शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नाटकवाल्यांच्या कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 06:00 IST

राजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी  लिहिलेल्या या कविता आहेत.  त्यात एकटेपण, तुटलेपण जसे आहे, तसे  विस्कटलेपण आणि गवसलेपणही आहे.  मराठी काव्य परंपरेला जोडणार्‍या आणि  नवतेचा शोध घेणार्‍या या कविता आहेत.

ठळक मुद्देया कविता नाट्यपूर्ण आणि नादमय आहेत. या नाट्यमयता असलेल्या कवितांमध्ये काही स्वगतं आहेत, काही संवाद आहेत, विराम आहेत, विविध पात्न आहेत तर काहीवेळा विधानंही आहेत. काही कविता या चक्क नाट्यप्रवेशासारख्या आहेत तर काही नाट्यछटेसारख्यासुद्धा !

- अतुल पेठे

नाटककार राजीव नाईक, नाट्यदिग्दर्शक रवींद्र लाखे आणि लेखिका, अनुवादक तसेच अभिनेत्नी माया पंडित या तिघांच्या कवितांचे स्वतंत्न संग्रह मागील वर्षात आलेले आहेत. त्यांच्या  कविताबिविता, संपर्क क्षेत्नाच्या बाहेर,  अवस्थांतराच्या कविता आणि तल्खली या चारही काव्यसंग्रहांकडे मी समीक्षक या नात्याने पहात नाही हे प्रथम स्पष्ट करतो. तर या तीनही कवींच्या कविता मला कशा आणि का भावल्या ते सांगायचा प्रयत्न करणार आहे. हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी लिहिलेल्या या कविता आहेत. त्यात जसे एकटेपण, तुटलेपण आणि विस्कटलेपण आहे तसेच गवसलेपणही आहे. या तिघांच्याही कविता मराठी काव्य परंपरेला जोडणार्‍या आणि नवतेचा शोध घेणार्‍या आहेत. हे कवी ज्या विस्कळीत आणि अघटित काळाचे प्रतिनिधी आहेत, ते त्या काळाचे दर्शन मोठय़ा जबाबदारीने आणि ताकदीने त्यांच्या त्यांच्या कवितांतून घडवताना इथे दिसत आहेत. त्यांच्या या कविता नाट्यपूर्ण आणि नादमय आहेत. या नाट्यमयता असलेल्या कवितांमध्ये काही स्वगतं आहेत, काही संवाद आहेत, विराम आहेत, विविध पात्न आहेत तर काहीवेळा विधानंही आहेत. काही कविता या चक्क नाट्यप्रवेशासारख्या आहेत तर काही नाट्यछटेसारख्यासुद्धा ! आता हे तीनही कवी नाटकवाले असल्याने त्यांच्या कवितांवर नाट्यमयता साधण्याचा परिणाम झालेला आढळतो.राक्षस, पर्‍या, देव आणि भुतंखेतं एकाच पंक्तीला जेवायला बसलेली आणि माझ्या हातांत वाढायची भांडी. नव्हत्याचं होतं झालेलं थोडं अप्रूप वाटलेलं (कविताबिविता - राजीव नाईक)

गाढवं ओझं वाहताना   पाहिली आहेस कधी?पाठीवर ओझं पडलं की   चालायला लागतात.. हा त्यांचा गुण   अवगुण ठरवला गेला.. तो कोणी ठरवला तर   माणसांनी. (संपर्क क्षेत्नाच्या बाहेर - रवींद्र लाखे)

आगीनंतर काय होतं? जळलेल्याचं जातं !खाकपण हेच उरतं नसलेल्यांशी नातं.चटका बसलेले हात, धगीत पोळलेली पातवणवलेल्या जंगलावर धुराचे फिरावे हाततसे तुम्ही विचारता, काय बिघडलं आतल्याआत?(तल्खली - माया पंडित)

तसेच राजीव नाईक आणि रवींद्र लाखे यांच्या काही कवितांमध्ये नाटकाची भाषाही आढळते. उदाहरणार्थ -

पहिल्या बॅटनपासून शेवटच्या बॅटनपर्यंतस्पॉट्सची संख्या कशी कमी कमी होत गेलेलीत्यात, पुढे पुढे करणार्‍यालाफुट्स, एफओएचचा भरणा जाऊदे, मागेच बरं प्लॅटफॉर्मचा सहारा आणि कट -लाइट्सची साथ.(कविताबिविता - राजीव नाईक)

अल्झायमर झाल्यावरलेखकाने लिहिली एक संहिता.तरुण रंगकर्मी वाचताहेत ती.भंबेरी उडते आहे वाचताना.दिग्दर्शक नट नेपथ्यकार प्रकाशयोजनाकारयांना कळत नाहीयेकुठले भान ठेवावे जागरूक स्वत:चे की लेखकाचे?(अवस्थांतराच्या कविता - रवींद्र लाखे)

आता हे तीनही संग्रह ज्या क्र माने वाचले त्या क्र माने मी आता त्यांच्यावर लिहीत आहे. प्रथम राजीव नाईक यांच्या कविताबिविता या काव्यसंग्रहाविषयी बोलू. आता कविताबिविता हा शब्द वाचताच मनात येतं की बिविता ही भानगड काय? कविता आपल्याला माहीत असतात; पण बिविता कुठे असतात? तर हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर लक्षात येतं की, कविता आपण वाचतो आणि बिविता आपल्या मनात उमटतात.करताकरविता  करवतो कवितासृष्टीच्या  समष्टीच्या  संचिताच्या.होय - नाही म्हणताहोऊन जातात बिवितात्याच्या  तिच्या  त्यांच्या.(गंमत म्हणजे संपर्कक्षेत्नाच्या बाहेर या रवींद्र लाखेंच्याकाव्यसंग्रहात बिविता याच नावाने कविता आहे.) या  बिवितांमुळे वाचकाला त्याचा स्वत:चा अवकाश मिळतो. नाटक पाहताना प्रेक्षकाने एकरूप होण्यापेक्षा अलिप्त होऊन पहाणे म्हणजे शहाणे होणे, हे जसे मानले जाते तसेच इथे कवितांबाबत होते.आयुष्याचा अवधी एका विचाराएवढाच असतो  खरं तर खोटं तर अशा अनेक क्षणांचं मिळून होतं आयुष्यचांगल्या नाटकाचा आणखी एक गुण म्हणजे जगण्यातील क्षणिक अद्भुततेला ते नाटक स्पर्श करते. हा गुण राजीव नाईक यांच्या कवितेत ठायी ठायी आढळतो. ही अद्भुतता जगण्यातले नवे प्रांत दाखवते. त्यातूनच आयुष्य विस्तारते. वाचक विचार करू लागतो. या संवादात भाषा महत्त्वाचा घटक आहे. मराठी नाटक करताना मराठी नाटकातील भाषा नादमय वजनाने बोलणे आपण कायमच महत्त्वाचे मानत आलो आहोत. राजीव नाईकांच्या कवितेमध्ये हे नादमय भाषेचे भान दिसते. कविताबिविता - मौज प्रकाशन / संपर्क क्षेत्नाच्या बाहेर आणि अवस्थांतराच्या कविता - कॉपर कॉइन प्रकाशन / तल्खली - शब्द प्रकाशन

atulpethe50@gmail.com(लेखक प्रयोगशील रंगकर्मी आहेत.)

(उत्तरार्ध पुढच्या अंकात)