शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जट्रोफा  आणि विनायकराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 07:00 IST

विनायकराव पाटील यांचे जट्रोफाच्या शेतीचे अनुभव गेले दोन रविवार ‘मंथन’मध्ये वाचले आणि एक तळमळीचा, दूरदृष्टीचा, ‘हाडा’चा शेतकरी किती दूरवर पाहू शकतो, हे जाणवून विनायकरावांच्या हिमतीचे विशेष वाटले.

-

विनायकराव पाटील यांचे जट्रोफाच्या शेतीचे अनुभव गेले दोन रविवार  ‘मंथन’मध्ये वाचले आणि एक तळमळीचा, दूरदृष्टीचा, ‘हाडा’चा शेतकरी किती दूरवर पाहू शकतो, हे जाणवून विनायकरावांच्या हिमतीचे विशेष वाटले. असे प्रयोग करण्याला अनुकूल वातावरण नसताना त्यांनी ही यातायात केली होती. आता परिस्थिती फार नसली, तरी थोडी बदलते आहे, असे म्हणावयास वाव आहे.

मुळातच आपल्या सरकारांची वृत्ती जुन्या चाकोरीतून गाडा (कसा का असेना) चालता ठेवण्याकडे असते. त्यात सामाजिक स्तरावरही वातावरण प्रयोगानुकूल नाही. कारण यशाचा उदंड गौरव आणि अपयशाची नुसती भीतीच नाही, तर जणू सामाजिक लांच्छनच! तेव्हा इतरांवेगळे करायला कोणी गेले, की त्याची फार ऊर्जा आधी विरोधी वातावरणात स्वत:ची ऊर्मी जिवंत टिकवून धरण्यातच खर्ची पडते. त्यात शेतीत प्रयोग म्हणजे आणखीच अवघड.

- अशा पार्श्वभूमीवर विनायकरावांनी केलेली धडपड वाचताना खरेच विशेष वाटले.

जट्रोफापासून केलेल्या इंधनावर विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी झाल्याच्या बातम्या आल्यावर आता पुन्हा एकवार या पिकाकडे शेतकर्‍यांचे लक्ष जाईल असे दिसते.एकूणच इंधन दरांचा भडका उडाल्यावर तरी काही पर्यायी व्यवस्थेचा विचार आपल्या देशात गांभीर्याने सुरू होईल, अशी आशा धरायला जागा दिसते.

शेतीमधली प्रयोगशीलताही आता अन्य पर्याय संपल्याने का असेना, आपल्याकडे मूळ धरू लागली आहे, हेही तसे चांगलेच चिन्ह! मात्र इंधनानुकूल पिकांच्या संबंधात मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन आणि त्याही आधी माहितीचा पुरेसा प्रसार होणे मला गरजेचे वाटते. सरकारी कृषी खात्यांनीही याबाबतीत ‘एक खिडकी योजना’ सुरू करून तसेच हेल्पलाईन चालवून शेतक-याच्या जिज्ञासेला योग्यवेळी खतपाणी घालण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या दिशेने प्रयत्न चाललेले दिसतात. त्या प्रयत्नांना स्थानिक स्तरावर योग्य ती जोड मिळणे आवश्यक आहे.

- आणि मुख्य म्हणजे त्या प्रयत्नांमध्ये विनायकराव पाटलांसारख्या मातीत पाय आणि हातही असलेल्या प्रयोगशील ज्येष्ठ व्यक्तींनाही सामावून घेतले पाहिजे.

- राजशेखर हिरे, भंडारा 

वाचकांचे विचार, प्रतिक्रिया, वाद आणि प्रतिवादांसाठी : manthan@lokmat.com