शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट हरवला आहे?

By admin | Updated: November 7, 2016 10:55 IST

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र

 परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!एका स्थानिक शॉपिंग मॉलमधून माझी बॅग चोरीला गेली. या बॅगमध्ये माझा पासपोर्ट, लॅपटॉप आणि इतर काही मौल्यवान गोष्टी आणि कागदपत्रं होती. या पासपोर्टवर अमेरिकेचा व्हिसा होता. आता मला वकिलातीत हे कळवावं लागेल का? - हो, अर्थात आणि अवश्य. तुमचा पासपोर्ट आणि व्हिसा हरवला असेल तर हे तातडीनं अमेरिकन वकिलातीला कळवायला हवं. अमेरिकेचा व्हिसा बदलून मिळण्यासाठीही ही प्रक्रिया आवश्यक असते. ही प्रक्रिया अवघड वाटत असली तरी सुदैवानं ती खूपच सोपी आहे. यासाठी सर्वात प्रथम ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवावा. पोलिसांकडून ही घटना कशी घडली याच्या सविस्तर अहवालाची लेखी प्रत अवश्य घ्यावी. जर तुम्ही भारताच्या बाहेर आहात आणि तिथे ही घटना घडली तर तिथल्या भारतीय दूतावासात किंवा वकिलातीत घटनेची माहिती देण्यासाठी आणि व्हिसा बदलून मिळण्यासाठी संपर्क करावा. पोलिसांकडे गुन्ह्याची नोंदणी झाल्यानंतर अमेरिकेच्या वकिलातीला किंवा दूतावासाला तुमचा व्हिसा कुठे जारी झाला होता हे कळवावे लागते आणि पोलिसांच्या अहवालाची एक प्रतही द्यावी लागते. हरवलेला किंवा चोरीला गेलेला व्हिसा पुन्हा जारी होत नाही. अमेरिकेत प्रवास करण्यासाठी नव्यानं व्हिसा मिळवावा लागतो. जर तुम्ही अमेरिकेतच असाल तर जोपर्यंत तिथे आहात त्यासाठी नवा व्हिसा आवश्यक असतो. आणि जर तुम्ही अमेरिकेतून बाहेर पडला असाल तर पुन्हा नव्यानं त्या देशात प्रवेशासाठी नवीन व्हिसाची आवश्यकता असते. व्हिसा हरवला आहे अशी नोंद झाली की सिस्टिममधूनही तो रद्द होतो. अशी नोंद केल्यावर हरवलेला पासपोर्ट सापडला तरी नवीन व्हिसा मिळवणं आवश्यकच असतं. प्रवासात असताना/नसतानाही तुमच्या पासपोर्टवरच्या वैयक्तिक माहितीच्या पानाची, व्हिसाची आणि अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर तिथे मिळणाऱ्या अ‍ॅडमिशन स्टॅम्पची एक प्रत झेरॉक्स करून अवश्य ठेवावी. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत पासपोर्ट हरवल्यानंतरचा ताण बऱ्यापैकी कमी होतो.