शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

खरे आव्हान वेगळेच

By admin | Updated: December 27, 2014 19:05 IST

जग म्हटले, की चांगले आणि वाईट या दोन बाजू असायच्याच. या सार्‍यात आपण नक्की काय आणि कसा विचार करतो, हेच शेवटी महत्त्वाचे. त्या सकारात्मकतेच्या दिशेने जाण्याची सुरुवात यानिमित्ताने व्हावी.

 भीष्मराज बाम

 
जग म्हटले, की चांगले आणि वाईट या दोन बाजू असायच्याच. या सार्‍यात आपण नक्की काय आणि कसा विचार करतो, हेच शेवटी महत्त्वाचे. त्या सकारात्मकतेच्या दिशेने जाण्याची सुरुवात यानिमित्ताने व्हावी.
--------------------
सारे धर्म शांततेचा घोष करतात; पण त्यांचे अनुयायी इतकी अशांतता माजवतात त्याचे कारण काय आहे?
जगात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. त्यामध्ये जे चांगले असतील, त्यांचे राज्य असावे आणि वाईट लोकांना इतरांना त्रास द्यायची संधी मिळू नये, असेच बहुसंख्य माणसांना वाटत असते. चांगले विचार समाजात रुळावेत आणि वाईट विचारांचे दमन व्हावे, यासाठी धर्मसंकल्पना निर्माण झाली आणि चांगली माणसे समाजाचे नियंत्रण करीत राहावीत, यासाठी राजसत्ता निर्माण झाली. आता चांगले आणि वाईट हे ठरवायचे कोणी? याबद्दल प्रत्येकाचे मत हे वेगळे असू शकते. मग ज्याचे बळ जास्त असेल तो आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करायला लागला. राजसत्ता बलवान होतीच; पण धर्म कोणता स्वीकारायचा तेही राजसत्तेनेच ठरविण्याचा आग्रह धरला आणि या हट्टासाठी सर्वसामान्यांवर इतिहासात अनन्वित अत्याचार झाले आहेत व अजूनही होत आहेत.
राजसत्तेने धर्माच्या नावावर अत्याचार करू नयेत, यासाठी निधर्मी राज्याची संकल्पना निघाली. ईश्‍वराशी तुमचे संबंध कसे असावेत ते तुम्ही ठरवावे आणि इतर लोकांशी तुम्ही कसे वागायचे ते राजसत्ता ठरवील. पण, पहिल्या दोन संकल्पनांप्रमाणेच ही संकल्पनाही प्रत्यक्ष व्यवहारात कधी उतरू शकलेली नाही. लोकशाहीची संकल्पनासुद्धा आपण फोल ठरवून दाखविली आहे. लोकांची मते मिळवून एकदा सत्ता मिळविली, की पुढल्या निवडणुकांपर्यंत लोकांची पर्वा करण्याचे कारण नाही असाच सर्व राजकारण्यांचा दृष्टिकोन असतो. सत्य, अहिंसा आणि शांती यांचा उद्घोष करीत तथाकथित धार्मिक लोकांनी उच्छाद मांडलेला असतो आणि सर्वसामान्य जनता ते सहन करीत राहते. स्वार्थ हा मानवी स्वभावाचा पाया आहे. जराही संधी मिळाली, की तो डोके वर काढून सगळेच काबीज करायला पाहतो. खर्‍या धार्मिक माणसाने असे कधीच होऊ द्यायचे नसते. आपल्या विश्‍वात योग्य ती व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपली आहे. तसे जर झाले नाही, तर त्यासाठी इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो. आपली धर्मतत्त्वांवर श्रद्धा असेल, तर आपण ती पाळायचीच आणि शक्य तितकी इतरांनाही पाळायला लावायची; पण त्यात जोर जबरदस्ती असता कामा नये. महात्मा गांधींचे सत्याग्रहाचे तत्त्व हेच होते. अगदी शत्रूचेसुद्धा मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा; पण ते जमले नाही, तर त्याला त्रास देण्याऐवजी आत्मक्लेशाचा मार्ग पत्करायचा. आता हाच मार्ग सर्वांना पटायला हवा असे नाही; पण काहीही झाले तरी हिंसेचा मार्ग चोखाळायचा नाही, हे तरी सर्वांनी मान्य करायला हवे. दुसर्‍या महायुद्धानंतर युनायटेड नेशन्स ही संकल्पना या प्रयत्नातूनच जन्माला आली; पण त्या प्रयत्नालाही फारसे यश येताना दिसत नाही.
धर्म आणि अध्यात्म यांतला फरक ओळखायला हवा. धर्म हा सर्वांनी पाळण्यावर अवलंबून असतो. काहींनी पाळला आणि इतरांनी नाही, तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणूनच एका संताने म्हटले आहे, की ‘मजहब मरेंगे, दिन रहेगा.’ म्हणजे सारे धर्म नाहीसे होतील; पण अध्यात्म मात्र शिल्लक राहील. इतरांची वागणूक सुधारेल तेव्हा सुधारो, मी स्वत:वर ताबा ठेवीन असा प्रयत्न करीत राहिले तरी पुष्कळ साधता येईल.
इतका अत्याचार का होत आहे, हा प्रश्न मनात उभा राहतो, ही फारच चांगली गोष्ट आहे. पण, हे सुधारण्यासाठी मी काय करायला हवे आहे, ते मी करतो आहे की नाही, याचा विचार करण्याइतकी जागरूकता आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवी. आपली पिढी आणि पुढली पिढी यांच्यावर आपण आपल्या वागण्या-बोलण्याने संस्कार करीत असतो. त्यांच्या दृष्टिकोनावर थोडाफार तरी परिणाम होत असतो. तो संस्कार चांगला व्हावा, हे पाहण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ती व्यवस्थित पार पाडायला हवी.
परमतसहिष्णुता हाच या समस्येवर उपाय आहे. आपलेच मत बरोबर आणि दुसर्‍याचे ते चुकीचे, हा भाव पोरकटपणाचा आहे. तो विचारवंतांनी आधी टाकून द्यायला हवा म्हणजे मग सामान्य माणसांचीही तीच धारणा होईल. आपले मत इतरांवर लादण्याच्या प्रयत्नामुळेच इतकी अशांतता माजली आहे. यासाठीच अध्यात्माची गरज आहे. अध्यात्म आपल्याला स्वत:वर नियंत्रण राखायला शिकवते. हे नियंत्रण साध्य झाले, की इतरांशी संबंध आपोआपच चांगले राहायला लागतात. आयुष्याला अध्यात्माच्या विचारांचा पक्का पाया असला, तरच मानवजात प्रगती करू शकेल अन्यथा नाही. आपल्या भारताच्या संविधानात सर्व धर्मीयांना सारखेच अधिकार दिले गेले आहेत ते याचसाठी. निदान आपल्या देशात तरी असहिष्णुता नाहीशी करण्याचे प्रयत्न होत राहायला हवेत, असे वाटते. मला वाटते, की जगात सार्‍याच माणसांनी एकाच विचाराचे आणि मताचे असावे, असे साक्षात ईश्‍वरालासुद्धा मान्य नसावे, नाही तर त्याने आपल्या मेंदूमध्येच तशी योजना करून टाकली असती. निरनिराळे विचार आणि मते पचवून प्रगती साधणे, हेच तर मानवजातीपुढील खरे आव्हान आहे. त्याला यशस्वीपणे तोंड दिले तरच भविष्य आहे, नाही तर सर्वनाशच पुढे दिसतो आहे. 
गेले वर्षभर हे सदर लिहिले, याचा मला खूपच फायदा झाला. आपल्याला हवे असेल ते आपण लिखाणामधून मांडतोच; पण ते स्वगत भाषणासारखे असते. प्रश्नोत्तरांमधून जो संवाद साधला जातो, तो अधिक महत्त्वाचा. कारण त्यातून अभ्यासासाठी आणि चिंतनासाठी नवे मुद्दे मिळत जातात. त्यामुळे त्यातून लेखक आणि वाचक या दोघांनाही विचारांच्या प्रगल्भतेकडे जाणे शक्य होते.  
नव्या वर्षांसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा..!!!
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)