शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

आता कुटुंब नियोजनही 'हायटेक'

By admin | Updated: July 26, 2014 12:58 IST

‘हायटेक टेक्नॉलॉजी’ने सगळे जीवनच व्यापून टाकले आहे. कुटुंब नियोजनासारख्या आतापर्यंत सर्वांनीच हात टेकलेल्या समस्येतही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. एक मायक्रोचिप शरीरात बसवली, की सलग १६ वर्षे गर्भधारणेची भीती नाही, असे संशोधन नुकतेच यशस्वी झाले आहे. यापूर्वीची कमी कालर्मयादेची, शस्त्रक्रियेशिवाय बसवता न येणारी साधने मागे पडून, या नव्या तंत्रज्ञानाने लोकसंख्या र्मयादित ठेवणे शक्य झाले आहे.

- डॉ. अविनाश भोंडवे

आपल्या देशातल्या आर्थिक समस्येचे, आरोग्य विषयक प्रश्नांच्या मूलभूत गरजा न भागविता येण्याचे मुख्य कारण आपली विपुल लोकसंख्या. या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी देशभर कुटुंबकल्याणाचा कार्यक्रम राबविला जातो. मात्र, महिलांमधील तांबी बसविण्याची भीती, शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज- यामुळे या प्रयत्नांना शंभर टक्के यश येत नाही. त्यात गर्भनिरोधक गोळ्या सतत वर्षानुवर्षे घ्याव्या लागतात. तांबी बसवली तरी तीन वर्षांनी ती काढावी लागते, ही र्मयादासुद्धा कारणीभूत ठरते.
परंतु, आता यासाठी संगणक विश्‍वातील महानायक बिल गेट्स आणि त्याच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या प्रोत्साहानाने बनवली गेलेली संगणकीय चिप वापरली, तर संतती नियोजनाचे काम खूप सोपे होणार आहे. मायक्रोसॉफ्टची ही चिप एकदा बसवली, की तब्बल सोळा वर्षे परत बदलायची गरज राहणार नाही. पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराची ही चिप अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यातील लेक्सिंग्टनमधील मायक्रोचिप्स या संस्थेने विकसित केली आहे. 
चिपच्या जन्माची कथा : ही चिप कशी जन्माला आली याची कथासुद्धा मनोरंजक आहे. २0१२ मध्ये बिल गेट्स आपल्या सहकार्‍यांसोबत एम.आय.टी. या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी विश्‍वविद्यालयात गेले होते. तिथे रॉबर्ट लँगर या तिथल्या मायक्रोचिपवर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांशी त्यांची भेट झाली. बोलता बोलता बिल गेट्स यांनी विचारणा केली, की संतती नियोजनासाठी स्त्रिया सहजतेने वर्षानुवर्षे वापरू शकतील, अशी एखादी चिप बनवता येईल का? या चिपचे काम एखाद्या रिमोट कंट्रोलने हवे तेव्हा थांबविता आले तर जास्त चांगले होईल, असेही त्यांनी मांडले. 
रॉबर्ट लँगरने १९९0 मध्येच अशा प्रकारे काही द्रव्ये प्रसृत करणार्‍या मायक्रोचिपचा शोध, मायकेल चिमा आणि जॉन सांटिनी या सहकार्‍यांसोबत लावला होता. प्रश्न होता तो फक्त ही चिप मानवी शरीरात बसवून, त्यातून काही औषध वर्षानुवर्षे प्रसृत करण्याचा. त्यांनी हे काम मायक्रोचिप्सवर सोपवले. त्यांनी दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर, हे संशोधन कार्य या महिन्यात  पूर्ण केले आणि जगातल्या कोट्यवधी स्त्रियांना दिलासा देणारे कुटुंब नियोजनाचे हे साधन विकसित केल्याचे जाहीर केले. मायक्रोचिप्स ही कंपनी लवकरच अमेरिकेच्या अन्न आणि औषध संचालनायची रितसर परवानगी घेईल. त्यानंतर या उपकरणाची विविध रुग्णांवरील चाचणी पुढील वर्षी सुरू होऊन साधारणत: २0१८ मध्ये ती जगातील सर्व महिलांच्या वापरासाठी उपलब्ध होईल.
चिपची कार्यपद्धती : दोन सें.मी. लांबीच्या आणि तेवढय़ाच रुंदीच्या या चिपची जाडी सात मि.मी. आहे. या चिपवर मध्यभागी दीड चौरस सें.मी. भागात लीव्होनॉरजेस्ट्रल हे औषधी द्रव्य घन स्वरूपात एका पातळ पापुद्रय़ाच्या आवरणात भरून ठेवलेले असते. त्यावर हर्मेटिक टायटॅनियम आणि प्लॅटिनम लावून ते पक्के सीलबंद करून टाकलेले असते. या चिपवर असलेल्या बॅटरीतून विद्युतप्रवाह  चिपमध्ये गेल्यावर ३0 मायक्रोग्रॅम औषध द्रव स्वरूपात निर्माण होते आणि ते स्त्रीच्या शरीरात उत्सर्जित होते. या पद्धतीने १६ वर्षे पुरेल एवढा साठा त्या चिपवर केलेला असतो. 
ही चिप छोट्याशा शस्त्रक्रियेद्वारे स्त्रीच्या दंडावर, कंबरेवर किंवा पोटावर त्वचेखाली बसवली जाते. या शस्त्रक्रियेला पूर्ण भूल द्यावी लागत नाही. फक्त जिथे चिप बसवायची तेवढी जागा लोकल इंजेक्शनने बधीर करावी लागते. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. 
डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये किंवा छोट्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे काम काही मिनिटांत करता येते. चिप बसवल्यावर सोळा वर्षांपर्यंत काढण्याची गरज नसते. त्यामधील लीव्होनॉरजेस्ट्रलमुळे स्त्रीला गर्भधारणा होत नाही. दरम्यानच्या काळात त्या स्त्रीला संतती व्हावी, असे वाटल्यास रिमोट कंट्रोलच्या साह्याने, शरीराच्या बाहेरून या चिपचे काम काही महिने बंद ठेवता येते. ती स्त्री गर्भवती राहून, यथावकाश तिची प्रसूती झाल्यावर, पुन्हा रिमोट कंट्रोल वापरून चिप पुन्हा सुरू करता येते. अशा तर्‍हेने चिप शरीरात ठेवल्यानंतर, पुन्हा तशाच छोट्या शस्त्रक्रियेने काही मिनिटांत काढता येते. त्यांनंतरही संतती नियमन करण्याची त्या स्त्रीची इच्छा असल्यास, नवी चिप त्याचवेळेस बसवता येते.
लीव्होनॉरजेस्ट्रलचे कार्य : लीव्होनॉरजेस्ट्रल हे प्रोजेस्टेरॉन या स्त्रियांच्या हॉर्मोनशी संबंधित असलेल्या वर्गातील औषध आहे. या औषधामुळे स्त्रीच्या बीजांडकोशातील स्त्रीबीज बाहेर पडत नाही. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज बीजांडकोषातून बाहेर पडून स्रीबीज नलिकेतून गर्भाशयाकडे यावे लागते. तिथे पुरुषाच्या शुक्राणूशी ते फलित झाल्यास गर्भधारणा होते. लीव्होनॉरजेस्ट्रलमुळे बीजांड कोषातून स्त्रीबीज बाहेरच न पडल्याने गर्भधारणा होण्याचे टळते. लीव्होनॉरजेस्ट्रलमुळे गर्भाशयाच्या आतील अस्तर तयार होण्याच्या प्रक्रियेवरदेखील प्रतिबंध येतो. त्यामुळे गर्भधारणा न व्हायला ते आणखीनच उपयुक्त ठरते. 
चिपचे फायदे : 
‘फिल इट, शट इट अँड फरगेट इट’ अशी पूर्र्वी एका मोटारसायकलची जाहिरात करायचे. या चिपचे काम तसेच आहे. एकदा बसवल्यावर सोळा वर्षे विचार करायचे कारण नाही. काही उपकरणे आणि साधने पाच वर्षांपर्यंत बसवता येतात. यांच्या तुलनेत या साधनाची सोळा वर्षांची र्मयादा लक्षणीय ठरेल.
कुठलीही शस्त्रक्रिया नसल्याने, त्यातील रुग्णाला असलेले धोके टळतात. कुटुंब नियोजनासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आजकाल बिनटाक्याची आणि सुलभ असते. रुग्णांना ती कमी त्रासदायक असते. तरीही अधूनमधून घडणार्‍या काही घटनांमध्ये रुग्णांच्या जीवाला धोका झाल्याचे वृत्त येत असते. चिप बसवण्यात हा धोका अजिबात नसतो.
शस्त्रक्रियेबद्दल रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मनात असलेली भीती यात उद्भवत नाही.
कुठल्याही विवाहित स्त्रीला लग्न झाल्यावर, प्रथम प्रसूतीपूर्वी ओरल काँट्रासेप्टिव्ह्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. पण, ती दर महिन्याला २१ दिवस अशी महिनोंमहिने घ्यावी लागते. यात एकही गोळी विसरली, की सगळेच मुसळ केरात, अशी वेळ येते. या पद्धतीत असे होत नाही.
अनेक काळ संतती नियमनाच्या गोळ्या घेतल्यास स्त्रियांचे वजन वाढणे आणि इतरही दुष्परिणाम होतात. या चिपमुळे हे परिणाम होत नाहीत.
रिमोट कंट्रोलने हवे तेव्हा या चिपचे काम थांबविता येत असल्याने, ती स्त्री आपल्या वैवाहिक आयुष्यात के व्हाही आणि कितीही वेळा संतती होण्याची संधी प्राप्त करू शकते.
काही आक्षेप : या नव्या चिपबाबत काही आक्षेप निश्‍चितच आहेत.
चिपमध्ये लीव्होनॉरजेस्ट्रलचा १६ वर्षांचा साठा बसविला जाणार आहे. एवढय़ा दीर्घ काळात या औषधाची परिणामकारकता टिकणार का?
प्रत्येक औषधाची एक कालर्मयादा असते. त्यानंतर ते एक्स्पायर होते. या चिपमधील औषधाच्या एक्सपायरीची मुदत काय? एवढय़ा काळात ते एक्स्पायर होणार नाही का?
लीव्होनॉरजेस्ट्रल हे औषध सध्या ‘इर्मजन्सी काँट्रासेप्टिव्ह’ म्हणून वापरले जाते. असुरक्षित शरीर संबंधामध्ये गर्भधारणा होऊ नये, यासाठी ते प्रचलित आहे. नेहमीच्या संतती नियमनाच्या गोळ्यात ते वापरू नये असा संकेत आहे, त्याबद्दल खुलासा होणे गरजेचे आहे.
बार्बिच्युरेट, कार्बामिझापिन, फेनिटोईन गटांतील अपस्माराची किंवा फिट्सची औषधे, ग्रिसिओफल्विन हे त्वचेच्या विकारातील औषध, एच.आय.व्ही.करिता असलेली औषधे अशा अनेक औषधांपैकी कुठल्याही औषधांसमवेत लीव्होनॉरजेस्ट्रल दिले गेल्यास, या औषधांच्या प्रभावाखाली त्याचे कार्य कमी होते. अशावेळेस गर्भधारणा राहू शकते. हे आजार त्या स्त्रीला चिप बसवल्यानंतर झाल्यास हा प्रसंग नक्कीच उद्भवू शकतो.
लीव्होनॉरजेस्ट्रल या औषधामुळे पाळीच्या नियमितपणात बदल होतो. मध्येच अंगावरून जास्त जाणे, स्पॉटिंग होणे असे त्रास होतात.
अनेक स्त्रियांना लीव्होनॉरजेस्ट्रल घेतल्यावर उलट्या, मळमळ, जुलाब होणे, चक्कर येणे, डोके जड व बधीर होणे, खूप थकवा येणे, स्तनांमध्ये खूप वेदना होणे असे साइड इफेक्ट्स होतात. या प्रकारच्या महिला वर्गाचे काय? त्यांना ही चिप बसवल्यावर लगेच काढून टाकावी लागेल.
कुठल्याही औषधाप्रमाणे या औषधालादेखील अँलर्जी किंवा मोठी रिअँक्शन येऊ शकते. ही चिप बसविण्याआधी त्या स्त्रीमध्ये लीव्होनॉरजेस्ट्रलची टेस्ट करणे आवश्यक ठरेल.
विवाहित महिलांना ही चिप नक्की उपयुक्त ठरेल, पण सेक्सवर्कर्स आणि विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या स्त्री-पुरुषांना याचा जास्त फायदा होईल, असा आक्षेप काही नामवंत समाजशास्त्रज्ञांनी घेतला आहे.
या सर्व बाजूंचा विचार करून, या साधनामध्ये काही बदल केला गेला, तर जगातल्या असंख्य महिलांना ‘पाळी चुकली’ म्हटल्यावर जी मन:स्थिती होते त्यापासून निश्‍चितच सुटका होईल. त्याचप्रमाणे भारतासारख्या देशाला प्रचंड वेगाने वाढणार्‍या लोकसंख्येला आळा घालण्याकरिता एक अमोघ शस्त्र मिळेल, यात शंकाच नाही.
(लेखक फॅमिली फिजिशियन, इंडियन मेडिकल असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी पदाधिकारी आहेत.)