शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

पिच्चर

By admin | Updated: May 16, 2015 13:47 IST

एका बुटक्या कमानीतनं भिंतीला पाठ चिकटवून एकेकानं सटकायचं. आत सगळीकडे अंधार. हळूच पाठीवर झोपायचं आणि हूं की चूं न करता त्या अवस्थेतच अडीचएक तास पिक्चर बघायचा. कुणाला पत्ताच लागायचा नाही!

- चंद्रमोहन कुलकर्णी
 
थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणो ही तेव्हा दुर्मीळ गोष्ट होती. तेवढय़ासाठी घरनं पैसे (हो, पैसेच! रुपया ह्या चलनापर्यंत सिनेमाचा तिकीटदर पोचला नव्हता!) मागून घेण्याइतकं ते सोपंही नव्हतं. 
नवे कोरे करकरीत पिक्चर (बोली भाषेत : पिच्चर!) स्वस्तात बघायचे तर एक उपाय होता:
- मिलिटरी थिएटर!
दर महिन्यातला कुठलातरी एखादा ठरावीक वार. 
रात्री आठच्या सुमाराला जेवून, खिशात चार आणो घेऊन दोघा-चौघांनी निघायचं. गळ्यात गळे, शिट्टय़ा वाजवत, निवांत, रमतगमत. 
अंगावर शाळेचाच टिपिकल युनिफॉर्म. पांढरा (घरी आल्यावर आउट केलेला) इनशर्ट, तीच ती गुडघ्यापर्यंतची सुप्रसिद्ध खाकी अर्धी चड्डी!
घोरपडे पेठेतून शंकरशेट रोड. पुढे अप्सरा टॉकीजच्या रस्त्यावरनं गोळीबार मैदान. 
मिलिटरी एरिया सुरू. ट्रॅफिक बिलकूल नाही. आजच्याएवढं तर नाहीच. एखाददुसरा मिलिटरीचा ट्रक, रिक्षा एखादी. रायफलवाले, बारीक केसांचे, मोठय़ा मिश्यांचे सैनिक, अधूनमधून!
त्यांच्या नजरेला नजर न देता जीव मुठीत धरून पुढे पुढे जात राहायचं.
एकदोन बराकी ओलांडल्या, की मिलिटरीची मेस असते तसा एक मोठा दगडी बांधकाम असलेला कौलारू हॉल लागायचा. अंधार वाढवणारा रहस्यमय लाइट.
वाकून, कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीनं हळूहळू पळत पण सावधपणानं एका ठरलेल्या खांबापाशी जायचं. 
सगळ्यांचे चार चार आणो एकाकडं जमा केलेले असायचेच. 
सिव्हिल कपडय़ातल्या एका बुटक्या माणसाच्या मुठीत कुणीतरी एकानं ते हळूच सारायचे.
हिशेबात गडबड न करता ठरलेली सगळी रक्कम इमानदारीत द्यायचीच.
एका बुटक्या कमानीतनं एकेकानं पुढे सटकायचं, ते भिंतीला पाठ चिकटवून सरकत सरकत एका मोठय़ा दरवाज्याच्या आतच.
आत म्हणजे थिएटरमध्येच, डायरेक्ट!
सगळा अंधार. 
आतमध्ये गेलं की पुन्हा वाकायचं आणि हळूच पाठीवर झोपायचं आणि त्या अवस्थेतच थोडं थोडं सरकून घ्यायचं. 
सगळे आलेत, हा अंदाज आपोआप येतच असे.
पाठीवर झोपायचं कारण म्हणजे बसायला खुर्ची वगैरे काही नाही, झोपूनच अडीचएक तास पिक्चर बघायचा.
लक्षात आलं ना?
सांगतो. 
पडदा. 
त्याच्यापुढे सहाएक फूट, प्लॅटफॉर्मसारखी रिकामी जागा. 
ह्या जागेवर आम्ही पडद्याकडे मुंडय़ा करून उताणो झोपलेलो. आमच्या मागे आमची मुंडकी दिसणार नाहीत इतक्या उंचीचा कठडा. त्याच्या मागे सगळं थिएटर. सगळ्या खुच्र्या भरलेल्या, मिलिटरी मेन, त्यांच्या बायका, ऑफिसर्स वगैरे!! 
- पुढे ही चारपाच पोरं झोपून पिक्चर बघतायत ह्याचा कुणाला पत्ताच लागायचा नाही. 
इंटरव्हल बाकीच्यांना. आम्हाला नाही. पाणी पिणो आणि बाहेर टाकणो दोन्ही नाही. आजच्यासारखी बिसलरी वगैरे प्रकरणं काही नव्हती. आणि असती तरी ते तसलं पाण्याची बाटली सोबत  वगैरे नेणं शामळूपणाचं! 
-आणि त्या बुटक्यानं घरीच हाकललं असतं.
अशा अवस्थेत एकमेकांशी एक अक्षरसुद्धा न बोलता पूर्ण वेळ पिक्चर बघायचा. 
गाणी, डायलॉग, मुख्यत: डान्स (जितेंद्र ना!!) व्यवस्थित एन्जॉय करायचा.
सगळं थिएटर रिकामं झाल्याशिवाय हूं की चूं न करता गप्प पडून राहायचं. 
शांतता प्रस्थापित झाली की बुटक्या यायचा. एकदाच फक्त हातातली काठी जमिनीवर आपटून आवाज करायचा. 
.. सरकत सरकत उठायचं. 
कपडे झटकून येताना जे जे केलं, ते ते सगळं उलटय़ा क्रमानं करत करत बाहेर पडायचं, अंधार तुडवत, पिक्चरबद्दल एक अक्षरही न बोलता घरी.
आज सिनेमा म्हणजे ऐष. तिघांना पार्किगसह दोन पाचशे सहज लागतात!.
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)