शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

बाप्पा आणि मी :- चित्रकार सुभाष अवचट यांनी चितारलेलं दोघांमधलं नातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 06:00 IST

ठिपके जुळवले तरी त्यात तो दिसतो. फुलं-पानं मांडली तरी त्यात तो उमटतो. माती चिवडून तिचा गोळा हातात घेतला तरी त्याचा भास होऊ शकतो. तो गणपतीच!

-सुभाष अवचट

पंडित भीमसेन जोशी, मी आणि गणपती.. या तिघांमध्ये काही खास नातं असावं, अशी शंका तरी कुणाला येईल का?- पण ते आहे.

इतकं घट्ट की गणपती म्हटलं की मला भीमूअण्णा आठवतातच आठवतात आणि आठवणीतलं ते चित्रं नजरेसमोर उमटायला लागतं.

मी त्यांना भेटायला गेलो आहे.. ते म्हणतात, या, बसा बसा! मग कुठूनतरी एक कोरा कागद पैदा करतात. एक साधं बॉलपेन. एकाग्रपणे त्या कागदावर बिंदू-बिंदू काढण्याचं त्यांचं काम चालू आहे. एकीकडे गप्पा. मध्येच मान खाली घालून पुन्हा पुढला बिंदू.

तेवढय़ात वत्सलाबाई येतात. त्या येत-जात असतातच. भीमूअण्णा काय करताहेत याकडे त्यांची बारीक नजर आहेच. शेवटी त्या अस्वस्थ होऊन विचारतातच, अहो, हे काय करताय कागदावर?तोवर भीमूअण्णांनी ते बिंदू-बिंदू जोडून एक आकृती तयार केली आहे. ते हसत हसत वत्सलाबाईंना म्हणतात, अहो, चित्रकारांना द्यायला गणपती काढतोय!

- कागदावरचा आकार गणपतीचाच आहे!

हे इतकं मोकळंढाकळं रंग-रुप-आकार असलेला, नियम-अटी-आग्रह-सोवळं-दरारा-धाक यातलं काही म्हणता काही नसलेला, गप्पा मारतामारता सहज साकारता येणारा दुसरा कुठलातरी ‘देव’ आहे का?

ठिपके जुळवले तरी त्यात तो दिसतो.

फुलं-पानं मांडली तरी त्यात तो उमटतो.

माती चिवडून तिचा गोळा हातात घेतला तरी त्याचा भास होऊ शकतो.

तो गणपतीच!

आणि तो. त्याला अहो-जाहो करायचीही सक्ती नाही.

खांद्यावर हात टाकून मनातलं सांगावं, इतका जवळचा मित्रच जसा!प्रत्येक कलावंताचा तो आद्य-देव. गायक, वादक, नर्तक, चित्रकार सगळेच त्याच्याशी जोडलेले. त्याचं कारण गणपतीचं हे लोभस, आकर्षक रूप आणि मुख्य म्हणजे कशातूनही, कुठेही साकार होऊ शकणारा त्याचा आकार!हा आकार कसा आकाराला आला असेल, याचा विचार मी खूपदा करत बसलेलो आहे. कसलाही साचा, प्रमाण नसलेला नुसता रेघांचा भास. 

रेघा नसल्या तर रंगही पुरतात. त्यातलं काहीही नसलं, तर मग वस्तू नुसत्या जुळवत नेल्या तरी तो आकार साधता येतो.

ही जादूच नव्हे काय?

गणपती उग्र रुपातही असतो म्हणे. पण तो तंत्रपूजा करणा-याचा गणपती.सामान्यांचा गणपती हा दरवर्षी घरी येणारा, चौकातल्या मांडवात बसणारा, मुलांसोबत नाचणारा, त्यांच्या कॉमिक्समध्ये चक्क उडणा-बिडणारा मित्रच जसा. तो ज्ञानी आहे. गुरु आहे; पण रागीट, धाक घालणारा नाही. उलट असेल त्यात जुळवून घेणारा, जाताना डोळ्यात पाणी आणणारा लोभस पाहुणा आपल्या घरचा!

काही वर्षांपूर्वी मी मला भेटलेला गणपती एका चित्रमालिकेत रंगवला होता. चहा पिणारा, पुस्तक वाचणारा, कामगारांसोबत कष्टणारा, नटासोबत रंगमंचावर वावरणारा, दारात उभा असणारा.. असा तुमच्या-माझ्यासारखा गणपती! 

ती मालिका वादात सापडली, तो विषय वेगळा; पण माझ्या त्या चित्रप्रदर्शनाला आलेल्या एका बाईंनी माझ्याजवळ येऊन सांगीतलं होतं,  

‘अवचट, सध्या माणसाचा ‘देव’ करण्याचा जमाना आहे. अशा या विचित्र दिवसात तुम्ही देवातला ‘माणूस’ दाखवला, हे उत्तम केलंत!’

तेच गणपतीचं खरं वर्णन आहे.

देवातला माणूस!

- मला माझ्या कॅनव्हासवर जाता-येता भेटतो तो.

(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत)