शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

रिअॅलिटी चेक

By admin | Updated: April 9, 2016 14:55 IST

कुठल्याही करिअरला प्राधान्य देणा:या कोणत्याही व्यक्तीला स्पर्धा आणि त्यातून येणारे ताणतणाव या गोष्टी चुकलेल्या नाहीत. तुमचा फोकस काय आहे आणि तुम्ही ज्या क्षेत्रत जाऊ इच्छिता त्या क्षेत्रचं वास्तव आणि स्वत:मधल्या क्षमता या गोष्टी तुम्ही तपासून घेतल्या आहेत का,

अवास्तव आणि मूर्ख स्वप्नांना
इथे माफी मिळत नाही!
 
प्रिया बापट
 
कुठल्याही करिअरला प्राधान्य देणा:या कोणत्याही व्यक्तीला स्पर्धा आणि त्यातून येणारे ताणतणाव या गोष्टी चुकलेल्या नाहीत. 
तुमचा फोकस काय आहे आणि तुम्ही ज्या क्षेत्रत जाऊ इच्छिता त्या क्षेत्रचं वास्तव आणि स्वत:मधल्या क्षमता या गोष्टी तुम्ही तपासून घेतल्या आहेत का, एवढा एकच महत्त्वाचा- आणि कळीचा- प्रश्न असतो.
ग्लॅमरच्या जगात येण्याचा एखाद्या व्यक्तीचा नेमका उद्देश काय आहे त्यावरही बरंच काही अवलंबून असतं. मला प्रसिद्धी आणि पैसा हवा आहे, की (त्यासोबतच) मला चांगलं काम करायचं आहे; हा प्रश्न इथे येण्यापूर्वी प्रत्येकाने स्वत:ला विचारावा आणि खरंखरं उत्तर शोधावं असं मी सुचवीन.
 मी सुंदर आहे, मला छान उंची आहे, मी गोरी आहे.. हे किंवा असलेच तपशील तुम्हाला उत्तर म्हणून मिळाले, तर आपलं सगळंच मुसळ केरात जायची खूपच शक्यता आहे, हे गृहीत धरावं.
 स्वप्नं जरूर पाहावीत, पण ती अवास्तव आणि मूर्ख नाहीत ना याचा रिअॅलिटी चेक जरूर करावा. आपल्याला तो करता येत नसेल, तर अन्य कुणा जाणकाराकडून करून घ्यावा. ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं’ हे सिनेमात ठीक, वास्तवात तो मूर्खपणा असण्याचीच शक्यता अधिक. मोठी स्वप्नं घेऊन येत असताना ती पूर्ण करण्यासाठी लागणा:या क्षमता आपल्याजवळ आहेत का, नसल्या तर ती कमवण्याची किमान क्षमता आहे का, याचाही अंदाज असलाच पाहिजे. 
माझंच पाहा. मी मोजकंच करते.
- आता याचे अनेक अर्थ होऊ शकतात. कुणी म्हणोल, हे काय, प्रियाला काही कामच मिळत नाही म्हणून ती मोजकं काम करते, अरेरे..
- पण त्याचा माङयावर परिणाम होत नाही कारण मी मोजकं, निवडक काम करते याची माझी म्हणून काही कारणं आहेत. 
मुळात मला फक्त चांगल्या दर्जाचंच काम करायचं आहे. एका वेळी मला अनेक प्रोजेक्ट पसंत पडले तर मी ते सगळे करीन, किंवा काहीच करीन.
असे निर्णय करणं सोपं असतं, निभावणं अवघड. वास्तवाकडे आपण कसं बघतो यावरही ब:याच गोष्टी अवलंबून असतात. समजा, माङया स्वत:च्या प्रवासाकडे मी नकारात्मक पद्धतीने बघितलं तर मला नक्कीच त्याचा त्रस होईल. आपण इतरांच्या मागे पडलोय, आपल्या बरोबर कुणाला कामच करायचं नाहीये असले काहीही विचार मनात येऊन मन शिणून जाईल. पण असं होत नाही. कारण काय आणि कसं काम करायचं याचा माझा म्हणून विचार पक्का आहे. मला सोशल नेटवर्कवरती किती लाइक्स मिळतील किंवा इतर लोक माङयाविषयी काय बोलतात यासाठी मी काम करत नाही. मी काम माङया आनंदासाठी करते. त्यामुळे त्याचा वेगही मीच ठरवला आहे. 
राहता राहिला प्रश्न यश आणि अपयश या दोन्हींच्या हाताळणीचा! तर मला वाटतं, इथे तुमच्या कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मला जमिनीवर ठेवायला आणि अवघड प्रसंगी आधार द्यायला आईबाबांबरोबर उमेश आहे. एकमेकांच्या प्रोसेसकडे तटस्थपणो बघण्याची भूमिका आम्ही अगदी चोखपणो पार पाडतो. 
ब:याच वर्षांपूर्वी माङयाही करिअरमध्ये एक काळ असा आला होता जेव्हा माङयाकडे काहीच काम नव्हतं. आपण नेमकं काय काम करायचं असा पेच माङयासमोर होता. आणि उमेश तेव्हा प्रचंड बिझी होता. त्यावेळी मी इतर पर्यायही तपासून पाहिले. अभिनयाखेरीज मी काय काय करू शकते? एखादी नोकरी करावी का? पण मग लोक काय म्हणतील? 
असले सगळे विचार माङयाही मनाला शिवून गेले होते. पण त्या कठीण काळात उमेशने मला खूप सांभाळून घेतलं होतं. काय निवडायचं असा पेच आहे म्हणून निराश होण्याऐवजी ज्या गोष्टी येत नाहीत त्या मी शिकाव्यात असं त्यानं सुचवलं. आणि त्याचा खरंच उपयोग झाला. 
.. त्या रितेपणाच्या काळात मी नाच शिकले, भरपूर वाचन केलं, माझं बंद पडलेलं गाणं पुन्हा सुरू केलं आणि त्या सगळ्याचा मला खरंच खूप उपयोग झाला.
स्वत:चा रितेपणाचा विचार करत बसून निराश बसून राहण्याऐवजी चार नव्या गोष्टी शिकले. 
मनाची तगमग आपोआप थांबली.. त्याला कारण उमेश. आणि मी बोलकी असल्यानं हे सारं मी मनमोकळेपणानं बोलले. त्यातून मार्ग सापडत गेले.
मी लहान असतानाच कामाला सुरु वात केली होती. त्यामुळे स्वत:चे पैसे खूप आणि खूप आधीपासून मिळत होते. पण त्या पैशाचं सगळं व्यवस्थापन बाबा बघायचे. बॅँकेत पैसे आले की लगेच त्याची गुंतवणूक करून मला खर्चायला मोजकेच पैसे ठेवण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळे आहे त्यात मॅनेज करण्याची मला पहिल्यापासून सवय आहे. त्याचा आजही मला उपयोग होतो. लाइफस्टाइल सांभाळणं हा काही जीवनमरणाचा प्रश्न नसतो याचं भान राखणं अवघड खरं, पण अशक्य नसतं ते. ते भान तुमच्या काम करण्याच्या उद्देशातूनच येतं. तुमच्या जगण्याचा, असण्याचा, काम करण्याचा, न करण्याचा उद्देश काय आहे हे फार स्पष्ट असलं पाहिजे. 
कुणाला तरी दाखवण्यासाठी आपलं करिअर असू शकत नाही, ते आपल्यासाठी असलं 
पाहिजे, स्वत:ला प्रूव्ह करण्यासाठी असलं 
पाहिजे.
कुणाही क्रिएटिव्ह माणसाच्या आयुष्यात अशी फेज येऊ शकते, पेच पडतात. मला एकच कळतं, प्रत्येकाला आयुष्याचा आनंद घेण्याचा हक्क आहे. एवढय़ा तेवढय़ा कारणांनी हार मानून कसं चालेल?