडक रात्री 9 च्या सुमारास निघून दुस:या दिवशी सकाळी तारुबंद्यात उगवत असे. हिंस्त्र श्वापदं असणा:या अतिशय घनदाट जंगलातून दोन रात्रीत तो जवळपास 1क्क् कि.मी. चालत जात असे. त्याचं वय कोणालाच माहीत नव्हतं. पण तो गो:या साहेबांच्या ज्या गोष्टी सांगत असे त्यावरून मी अंदाज बांधला की त्याचं वय 7क् तरी असावं. त्याला मेळघाटच्या जंगलाचा कानाकोपरा माहीत होता म्हणून माङया दौ:यावर तो सोबत असावा असा माझा आग्रह असे. जंगलात पूर्ण आयुष्य घालवलेल्या या माणसाचा मृत्यू दिल्लीत रस्त्यावरच्या अपघातात व्हावा हा किती दैवदुर्विलास ! तारुबंदा गावाच्या बाहेर तारुबंदा-आढाव रस्त्यावर त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक बांधलं आहे. सध्या त्याच्या घरी त्याचा ‘लमजाना’ (जावई) राहत आहे. लगAानंतर नवरदेवाने बायकोच्या घरी राहायला जाणं ही कोरकू आदिवासींची वैशिष्टय़पूर्ण प्रथा आहे.
सोमजीचं घर गावाच्या एका टोकाला होतं, तर वन आरोग्य केंद्र दुस:या टोकाला होतं. तारुबंद्याला डॉक्टरसाठी छानसा बंगला होता. पण तारुबंदा फार दुर्गम असल्याने फार काळापासून कोणी तिथं राहत नव्हतं. मला तो बंगला आवडला आणि थोडी डागडुजी करून त्यात राहायचं मी ठरवलं. आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूला एक तळं होतं. त्यात भरपूर मोठाले मासे असत. दिवसा या तळ्याचा वापर गावकरी व त्यांची जनावरं करत, तर रात्री तिथले मूल रहिवासी वन्यप्राणी करत. सोमजीच्या घरापासून अध्र्या किलोमीटरवर वनविश्रमगृह होतं. डॉक्टर बंगला तयार होईर्पयत मी त्यात राहायचं ठरवलं.
मी तारुबंद्याच्या विश्रमगृहात महिनाभरासाठी राहायला गेलो तो 1979 चा सप्टेंबर महिना होता. घनदाट अरण्यात व टेकडीवर थोडं उंचावर असल्याने या विश्रमगृहातून जवळपास 1क्,क्क्क् हेक्टर एवढय़ा मोठय़ा जंगलाचं विहंगम दृश्य दिसत असे. दोन सूट्स व ऐसपैस व्हरांडा असणारं हे टुमदार विश्रमगृह होतं. दिवसभराची जंगलातली थकवणारी भटकंती झाल्यावर सैलावण्यासाठी या व्हरांडय़ात जुन्या पद्धतीच्या दोन आरामखुच्र्या होत्या. व्हरांडय़ात वाघाची जोडी आराम करताना दिसल्याने त्याला भरपूर प्रसिद्धीही मिळाली होती. तारुबंद्यात विजेचा नेहमीच लपंडाव चालायचा. माङया सात महिन्यांच्या वास्तव्यात आठ-दहा रात्रीच काय ती वीज होती.
लहानपणी मी या विश्रमगृहात आल्याचं मला चांगलं आठवतं. त्यावेळची एक गोष्ट आता दिसत नव्हती, ती म्हणजे हाताने ओढायचा पंखा. हा पंखा म्हणजे 3 बाय 1क् फूट लांबी-रुंदीचं जाड कापड असे. हा पंखा खोलीच्या आढय़ाला लटकावलेला असे. या पंख्याला जाडसर दोर बांधलेला असे आणि तो पुलीवरून छपराच्या जवळून बाहेर सोडलेला असे. बाहेर बसलेला पंखेवाला हा दोर एका विशिष्ट लयीत पुढे-मागे ओढत असे आणि त्यामुळे खोलीतली हवा हलून गारवा निर्माण होई. उन्हाळ्यात विश्रमगृहातली प्रत्येक खिडकी व दरवाजा वाळ्याच्या पडद्याने झाकली जायची. पंखेवाला या ताटय़ांवर पाणी मारायचा आणि पंखा चालवत राहायचा. हा कार्यक्रम दिवसातले आठ-दहा तास तरी चालायचा. मध्य भारतात उन्हाळ्यात तपमान 45 अंशाच्या वर जाते. इतका कडक उन्हाळा अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना सुसह्य व्हावा यासाठी ही अधिकृतपणो सुविधा केलेली असायची. आम्हा मुलांना या पंखेवाल्याची दया यायची आणि त्याच्या जेवणाच्या वेळेत पंखा ओढायचं काम आम्ही स्वखुशीने करत असू. मेळघाटातल्या पूर्वीच्या सर्व विश्रमगृहांचं आणखी एक वैशिष्टय़ होतं ते म्हणजे गवताने शाकारलेली गारेगार छपरं. विजेच्या आगमनामुळे हे पंखे आणि गवती छपरं लोप पावली. पण मे महिन्यातल्या वाळ्याच्या सुगंधी हवेची स्मृती माङया मनात आजही तितकीच ताजी आहे.
विश्रमगृहाच्या मागच्या दरीत 1क्क् मीटरवर स्मशान होतं. या स्मशानात एका रेंजरचं दफन केलेलं होतं. हा रेंजर कॉलरामुळे मरण पावला आणि त्यावेळी सिपनेला आलेल्या पुरामुळे त्याला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली नाही असं सांगितलं जातं. या घटनेवर आधारित विश्रमगृहाशी निगडित भुताच्या गोष्टी रचल्या गेल्या आहेत. विश्रमगृहापासून 5क् मीटर तारुबंद्याच्या विरुद्ध बाजूस दगडावर कोरलेला वाघाच्या पंजाचा ठसा आहे. या जागेला ‘कुला (वाघ) बाबा’ असं नाव असून, कोरकू याला मानतात. त्यांचा विश्वास आहे की हा ठसा एका ख:या मोठय़ा वाघाचाच आहे. तारुंबदाकुंड (वन्यप्राण्यांना निर्वेधपणो राहण्यासाठी या कुंड गावाचं आता व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर पुनर्वसन झालेलं आहे) रस्त्यावर कांद्री नावाची एक जागा आहे. वाघाच्या या भूमीवर एक छोटंसं हनुमान मंदिर आहे. दस:याच्या संध्याकाळी मदतनीस हिरालाल आणि वायरलेस ऑपरेटर फणसाळकर या दोघांबरोबर मी फिरायला गेलो असताना अचानक अतिशय जवळून वाघाची डरकाळी ऐकू आली आणि बचावासाठी आम्हाला विश्रमगृहात धाव घ्यावी लागली.
तारुबंदा-आढाव रस्त्यावर चार-पाच किलोमीटरवर डोलारबाबाचं मंदिर होतं. कोरकू या बाबालाही मानत. विशेषत: पाऊस न झाल्याने दुष्काळाची शक्यता निर्माण झाल्यास, एखादी रोगाची साथ आल्यास या बाबाचा ते धावा करत. कोरकूंची श्रद्धा होती की, फार फार वर्षापूर्वी असा माणूस (डोलारबाबा) अस्तित्वात होता आणि बैलांऐवजी वाघांच्या जोडीने तो शेतीची नांगरणी करत असे. डोलारबाबाच्या मंदिरातली सार्वजनिक पूजा करायचा मान गावच्या प्रमुखाकडे म्हणजे सोमजी पटेलकडे होता.
तारुबंदा गावातून वनविश्रमगृहाला जायला दहा मिनिटं लागत असली तरी तो रस्ता घनदाट जंगलातून जात असल्याने तो एकटय़ाने पार करायला विशेषत: रात्रीच्या वेळी, वाघाचंच काळीज लागतं. त्या रस्त्यावर एक अवघड वळण होतं, त्या ठिकाणी वन्यप्राण्याशी धडक होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
मला आठवतंय, मी पहिल्यांदा या रस्त्यावरून गेलो तेव्हा माङया सोबतीला शहरात राहिलेले वनपाल गवई होते. रात्रीची वेळ असल्याने त्यांनी टेंभा घेतला होता. एक उद्देश म्हणजे उजेडासाठी आणि दुसरा म्हणजे वन्यप्राण्यांना दूर ठेवण्यासाठीही होता. गमतीचा भाग म्हणजे गवई चालता चालता मध्येच थबकत आणि टेंभा उंचावून स्वत:भोवती प्रदक्षिणा घालत. त्यांनी यामागची कारणमीमांसा सांगत मलाही तशी प्रदक्षिणा घालायचा सल्ला दिला. त्यामागे त्याचं तर्कशास्त्र होतं की आपण अशी प्रदक्षिणा नाही मारली तर धूर्त वन्यप्राणी मागून हल्ला करू शकतात. त्यावेळी मी त्या गरीब बिचा:या माणसाच्या भ्याडपणाला उपरोधानं हसलो; पण नंतर मी त्याच्या बुद्धिमत्तेवर चिंतन केलं.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य
वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com