शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

निमित्त- स्टुटगार्डचे ख्रिसमस मार्केट ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 07:00 IST

ख्रिसमस आला, की युरोपमध्ये ऐन थंडीत सजू लागतात ख्रिसमस मार्केट. जर्मनीतील स्टुटगार्डचे वाईनचे मार्केट ऊर्फ ख्रिसमस मार्केट युरोपातील सुंदर आणि मोठ्या मार्केटपैकी एक असे समजले जाते. सध्या तेथे सजलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्केटविषयी...

- अनघा महाजन -डिसेंबर महिना सुरू होतो. थंडीची चाहूल लागते. गरम जॅकेट, टोप्या, हातमोजे कपाटातून बाहेर येतात. दिवस छोटा होतो. अंधार लवकर पडतो अन् चाहूल लागते ख्रिसमसची... लुकलुकत्या दिव्यांनी सजलेल्या ख्रिसमस मार्केटची. एरवी दिवाळी, दसरा आणि मराठी सण मिस करणारी आम्ही मराठी माणसे आता ख्रिसमस मार्केटची वाट पाहू लागतो. युरोपची ख्रिसमस मार्केट प्रसिद्ध आहेत. जगभरातून लाखो पर्यटकही छोटी-छोटी पारंपरिक पद्धतीनं सजवलेली मार्केट बघायला येतात. मी गेली १७ वर्षे जर्मनीत वास्तव्य करते. स्टुटगार्ड या बाडेन वुर्टेम्बर्ग या राज्याच्या राजधानीच्या गावात. स्टुटगार्डचे वाईनचे मार्केट ऊर्फ ख्रिसमस मार्केट युरोपातील सुंदर आणि मोठ्या मार्केटपैकी एक असे समजले जाते. येथील सर्वच लहान-लहान गावात ख्रिसमस मार्केट भरतात. स्टुटगार्ड गावाच्या मध्यभागात मार्केटप्लेस या ठिकाणी दरवर्षी हे ख्रिसमस मार्केट डिसेंबर महिन्यात २५ दिवस भरते. ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या मार्केटमध्ये सुमारे २९० झोपड्यांच्या आकाराचे अथवा पारंपरिक घरांच्या आकाराचे स्टॉल लागतात. प्रत्येक  स्टॉल सजवण्याची चढाओढ लागलेली असते. त्यामुळे अवघे मार्केट सजवल्यानं मनमोहक, सुंदर दिसते. कोणी या स्टॉलच्या छतावर बायबलमधील कथांची आरास केलेली असते किंवा कोणाच्या तरी छतावर सांताक्लॉज त्याच्या रेनडिअरच्या गाडीतून भेटवस्तू घेऊन आलेला असतो. लुकलुकत्या दिव्यांनी आणि पाईन वृक्षांच्या पानांनी सजवली जातात. प्रत्येक स्टॉलची मजाच न्यारी असते. दुकानदार मध्ययुगीन काळातील पारंपरिक कपडे घालून लाकडी खेळणी, कोरीव काम केलेल्या वस्तू, विविध आकारांच्या, रंगांच्या, सुगंधाच्या मेणबत्त्या थाटून बसतात. गिऱ्हाईकांना आग्रहानं बोलावून त्या वस्तूंची प्रात्यक्षिकं देत असतात. काही उत्साही दुकानदार लहान मुलांसाठी मेणबत्त्या तयार करणे, लाकडावरील कोरीव काम करतात. 

मार्केटची शोभा वाढविण्यात गायक-वादक मंडळीही हातभार लावतात. स्टेजवर दररोज ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ सादर करतात. काही कलाकार जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून आपलं वाद्य तल्लीन होऊन वाजवत असतात. रसिक त्यांच्याभोवती गोळा होऊन त्यांना दिलदार दाद देतात. ख्रिसमस मार्केटचे मुख्य आकर्षण आहे, येथील फूड स्टॉल. जर्मन ‘ग्ल्हुवाईन’ म्हणजे लवंग, दालचिनी, वेलदोडे आणि अजून काही गरम मसाले घालून उकळलेली रेड वाईन. ही गरमागरम सर्व्ह करतात. अशी तयार केलेली वाईन इतकी चवीष्ट असते, ती प्यायल्याशिवाय तिची ही आगळीवेगळी सुंदर चव समजूच शकणार नाही. ती फक्त ख्रिसमसच्या काळातच मिळते. ती प्यायल्याशिवाय या मार्केटमध्ये जाणे सार्थकी लागत नाही. ‘स्टोल्लन’ म्हणजे जर्मन केक हाही प्रकारचा ब्रेड, सुकामेवा आणि गरम मसाल्याचे पदार्थ घालून तयार केलेला असतो. ‘लेबकुचेन’ म्हणजे ‘जिंजर ब्रेड.’ ख्रिसमस मार्केटमध्ये हा हृदयाच्या आकाराचा केक मिळतो. त्यावर आयसिंग शुगरने नाव टाकून अथवा ग्राहकाला हवे ते लिहून विकले जाते. हौशी मंडळी आपल्या प्रियजनांची नावं टाकून हा हृदयाच्या आकाराचा जिंजर ब्रेड गळ्यात घालून फिरताना दिसतात. ग्रिल्ड सॉसेज, चॉकलेटने मढवलेली फ्रूट स्केवर्स, गार्लिक ब्रेड, प्रेट्झेल, वाईल्ड पोटॅटो विथ गार्लिक सॉस अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत आणि ‘ग्ल्हुवाईन’चा मग हातात घेऊन फिरत या ख्रिसमस मार्केटची सहल पूर्ण होते अन् ख्रिसमस सणाचा आनंदही द्विगुणित होतो...(लेखिका जर्मनीतील स्टुटगार्डच्या रहिवासी आहेत.)

टॅग्स :PuneपुणेChristmasनाताळ