शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

निमित्त- समतेचा मंत्र देणारा संत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 06:00 IST

आज समाजात विषमता, रूढी, अंधश्रद्घा, परंपरांचे वेड, धार्मिक अहंकार, प्रांतवाद सर्वत्र बोकाळलेला आहे...

- डॉ. राम आबणे- आज समाजात विषमता, रूढी, अंधश्रद्घा, परंपरांचे वेड, धार्मिक अहंकार, प्रांतवाद सर्वत्र बोकाळलेला आहे. अजूनही कित्येकांना घर नाही, निवारा नाही, वस्त्र नाही, पुरेसे अन्न नाही. राज्यकर्ते आपापल्याच राजकारणात गुंग आहेत. म्हणून आजच्या काळात संत रोहिदास (इ.स. १३७६ ते १५२७) यांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्त्वांच्या विचारांची गरज आहे.जाती-जातींत विभागलेल्या समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे कार्य संत रोहिदासांनी केले. त्यांच्या जयंतीनिमित्त.. भक्तीची ध्वजा दक्षिणेतून हाती वागवत आचार्य रामानंद उत्तरेला प्रकटले आणि भेदाभेदांनी भग्न झालेल्या भयग्रस्त समाजमनास भक्तीचा आधार लाभला. रामानंदांच्या उदार वृत्तीत सारा समाज संघटित करण्याचे सामर्थ्य होते. उच्चनीचता, कृत्रिम बंधनांना झुगारून स्वामी रामानंदाचे संत सांगाती आत्मविश्वासाने पुढे सरसावले आणि भक्तीची चळवळ सगळीकडे सुरू झाली. उच्चनीचता या बंधनांना त्यांनी झुगारले. कोष्ट्याचा कबीर दुर्दम्य आत्मबलाने बोलू लागला. कसायाघरचा सदन टाळ-मृदंगाच्या गजरात रंगून गेला. धना जाटाची ब्रह्मानंदी टाळी लागली आणि संत रोहिदास भक्तीची बानी व दोेहे आाणि सारखी गाऊ लागला. या सर्व संतांची भक्ती पाहून सारा समाज त्यांचा जयजयकार करू लागला. शील, कर्तृत्व आणि उच्च प्रतीचा भक्तिभाव यामुळे रोहिदास संतपदाला पोहोचले. त्यांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण भारत जागृत केला. संत कबीर आणि गुरू नानकजी हे गुरू रोहिदासांचे समकालीन होते. गुरू रोहिदासांना कबीर गुरू व मोठे बंधू मानावयाचे गुरू गोरखनाथ व गुरू नानक हे रोहिदासांची कीर्ती ऐकून स्वत: त्याच्या भेटीस आले होते. नानक स्वत: संत रोहिदासांची गीते, भजने म्हणत असत. शीखांचा पवित्र ग्रंथ गुरुसाहिबमध्ये संत रोहिदासांची चाळीस पदे असून, त्यांच्या विचारधारेला या ग्रंथात आदराचे स्थान दिले आहे. सद्गुरू रोहिदासांची वाणी ही ब्रह्मज्ञानाचे विशाल असे भांडार आहे, की जे भारतीय समाजाला प्रकाश देणाºया गोळ्याचे कार्य करते. रोहिदासांचा काळ हा धर्मग्लानीचा होता. बहुतेक हिंदू राज्ये परधर्मीय आक्रमकांनी खालसा झाली होती. यज्ञयाग, व्रतवैकल्ये, जपजाप्य एवढ्यापुरतेच धर्मभावनेचे क्षेत्र आकुंचित बनले होते. कर्मठपणाचे अवास्तव बंड माजल्यामुळे नैतिक मूल्यांची चहाड राहिली नव्हती. उच्चवर्गीय सुखासीनतेची व भोगविलासाची प्रवृत्ती वाढली होती. अशा वेळी रोहिदासांना वाईट वाटले. जनतेच्या दु:खाला आपल्या शांत वाणीने सुखी करण्याचा आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केला. ते म्हणतात, ऐसा चाहौ राज मैंै, जहां मिलैै सब कौ अन्न।छोटे बडे सभ सम बसैै, रोहिदास रहैै प्रसन्न।।मला या देशात अशी व्यवस्था, असे राज्य हवे आहे, जेथे सर्वांना अन्न मिळाले पाहिजे. लहान-मोठे सगळे एकाच पंक्तीत बसायला पाहिजेत. त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हाच मला प्रसन्नता लाभेल, असा समाजवादाचा सिद्घांतच त्यांनी दिला. सद्गुरू रोहिदास यांची महत्ता अशी, की त्यांनी सर्वप्रथम नारीजातीला समान हक्क दिले आणि मानवतेच्या विरुद्घ विचारांना विरोध केला. नारीला भक्ती करण्याचा अधिकार नाही, असा समज त्या वेळेस होता. स्त्री-पुरुष समानता नव्हती. संत रोहिदासांच्या तत्कालीन अनेक राजघराण्यांतील राण्या त्यांच्या शिष्या बनल्या होत्या. यामध्ये मीराबाई, राणी झाला आदींचा समावेश होता. मीराबाईस सती जाण्यापासून परावृत्त करण्याचे कार्य संत रोहिदासांनी केले. थोडक्यात, त्यांचा सतीप्रथेस विरोध होता. संत रोहिदास हिंदू-मुसलमान या दोन्ही धर्मांना समान मानत होते. ते म्हणत-मंदिर मसजिद दोऊ एकं हैै, इन मंह अंतर नाही।रोहिदास राम रहमान का, झगडड कोड नाहि।।संत रोहिदासांच्या विचारधारेवर प्रभावित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संत रोहिदास यांचा अतिशय भक्तिपूर्ण असा पोवाडा लिहिला आहे. अशा वंदनीय संत रोहिदासांच्या सामाजिक विचारांना पुढे नेण्याची गरज आहे. (लेखक संतसाहित्याचे अभ्यासक असून, त्यांनी देशात सर्वप्रथम संत रोहिदासांवर पीएच. डी. मिळवली आहे.)

 

टॅग्स :Puneपुणे