शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध

By admin | Updated: June 2, 2016 14:02 IST

पाकिस्तानी कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणं तसं काही नवीन राहिलेलं नाही. पण अजूनदेखील त्यांना होणारा विरोध मावळलेला नाही. शिवसेना, मनसे यांसारख्या प्रादेशिक पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना आपला विरोध नेहमी उघडपणे दर्शवला आहे

ऑनलाइन लोकमत - 

पाकिस्तानी कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणं तसं काही नवीन राहिलेलं नाही. पण अजूनदेखील त्यांना होणारा विरोध मावळलेला नाही. शिवसेना, मनसे यांसारख्या प्रादेशिक पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना आपला विरोध नेहमी उघडपणे दर्शवला आहे. शिवसेना तर सत्तेत सहभागी असूनदेखील सरकारविरोधात भुमिका घेत आपलं मत मांडलं आहे. 
 
नुकतंच काही दिवसांपुर्वी पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना विरोध करण्यात आला होता. मात्र अशाप्रकारे विरोध करण्यात आलेले गुलाम अली पहिले कलाकार नाहीत. पाकिस्तानी अभिनेत्री माहिराचा चित्रपट बिन रोए याला महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शितदेखील होऊ दिलं गेलं नव्हतं. 
माहिरा शाहरुख खानचा चित्रपट रईसमध्येदेखील झळकणार आहे. याआधी पाकिस्तानातूनआलेला कॉमेडियन शकीलला देखील परत जावे लागले होते. शकीलला तर चित्रीकरणादरम्यानच तीव्र विरोधामुळे सेट सोडावा लागला आणि मुंबईदेखील. कॉमेडी शोमध्ये शकीलशिवाय रऊफ लाला आणि अनेक दुसरे पाकिस्तानी कलाकार आले, मात्र विरोधामुळे त्यांनाही परत जावे लागले. पाकिस्तान येथून आलेली व बिग बॉस अतिथी बनलेली विना मलिक हिलाही भारतातून परतावे लागले, तर मीरालादेखील अशाच विरोधाचा सामना करावा लागला. मीराला महेश भट्ट यांनी हिंदी चित्रपटात आणले होते. तिच्यासोबत नजर चित्रपट बनविल्यानंतर भट्ट तिला पुन्हा घेऊ इच्छित होते मात्र, विरोधामुळे महेश भट्ट यांना आपला विचार बदलवावा लागला. 
 
आपल्या कव्वालिसाठी जगभरात नाव कमविलेले नुसरत फतह अली खान यांचे पुत्र राहत अली खान यांच्या गायनास भारताच्या संगीतप्रेमींनी खूप पसंत केले, मात्र येथे होणार्‍या विरोधामुळे त्यांचे येणेही जवळजवळ बंद झाले आहे. राहत फतेह अली खान सध्या दुबईत जाऊन बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी गाण्यांचे रेकॉर्डिंग करीत असतात. पाकिस्तानचे आणखी एक गायक आतिफ असलम यांनादेखील विरोधामुळे भारतात येण्याचा विचार बदलावा लागला. 
 
अली जाफर सलग बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करीत आहे आणि त्याच्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीही अडचण आली नाही. खूबसूरत चित्रपटात सोनम कपूरचा नायक बनलेल्या फवाहद खानला देखील अशा समस्येचा सामना करावा लागलेला नाही. तो अजूनही बॉलिवूडच्या तीन चित्रपटांमध्ये काम करीत आहे.आणखी एक पाकिस्तानी कलाकार इमरान अब्बास विक्रम भट्टचा चित्रपट क्रिचरमध्ये दिसला होता. सध्या तो करण जोहरचा नवीन चित्रपट ए दिल है मुश्किल मध्ये काम करीत आहे.
 
नुकताच सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये 'भर दे झोली' गाणारे अदनान सामी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहेत आणि त्यांना कोणतीच अडचण आली नाही. गझल गायक गुलाम अली यांचा मुंबई येथे होणारा गझल गायनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे अखेर रद्द झाला आहे. परंतु असे पहिल्यांदाच झालेले नाही. गुलाम अली यांचा हा चौथा कार्यक्रम आहे, ज्याला शिवसेनाच्या विरोधामुळे रद्द करण्यात आले. पाकिस्तानकडून भारतात दहशतवाद पसरविला जात असल्यामुळे शिवसेना अनेक वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांना येथे चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करण्यास विरोध करीत आली आहे.