शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाच्या आयोजनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:57 IST

नयनतारा सहगल यांना यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावून आणि पुन्हा येऊ नका, असे सांगून जी घोडचूक ...

नयनतारा सहगल यांना यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावून आणि पुन्हा येऊ नका, असे सांगून जी घोडचूक करण्यात आली आहे, ती खरोखरच निंदनीय आहे. आजपर्यंतच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वाद झाले नाही नाहीत, असे नाही. वाद हे सुसंस्कृतपणाचे लक्षण निश्चितच आहे; परंतु ज्या कारणासाठी हे वाद झालेत, ते कारण लक्षात घेतले असता असे प्रसंग पुन्हा पुन्हा जर उद्भवू द्यायचे नसतील, तर मराठी लेखक, साहित्य संस्था, मराठी पत्रकार, संपादक आणि मराठी माणसाने आता संमेलनाच्या आयोजनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही कोणत्या तरी राजकीय व्यक्तीची किंवा एखाद्या शिक्षण सम्राटाच्या हातची बटीक बनली आहेत. धनिक लोकांच्या पुढाकाराखाली किंवा राजाश्रयाखाली ही संमेलने आयोजित होतात, ही बाब आता लपून राहिली नाही. या संमेलनांचा जो स्वागताध्यक्ष असतो, तो त्याच्या विचारसरणीनुसार त्या त्या संमेलनावर आपली प्रतिमा उजळविण्यासाठी स्वत:ची छाप पाडू इच्छित असतो. त्याच्या विचारसरणीच्या विरोधात जर कोणी बोलणार असेल, तर साहजिकच स्वागताध्यक्षांना मिरच्या या झोंबणारच!यवतमाळमध्येसुद्धा नेमके हेच घडले आहे; परंतु या विषयावर कोणी उघड उघड बोलत नाही. संमेलन उधळून लावू किंवा इंग्रजी भाषेची लेखिका संमेलनासाठी उद्घाटक कशाला बोलावली किंवा या संमेलनावरचा खर्च हा अनावश्यक आहे.... असा जो प्रचार करण्यात आला, तोच मुळात या संमेलनासाठी विघ्न आणण्यासाठीच, वाद घालण्यासाठी करण्यात आला.मराठी माणसाला वाद करायला आवडते आणि साहित्य संमेलन हे त्याच्यासाठी उत्तम असे केंद्र असते. फक्त योग्य टायमिंग हे साधता आले पाहिजे.... हे गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांनी साधले आहे.अंबानीने स्वत:चा मुलीच्या लग्नात शंभर कोटी रु. खर्च केले तर कोणी बोलणार नाही. एखाद्या नटीने तिच्या लग्नावर कोट्यवधी रुपये खर्च केले तर कोणी बोलणार नाही... एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय अधिवेशनावर १०० कोटी रुपये खर्च झाले तर कोणी बोलणार नाही...परंतु मराठी साहित्य संमेलनावर दीड-दोन कोटी रुपये खर्च होत असतील तर आगपाखड केली जाते, हेही वास्तव आहे.बंगाल, कानडी, तेलुगू भाषिक त्यांच्या त्यांच्या भाषेच्या उत्सवावर त्या त्या ठिकाणचे सरकार आठ-दहा कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात; पण मराठी भाषिकांच्या संमेलनावर २५ ते ५० लाख रुपये शासनाने दिले तर सरकारी भीक घेऊन संमेलन भरविता, अशा शब्दात विरोध केला जातो. बारा कोटी मराठी जनतेचा भाषिक उत्सव म्हणून आपण या संमेलनांकडे बघितले पाहिजे.१९९९ ला मुंबईमध्ये भरलेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळेस वसंत बापट संमेलनाध्यक्ष असतानाच राजकीय राजाश्रयाशिवाय जर संमेलने यशस्वी करावयाची असतील, तर स्वतंत्र संमेलन निधी कोष उभा करण्याची संकल्पना मांडली गेली. या संमेलन कोष निधीच्या संकल्पनेचे सर्व स्तरांतून स्वागत झाले... एक-दोन वर्षे उत्साह राहिला... मराठी माणसांचे योगदान या बाबतीत कासवगतीचे राहिले. गेल्या वीस वर्षांत हा संमेलन निधी १ कोटी २१ लाखांच्यावर गेला नाही. खरंतर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एक रुपया जरी या कामासाठी दिला असता, तर दहा कोटींच्या घरात मराठी माणसांचा संमेलन कोष निधी जमविला असता. मग आजच्यासारखे कोणासमोरही हात न पसरविता हा भाषेचा उत्सव सहज साजरा करता आला असता. राजकीय वर्तुळातील व्यक्तींना स्वागताध्यक्ष न करतासुद्धा महामंडळाला मराठी संमेलन आयोजित करता आले असते; परंतु लाख लाख रुपये पगार घेणाऱ्या मराठी प्राध्यापकांनी ना मानधन नाकारले ना या संमेलनांच्या निधीला भरभरून सहकार्य केले.बारा कोटींच्या महाराष्ट्रामध्ये दहा कोटी रुपये उभे करणे कठीण नव्हते; परंतु इच्छाशक्तीचा अभाव आणि आव्हानाला प्रतिसाद न देण्याची मराठी मानसिकता याला कारणीभूत आहे. येथून पुढे प्रत्येक संमेलनामध्ये राजकीय हस्तक्षेप जर होऊ द्यायचा नसेल, तर मराठी साहित्य संमेलनासाठीच्या कोषामध्ये भर पाडणे हा उपक्रम सर्वांना आपला वाटला पाहिजे. कारण दरवर्षी अशा वादांमध्ये संमेलन रंगणार आहे, हे थांबवायचे असेल आणि संमेलन खºया अर्थाने स्वयंपूर्ण करायचे असेल आणि संमेलनांमधील राजकीय पक्षांचा हस्तक्षेप किंवा मोठ्या पैसेवाले मंडळींच्या हाताखाली संमेलन जर जाऊ द्यायचे नसेल, तर संमेलन निधी कोष उभा करणे, हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढचे मुख्य ध्येय हवे. मराठी माणूस स्वत:च्या उत्सवासाठी जोपर्यंत संमेलन कोष निधी दहा कोटींपर्यंत येत नाही व त्याच्या व्याजावर संमेलनांचा खर्च भागत नाही, संमेलन ही तात्त्विक व गंभीर चर्चा करण्यासाठी असतात ही भावना वाढीस लागत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने विवेकाचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न करण्यात येईल.- नरेंद्र लांजेवार

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAkolaअकोलाcultureसांस्कृतिक